मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेळ्ळी

ऊध्दव गावंडे · · दिवाळी अंक
. . जोळी डंगर्‍या बैलाची झालं कचूमचू गाळं वाटं उतरेलं चाकं असे जिंदगी चे हालं जो येते तो बोलूनचं निर्‍हा गामनं ठेवते होनं जानं काई नाई फक्त चकोन्या दाखोते कायं कोनाच्या पोटातं नाई होटावरं दिसे जातो भरळल्या आमी दाने जात्यातले जसे कई फुटीलं भोपया निंगतीलं ह्या झापळा भिता सारोल्या जातीलं कई खचूनं पोपळा आमी बापा साधे सुधे नाई समजतं कावा नोका चितं पाऊ आता बेळ्ळी लागली रे बावा .

वाचने 14807 वाचनखूण प्रतिक्रिया 18

बेळ्ळी- बैलगाडी ला बैल जुंपतांना त्याच्या गळ्या खालुन बांधलेला पट्टा जेव्हा बैलगाडीच्या मागील भागात पुढील भागा पेक्षा अति जास्त ओझे होते तेव्हा बैलाचा गळा त्या पट्ट्या (बेळ्ळी ने)आवळल्या जातो याला बेळ्ळी लागणे असे म्हणतात डंगर्या - म्हाताऱ्या वाटं-बैलगाडी च्या चाकाभोवती असलेली लोखंडी पट्टी ती ढिली होणे म्हणजे वाट उतरणे परिणाम चाक मोडणे चकोन्या- चकवणे पोपळा- मातीच्या भिंतीवर कालांतराने धरनारा थर पोपडा

पैसा 11/11/2015 - 13:46
बेळ्ळी शब्दाचा अर्थ माहीत नसल्याने गाडी अडली होती. आता नीट समजली! कविता छान आहे. लिहीत रहा.

मिपाकरांचा अत्यंत आभारी आहे. आपण च प्रोत्साहन दिले आपणां मुळेच दिवाळी अंकात समाविष्ट होऊ शकलो. दिवाळी अंकाचे संपादक,रसिक मित्रांनो धन्यवाद! नीलकांतजी, धन्यवाद !

राही 26/11/2015 - 15:27
सुंदरच आहे कविता. कुठल्या जिल्ह्याची/पट्ट्याची बोली म्हणायची ही?