नसत्या उचापती -१ { तपासणी}

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
25 Jun 2015 - 4:26 pm

सकाळचे आठ वाजले असतील . आज सुट्टीचा दिवस , मी पण आगदी निवांत होतो . शांतपणे वर्तमान पत्र वाचत चहाचा आंनद घेत होतो .तो पर्यंत दारावर कोणी थाप मारली . मी दार उघडले ,पाहतो तर आमचे शामराव . मळका शर्ट, धोतर , डोक्याला लाल मुंडासे बांधलेले .शामराव हातात कांहीतरी घेऊन आत आले . मी विचारले देखील ,शामराव काय आणलाय हे आज ?
त्यावर शामराव म्हणाले " दोन दिस झाल ,म्ह्स व्याली , तुमास्नी खरवसाचे दुध आवडते म्हणून हे दुध घेऊन आलोय ."

माझ्या मनात देखील त्याच्या प्रेमाच्या ओलाव्याने कृथार्थ भावना निर्माण झाली .तस बघितले तर कधी काळी शामराव हे आमच्या शेतात कूळ म्हणून होते ,नंतर कुळ कायद्या मुळे ते आमच्या जमिनीचे मालक झाले पण त्यांनी आमच्या बरोबर असणारे प्रेमाचे,घरोब्याचे संबध मात्र कधी तोडले नाहीत . आम्ही देखील त्यांना कुठलीही मदत लागू दे ,त्याचे कुठलेही काम असू दे , ते करण्यास आम्ही तत्पर असू . तो आमच्या घरी येताना देखील कधी रिकाम्या हाताने येत नसत . कधी भोपळा तर कधी तुरीच्या शेंगा तर कधी वांगी घेऊन येत असे . आता बघा ना निव्वळ आम्हाला आवडते म्हणून तो खरवसाचे दुध घेवून लवकर सकाळी आला होता .त्याला आमच्या स्वच्छतेचा दंडक हि चांगलाच ठाऊक आहे . मी त्याला बजावून सांगीतले आहे ,कुठलिही गोष्ट देताना स्वच्छ घासलेल्या भांडयातून झाकुन देणेची आहे. त्याने आज देखील, एकदम नवीन दिसणार्‍या तांब्या सारखा, स्वच्छ घासलेला तांब्या, त्यावर झाकलेले कर्दळीचे पान व त्या पानाभोवती दोरीने बांधून हातात दोरी धरली होती . म्हणजे आपल्या घरात शिंकाळे असते अगदी तसे . इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या ,चहा पाणी झाले .

मग शामरावम्हणाले " मालक गेली सात आठ दिवस झाले पोटाला लई चावतंय बघा , काय भी सुचत नाही ,”
“पोटाला चावतंय “ !!! “ कोण चावतंय “…. मी.
“अव चावतंय म्हंजी लई दुखतय, कुठल्या तरी डाक्तरला दाखवाव म्हणतोय , म्हणून शान आज आलोय बगा” . शामराव .
" ठीक आहे आपण जाऊ आज डॉक्टरांचे कडे " मी म्हणालो.

जवळच असणाऱ्या ओळखीच्या डॉक्टर कडे मी त्याला घेऊन गेलो . डॉक्टर साहेबांचा दवाखाना घरातच होता . बाहेरच्या खोलीत दवाखाना , छोटीशी तपासणीची खोली व मागे ते कुटुंबा सहित राहत होते. आमचा नंबर आल्यावर मी व शामराव आत गेलो . मी शामरावांची ओळख डॉक्टर साहेबाना करून दिली.
”हे आमचे गाव वाले शामराव, अहो ही माणसे खेडूत असली म्हणून काय झाले ? . फार मायाळू हो ! बघाना आज निव्वळ मला आवडते म्हणून बिचारा सकाळी खरवसाचे दुध घेऊन आलाय" . हे ऐकल्यावर डॉक्टर देखील खुश झाले , म्हणाले " अरे वा !! खरवसाचे दुध , अहो आमच्या मंडळीना देखील खूपच आवडते हो !!! ते मिळवण्यासाठी आम्ही कुठे कुठे हिंडलो,ठाऊक आहे , हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. हे ऐकल्यावर मी म्हणालो " अहो त्यात काय एवढे , आमचा शामराव देईलकी तुम्हाला खरवसाचे दूध आणून ! काय शामराव , देशील ना डॉक्टर साहेबाना खरवसाचे दुध?. " शामराव गालातल्या गालात हसला ,अव डॉक्टर साहेब त्यात काय ऐवढी आप्रुबाई, म्या आणून देतो तुमास्नी दुध " डॉक्टर पण खूपच खूश झाले . नंतर बाजूच्या खोलीत शामरावला नेऊन त्याची तपासणी केली व ते शामरावाना घेऊन बाहेर आले . ते म्हणाले "हे बघा यांच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण आत्ता तरी मला सांगता येणार नाही . त्या साठी आपल्याला कांही टेस्ट कराव्या लागतील . एक दोन दिवसात तुम्ही यांना परत घेऊन या ,ब्लड आपण इथेच घेउ ,मात्र युरीन त्यांना घेऊन यायला सांगा . मग ठरवू आपण काय उपचार करायचे ते ." नंतर आम्ही दोघे घरी परत आलो . डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी शामरावाना सांगितल्या .बहुतेक युरीन तपासण्याची कल्पना, त्याला कांही आवडली नसावी ." आयला !! डॉक्टर लोक कशाचीबी तपासणी करत्यात " असे म्हणत तो गाव कडे निघून गेला .

