बाप्पाचा नैवेद्य : चॉकलेट मोदक

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
21 Sep 2015 - 7:39 am

नमस्कार मंडळी!गणेशउत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले आहेच.रोज छान छान नविन नैवेद्य दाखवताय ना?माझ्याकडेहि उकडीचे मोदक,तळणीचे मोदक,खवा मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवुन झालेच.पण मुलांना काहि समाधान होईना.कारण चॉकलेट मोदक काही अजुन झाले नव्हते.गणपती बसुन तीन दिवस झालेले आणि चॉकलेट मोदक नाहित म्हणजे बाप्पा रागवेल ना अशी धमकी शेवटि छोट्या लेकीकडुन देण्यात आली.आता मोदक करणे आलेच.बर बाप्पाही पूर्ण १० दिवस असल्याने रोज नैवेद्यात विविधता हवीच नाहितर गणपती बाप्पा कंटाळेल हे हि लेकीकडुन सांगण्यात आले.असो.

घरी नेहेमी चॉकलेट बनवले जातातच त्यामुळे साहित्य घरात होतेच.अगदी थोड्या साहित्यात छान मोदक तयार झाले.मुल खुश,त्यांच मित्रमंडळ खुश त्यामुळे बाप्पाहि खुश झाले असावेत.
तर चला आता घेउयात साहित्यः
चॉकलेट कंपाउण्ड १ तुकडा
(डार्क,मिल्क असे आवडेल ते घ्या)
सुकामेवा (आवडेल तो घ्या) २-३ चमचे
मोदक साचा
mm

आता कृती:प्रथम गॅसवर एक भांडे ठेवुन त्यात पाणी घाला.त्यात बसेल एवढे दुसरे भांडे ठेवा.
त्यात चॉकलेट कंपाउण्डचे तुकडे टाका.आता ते विरघळायला लागेल.

mm1

साधारण १०-१५ मिनिटात विरघळल्यावर त्यात सुकामेवा मिसळा.छान एकत्र करा.
आता हे विरघळलेले चॉकलेट मोदक साच्यात भरा.

mmm1
हा मोदक साचा फ्रिजमधे एकतास ठेवा.एक तासाने बाहेर काढुन मोदक सुटे करा.
मस्त चॉकलेट मोदक तयार.

m
सुकामेवा ऐच्छिक आहे.नाहि घातलात तरी चालेल.शिवाय व्हाईट चॉकलेट आणी डार्क चॉकलेट अर्धे अर्धे भरूनही मोदक करू शकता छान चव येइल.

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

21 Sep 2015 - 7:50 am | कविता१९७८

वाह मस्तच

अजया's picture

21 Sep 2015 - 8:09 am | अजया

अरे वा! चाॅकलेट मी मावेमधे मऊ करते. त्याचे मोदक बनवायची आयडिआ सुगरणींनाच येणार!

पियुशा's picture

21 Sep 2015 - 9:38 am | पियुशा

य्म्मी...........एक प्लेट पाठवूण देने :)

निवेदिता-ताई's picture

21 Sep 2015 - 10:03 am | निवेदिता-ताई

मस्तच

मदनबाण's picture

21 Sep 2015 - 10:17 am | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाप्पा मोरया... :- Angarki

मृत्युन्जय's picture

21 Sep 2015 - 10:53 am | मृत्युन्जय

सोप्पे, सुंदर आणि मस्त. टेंम्प्टिंग दिसताहेत एक्दम मोदक

पदम's picture

21 Sep 2015 - 11:08 am | पदम

मस्तच!

झककास.....खुप छान दिसताहेत मोदक....

सुहास झेले's picture

21 Sep 2015 - 1:15 pm | सुहास झेले

वाह... मस्तच :)

नूतन सावंत's picture

21 Sep 2015 - 1:28 pm | नूतन सावंत

खूप सुरेख दिसताहेत मोदक.

भुमी's picture

21 Sep 2015 - 1:33 pm | भुमी

चॉकलेट मोदक म्हणजे ,बच्चेकंपनीही खूष आणि बाप्पाही खूष.छान सोपी पाककृती ,नक्की करून बघणार.

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 2:00 pm | सानिकास्वप्निल

यम्मी चॉकलेट मोदक !!
गोडुले दिसतायेत मोदक अगदी, बाप्पा नक्की खूष :)
सुका-मेवा हलका रोस्ट करुन घातला तर?

स्वाती दिनेश's picture

21 Sep 2015 - 3:05 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसत आहेत चॉकलेट मोदक!
स्वाती

आरतीचा वेगळा प्रसाद आवडला. छान दिसतायत मोदक.

पद्मावति's picture

21 Sep 2015 - 7:16 pm | पद्मावति

सुपर्ब चॉकलेट मोदक. बाप्पा उठून एखादा मोदक गप्पकन मटकवेल इतके टेंप्टिंग दिसताहेत.

वाह! छान दिसताहेत मोदक!

.

मितान's picture

22 Sep 2015 - 9:50 am | मितान

मस्त मोदक :)

इशा१२३'s picture

23 Sep 2015 - 2:13 pm | इशा१२३

सगळ्यांचे आभार!
@सानिका रोस्टेड सुकामेवा छानच लागतो.यात घातलेले बदाम रोस्टेडच आहेत.

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 3:06 pm | दिपक.कुवेत

चोको मोदक आवडले.

कपिलमुनी's picture

7 Oct 2015 - 3:18 pm | कपिलमुनी

आता साचा शोधणे आले

दिपक.कुवेत's picture

7 Oct 2015 - 3:21 pm | दिपक.कुवेत

काहिहि हां मुनी...