मित्रा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
4 Sep 2015 - 9:44 am

जीवघेण्या बंदुकांच्या फैरी
फुटणारे बॉम्ब
जीवाच्या आकांताने पळणारे रेफ्यूजी
या सार्यांना समजावता येईल रे,
पण तू, एका कधीच न संपणाऱ्या समुद्रात
निघुन गेलास चिरविश्रांती घेण्यासाठी.
तुला कस समजावणार आता !!
खैर
शांत झोपलेल्या माझ्या छोट्या मित्रा कायम तसाच रहा

जिप्सी

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

4 Sep 2015 - 10:49 am | मांत्रिक

ही कविता मी तुमच्या ब्लॉगवर वाचलेली आहे. पण त्यासोबतचे छायाचित्र देखील द्यायला हवे होते. कारण त्याच्याशिवाय कवितेचा नीट अर्थबोध होत नाही.

छायाचित्र डकवण्याचा प्रयत्न केला होता मी जमले नाही मग फक्त कविताच पोस्ट केली.

तुमची बारिश की मेमरी अजून आहे हो लक्षात! खूप खूप आवडलेली कविता मला.
ही पण कविता म्हणून चांगली आहे. पण छायाचित्रासहित वाचल्यास एकदम धक्का बसतो. एकदम हृदयाच्या तळापासून काहीतरी कळ निघते.

महासंग्राम's picture

4 Sep 2015 - 11:31 am | महासंग्राम

धन्यवाद मांत्रिक, अशीच मंत्रणा करत रहा…. :)

एक एकटा एकटाच's picture

4 Sep 2015 - 7:18 pm | एक एकटा एकटाच

टोचली

सूड's picture

4 Sep 2015 - 7:25 pm | सूड

:(

अत्रुप्त आत्मा's picture

4 Sep 2015 - 7:34 pm | अत्रुप्त आत्मा

:(