Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य : चॉकलेट मोदक

लेखक इशा१२३ यांनी सोमवार, 21/09/2015 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!गणेशउत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले आहेच.रोज छान छान नविन नैवेद्य दाखवताय ना?माझ्याकडेहि उकडीचे मोदक,तळणीचे मोदक,खवा मोदक बाप्पाला नैवेद्य दाखवुन झालेच.पण मुलांना काहि समाधान होईना.कारण चॉकलेट मोदक काही अजुन झाले नव्हते.गणपती बसुन तीन दिवस झालेले आणि चॉकलेट मोदक नाहित म्हणजे बाप्पा रागवेल ना अशी धमकी शेवटि छोट्या लेकीकडुन देण्यात आली.आता मोदक करणे आलेच.बर बाप्पाही पूर्ण १० दिवस असल्याने रोज नैवेद्यात विविधता हवीच नाहितर गणपती बाप्पा कंटाळेल हे हि लेकीकडुन सांगण्यात आले.असो. घरी नेहेमी चॉकलेट बनवले जातातच त्यामुळे साहित्य घरात होतेच.अगदी थोड्या साहित्यात छान मोदक तयार झाले.मुल खुश,त्यांच मित्रमंडळ खुश त्यामुळे बाप्पाहि खुश झाले असावेत. तर चला आता घेउयात साहित्यः चॉकलेट कंपाउण्ड १ तुकडा (डार्क,मिल्क असे आवडेल ते घ्या) सुकामेवा (आवडेल तो घ्या) २-३ चमचे मोदक साचा mm आता कृती:प्रथम गॅसवर एक भांडे ठेवुन त्यात पाणी घाला.त्यात बसेल एवढे दुसरे भांडे ठेवा. त्यात चॉकलेट कंपाउण्डचे तुकडे टाका.आता ते विरघळायला लागेल. mm1 साधारण १०-१५ मिनिटात विरघळल्यावर त्यात सुकामेवा मिसळा.छान एकत्र करा. आता हे विरघळलेले चॉकलेट मोदक साच्यात भरा. mmm1 हा मोदक साचा फ्रिजमधे एकतास ठेवा.एक तासाने बाहेर काढुन मोदक सुटे करा. मस्त चॉकलेट मोदक तयार. m सुकामेवा ऐच्छिक आहे.नाहि घातलात तरी चालेल.शिवाय व्हाईट चॉकलेट आणी डार्क चॉकलेट अर्धे अर्धे भरूनही मोदक करू शकता छान चव येइल.

वाचने 9614
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

अरे वा! चाॅकलेट मी मावेमधे मऊ करते. त्याचे मोदक बनवायची आयडिआ सुगरणींनाच येणार!

चॉकलेट मोदक म्हणजे ,बच्चेकंपनीही खूष आणि बाप्पाही खूष.छान सोपी पाककृती ,नक्की करून बघणार.

यम्मी चॉकलेट मोदक !! गोडुले दिसतायेत मोदक अगदी, बाप्पा नक्की खूष :) सुका-मेवा हलका रोस्ट करुन घातला तर?

मस्तच दिसत आहेत चॉकलेट मोदक! स्वाती

सगळ्यांचे आभार! @सानिका रोस्टेड सुकामेवा छानच लागतो.यात घातलेले बदाम रोस्टेडच आहेत.

चोको मोदक आवडले.