गादी

संजय पाटिल's picture
संजय पाटिल in जनातलं, मनातलं
24 Jul 2015 - 6:49 pm

सर्व मिपाकरांना सादर प्रणाम करून पहिलेवहिले लेखन सादर करत आहे. शुद्धलेखन व टायपिंग मिस्टेक्स समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

साधारण १०-१२ वर्षापूर्वी घडलेली घटना. त्यावेळी मी, पत्नी, दोन मुले - मुलगी व.व. ४, मुलगा व.व. ०.७५, आई आणि वडील असे सर्वजण इचलकरंजीला एकत्र राहत होतो. गेले २-३ महिने सौ व आई यांचा जुन्या गाद्या मोडून नवीन करण्याबद्दल पाठपुरावा चालू होता. आता मोडून म्हणजे काय तर गादीवाला जो असतो तो घरी येतो, जुन्या गाद्यांचे वजन करतो आणी घेऊन जातो. मग आपण त्याच्या कारखान्यात जायचं. आपल्याला हवं ते कापड सिलेक्ट करायचं. साधारण साइज व नग सांगायचे. जर जादा कापूस लागणार असेल तर त्याचे पैसे व कापडाचे पैसे आगाऊ घ्यायचे . मग २-३ दिवसात तयार गाद्या घरी डिलिव्हरी देऊन जातात. मग कापसाच्या वजनातला फरक, नवीन कापडाचा दर, मजुरी असा सगळा हिशोब करून पैसे द्यायचे असा एकूण प्रकार होता. गादीवाल्याला विचारलं की बाबा आधी नवीन गाद्या बनव मग जुन्या घेऊन जा, तर म्हणाला की एवढा कापूस माझ्याकडे शिल्लक नसतो. आम्ही लोक फक्त मजुरी वर काम करतो.

आता या सगळ्या भानगडीत २-३ दिवस विना गादी चे राहावे लागणार म्हणून मी हे प्रकरण टाळत होतो. योगायोगाने बहिणीच्या घरी काहीतरी कार्यक्रम निघाला म्हणून आई व वडील ५-६ दिवसांसाठी बहिणीकडे राहायला गेले. हे गेल्यावर बायकोला पुन्हा नव्या गाद्यांची आठवण झाली. ती म्हणाली "अहो, आई व बाबा ५-६ दिवस नाहीयेत, आपण पण २ दिवस तिकडेच जाणार आहोत. तर जाताना गाद्या देऊ म्हणजे परत येईपर्यंत तो गाद्या बनवून ठेवेल व आपण आल्या आल्या आणून देईल."

मला पण हे पटलं आणि म्हंटलं चला, एकदाचा हा प्रश्न सुटतोय तर करून घेऊ. मग गादीवाल्याला बोलावलं. त्याने आणलेल्या स्प्रिंग च्या काट्यावर एक एका गादीचे वजन केले. आई बाबांच्या खोलीतून आतल्या पण गाद्या उचलून आणल्या. सगळ्या गाद्यांचे वजन लिहिलेला एक कागद माझ्याकडे दिला व "कारखान्यात येऊन कापड बघून जा" असे सांगून गाद्या हौद्याच्या सायकलीत टाकून घेऊन गेला. हौद्याची सायकल म्हणजे त्या सायकलीचा पुढचा भाग हा एखाद्या दोन चाके लावलेल्या पाळण्यासारखा व मागच्या भागाला अर्धी एक चाकी सायकल, पूर्वी घरातला सिलिंडर अश्याच सायकल मधून यायचा.

दोन दिवसांनी आम्हीपण बहिणीकडे गेलो. तिकडचा कार्यक्रम झाल्यावर सगळेजण एकत्रच परत निघालो. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचलो. कुलूप काढून दार उघडून आत येऊन टेकलो होतो तोच बाबांची नजर रिकाम्या दिवाण वर पडली. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहताच मी खुलासा केला "अहो नवीन गाद्या करायला दिल्यात, म्हंटलं दोन दिवस कोणी नाही तर तेवढ्यात होऊन जातील."

