मदत / मार्गदर्शन हवे आहे

nashik chivda's picture
nashik chivda in काथ्याकूट
21 Feb 2016 - 4:34 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी

मी मिपाचा गेल्या पाच वर्षांपासून मूक वाचक असून पहिल्यांदाच लिहण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा सांभाळून घेणे हि विनंती

मी नाशिककर सध्या नाशिक येथेच राहतो. आमच्या मायबाप कंपनीने आम्हाला पुण्यनगरी अर्थात पुणे येथे पोराबाळा सकट स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मला २ मुले असून त्यांच्या पुणे येथील शाळेच्या प्रवेशाची व शक्योतो शाळेच्या जवळपास आम्हाला राहण्याची व्यवस्था करणे आहे.
माझे कार्यस्थळ हे वाकडेवाडी येथे आहे.

१. शाळा - अपेक्षा
एस एस सी बोर्ड - इंग्लीश माध्यम - शक्योतो convent
माफक व रास्त फी
प्रवेश हवा आहे तिसरी व पाचव्या इयत्तेमध्ये ( येत्या शैक्षणिक व वर्षात )

२. राहण्याची व्यवस्था - अपेक्षा
शक्योतो शाळेच्या जवळपास - माफक/रास्त घर भाडे
दोन टू-विल्हर पार्किंग

तरी कृपया मदत / मार्गदर्शन करावे

पुढील पुणे कट्ट्याचा चाहता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Feb 2016 - 4:36 pm | प्रचेतस

मकाजी, कोंडाजी का माधवजी?

नाव आडनाव's picture

21 Feb 2016 - 4:44 pm | नाव आडनाव

नगरचा आशीर्वाद चिवडा लै भारी. रामप्रसाद पण चांगला.
बाकी नाशीककर लोक चिवड्याला लैच मान देतेत असं दिस्तंय - सार्‍या नावांच्या शेवटी "जी" हे :)

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 4:46 pm | यशोधरा

माफक हा शब्द डिक्शनरीतून काढावा कृपया.

आदूबाळ's picture

21 Feb 2016 - 4:47 pm | आदूबाळ

आनंद ग्रुप का?

nashik chivda's picture

21 Feb 2016 - 5:24 pm | nashik chivda

फक्त आनंद
ग्रुप नव्हे

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 4:48 pm | स्वामी संकेतानंद

मदत करा की त्यांना!

सतिश गावडे's picture

21 Feb 2016 - 5:00 pm | सतिश गावडे

वाकडेवाडीला जर कामाचे ठिकाण असेल तर तुम्ही राहण्यासाठी खडकी, दापोडी, विश्रांतवाडी अशा भागामध्ये घर पाहू शकता.

तुम्हाला "माफक" शब्दांत नेमके काय घरभाडे आणि शाळा खर्च अपेक्षित आहे हे कळले नाही. पुण्यात माझ्या माहितीनुसार वन बीएचके फ्लॅटचे भाडे साधारणपणे पाच हजारापासून सुरु होते. सोसायटी नवी असेल तर बहुतेक वेळा पार्किंग असते. जुन्या सोसायटयांना पार्किंग नसते.

शाळेच्या बाबतीत म्हणाल तर तो खर्च प्रत्येक शाळेनुसार वेगळा असतो. ती माहिती तुम्हाला स्वतःलाच काढावी लागेल.

nashik chivda's picture

21 Feb 2016 - 5:21 pm | nashik chivda

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद

माफक म्हणजे साधारण घरभाडे ६ ते ८ हजार व शाळेची फी वार्षिक २५-५० हजार पर्यंत चालेल

तुमच्या घरभाडयाच्या बजेटमध्ये चांगले घर मिळू शकेल.
शाळेचे मात्र प्रत्यक्ष येऊन तुम्हाला स्वतःला माहिती काढावी लागेल. पुण्यात शालेय शिक्षण हे जरा खर्चिक प्रकरण आहे.

माफक आणि रास्त पुण्यातले का नाशकातले ?
रेंज प्लीज !

अपेक्षित घरभाडे ६ ते ८ हजार व शाळेची फी वार्षिक २५-५० हजार पर्यंत चालेल