विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा,
झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला ,
परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.
प्रेमाचा अंकुर बहरला ,बहरून शुभमंगल झाला ,
आठवतो मज अजून सारखा , मिलनाचा तो क्षण पहिला .
प्रेमाचा हा तरु मोहरला ,आल्या त्याला नव्या पालव्या ,
आठवतो अजून दिवस तो मजला , दोनाचा जेव्हा त्रिकोण झाला .
सुखी आपला संसार चांगला , नजर लागली , कसा बिघडला ?
गेलीस ग तू सोडूनी अर्धा , सुंदर आपला डाव मांडला .
तरीही हा चिमणा एकला , पांखारांसाठी जगाला श्रमाला,
उडूनी गेली पांखरे आतां ,चिमणा राहिला ग एकला !
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा,
झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
प्रतिक्रिया
1 Dec 2015 - 7:05 pm | पैसा
जरा वृत्तात बसवून बघा बरं.
1 Dec 2015 - 8:15 pm | विश्वव्यापी
प्रयत्न करून पहातो.
पण माझे शिक्षण इंग्रजी मध्ये झाले असल्या कारणाने मला थोडे मार्गदर्शन करा. तुम्हाला कविता बरी वाटली हे वाचून आनंद झाला.
प्रतिसादा बद्दल आभारी आहे.
धन्यवाद
2 Dec 2015 - 10:21 am | पैसा
अक्षर गणवृत्तांचा अभ्यास आधी करावा लागेल. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4
त्यानंतर
http://www.maayboli.com/node/21889
https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4...
हे काही वाचून बघा.
2 Dec 2015 - 7:39 pm | विश्वव्यापी
आपल्या टीप बद्दल धन्यवाद .
कठीण वाटतंय पण प्रयत्न करणार आहे :-)
1 Dec 2015 - 9:16 pm | अभ्या..
स्टोरी बोल्ड झालीय
2 Dec 2015 - 9:09 am | विश्वव्यापी
धन्यवाद
2 Dec 2015 - 12:44 pm | दमामि
:):)
2 Dec 2015 - 7:46 pm | विश्वव्यापी
कविता मला नेहमी बोल्ड करायला आवडतात !
काय आहे , वाचायला सोप्या पडतात ना मंग .बोल्ड मंदी :-)
2 Dec 2015 - 8:07 pm | अभ्या..
सारखे सारखे असे केले की क्लीन बोल्ड व्हाल हो. ;)
3 Dec 2015 - 3:59 pm | विश्वव्यापी
आता कसले क्लीन बोल्ड होणार आम्ही ! इस वर्षापुवीच झालो की .
आता फक्त कॉमेंट्री करतो आम्ही :-)
3 Dec 2015 - 4:22 pm | अभ्या..
वेल प्लेड.