ग्रेस . . (श्रद्धांजली - दि.२८ मार्च २०१२)

एस.योगी's picture
एस.योगी in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 12:23 pm

"प्रिय ग्रेस . . . . ."
दुःखाचा महाकवी होतास 'तू'
दुःख साजरे करायला
शिकवलस तू मला..
व्यथा अन वेदनांनाच जगण्याची भाषा केलीस तू
देवालाही ठावूक नसेल कुठल्या मातीचा बनला होतास तू,
काळजातल्या दुःखाला सहसा कुणीही हात लावत नाही
अन तुला मात्र काळजातल्या दुःखाशिवाय कधी काहीच रुचलं नाही..
दुःखाला तरल करायला सहजच जमायचं तुला
दुःखातही 'सुख' असते हे तुझ्यामुळेच कळले मला,
सुखालाही दुखावेल इतक्या सुंदरपणे तू दुःख साजरं करायचास
अन तितक्याच अभिमानाने ते जगासमोर मिरवायचासही…..
पण तू एक प्रमाद केलास.................
अनंताच्या प्रवासाला निघालास .....
खरं तर कुणालाच हा प्रवास चुकलेला नाही
पण ...
तू जरा अतीच घाई केलीस ....................
तुझही बरोबर आहे म्हणा
नाही तरी इथे तुझ्याशिवाय कोणामध्ये एवढी ताकद होती
'वैश्विक नश्वर सत्याला' हसत कवटाळण्याची?
तू गेल्याचं दुःख आहेच रे आम्हाला .........
पण तू येणारच नाहीस परत कधीही
याहून मोठे दुःख काय असणार?
तुझ्या नसण्याच दुःख
तुलाही मांडता येणार नव्हतं
म्हणून कदाचित ..............

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

एस.योगी's picture

10 Sep 2015 - 12:34 pm | एस.योगी

दुःखाचे महाकवी 'ग्रेस' उपाख्य माणिक सीतारामपंत गोडघाटे यांनी २६ मार्च २०१२ रोजी अखेरचा श्वास घेतला..
त्यांच्याविषयी असणाऱ्या आदरापोटी, प्रेमापोटी अथवा आपुलकीच म्हणा ना ....
मला झालेलं दुःख मनातून मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न ......

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2015 - 2:29 pm | चौथा कोनाडा

+ १.

आवडले.

लीना घोसाळ्कर's picture

10 Sep 2015 - 4:16 pm | लीना घोसाळ्कर

एस.योगी.......
मनाला झालेलं दुःख मनातून मांडण्याचा हा खूपच छान प्रयत्न.
आवडले........

एस.योगी's picture

10 Sep 2015 - 5:14 pm | एस.योगी

आभारी आहे .....

विशाल कुलकर्णी's picture

10 Sep 2015 - 4:33 pm | विशाल कुलकर्णी

आवडली.... _/\_

शीतल जोशी's picture

10 Sep 2015 - 5:27 pm | शीतल जोशी

कवी ग्रेस या बद्दलचे मनोगत आवडले. त्यांच्या कविता आवडतात, कधी कधी अर्थ लावायला अवघड वाटतात हि.पण खूप तरल अनुभव देतात

साहित्य जगतात कवी ग्रेस यांना दुःखाचे महाकवी मानले जाते
त्यांच्या कविता गूढ असतात यात वाद नाही
आपण बरोबर आहात
परंतु जेव्हा,
"ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादात होता,
मेघांत अडकली किरणे हा सुर्य सोडवीत होता"
वाचनात अथवा ऐकण्यात येते तेव्हा या सम सोपे सुलभ हेच हाच अनुभव येतो...

योगी जी
तुमचं ग्रेस वरील प्रेम दिसुन येतं.
आवडली तुमची शैली.
तुम्हाला ती गेली तेव्हा कविता आकलन सुलभ वाटली
मला स्वतःला तर ही कविता कधी पुर्णपणे आकलनात येईल असे वाटत नाही,
त्यांच्या फार कविता पुर्णपणे समजल्या अस वाटतं
अर्थातच ही माझी आकलन मर्यादा आहे.
आणि एस. योगी हे टोपण नाव आहे की खर
एक सीरीयल होती पुर्वी मि.योगी नावाची ती आठवली.
धन्यवाद

मला कवी ग्रेस यांच्या मोजक्याच अशा कविता आहेत ज्या पुर्णपणे समजल्या अस खात्रीने म्हणता येत.
वरील प्रतिसाद चुकुन लिहीला वाक्याचा नेमका उलट अर्थ झाला

एस.योगी's picture

11 Sep 2015 - 2:38 pm | एस.योगी

दुरुस्तीसह प्रतिसाद दिलात, आभार.
एस.योगी - एस. - सोनार (आडनाव) योगी - योगेश (अस्मादिक)
काव्य लेखनासाठी धारण केलेले टोपण (पेनाचं झाकण नव्हे) नाव.
इतर लेखन मात्र 'योगेश सोनार' नावानेच असतं.

#मिस्टर योगी#
दूरदर्शनच्या सुवर्णयुगातील आणि ८० च्या दशकातील स्व.मोहन गोखले अभिनित एक उत्तम मालिका.

मोहन गोखलेंची आणखी एक आठवण म्हणजे
ते ग्रेस च्या कवितांच सुंदर भावपुर्ण सादरीकरण करायचे
स्वतः ग्रेस यांनी गोखलेंच्या रेसीटेशनला दाद दिलेली वाचल्याच आठवतय.
योगेशजी तुमच कवी नाम आवडलं.

मोहन गोखलेंची आणखी एक आठवण म्हणजे
ते ग्रेस च्या कवितांच सुंदर भावपुर्ण सादरीकरण करायचे
स्वतः ग्रेस यांनी गोखलेंच्या रेसीटेशनला दाद दिलेली वाचल्याच आठवतय.
योगेशजी तुमच कवी नाम आवडलं.

द-बाहुबली's picture

10 Sep 2015 - 7:15 pm | द-बाहुबली

समद्या भावना पोचल्या पण "श्रद्धांजली - दि.२८ मार्च २०१२" असे लिहुन आज धागा टंकायचे काय प्रयोजन ?

एस.योगी's picture

11 Sep 2015 - 1:23 pm | एस.योगी

श्रद्धांजली २८ मार्च २०१२
उपरोक्त दिवशी सदर निर्मिती लेखणीतून उतरली आहे.
(काव्य काल सुचित होणेसाठी संदर्भ देण्याचा अट्टाहास.)

शुचि's picture

10 Sep 2015 - 7:53 pm | शुचि

अतिशय आवडली.

शंतनु _०३१'s picture

11 Sep 2015 - 1:14 pm | शंतनु _०३१

__/\__