चारोळ्या

विश्वव्यापी's picture
विश्वव्यापी in जे न देखे रवी...
3 Dec 2015 - 5:41 pm

त्यावेळी जिकडे तिकडे चारोळ्यांचे पेव फुटले होते . जोतो चारोळ्या करत फिरत असे. चारोळ्या मित्रांना म्हणून दाखवत असे . काही ओरिजिनल असत , काही इन्स्पायरड असत , तर काही चक्क कॉप्या असत व आपल्या नावावर खपवल्या जात . पण तरीही चारोळ्या ऐकण्यात , करण्यात आणि मित्रांमध्ये ऐकवण्यात एक वेगळीच मौज असे . अशाच त्या मंतरलेल्या कॉलेज च्या दिवसांत काही सुचलेल्या ,काही इन्स्पायरड चारोळ्या फक्त तुमच्या साठी . ओडून ताणून कलेल्या ,काही र ला र , ट ला ट जोडून जुळवून आणलेल्या, तर काही सरस जमलेल्या . पहा आवडतात का ! नाही आवडल्या तरी चारोळ्याच त्या , टाईम पास झाल्याशी कारण ........ काय ?
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चारोळ्या.......

तो राम हि खोटा होता , खोटी त्याची कहाणी . ते संत ही खोटे होते , खोटी त्यांची वाणी ,
फक्त मृत्यूच एक सत्य या जगात ,हे जीवन मात्र , आळवा वरचे पाणी !

वैरयांच्या शब्दात आज मध मिसळलाय!,बाभळीच्या काट्यात आज गुलाब उमलाय !
सुर्य उगवलाय आज कुणीकडे ?अबोलीत आज सुगंध फुललाय !

ओठांत मदिरा अन नैन शराबी ,जीवनात नाही या काहीच खराबी .
आकंठ पिऊ दे मज जीवनाचा प्याला ,गुत्यातून उठला खूप उशिरा हा शराबी .

ही रात्र निळी चांदण्यांच्या शालूत आली. रातराणीच्या गंधात डुंबून आली .
फिरविला कुणिरे मनांत मोरपंख ?अन याद तुझी हळूच डोकावून गेली.

जीवनीची रीत आशीच असते ,खिडकी पल्याड जग सुंदरच दिसते !
तो आहे अनाडी , सांग त्या वेड्याला ,प्रत्येक पेल्यात एक वादळ असते !

त्यांनी मांडला शिक्षेचा बझार ,सिस्टम हा शिक्षणाचा जर्जर
पण कोण तमा बाळगतो याची ,नोकरी एक अन हजांरो बेकार

मेल्यावर मी बंधू नका बूथ ,आठवणी माझ्या ठेवू नका शाबूत
पण इतकेच करा दोस्तानो माझ्या साठी ,अस्थींची बनवून माझ्या विट , बसवा गुत्याच्या भिंतीत

विचारांच्या दुनियेत हरवलायेस दोस्त ,कवितांच्या दुनियेत रामलायेस दोस्त .
तू सोडून दे या भाकड कवी कल्पना ,खर्या दुनियेची ओळख विसार्लायेस दोस्त.

ही वाट पायाखालची का कधी संपली आहे ? वाटेवरचा प्रत्येक मुसाफिर नेहमीच दमला आहे !
ही नाही वाट , तो आहे कालसर्प !वाटेतच वाटेने सर्वांना गिळले आहे !

स्वप्नांना वास्तवाचा पायबंध असतो
आनंदाला सतत दुखा:चा डंख असतो
नको होवूस तू या जीवनाला निराश
निराशेला आशेचा पंख असतो

Dreams are bound by chains of reality
Happiness is sprinkled with salts of sorrow
Never be downcast with life my friend
For hope comes on wings of morrow

जीवन एक अथांग सागर आहे ,जगणे एक सागर सफर आहे
सफरीची सुरुवात आहे तुझा जन्म , सफरीच्या अंती मृत्यूची किनार आहे

-------------------------------------------------------------------------

फ्री स्टाइलचारोळ्या

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

5 Dec 2015 - 11:50 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहेत

ही रात्र निळी चांदण्यांच्या शालूत आली. रातराणीच्या गंधात डुंबून आली .
फिरविला कुणिरे मनांत मोरपंख ?अन याद तुझी हळूच डोकावून गेली.

विश्वव्यापी's picture

8 Dec 2015 - 5:46 pm | विश्वव्यापी

आपल्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद