क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
10 Jul 2015 - 9:23 am

क्रिकेटच्या खेळाच अविभाज्य भाग म्हणजे स्लेजिंग!

एकाग्रपणे खेळत असलेल्या बॅट्समनचं चित्तं विचलीत करण्यासाठी आणि एकग्रता भंग पावून आणि एखादा भलताच चुकीचा शॉट मारून तो बाद व्हावा म्हणून अनेकदा शेरेबाजी केली जाते. बहुतेक वेळा ही शेरेबाजी वैयक्तीक असते आणि एकमेकांचं गुणवर्णन करणार्‍या - विशेषतः 'फ'काराने सुरु होणार्‍या - खास शब्दांनी सजलेली असते हे वेगळे सांगणे न लगे!

स्लेजिंगची ही कला रुजवली आणि मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरवात केली ती ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपल आणि त्याच्या सहकार्‍यांनी! चॅपलच्या संघातील स्वतः चॅपल, त्याचा धाकटा भाऊ ग्रेग चॅपल, डेनिस लिली, रॉडनी मार्श आणि अ‍ॅश्ली मॅलेट हे या कलेत माहीर असलेले खेळाडू! चॅपलच्या या स्लेजिंगच्या कलेलाच पुढे स्टीव्ह वॉने मेंटल डिसइंटीग्रेशन हे नाव दिलं. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी यात विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे! पर

स्लेजिंगच्या वेगवेगळ्या किश्श्यांसाठी हा धागा -

(असा धागा आधी निघाला असल्यास कल्पना नाही. निघाला असल्यास त्याची लिंक द्यावी. हा धाग रद्द करण्याची मी संपादकांना विनंती करेन).

************************************************************************************

क्रीडालेख

प्रतिक्रिया

स्पार्टाकस's picture

10 Jul 2015 - 9:30 am | स्पार्टाकस

पहिला किस्सा भूतपूर्व इंग्लिश कॅप्टन डॉ. डब्ल्यू जी ग्रेस (आद्य दाढीदिक्षीत - इति शिरीष कणेकर!) याचा..

डब्ल्यू जी ग्रेस एका मॅचमध्ये खेळत असताना त्याला बॉलिंग करणार्‍या एका बॉलरने ग्रेसच्या दोन स्टंप्स उडवल्या! ग्रेस विकेटवर काही क्षण उभा राहिला. बहुतेक अंपायर नोबॉल देईल अशी त्याला अपेक्षा असावी. नाईलाज झाल्यावर ग्रेस जेव्हा परत फिरला तेव्हा त्या बॉलरने त्याला ऐकवलं,

Surely you are not going doctor?
There is one stump still standing

ग्रेसविरुद्ध केलेली अनेक चांगली अपिल्स अंपायरने नाकारल्यामुळे वैतागलेल्या बॉलरने ग्रेसला हे ऐकवलं होतं!

श्रीरंग_जोशी's picture

10 Jul 2015 - 9:38 am | श्रीरंग_जोशी

एकदम आवडीचा अन रोचक विषय. पूर्वी चर्चा झाली असली तरी नव्याने चर्चा व्हायला काहीच हरकत नाही.
शोध घेतल्यावर मृत्युन्जय यांचे दोन धागे मिळाले.

मला लगेच आठवलेला एक किस्सा. भारताच्या २००३च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव वॉचा शेवटचा सामना होता.

एका षटकात भारतीय फिरकीपटूच्या (बहुधा हरभजन) गोलंदाजीवर खाली बसून षटकार मारल्यावर यष्टिरक्षक पार्थिव पटेलने अजुन एक असे म्हणून स्टीव वॉला डिवचले.

त्यावर वॉ ने असे काहीसे उत्तर दिले होते, व्हेन आय स्टार्टेड प्लेयिंग इन्टरनॅशनल क्रिकेट यु वर स्टिल इन नॅपिज...

राघव's picture

2 Dec 2018 - 5:55 pm | राघव

बॉय, शो सम रिस्पेक्ट!
व्हेन आय स्टार्टेड प्लेयिंग इन्टरनॅशनल क्रिकेट, यू वेअर स्टिल इन नॅपिज...

माझ्या आठवणीतला किस्सा म्हणजे आमिर सोहेल चं प्रसाद ला डिवचणं, प्रसाद चा लेग कटर, उडालेला त्रिफळा, आणि 'मा****!' अशी प्रसाद ने हासडलेली शिवी.

उगा काहितरीच's picture

10 Jul 2015 - 9:52 pm | उगा काहितरीच

क ड क !

मृत्युन्जय's picture

10 Jul 2015 - 11:17 am | मृत्युन्जय

श्रीरंग जोश्यांनी लिंक दिल्याच आहेत. पण म्हणुन धागा उडवण्याची काय गरज आहे. परत नव्याने किस्से शेयर करता येतीलच की. शिवाय गेल्या २ -३ वर्षात नविन किस्से आले असतीलच. :)

सारवान आणि मॅकग्राथचा किस्सा
इथे देण्यासारखा नाही. :)
पण मॅकग्राथने सारवानला डिवचले होते आणि सारवानचे पत्युत्तर ऐकुन तो इतका खवळला होता की त्याच्या अंगावर धावुन गेला होता.

