जिंदगी ना मिलेगी दोबारा - जावेद अख्तर भावानुवाद

अजब's picture
अजब in जे न देखे रवी...
25 Oct 2015 - 10:57 am

१.
एक बात होठों तक है जो आयी नहीं
बस आँखों से है झांकती
तुमसे कभी मुझसे कभी
कुछ लब्ज है वो मांगती
आवाज़ की बाहों में बाहे ड़ाल के इठलाये वो
लेकिन ये जो एक बात है
एहसास ही एहसास है
खुशबू सी है जैसे हवा में तैरती
खुशबू जो बेआवाज़ है
जिसका पता तुमको भी है जिसकी खबर मुझको भी है
दुनिया से भी छुपता नहीं
ये जाने कैसा राज़ है
भावानुवाद
एक कहाणी जी ओठांवर न येताही
डोकावे डोळ्यांच्या मधुनी
शब्दच काही मागत राही
तुझ्याजवळ अन माझ्याकडुनी...
कधी कहाणी आवाजाच्या
बाहूंमध्ये मिरवत असते
कधी कहाणी नुसती केवळ
जाणिव होउन भासत असते...
गंध जसा फिरतो वाऱ्यावर
मूकपणे दरवळतो घरभर
मूक कहाणी तुला समजते , मला समजते;
हे गुपित कसे जे दुनियेलाही कळून जाते?

२.
जब जब दर्द का बादल छाया
जब गम का साया लहराया
जब आंसू पलकों तक आया
जब ये तनहा दिल घबराया
हमने दिल को यह समझाया
दिल आखिर तू क्यूँ रोता है
दुनिया में यूँही होता है
यह जो गहरे सन्नाटे है
वक्त ने सबको ही बांटे है
थोडा गम है सबका हिस्सा
थोड़ी धुप है सबका किस्सा
आँख तेरी बेकार ही नम है
हर पल एक नया मौसम है
क्यूँ तू ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यूँ रोता है?
भावानुवाद
जेव्हा जेव्हा दु:खाने आभाळ दाटले
जेव्हा जेव्हा दु:खाचेहि सावट आले
जेव्हा अश्रू डोळ्यांच्या अल्याड थांबले
जेव्हा दु:खी हृदयामध्ये भय पिसाटले
समजावाया हृदयाला मी हे सुनावले...
मना, उगीचच इतके तू रडतोस कशाला
असे नेहमी करायची तर सवय जगाला...
भीषण इथले सारे सन्नाटे
काळ ठेवतो सर्वांचे वाटे
सर्वांकरता दु:खे काही
सर्वांसाठी तप्त उन्हेही
उगाच तुझे का ओले डोळे
क्षणाक्षणाचे ऋतू निराळे
क्षण असले तू गमावुनी बसतोस कशाला?
मना, उगीचच इतके तू रडतोस कशाला...
३.
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो
तुम एक दरियाँ के जैसे लहरों में बहना सीखो
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम....
भावानुवाद
मनात अस्वस्थता घेऊन चालत जाशील तर तू जिवंत आहेस...
डोळ्यांत स्वप्न विजेवत चकाकत ठेवशील तर तू जिवंत आहेस...
वाऱ्याच्या झोक्यागत मुक्त राहायला शीक
पाण्याच्या लाटांगत मुक्त वाहायला शीक
प्रत्येक क्षणाला भेट बाहू पसरून
प्रत्येक क्षण येतोय नवी बहार घेऊन ...
स्वत:च्या नजरेत बेचैनी आणून चालशील तर तू जिवंत आहेस...
मनात अस्वस्थता घेऊन चालत जाशील तर तू जिवंत आहेस...

कविता

प्रतिक्रिया

दमामि's picture

25 Oct 2015 - 11:24 am | दमामि

क्या बात!

बाबा योगिराज's picture

25 Oct 2015 - 12:47 pm | बाबा योगिराज

भेष्ट.

शब्दबम्बाळ's picture

26 Oct 2015 - 12:29 am | शब्दबम्बाळ

छान लिहिलंय, फक्त ते 'सन्नाटा'सारखे शब्द खटकले मध्येच...
हिंदी ओळी आणि मराठी भावानुवादाच्यामध्ये थोडी जागा सोडली तर सहजपणे वाचता येईल...

उगा काहितरीच's picture

26 Oct 2015 - 8:11 am | उगा काहितरीच

+१ हेच म्हणणार होतो !

पगला गजोधर's picture

30 Oct 2015 - 9:17 am | पगला गजोधर

:)

अजया's picture

30 Oct 2015 - 10:48 am | अजया

मस्त.

रामदास's picture

30 Oct 2015 - 10:56 am | रामदास

गजब कर दिये !
आवडला भावानुवाद.