बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 Feb 2016 - 11:52 pm

स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर येऊन कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे.

असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली.

नंदन वन के सब जानवर
शेर-बकरी, चूहा बिल्ली
एक घाटपर पिए पानी.
चूहों का म्होरक्या मुर्दाबाद
बिल्ली मौसी जिंदाबाद.

माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही. मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील. म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा. उन्दिरांनो बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.

आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले. पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला. त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली. आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि अतिशहाणे उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित राहो. त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली मौसीच्या जवळ येऊन आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, मूर्ख उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले. मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

कथाबालकथाविचार

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

18 Feb 2016 - 12:32 am | गामा पैलवान

राघवेंद्र's picture

18 Feb 2016 - 1:17 am | राघवेंद्र

कळली व आवडली.

कपिलमुनी's picture

18 Feb 2016 - 2:13 am | कपिलमुनी

पण
सरळ हाताने घास खावा ! एवढ्या उपद्याप करायची काय गरज ?

अदि's picture

18 Feb 2016 - 12:09 pm | अदि

सरळ हाताने घास खाल्ला तर असहिष्णुता वाढते ना आजकल..
@विप- सणसणीत गोष्ट.

मदनबाण's picture

18 Feb 2016 - 6:44 am | मदनबाण

गोष्ट छान आहे...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

हर्षल_चव्हाण's picture

18 Feb 2016 - 7:02 am | हर्षल_चव्हाण

कळली तुमची पोष्ट, छान आहे गोष्ट... :)

उगा काहितरीच's picture

18 Feb 2016 - 10:54 am | उगा काहितरीच

मस्त कथा. समझनेवालोको इशारा काफी है । ;-)

सुनील's picture

18 Feb 2016 - 11:04 am | सुनील

मस्त कथा!

उंदीर म्हणजे सामान्य जनता.
बिल्ली म्हणजे धर्ममार्तंड
आणि परजिवी म्हणजेच धर्म नामक अफूची गोळी!!

रुपके खूप आवडली.

विवेकपटाईत's picture

19 Feb 2016 - 6:38 pm | विवेकपटाईत

प्रतिसादासाठी धन्यवाद. अर्थ लावण्याची स्वतंत्रता प्रत्येकाला आहेच.

माहितगार's picture

19 Feb 2016 - 6:48 pm | माहितगार

कथा वाचली