त्या नतर बरेच दिवस शामराव कांही आले नाहीत . एक दिवस अचानक नेहमी प्रमाणे हातात घासलेला स्वछ तांब्या ,त्या वर कर्दळीचे पान बांधलेले, त्याला सभोवती दोरी बांधलेली ,,हातात दोरी घेऊन ते आवतरले. त्यांना बघितल्यावर मी लगेचच ओळखले . शामराव खरवसाचे दुध घेऊन आले आहेत .ते पण डॉक्टर साहेबा साठी असणार . अरे वां !!! म्हणून कोणी संतानी म्हंटले आहे "बोले तैसा चाले ,त्याची वंदावी पावले "मी शामरावना लगेचच म्हणालो " चला शामराव ,आधी स्कूटर वर बसा. डॉक्टर साहेबाना हे देवून येऊ या " तसे शामराव पटकन स्कूटर वर बसले व दवाखान्यात आलो .दवाखान्यात खूपच गर्दी होती व मला पण वेळ कमी होता म्हणून मी व शामरावाने दारातून हळूच डोकावले व डॉक्टर साहेबाना हसत तांब्या दाखवला . डॉक्टर साहेबाना याची लगेचच कल्पना आली व त्यांनी" हे आत वहिनीच्या कडे द्या व फ्रीज मध्ये ठेवायला सांगा असा निरोप दिला . डॉक्टर साहेब देखील जाम खूश झाले असणार .

नंतर मी व शामराव घरी परत आलो . नेहमी प्रमाणे चहा पाणी झाले गप्पा गोष्टी चालूच होत्या ,मध्येच काळजी पोटी मी शामरावाना विचारले " शामराव मागल्या खेपेस तुम्ही पोटात दुखते अस कांहीतरी म्हणत होता ,डॉक्टरनी तपासणी करून घ्यायला सांगितले होते ना ? असे अंगावर काढू नका हं, ते युरीन तपासायला सांगितले होते त्याचे काय झाले ? " असे मी विचारले.
त्या वर शामराव उत्स्फ़ूर्तपणे म्हणाले " अवं तेच तर मी तपासणी साठी सकाळी तांब्यातून घेऊन आलो नव्हं ? !!!"
हे ऐकल्यावर एखादी वीज अंगावर पडावी तसा मी ताडकन उडालो . काय बोलावे ते मला सुचेना..
"अरे शहाण्या, तुला हे सर्व करायचेच होते तर लहान बाटली ,छोटीशी डबी तुझ्या कडे नव्हती काय" ? मी.
" तुम्हीच म्ह्णाला नव्ह, कुठ्लिबी गोष्ट घासलेल्या भांड्यातून, झाकून आन म्ह्नून, आनी मला बी काय ठाव,तुमची गडबड कशापाई चालीया " शामराव.

माझ्या ह्या गडबडी स्वभावामुळे,मी स्वताहून हे संकट ओढवून घेतले होते.अता काय होणार ह्या चिंतेने मी व्याकुळ झालो होतो,मात्र घरातील सर्व मंडळी अगदी लहाना पासून ते मोठया पर्यन्त ,माझा चेहरा बघून खो खो हसत होती. त्या नंतर मी मात्र त्या डॉक्टरांच्या आजुबाजूच्या रस्त्यावर देखील फिरकलो नाही. ही गोष्ट इथेच संपली . पुढल्या शंका मला विचारू नका. कळावे ,लोभ असावा ही विंनती !!!

