आमचा पण बिग बॉस

यमन's picture
यमन in जनातलं, मनातलं
29 Sep 2015 - 10:30 am

आणि एकदाचा मराठी साहित्तीकांचा "बिग बॉस " मधला मार्ग मोकळा झाला .
त्यांच्या बरोबर सनी लिओन पण घुसणार आहे .आनंद आहे .
आमच्या हाती बऱ्याच साहित्तीकांच्या अनुदिनी चे शेष हाती लागले आहेत . खास तुमच्या साठी ...

जयवंत दळवी …

"हि तशी उफाड्याची .
आमच्या बयो सारखी . कदाचित बयो पेक्षा काकणभर जास्तीच .
बजा काका असता तर तिच्या कडे बघता बघता लाळ गिळायाचीच विसरला असता . तो बयो कडे असाच बघायचा . जीभ ओठावर काढून एकटक . आजू बाजुंच्या बायका तोंडाला पदर लावून हसायच्या . पण बजा काकाला ह्याचे काहीही सोइर सुतक नव्हते .
तीच्या कडे बघत मोठे फुत्कार टाकण हाच त्याचा छंद होता . नाही म्हणायला पोटा पाण्याला म्हणून कागदी पिशव्या विकायचा .
बयो इकडे वयापरत्वे वाढत चालली होती . आणि तीच्या आईची,मंदा मावशीची काळजी हिच्या गोलाईच्या वर्ग प्रमाणात .
हिच्या सारख्या पोरीला किती लोकांपासून जपायचे ?,हीला लपवून घरात ठेवायचे म्हंटले तर घरी सावत्र बाप आहेच ओरबडायला .
शेवटी तिनी निर्णय घेऊन टाकला आणि गावातल्या पैलवाना बरोबर तीला उजवले .
तीच्या लग्नाच्या दिवशी रात्रीच बजा काका आणि ती गाव सोडून पळून गेले .
पिशव्यांचे कोरे कागद तसेच ठेऊन .
नंतर कधीतरी दोघांना मुलगी झाल्याचे कानावर आले .
ही सनी कदाचीत त्या दोघांचीच मुलगी असावी .असावी नाही आहेच . बयो सारख्याच मापाची.
तीची जीभ ओठावर ठेवून नजर देण्याची पद्धत पण बजा काका सारखीच .
असो हिच्या जवळ एकदा बयो चा विषय काढला पाहिजे .
मंदा मावशीला हि कळवतो ; हिलाही एखादा पैलवान बघ . बयो पेक्षा हिला जास्ती निकड वाटतीय ."

अच्युत गोडबोले
ह्यांच्या स्वताच्याच अनुदिनी मधली पहिली पाच आणि शेवटची पाच पानं आत्मस्तुती नि भरलेलेली आहेत.
आपण मधूनच वाचायला सुरुवात करू…
"तसाही मी इथे पुस्तक छापायचं सोडून काय करतोय ? एवढ्या वेळात २-४ पुस्तकं लिहून झाली असती .
मला तुरुंग नवीन नाही .असो ह्या अनुभवावरही एखादं पुस्तक निघू शकेल .
मला साहित्तीक लोक माझं लिखाण वाचून गणिती समजतात ;आणि गणिती लोक माझी गणितं बघून विनोदी लेखक समजतात .
म्हणजे तार्किक दृष्ट्या विचार केला तर मी दोन्ही आहे . असो इथे बाकी लोक IIT मधले नसल्या मुळे "तर्क " वगैरे अपेक्षा करण्यात अर्थ नाही .
इथे हाती wikipedia नसल्या मुळे पुढचे लेखन थांबले आहे . राजहंस चे माजगावकर मागे लागलेत .
माझी दाढी आता वाढून अस्ताव्यस्त झालीय ;माझ्या झब्ब्याचा रंगही विटला आहे .
आता तरी मला लोक साहित्तीक समजतील का ?"

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे …
ह्यांची अनुदिनी एखादया बखरी सारखी आहे . आजूबाजूला ढाली तलवारींची चित्र वगैरे .

"हि मोहीम म्हणजे विजेच्या कल्लोळात ;आषाढ -ढगांशी एखाद्या टिटवी ची झुंज". आई भवानी आम्हांस यश देवो .
मुलायम फत्ते करण्या साठी कदाचित स्वकीयांना बाजूला सरावं लागेल .वेदनेचे डोंब उसळतील ; पण गनीम मातबर आहे; संपा अथवा संपवा .सर्वांना मारून गर्दीस मेळवावे हेच उचित .
दगाबाजीचा बहुत संभव . गनिमी बाणा क्रमप्राप्त आहे. येताना तलवारीचे दोन हात शिकून आलोय .अभ्यासोनी प्रकटावे .
स्वयंप्रकाशित पणतीला अंधाराचे कसले भय ?
आज वद्य अष्टमी असावी. sunny leoni नामक भगिनीचा अवमान झाल्याचे आम्हांस कदापि सहन नाही .
तत्पर निषेध खलीता काढून साहेबांना रवाना केला
"इये नसते कथले केलिया . कोणाचाही मुलाहिजा नाही असे समजोनी वर्तवणूक चालविली आहे . मुलुखात स्त्री मातेसमान .परस्त्री निंदा हे तो ब्रह्म हत्येचे पाप. शासनकर्त्याने शासनात कसूर सोडो नये ."
बहुत काय लिहावे ? आई सरस्वती आज रुसली आहे .शब्द संपले .
आमचे अगत्य असो द्यावे , विज्ञापना .
राजते लेखानावधी .
सेवेचे ठाई तत्पर
बळवंत मोरेश्वर निरंतर ."

