(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या)
ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.
ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
जाउंदी तिच्यायला, बारक्या हाईच की.
कांभरून घीउन तसचं झुपलु.
तसं म्हातारं खेकसलं.
ताडदिशी ऊठलू.
वैताग-
अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.
हि किरणं कशी काय आली आत.
साली सकाळ पण लवकरचं झालीय.
आता ही अंबाबाई डोकं खाणार.
ह्यो व्यायाम पण डोक्याला ताप आहे.
अॉफिसला दांडीच मारतो आज, पण साला तो खवीस बॉस. छ्या.
डोळे उघडावे काय आता.
ते टमरेल कुठे ......... असो.
बेवडा-
थगल कत दलदलदल.
क्वाल्टल दला द्यात्तत दाली.
ह्यंगलायला दाव लादनाल.
ही थतालाय का थंद्याखाल?
थाल पानी थमी थल्लं
"बिव्रे ... थिंब्वान "
पाशवी-
हा सुर्य अनन्वित अत्याचार करत आहे.
सृष्टीचा निर्माता असला म्हणुन काय झालं.
आमच्या साखरझोपेत व्यत्यय आणण्याचा अधिकार याला दिलाच कोणी"
आम्ही याचा निषेध करतो.
तु कितीही उगवलास तरी आम्ही झोपुन राहु.
ढाराढुर...
हामेरीकन-
सकाळी सकाळी फकिंग मॉर्निंग झालीय.
इट्स टू मच्.
डीजे-डिस्कोत फुल नाईट संपवली.
ती व्हाईट गर्ल , वॉव.
नाईटभर ओन्ली सिड्युस करत राहीली.
बड्वायजर, ओल्डमंक देऊन सगळी पर्स एम्प्टी केली.
गुडबायताना हातात केवळ बनाना ठेऊन गेली, शीट.
स्लिपींग पील्स आता घेतल्याच पाहिजेत.
'मटणा' चा हिरो-
फरशीवर गार झोपलो होतो.
पक्या सकाळीच कुठेतरी उलथला होता.
रात्रीचं मटण फक्कड होतं.
आळस देत फरशीवरच उलथा पालथा झालो.
कुठुनतरी भिरभिरत आलेलं एक लाटणं पेकाटातच बसलं.
धुम पळालो.
ग्रेसप्रेमी (क्षमा मागुन)-
बुबुळांच्या आरक्त प्रक्षोभनातुन,
मी हजारदा सांडलो असतो.
तप्तघनीचा हा ओंगाळला वृक्ष,
बांडगुळ पांघरुन घेतो.
हा सुर्य हांडगा आहे.
त्याच्या आवशीचा घो.
ऊठतोच एकदाचा.
भिडू-
ऐ...., आरं कुठं, एवढ्या वरती का गेलायस?
थांब तिथचं, नाहीतर बापुसाहेबांकडं खंप्लेंट करीन, आन ते ऊन सोडनं पहिलं बंद कर.
आरं तिच्या, हे काय तिर्थरूप फोक घेऊन हिकडचं यायलेत.
आये, आंघुळीला पाणी काढ.
हांडरवर्ल्ड-
वंटास सकाळ झालीय भिडू.
काल रात्री भिक्याला टपकावला.
भेजातच घोडा घातला.
भाईकडून दोन पेटी नक्की.
पण मागुन माझ्या टाळक्यात कुणी हानलं हुतं?
आणं हा हवालदार कसा हितं?
भेंडी मी डायरेक्ट तुरूंगातच हाय की?
साला पाच वर्षे बांबू.
चाळ-
शेजारील तिंबुनानाच्या लांबलचक खाकरण्याने झोप जरा चाळवली.
किंवा, समोरील आपटेबाई गाण्याचा रिवाज करत असणार.
दोन्ही आवाजात विशेष असा काही फरक जाणवत नाही.
हे असे अगम्य विचार डोक्यात असतानाच अर्धांगाने एकसुऱ्या आवाजात हुकुम सोडला.
"अहो, नळाला पाणी सुटलयं, तेवढे दोन हंडे घेऊन रांगेला लागा"
न उठुन काय करता?
राजकारणी-
हरहर...
सुर्यमहाराज काही खबरबात न देता उगवले.
कार्यकर्ते बंगल्याभोवती उच्छाद मांडून बसले होते.
जयघोषांचा तर पाऊसच पडत होता.
तेवढ्यात चँनलवरचा रिर्पोटर बराळला.
दुनियेचे कान टवकारले.
पक्ष्याला फक्त एकच शीट.
अवसानघातच की..
आता दिवसभर फुकाचे लोळणे आले.
वाचने
7064
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
पलंगावर..?
In reply to मस्त by मारवा
चांगला आहे की प्रयोग !
हामेरिकन
मस्त! मस्त!! मस्त!!!
काही भयंकर नाव डोळ्यांसमोर
In reply to मस्त! मस्त!! मस्त!!! by शित्रेउमेश
अंधेरी रातमे, दिया तेरी.... =
In reply to काही भयंकर नाव डोळ्यांसमोर by जव्हेरगंज
च्यायला ....
हामेरीकन-
"जग चंद्रावर, बंड्या
In reply to हामेरीकन- by नाव आडनाव
अजून काही व्हेरिएशन्स...
In reply to "जग चंद्रावर, बंड्या by बॅटमॅन
इंडीड!
In reply to अजून काही व्हेरिएशन्स... by एस
खूप छान लिहिलय. एक सकाळ,
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
अँडमीन ओ अँडमीन, वरती चिटकवा.
In reply to प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. by जव्हेरगंज
अॅडवले आहे.
In reply to अँडमीन ओ अँडमीन, वरती चिटकवा. by प्यारे१
:)
In reply to अॅडवले आहे. by सस्नेह
मस्तच
मस्त, ल ई झ्याक !
अंग कसं ठणकत होत.पाठीचा खुबा
धन्यवाद, अधुनमधून बायोलॉजीची
In reply to अंग कसं ठणकत होत.पाठीचा खुबा by विजुभाऊ
तेच तर विजुभौ!
अबब.. बोकाभाऊ, चाटच पडलो.
In reply to तेच तर विजुभौ! by बोका-ए-आझम
ह्या ह्या ह्या ह्या ह्या!