हे ठिकाण

प्रतिक्रिया

खेडूत's picture

25 Jun 2015 - 4:52 pm | खेडूत

हा हा हा !
लैच्च भारीय! :)

टवाळ कार्टा's picture

25 Jun 2015 - 4:52 pm | टवाळ कार्टा

=))

उगा काहितरीच's picture

25 Jun 2015 - 5:45 pm | उगा काहितरीच

सिरीयस वाचता वाचता एकदम दणका ! वा क्या बात है !

कपिलमुनी's picture

25 Jun 2015 - 5:58 pm | कपिलमुनी

शेवटचा पंच तर एक नंबर :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2015 - 6:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

सौंदाळा's picture

25 Jun 2015 - 6:03 pm | सौंदाळा

हह्पुवा
पुढचे भाग पण असेच धम्माल पाहिजेत बरं का :)

ऋतुराज चित्रे's picture

25 Jun 2015 - 6:35 pm | ऋतुराज चित्रे

मजा आली. शामरावांनी तांब्यावर पाणी सोडले असेल आणी डॉ.साहेबांना तर कोणत्याही तांब्याने पाणी प्यायची भितीच वाटत असेल.

एस's picture

25 Jun 2015 - 6:55 pm | एस

हाहाहा!

शीर्षक वाचून खरेतर अंदाज यायला हवा होता. शेवट म्हणजे षटकार ठोकलाय एकदम!

सूड's picture

25 Jun 2015 - 6:57 pm | सूड

अर्र !! फ्रिजमध्ये? =))

विवेकपटाईत's picture

25 Jun 2015 - 7:17 pm | विवेकपटाईत

मस्त मजा आली वाचताना.

अजया's picture

25 Jun 2015 - 7:35 pm | अजया

=)) हाहाहा!!

मोहनराव's picture

25 Jun 2015 - 7:36 pm | मोहनराव

वेड्यासारखा हसतोय. लास्ट्च पंच लई बेकार!!
तांब्यावाले कुठे गेले रे सगळे!!

एक एकटा एकटाच's picture

25 Jun 2015 - 7:42 pm | एक एकटा एकटाच

खतरनाक

मधुरा देशपांडे's picture

25 Jun 2015 - 8:30 pm | मधुरा देशपांडे

लोल. :)))

चिगो's picture

26 Jun 2015 - 12:09 am | चिगो

शामराव लैच भारी.. एकदम जबराट..

रातराणी's picture

26 Jun 2015 - 12:40 am | रातराणी

उप्स!!
पु.भा.प्र!

रुपी's picture

26 Jun 2015 - 2:02 am | रुपी

मला आधी वाटलं की शामरावांच्या तपासण्यांचा खर्च वगैरे करावा लागला असं काही असेल.. :)

रेवती's picture

26 Jun 2015 - 5:33 am | रेवती

हा हा हा. काहीही.

मुक्त विहारि's picture

26 Jun 2015 - 6:41 am | मुक्त विहारि

शेवट अप्रतिम

नाखु's picture

26 Jun 2015 - 9:39 am | नाखु

कलाटणी "तांबीय दणका"

पुलेप्र.

मृत्युन्जय's picture

26 Jun 2015 - 10:40 am | मृत्युन्जय

लैच बेक्कार हसतोय. :)

झकासराव's picture

26 Jun 2015 - 10:55 am | झकासराव

अगागागागागा !!!!!!!!!!!!!!!!!!!!

हसुन हसुन डोळ्यातुन पाणी आलं . :)

स्नेहल महेश's picture

26 Jun 2015 - 11:14 am | स्नेहल महेश

:D

पाटील हो's picture

26 Jun 2015 - 11:31 am | पाटील हो

हा हा हा हा हा हा

खटपट्या's picture

26 Jun 2015 - 12:13 pm | खटपट्या

हही हही हही !!
कथेत तांब्या असला तरी कथा तांबीय नाहीये..
कमीत कमी तांब्या परत आणायला तरी जायचे...

शि बि आय's picture

26 Jun 2015 - 12:44 pm | शि बि आय

हा हा मस्तच ! ह्या पुढे कोणालाही काहीही सांगताना जरा जपून

तुषार काळभोर's picture

26 Jun 2015 - 12:58 pm | तुषार काळभोर

भारी!!

