मध
तुझी गुलाबी मखमल हवीये ,
मखमलितला गोड मध हवाय
अनानामिका ला नको देउस ,
जोपर्यंत तो अनामिक मी असेन
उचकी लागलिय प्रिये ,मोड्लोय पुरता
प्रणयी वात्सल्य हवय , हवय आता
तुझ्याबिगर असतो मी जेव्हा ,
दीन दुबळा असतो मी तेव्हा
मला तुझ्या प्रेमाची जरुरी नाही ,
फक्त तुझ्या प्रेमाची खोली हवी
घातकी वाटतो दुरावा तुझा
तुझ्याशिवाय श्वाश नाही माझा
पर्वा नाही मला कुठ्येस तू ,
फक्त तुझ्याजवळ हवाय मी
अन हवाय तुझ्या प्रेमाचा स्वाद ,
तू माझ्यात न मी तुझ्यात आत
नाही का ओढ्नारेस तू मला ,
इथेच मी , तुझ परिस दे मला
हो , तूच मला जगवलय
हो, तुच मला सावरलय....
माझे तुटलेले तुकडे ,
तूच जूळवलेस
तुटलेला तोडून जाऊ नकोस
मध प्रेमाचा सांडू नकोस
असुरक्षित तुझ्याविना ,असतो मी ,
फक्त तूच, जिच्यासाठी जगतो मी ,
थोड्या गोडव्याची ,गरज माझ्या जीवाला ,
तुझ्या प्रेमाच्या मधाची ,आस हृदयाला
मला नाही खेळायचा कोणता खेळ ,
तुझ्यात माझा बसू दे मेळ ,
तर मनात का तुझ्या कालवाकालव
ह्रदयात का तुझ्या हलवाहलव …
तुझी गुलाबी मखमल हवीये ,
मखमलितला गोड मध हवाय
अनानामिका ला नको देउस ,
जोपर्यंत तो अनामिक मी असेन
ह्म्म्म्म! अजुन !?
ओठ चिकटले की काय गुरुजी
क्या बात है...!!
धन्यवाद
अजून कमिंग सून
"अनानामिका" म्हणजे नक्की काय?
अनामिकाला