सकाळ - त्यांच्या नजरेतुन

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
7 Sep 2015 - 11:14 pm

(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या)

ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.

ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
जाउंदी तिच्यायला, बारक्या हाईच की.
कांभरून घीउन तसचं झुपलु.
तसं म्हातारं खेकसलं.
ताडदिशी ऊठलू.

वैताग-
अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.
हि किरणं कशी काय आली आत.
साली सकाळ पण लवकरचं झालीय.
आता ही अंबाबाई डोकं खाणार.
ह्यो व्यायाम पण डोक्याला ताप आहे.
अॉफिसला दांडीच मारतो आज, पण साला तो खवीस बॉस. छ्या.
डोळे उघडावे काय आता.
ते टमरेल कुठे ......... असो.

बेवडा-
थगल कत दलदलदल.
क्वाल्टल दला द्यात्तत दाली.
ह्यंगलायला दाव लादनाल.
ही थतालाय का थंद्याखाल?
थाल पानी थमी थल्लं
"बिव्रे ... थिंब्वान "

पाशवी-
हा सुर्य अनन्वित अत्याचार करत आहे.
सृष्टीचा निर्माता असला म्हणुन काय झालं.
आमच्या साखरझोपेत व्यत्यय आणण्याचा अधिकार याला दिलाच कोणी"
आम्ही याचा निषेध करतो.
तु कितीही उगवलास तरी आम्ही झोपुन राहु.
ढाराढुर...

हामेरीकन-
सकाळी सकाळी फकिंग मॉर्निंग झालीय.
इट्स टू मच्.
डीजे-डिस्कोत फुल नाईट संपवली.
ती व्हाईट गर्ल , वॉव.
नाईटभर ओन्ली सिड्युस करत राहीली.
बड्वायजर, ओल्डमंक देऊन सगळी पर्स एम्प्टी केली.
गुडबायताना हातात केवळ बनाना ठेऊन गेली, शीट.
स्लिपींग पील्स आता घेतल्याच पाहिजेत.

'मटणा' चा हिरो-
फरशीवर गार झोपलो होतो.
पक्या सकाळीच कुठेतरी उलथला होता.
रात्रीचं मटण फक्कड होतं.
आळस देत फरशीवरच उलथा पालथा झालो.
कुठुनतरी भिरभिरत आलेलं एक लाटणं पेकाटातच बसलं.
धुम पळालो.

ग्रेसप्रेमी (क्षमा मागुन)-
बुबुळांच्या आरक्त प्रक्षोभनातुन,
मी हजारदा सांडलो असतो.
तप्तघनीचा हा ओंगाळला वृक्ष,
बांडगुळ पांघरुन घेतो.
हा सुर्य हांडगा आहे.
त्याच्या आवशीचा घो.
ऊठतोच एकदाचा.

भिडू-
ऐ...., आरं कुठं, एवढ्या वरती का गेलायस?
थांब तिथचं, नाहीतर बापुसाहेबांकडं खंप्लेंट करीन, आन ते ऊन सोडनं पहिलं बंद कर.
आरं तिच्या, हे काय तिर्थरूप फोक घेऊन हिकडचं यायलेत.
आये, आंघुळीला पाणी काढ.

हांडरवर्ल्ड-
वंटास सकाळ झालीय भिडू.
काल रात्री भिक्याला टपकावला.
भेजातच घोडा घातला.
भाईकडून दोन पेटी नक्की.
पण मागुन माझ्या टाळक्यात कुणी हानलं हुतं?
आणं हा हवालदार कसा हितं?
भेंडी मी डायरेक्ट तुरूंगातच हाय की?
साला पाच वर्षे बांबू.

चाळ-
शेजारील तिंबुनानाच्या लांबलचक खाकरण्याने झोप जरा चाळवली.
किंवा, समोरील आपटेबाई गाण्याचा रिवाज करत असणार.
दोन्ही आवाजात विशेष असा काही फरक जाणवत नाही.
हे असे अगम्य विचार डोक्यात असतानाच अर्धांगाने एकसुऱ्या आवाजात हुकुम सोडला.
"अहो, नळाला पाणी सुटलयं, तेवढे दोन हंडे घेऊन रांगेला लागा"
न उठुन काय करता?

