उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
16 Jun 2015 - 10:42 am

मिसळपाव या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मिसळपाव संकेतस्थळ हे एक येथे नमुद धोरणांच्या परिघात सामुदायिक लेखन वाचन सहभागास अनुमती देणारे खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळाने दिलेल्या नियमांच्या चौकटीच्या मर्यादा सांभाळून संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही लेख धागे काढता येतील प्रतिसाद देता येतील अशी या संकेतस्थळाची रचना आहे.

माझे या संकेतस्थळावरील लेखन मुख्यत्वे हौशी लेखन असून ज्या धागालेखांवर प्रताधिकार मुक्ततेची सुस्पष्ट सूचना दिलेली नाही ते लेखन प्रताधिकारीत समजावे. मी लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. येथे मी दिलेल्या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही. कोणत्याही लेखातील कोणताही मजकूर या संकेतस्थळाच्या धोरणांना अनुलक्षून संकेतस्थळाचे मालक अथवा संपादकांनी पूर्ण अथवा अंशतः बदललेला किंवा वगळलेला असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. धागा लेखावरील प्रतिसादातील कोणताही मजकूर खर्‍याखुर्‍या जाणकार व्यक्तीच्या मतांशी न जुळणार्‍या किंवा संबंधित क्षेत्रातील ज्ञानाच्या अद्ययावत स्थितीबद्दल काहीच माहिती नसलेल्या व्यक्तीकडून लिहिलेला असू शकतो. अथवा विवीध धागा लेखातील माझे स्वतःचेही प्रतिसाद खर्‍याखुर्‍या जाणकार व्यक्तीच्या मतांशी न जुळणार्‍या किंवा संबंधित क्षेत्रातील ज्ञानाच्या अद्ययावत स्थितीबद्दल काहीच माहिती नसलेल्या स्थितीत आणि म्हणून त्रुटीयूक्त असू शकतात.

मी माझ्या धागा लेखात माझ्या प्रतिसादात किंवा माझ्या धागालेखावरील माझ्या आणि इतरांच्या प्रतिसादात, मिसळपाव संकेतस्थळाच्या धोरणांचे आणि लागू होणार्‍या कोणत्याही कायद्यांचे शासकीय नियमावलींचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही लेखनास मिसळपाव व्यवस्थापन संपादक आणि सहभागी लेखक यांना मी कोणत्याही प्रकारे अनुमती देत नाही आणि ज्याच्या त्याच्या जबाबदार्‍या त्यांच्या त्यांच्या असतील. काहीही झाले तरी, धागालेख पाने आणि प्रतिसाद पानात आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, मी अथवा माझ्या धाग्यावरून प्रतिसाद देणारे कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रबंधक , किंवा मिसळपाव संकेतस्थळाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, धोरण आणि कायदे विषयक अनिवार्य जबाबदार्‍यांपलिकडे जबाबदार असणार नाही.

मी आणि या संस्थळाचे धागालेखाच्या मजकुरात परस्पर संपादन करु शकणारे संपादक (यात या भूमिकेस अनुलक्षून संस्थळ मालक) अथवा माझ्या धागालेखांना प्रतिसाद देणारे अथवा मी प्रतिसाद दिला आहे अशा इतर धागा लेखकात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. मी माझ्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.

मी ज्या धागा लेखात लेखन आणि प्रतिसाद प्रताधिकार मुक्त होत असल्याची सुस्पष्ट सूचना केली आहे, तुम्हाला त्या प्रताधिकार मुक्ती सुस्पष्टपणे नमुद केलेल्या धागा लेखांतून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही

लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही इतरांच्या मालकीचा कॉपीराईटेड मजकुर, व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), अशा माहितीचा तुम्ही उपयोग करू शकत नाही.