सुनिता देशपांडे …
बाई तश्या उत्साही ."नवऱ्याला मुठीत कसे ठेवावे "ह्या विषयावरील व्याख्यान संपवून नुकत्याच इथे आल्या आहेत .
महाराष्ट्र पुरोगामी ठेवण्यात ह्यांचे योगदान मोठे !!!!! ह्यांनी नवऱ्याला सरळ "अरे भाई " असे संबोधून ;स्त्री मुक्तीचा नवा अध्याय मराठी समाजात लिहिलाय.
.
ह्यांची अनुदिनी वाचून स्त्री चा पती हा जुळून येती रेशीम गाठी मधला "आदित्य "आणि होणार सून मधला "shree" ह्यांचा एकत्र पणे समजूत दार पणा घेतलेला असावा अशी अपेक्षा जाणवते .

"बाकीबां च्या कवितांचा कार्यक्रम करायचा आहे असे सांगून मला भाई इथे घेऊन आला . पण आयत्या वेळी मला नेहेमी प्रमाणे विसरला . लग्ना आधी पासून हा असाच असल्या मुळे मला तक्रारी ला वाव पण नाही .
इतक्या वेळा ह्याला मी चहा आणून दिला .पण ह्याला कधीही "तू चहा घेतलास का ?" असे विचारावेसे वाटले नाही .
साधीशीच गोष्ट . पण सारखी बोचत राहते हेहि खरंच .
तरी आयोजकांनी मला वेगळे आमंत्रण दिले म्हणून मी आले . भाई आणि मी वेगवेगळे आहोत .
अच्युत भाई कडे प्रस्तावना मागत होता . मी royalty चं विचारल्यावर राहू देत म्हंटला .
सगळा व्यवहार मीच बघायचा ;म्हणजे वाईट पणा आला तर मला ."भाई "आहेच परत "महाराष्ट्राचं लाडकं दैवत "म्हणून मिरवायला .
शोषण काय फक्त बाहेरचं होतं ?
अगदी दोन व्यक्तींच्या नात्यातही शोषण होतंच कि .
कायमचा माझा उपदेश ऐकून "भाई " नि विनोद केलाच "मी एक देशपांडे आणि तू "उपदेश पांडे ".
एका विनोदा मध्ये माझ्या त्याच्या विषयीच्या भावनांचं मूल्यमापन झालं . हे हि खरेच नाही का ? "
अशा छोट्या छोट्या धक्क्यांनी जखमा होत राहतात . एका जखमेची खपली धरायच्या आधी पुढची ठेच . आणि वाईट गोष्ट म्हणजे ह्याच्या वरचा इलाज हि जखमी करणाऱ्या कडेच .

क्रमशः
***ह्या लेखन प्रपंच कोणालाही दुखावण्याच्या उद्देशानी केलेला नाही .
आवडल्यास सर्व श्रेय ह्या तालेवार सारस्वताना जाते .
चुका असतीलच तर त्यांना तुमच्या पर्यंत पोचवण्यात मी कमी पडलोय .

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

मिसळ खंग्री जमली आहे!

पैसा's picture

29 Sep 2015 - 12:47 pm | पैसा

मस्त जमलंय!

प्यारे१'s picture

29 Sep 2015 - 12:49 pm | प्यारे१

भारीच्च.
सनी लिओनी चे मराठी साहित्य अवकाशात धमाकेदार पदार्पण. ;)

मित्रहो's picture

29 Sep 2015 - 8:17 pm | मित्रहो

मस्त जमलेय

बिन्नी's picture

29 Sep 2015 - 9:20 pm | बिन्नी

मजा आली वाचून

अत्रुप्त आत्मा's picture

29 Sep 2015 - 9:28 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हा ह्हा ह्हा ! मज्जा आया वाच के.

gogglya's picture

30 Sep 2015 - 3:03 pm | gogglya

मजा आली...

तर्राट जोकर's picture

30 Sep 2015 - 3:53 pm | तर्राट जोकर

अजून येऊंद्यात...

जे.पी.मॉर्गन's picture

30 Sep 2015 - 4:16 pm | जे.पी.मॉर्गन

एड्ड्या मस्त रे! आधी वाचला होता तेव्हा पण आवडला होता आणि आत्ता पुन्हा वाचून अजून आवडला!

जे.पी.

यमन's picture

1 Oct 2015 - 5:30 pm | यमन

जरा साशंकच होतो . मिपाकरांना कितपत रुचतय

नाखु's picture

1 Oct 2015 - 5:36 pm | नाखु

वपु,शंकर पाटील्,नेमाडे , सुशी आणि सरतेशेवटी काकोडकर अध्याय वाचण्यास उत्सुक.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Oct 2015 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं आहे ! पुभाप्र.

अविनाश पांढरकर's picture

2 Oct 2015 - 6:53 pm | अविनाश पांढरकर

मस्त लिहिलंय