मॅकग्राथने सारवानला डिवचले होते हे खरे असले तरी, सारवानच्या उत्तराने मॅकग्राथ खवळण्याच्या कारणाला आणखी एक बाजू आहे.
मॅकग्राथची प्रेयसी (बहुतेक तिचं नाव जेन) लग्नाआधीच ब्रेस्ट कॅन्सर ने पिडीत होती. तिची शस्त्रक्रिया करून तिचा एक **** काढून टाकण्यात आला होता. हे माहिती असूनही मॅकग्राथने तिच्याशी लग्न केलं. लग्नाआधी आणि नंतरही मॅकग्राथने तिची मनापासून सेवा केली. काही वर्षांपूर्वी ती मरण पावली.
सारवानचे उत्तर मॅकग्राथला म्हणूनच जास्त लागले होते. सरवानला वरील गोष्टीची कल्पना होती का ह्याविषयी मला कल्पना नाही.
मैदानात कसाही असला तरी मॅकग्राथ मैदानाबाहेर अत्यंत सभ्य गृहस्थ आहे.
(आक्षेपार्ह वाटत असेल तर संपादक हा प्रतिसाद काढून टाकू शकतात)

मृत्युन्जय's picture

10 Jul 2015 - 12:07 pm | मृत्युन्जय

ही नंतरची सारवासारव झाली. मॅक्ग्राने सारवानला विचारले की "काय मग लाराच्या *** ची चव कशी आहे?". त्यावर सारवान म्हणाला "मला माहिती नाही. तुझ्या बायकोला विचार". असभ्य टिप्पणीला तसेच उत्तर देताना सरवान ने अगदी सहज उत्तर दिले होते. त्यात त्याने मॅक्ग्राच्या बायकोचा कॅन्सर, तिचा आजार, तिचे ऑपरेशन यावर काहिही टिप्पणी केलेली नव्हती. सरवान हा एरवीदेखील एक सभ्य माणूस आहे आणि मैदानावरदेखील तो स्लेजिंग करण्ञासाठी प्रसिद्ध नाही. मॅक्ग्रानेच त्याची नसती कुरापत काढली होती आणि मग बायकोच्या आजारपणाला मध्ये आणत कांगावा केला असे माझे तरी स्पष्ट मत आहे.

मी मॅकग्राथचे समर्थन करत नाही !तो चुकलाच होता..

मैदानाबाहेरचा एक किस्सा ..
वेगवान गोलंदाज डेनिस लिली हा मैदानावर फलंदाजाला खूप अर्वाच्य शिवीगाळ करायचा. पण मैदानाबाहेर तो त्याच्याशी अगदी मैत्रीपूर्ण वागायचा (म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला पार्टी देणे वगैरे ). अश्याच एका पार्टीत कपिल देवने त्याला विचारले
"तू इथे इतका छान वागतोस. मग मैदानावर साता जन्माचा वैरी असल्यासारखा का करतोस ?"
लिली म्हणाला ," मी एक वेगवान गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडू वेगाने टाकण्यात माझी प्रचंड शक्ती खर्ची पडते. आणि जेंव्हा शक्ती वय जाताना दिसते तेंव्हा माझा राग अनावर होतो"
त्यावर कपिल म्हणाला," अरे मी पण शक्ती खर्च करतो पण मी चिडचिड करत नाही तुझ्यासारखी"

यावर लिली च्या उत्तराने कपिल अवाक झाला होता.
लिली म्हणाला," कारण तू वेगवान नाही तर मध्यमगती गोलंदाज आहेस !!"

श्रीरंग_जोशी's picture

10 Jul 2015 - 9:46 pm | श्रीरंग_जोशी

आजवर स्लेजिंगचे जेवढे किस्से ऐकले असतील त्यात मला वाटणारा शिरोमणी किस्सा हाच.

England were playing Pakistan and, at what turned out to be a crucial moment later on, Frank Tyson managed to get an outside edge off a Pakistani batsman after the batsman had been frustrating them on a hot sweaty day. The ball went right through the hands of Raman Subba Rao who was standing in first slip and through his legs. After the over Raman heads over to the bowler and says, "Sorry Frank, I should've closed my legs." Frank Tyson, who didn't find any of this amusing, quipped back, "Not, you bastard, your mother should have."

वरील मजकूर येथून साभार.

स्पार्टाकस's picture

11 Jul 2015 - 1:21 pm | स्पार्टाकस

१९७४-७५ च्या अ‍ॅशेस मालिकेतला हा किस्सा (लिली-थॉमसनने गाजवलेली सिरीज)

इंग्लंडचा डावखुरा स्पिनर डेरेक अंडरवूड बॅटींग करत असताना थॉमसनचा चेंडू त्याच्या हातावर जोरात शेकला. अंडरवूड मैदानात हातावर उपचार करुन घेताना इयन चॅपलने त्याला विचारलं,

"Derek, which hand?"

"Right one." अंडरवूड उत्तरला

"F**k, We were aiming for the left one!" इति इयन चॅपल!

स्पार्टाकस's picture

11 Jul 2015 - 1:23 pm | स्पार्टाकस

२०१३-१४ च्या अ‍ॅशेस मालिकेत (मिचेल जॉन्सनने गाजवलेली सिरीज) बॅटींग करायला आलेल्या जेम्स अँडरसनला उद्देशून ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकेल क्लार्क,

"Get ready for a f**king broken arm."

अभिदेश's picture

13 Jul 2015 - 5:43 am | अभिदेश

आशेस मालिकेत एकदा इयान बोथम फलंदाजी करायला आल्या आल्या ऑसी यष्टीरक्षक रॉडनी मार्शने स्वागत केले …

Rodney : Hey Ian .. How's your wife and my kids ?

Ian : Wife is fine but kids are retired..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Jul 2015 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रिटार्डेड असं हवं होतं का?