मजकुराची वैधता आणि वैधता कार्यक्षेत्र

ज्या देशातून तुम्ही माहिती पहात आहात त्या देशातील कायद्यानुसार, मिसळपावसंकेतस्थळावरून अथवा मी नमुद केलेल्या दुव्यांवरील प्रकाशित झालेली एखादी माहिती पाहणे बेकायदेशीर किंवा तिथल्या प्रचलित नियमांचे उल्लंघन करणारे असण्याची शक्यता असू शकते. तुमच्या देशातील कायदे अशा पद्धतीच्या बोलण्यास, लिहिण्यास वा मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. मी कोणत्याही कायद्याच्या उल्लंघनास कुणासही उत्तेजन देत नाही; आणि म्हणून जर तुम्ही या संकेतस्थळावरील माझ्या धागा लेखांचा अथवा प्रतिसादांचा दुवा दिलात, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारित किंवा पुनःप्रकाशित केली, आणि असे करताना नियमभंग झाला, तर अशा कोणत्याही रीतीने कायद्याच्या किंवा नियमाच्या उल्लंघनास मी जबाबदार असणार नाही.

व्यावसायिक सल्ला नव्हे

जर तुम्हाला वैद्यकीय, कायदा, आर्थिक किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. मी कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला देत नाही.

कायदे अथवा विधीतत्व मिमांसा विषयक धागा लेख, अथवा प्रतिसाद लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. राज्यघटनेतील आणि विवीध कायद्यातील तरतुदी कायदे मंडळांच्या, न्यायपालिकांच्या निर्णयांनी सातत्याने उत्क्रांत (इव्हॉल्व) होत जातात आणि त्यांचा आवाकाही बराच मोठा आणि माझ्या सारख्या हौशी लिहिणाऱ्या सदस्यांना तेवढी माहिती असेल किंवा तशी लिहिण्याची आम्हाला सवड होईलच असे नाही, त्या शिवाय येथील लेखनात विवीध कारणास्तवर त्रुटीही राहून जाऊ शकतात. म्हणून माझ्या धागालेख धागालेखास आलेले प्रतिसाद अथवा माझे इतर धागा लेखांना प्रतिसादातील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी मी घेत नाही आणि माझ्या धाग्यांवरी प्रतिसाद लेखकांवर मिपा धोरणे आणि अनिवार्य कायदेचिषयक ज्याच्या त्याच्या जबाबदार्‍यांपलिकडे उर्वरीत तशी कोणतीही जबाबदारी ठेवत नाही.

आपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.

आम्ही दिलेल्या माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.

* अद्याप लेखन आणि सुधारणा चालू

* या उत्तरदायकत्वाच्या नकारासाठी विकिपीडियातील उत्तदायकत्वास नकाराचा अंशतः वापर केलेला असला तरी हा उत्तरदायकत्वाचा नकार तांत्रिकदृष्ट्या स्वतंत्र आहे.

* सुधारणा सुचवल्या जाण्याचे स्वागत.
* अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.

धोरणवावरप्रकटन

प्रतिक्रिया

देशपांडे विनायक's picture

16 Jun 2015 - 12:44 pm | देशपांडे विनायक

सभासदाने
हे वाचले आहे याची नोंद असावी म्हणून व्यवस्था ?

माझ्या वैयक्तीक ध्येय धोरणाशी अतिशय सुसंगत मजकुर या धाग्याचा आहे माझ्या लिखाणांचे ध्येयधोरण म्हणून मी याच मजकुराचा वापर करायच्या विचारात आहे.

सुरिया's picture

25 May 2021 - 4:19 pm | सुरिया

इतके सगळे करण्यापेक्षा फक्त "आम्ही नाई ज्जा" असे लिहून बोळवण केल्यास कसे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2021 - 9:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहीतगार यांनी सरकारच्या नव्या धोरण कायदा या संबधी तपशीलवार माहिती द्यावी ही विनंती.

-दिलीप बिरुटे

गॉडजिला's picture

26 May 2021 - 11:18 am | गॉडजिला

मिपाची तेव्हडी लोकसंख्या नाही