राजकारणी-
हरहर...
सुर्यमहाराज काही खबरबात न देता उगवले.
कार्यकर्ते बंगल्याभोवती उच्छाद मांडून बसले होते.
जयघोषांचा तर पाऊसच पडत होता.
तेवढ्यात चँनलवरचा रिर्पोटर बराळला.
दुनियेचे कान टवकारले.
पक्ष्याला फक्त एकच शीट.
अवसानघातच की..
आता दिवसभर फुकाचे लोळणे आले.

भाषाजीवनमानलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

मारवा's picture

7 Sep 2015 - 11:40 pm | मारवा

मस्त
शब्दांशी छान खेळलात.
वेगवेगळ्या कोणातुन एकच विषय
मजा आली,
आम्ही मित्र थोडा असाच नाही पण या टाइपचा शब्दांशी एक खेळ खेळायचो
प्रत्येकाने कुठल्याही अगदी वाट्टेल त्या मराठी सिनेमाच नाव घ्यायच
आणि मग त्याच्या मागे सर्वांनी एकसुरात ओरडायच
पलंगावर !
आणि हो ग्राम्य वालं व्हर्जन आवडलं.

जव्हेरगंज's picture

7 Sep 2015 - 11:50 pm | जव्हेरगंज

पलंगावर..?
हा प्रकार रोचक दिसतोय, आणखी थोड खुलवुन सांगाल काय?

उगा काहितरीच's picture

8 Sep 2015 - 12:59 am | उगा काहितरीच

चांगला आहे की प्रयोग !

अगम्य's picture

8 Sep 2015 - 1:01 am | अगम्य

चांगला प्रयत्न. एकाच गोष्टीबद्दल इतक्या वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून लिहिणे सोपे नाही. हामेरीकन वाचून हसू आलं. अमेरिकन आयुष्याबद्दलच्या तुमच्या कल्पना रंजक आहेत.

शित्रेउमेश's picture

8 Sep 2015 - 9:18 am | शित्रेउमेश

मस्त! मस्त!! मस्त!!!

बाकी तो पलंगावर वाला खेळ आम्ही पण खेळायचो... फक्त पलंगावर ऐवजी "गोधडीत"....

बघा.. खरंच मजा येते.... कोणत्याही सिनेमाच नाव घ्या, पुढे फक्त जोडायचं गोधडीत...

जव्हेरगंज's picture

8 Sep 2015 - 10:16 am | जव्हेरगंज

काही भयंकर नाव डोळ्यांसमोर आली.
उदा. बाबुरावला पकडा वगैरे.

मस्तच खेळ.

अंधेरी रातमे, दिया तेरी.... =))

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Sep 2015 - 10:32 am | ज्ञानोबाचे पैजार

च्यायला .... बडवायझर आणि ओल्डमंक असे कॉकटेल केल्यावर अजून काय होणार?

तरी बरे तुम्ही हमेरीकेपर्यंतच जाउन थांबलात. आम्ही तर बरीच विमाने ढगाच्या पलिकडे जाताना, याची देही याची डोळा ,पाहिलि आहेत. त्यांना खाली जमिनीवर आणणे फार मुश्किल काम असते.

बाकी सकाळ पण हल्ली पहिले पान भर जाहिराती छापतो. जाहिरातिंमधुन बातम्या शोधाव्या लागतात.

पैजारबुवा,

नाव आडनाव's picture

8 Sep 2015 - 10:40 am | नाव आडनाव

हामेरीकन-
नगरला ख्रिस्ती बांधवांची एक वस्ती आहे तिथे थोडी अशी भाषा आहे. माझा एक मित्र कायम म्हणत असतो असं तिथलं एक वाक्य -
"सन आला हेडवर, तरी जॉन बेडवर".

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 3:02 pm | बॅटमॅन

"जग चंद्रावर, बंड्या ग्राउंडावर" ची आठवण होऊन डोळे पाणावले.