"बरं केलंस. खरंतर मीच सांगणार तुला पण माझ्या पण ध्यानात नाही आलं" बाबा म्हणाले.
"अहो बाबा, यांच्या तरी ध्यानात कुठलं येतंय? मीच सुचवलं" इति सौ. पुढे माझ्याकडे पाहून " अहो अजून वेळ आहे तर बघून याना त्याच्याकडे जाऊन झाल्यात का ते?"
"अगं आत्ता तर येतोयना आपण, थोडा चहा घेतो आणी मग जातो"
मी एवढं बोले पर्यंत आई गडबडीने त्यांच्या खोलीत गेली.
"मी चहा टाकते" असं म्हणत बायको किचन कडे वळली.
"अरे आतल्या पण गाद्या दिल्यास का?" असं घाबऱ्या आवाजात बोलत आई पुन्हा बाहेर आली.
"हो. अगं सगळ्याच नवीन करायच्या होत्या ना? मग त्या कशाला ठेवू?"
"अरे पण देण्यापूर्वी मला जरा विचारायचंस. एखादा फोन तरी करायचास?" आई एकदम रडकुंडीला येत बोलली.
"अगं त्यात काय विचारायचंय? आणी तुम्हीच दोघी त्याच्या मागे लागला होतात ना गाद्या नवीन कर नवीन कर म्हणून? मग आता काय झालं?" बाबांनी विचारलं.
"आहो काय सांगू तुम्हाला? त्या आतल्या गादीत माझ्या पाटल्या होत्या!" असं म्हणत आईने डोक्याला हात लावला आणी खाली बसकण मारली.
"काय? पाटल्या? आणी गादीत?" बाबा आणी मी एका सुरात ओरडलो."
"अहो काय झालं? कुणाच्या पाटल्या? आणी आई का रडतायत?" चहा घेऊन येत असलेल्या बायकोने विचारलं आणी चहाचा ट्रे टिपॉय वर ठेवत ती पण आई जवळ फरशीवर बसली.
"आई अहो काय झालं? अश्या का रडताय? काय हो काय झालं आईंना?" असं म्हणत ती माझ्या कडे व बाबांकडे बघू लागली.
"अगं नीट सांगशील का काय ते? आणी रडणं आधी बंद कर बघू?" बाबा काळजीच्या सुरात बोलले.

आम्ही सर्वांनी मिळून १५-२० मिनिटं समजूत काढून आईला शांत करून बोलतं केलं. तेव्हा आईने सांगितलेल्या माहिती वरून एकंदरीत असा प्रकार घडला होता...

हे कसे सेव्ह करायचे माहीत नसल्यामुळे प्रकाशीत करत आहे.

क्रमशः

<a target = "_blank" href="/node/32139">भाग २</a>

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2015 - 6:52 pm | टवाळ कार्टा

म्हणून घरातल्या किमती वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे घरातल्या प्रत्येकाला (वय वर्षे १५ च्या वरच्या) माहित हवे

वर्णन मजेशीर वाटतंय.बांगड्या परत मिळाल्या असतील अशी अपेक्षा!!!

बादवे, गादी वाचून आत काहीतरी प्रक्षोभक असेल असे वाटले होते. पण ही तर भलतीच कुटुंबवत्सल कथा निघाली.

टवाळ कार्टा's picture

24 Jul 2015 - 7:14 pm | टवाळ कार्टा

खिक्क....पाडायचे का विडंबन ;)

अस्वस्थामा's picture

24 Jul 2015 - 7:32 pm | अस्वस्थामा

तुला तर चान्सच पायजे हा.. ;)

भिंगरी's picture

24 Jul 2015 - 8:23 pm | भिंगरी

टका चान्सलर

मृत्युन्जय's picture

24 Jul 2015 - 6:57 pm | मृत्युन्जय

वाचतोय

उगा काहितरीच's picture

24 Jul 2015 - 7:21 pm | उगा काहितरीच

चांगलं लिहीलय की !

अहो बाबा, यांच्या तरी ध्यानात कुठलं येतय

कुठली म्हणायची ही भाषा ?

रोचक किस्सा. मिपावर स्वागत. पुभाप्र. लेखनासंबंधी काही अडचण असल्यास साहित्य संपादक यांच्याशी संपर्क साधावा.

स्पंदना's picture

24 Jul 2015 - 7:47 pm | स्पंदना

नित्य कहाणी :))

लेखण करत असताना स्वतःलाच मेल करायच चोप्य्पेस्त करत. तेव्हढा एकच मार्ग आहे सेव्ह करायचा.

त्यापेक्षा एमेस वर्ड मध्ये सेव्ह करा फाईल. नंतर थेट काॅपी पेस्ट करा

सविता००१'s picture

24 Jul 2015 - 8:24 pm | सविता००१

गादीत पाटल्या?????
ठेवल्या तरी कशा???

सोंड्या's picture

24 Jul 2015 - 8:55 pm | सोंड्या

जडभारतजींशी बाडीस
शिर्षक वाचून लादी मादी इत्यादी शिर्षक सुचले होते पण छ्या....
पुभाशु

अरे बापरे!मिळाल्या का नाही परत?पुढला भाग लवकर टाका.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jul 2015 - 10:08 am | श्रीरंग_जोशी

रोचक आहे अनुभवकथन. लेखनशैली आवडली.

पुढल्या भागाची उत्सुकता आहे.

खटपट्या's picture

25 Jul 2015 - 11:45 am | खटपट्या

बापरे !! लवकर सांगा पुढे काय झाले ते.