बॅटमॅन's picture

26 Jun 2015 - 1:35 pm | बॅटमॅन

अग्गा बाबौ =)) =)) =))

अमितसांगली's picture

26 Jun 2015 - 1:48 pm | अमितसांगली

भारीच...

आतिवास's picture

26 Jun 2015 - 1:59 pm | आतिवास

:-)

स्वीत स्वाति's picture

26 Jun 2015 - 2:09 pm | स्वीत स्वाति

:-)

भटक्या योगी's picture

26 Jun 2015 - 2:13 pm | भटक्या योगी

​एकदम ४४० चा झटका. सिरीयसली वाचता वाचता अस काही असेल याची कल्पनाच आली नाही. जबरजस्त दणका :D :D :D

भीडस्त's picture

26 Jun 2015 - 2:43 pm | भीडस्त

सवसानच्याला डागदरीन बाईंनी डागदरसाएबाचा जाळ न धूर संगंच
काडला आसन पघा...

नाव आडनाव's picture

26 Jun 2015 - 2:57 pm | नाव आडनाव

:)

कोंकणी माणूस's picture

26 Jun 2015 - 3:38 pm | कोंकणी माणूस

शेवट वाचून लोटपोट

संदीप डांगे's picture

26 Jun 2015 - 5:13 pm | संदीप डांगे

जबराट लिव्लंय...

पण असंच सेम कुठंतरी वाचल्यासारखं वाटतंय... नक्की काय आठवत नाही पण डॉक्टर, खेडूत, वस्तू, बांधून नेणे, डॉक्टरने न बघता ठेवून घेणे. नक्की काय वाचलं होतं ते आठवलं तर सांगेन. कधी कधी उगाच देजावू फीलींग्स येत असतात.

मार्मिक गोडसे's picture

26 Jun 2015 - 6:37 pm | मार्मिक गोडसे

देजावू . च्यायला मलाही असंच वाटलं. मिपावर नसावे पण कुठेतरी नक्किच.

Sanjay Uwach's picture

26 Jun 2015 - 10:28 pm | Sanjay Uwach

सद्याच्या ह्या गतिमान जिवनात हसू मात्र फारच दुर्मिळ झाले आहे. पण तुम्ह्च्या ह्या हसण्याच्या प्रतिक्रीयेच्यां मुळे मी मात्र खुपच आंनदी झालो आहे.इतक्या लोकांना मी खारोखर हसवू शकलो, तर मी स्व:ताला खुपच भाग्यवान समजेन.हि कथा सत्य घटनेवर आधारीत आहे.एका माझ्या गावाकडील खेडूत माणसाने आशा प्रकारे तपासणी साठी युरीन आणले होते त्यावरून मला ही कल्पना सुचली व ती मी थोडी रंजक बनवून लिहली आहे.आशा आनेक गोष्टी मी पुढे लिहणार आहे.या कथेतिल तांत्रिक मुद्दे आपण क्षण भर बाजुला ठेवुन याचा आंनद लुटूया--संजीव वाशीकर.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

26 Jun 2015 - 10:36 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हे हे हे...

स्नेहानिकेत's picture

28 Jun 2015 - 12:13 am | स्नेहानिकेत

हा हा हा !!! जबराट शेवट.

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 9:58 am | dadadarekar

छाण

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jun 2015 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगागागागागा !!!!!!!!!!!!!!!!!!!!

बेक्कार हसतोय. =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2015 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी. =))

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jun 2015 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार

हाण तेज्यायला, ते शामराव गावंढळ होत का इरसाल?
त्या डाक्टरचा पण घरी मोठा पोपट झाला असेल.
परत कुणाकडे खरवसच काय काही सुध्दा मागायचा नाही.
पैजारबुवा,

लय म्हणजे लयच भारी . हि खरोखर घडलेली गोष्ट आहे का ?

प्रमोद देर्देकर's picture

30 Jun 2015 - 5:10 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी

अभिजीत अवलिया's picture

5 Jul 2015 - 12:46 am | अभिजीत अवलिया

हसून हसून पुरेवाट. जबरी

यशोधरा's picture

5 Jul 2015 - 2:47 am | यशोधरा

=))

मितभाषी's picture

5 Jul 2015 - 8:07 pm | मितभाषी

=))