जग चंद्रावर, आबा डोंगरावर.

बॅटमॅन's picture

8 Sep 2015 - 3:16 pm | बॅटमॅन

इंडीड!

पद्मावति's picture

8 Sep 2015 - 2:02 pm | पद्मावति

खूप छान लिहिलय. एक सकाळ, त्यावरचे सहा विचार. वेगळा साहित्यप्रकार. आवडला.

जव्हेरगंज's picture

8 Sep 2015 - 7:14 pm | जव्हेरगंज

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
(अजुन थोड वाढवायचा हा प्रयत्न.
अँडमीन आवडलं तर वरती चिटकवा.)

'मटणा' चा हिरो-
फरशीवर गार झोपलो होतो.
पक्या सकाळीच कुठेतरी उलथला होता.
रात्रीचं मटण फक्कड होतं.
आळस देत फरशीवरच उलथा पालथा झालो.
कुठुनतरी भिरभिरत आलेलं एक लाटणं पेकाटातच बसलं.
धुम पळालो.

ग्रेसप्रेमी (क्षमा मागुन)-
बुबुळांच्या आरक्त प्रक्षोभनातुन,
मी हजारदा सांडलो असतो.
तप्तघनीचा हा ओंगाळला वृक्ष,
बांडगुळ पांघरुन घेतो.
हा सुर्य हांडगा आहे.
त्याच्या आवशीचा घो.
ऊठतोच एकदाचा.

भिडू-
ऐ...., आरं कुठं, एवढ्या वरती का गेलायस?
थांब तिथचं, नाहीतर बापुसाहेबांकडं खंप्लेंट करीन, आन ते ऊन सोडनं पहिलं बंद कर.
आरं तिच्या, हे काय तिर्थरूप फोक घेऊन हिकडचं यायलेत.
आये, आंघुळीला पाणी काढ.

अँडमीन ओ अँडमीन, वरती चिटकवा. आवडलं.

सस्नेह's picture

9 Sep 2015 - 3:28 pm | सस्नेह

अ‍ॅडवले आहे.

जव्हेरगंज's picture

9 Sep 2015 - 3:46 pm | जव्हेरगंज

:)

एक एकटा एकटाच's picture

8 Sep 2015 - 7:37 pm | एक एकटा एकटाच

मस्तच

जबरदस्त

मजा आली वाचुन

और लिखो....

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2015 - 8:35 pm | चौथा कोनाडा

मस्त, ल ई झ्याक !

ह्ये सकाळंच झालं, आता रात्रीचं बी ल्हाय की !

अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.

\मी शब्द बरोबर वाचला ना? इथे कोणाचीच प्रतीक्रिया नाही म्हनुन विचारतोय.
पाठीला कणा असतो. खुबा हा पायाच्या सुरुवातीस असतो. असे शाळेत शिकलो होतो.

जव्हेरगंज's picture

9 Sep 2015 - 9:16 pm | जव्हेरगंज

धन्यवाद, अधुनमधून बायोलॉजीची पुस्तकं चाळत जाइन..

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2015 - 8:52 pm | बोका-ए-आझम

अंग इतकं दुखतंय की असले गोंधळ होत आहेत असं म्हणायचंय त्यांना. बाकी मस्तच. ग्रेससारखंच इतरांच्या शैलीतही लिहा ना. उदाहरणार्थ आचार्य अत्रे - गेल्या दहा हजार वर्षांत अशी झोप लागली नव्हती आणि या काँग्रेसधार्जिण्या भास्कराने आग पाखडून आम्हाला निद्रादेवीच्या साम्राज्यातून हद्दपार करायचा चंग बांधलेला आहे.

जव्हेरगंज's picture

9 Sep 2015 - 9:11 pm | जव्हेरगंज

अबब.. बोकाभाऊ, चाटच पडलो.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Sep 2015 - 10:07 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या ह्या ह्या! लै मज्जा आली वाचूण. अंटर्मणास आणंद जाला. ;)