मध

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
30 Dec 2015 - 12:09 pm

तुझी गुलाबी मखमल हवीये ,
मखमलितला गोड मध हवाय
अनानामिका ला नको देउस ,
जोपर्यंत तो अनामिक मी असेन

उचकी लागलिय प्रिये ,मोड्लोय पुरता
प्रणयी वात्सल्य हवय , हवय आता
तुझ्याबिगर असतो मी जेव्हा ,
दीन दुबळा असतो मी तेव्हा

मला तुझ्या प्रेमाची जरुरी नाही ,
फक्त तुझ्या प्रेमाची खोली हवी
घातकी वाटतो दुरावा तुझा
तुझ्याशिवाय श्वाश नाही माझा

पर्वा नाही मला कुठ्येस तू ,
फक्त तुझ्याजवळ हवाय मी
अन हवाय तुझ्या प्रेमाचा स्वाद ,
तू माझ्यात न मी तुझ्यात आत

नाही का ओढ्नारेस तू मला ,
इथेच मी , तुझ परिस दे मला
हो , तूच मला जगवलय
हो, तुच मला सावरलय....

माझे तुटलेले तुकडे ,
तूच जूळवलेस
तुटलेला तोडून जाऊ नकोस
मध प्रेमाचा सांडू नकोस

असुरक्षित तुझ्याविना ,असतो मी ,
फक्त तूच, जिच्यासाठी जगतो मी ,
थोड्या गोडव्याची ,गरज माझ्या जीवाला ,
तुझ्या प्रेमाच्या मधाची ,आस हृदयाला

मला नाही खेळायचा कोणता खेळ ,
तुझ्यात माझा बसू दे मेळ ,
तर मनात का तुझ्या कालवाकालव
ह्रदयात का तुझ्या हलवाहलव …

तुझी गुलाबी मखमल हवीये ,
मखमलितला गोड मध हवाय
अनानामिका ला नको देउस ,
जोपर्यंत तो अनामिक मी असेन

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

30 Dec 2015 - 12:14 pm | अत्रुप्त आत्मा

ह्म्म्म्म!

अजुन !?

प्रमोद देर्देकर's picture

30 Dec 2015 - 12:52 pm | प्रमोद देर्देकर

ओठ चिकटले की काय गुरुजी ह्म्म्म्म करतांव ते?

नाय म्हणजे मधाने म्हणतोय मी ...

प्रचेतस's picture

30 Dec 2015 - 2:01 pm | प्रचेतस

क्या बात है...!!
येऊ द्या अजून.

अविनाश लोंढे.'s picture

30 Dec 2015 - 7:10 pm | अविनाश लोंढे.

धन्यवाद प्रचेतस

अविनाश लोंढे.'s picture

30 Dec 2015 - 7:16 pm | अविनाश लोंढे.

आत्मबंध ... एवढी घाई का ?

"अनानामिका" म्हणजे नक्की काय? (दोनदा आलाय शब्द म्हणजे टायपो नसावा.)

अविनाश लोंढे.'s picture

31 Dec 2015 - 12:21 pm | अविनाश लोंढे.

अनामिकाला