दिल्ली, आग्रा भटकंती - माहिती हवी आहे

चिमी's picture
चिमी in भटकंती
15 Jun 2015 - 2:48 pm

नमस्कार मिपाकर्स,

अजया ताईच्या इटलीच्या भ्रमणगाथेवरुन प्रेरणा घेऊन मी आणि माझ्या मैत्रिणीने दिल्ली - आग्रा ट्रिप फायनली फायनल करुन टाकली आहे. (जी ह्या आधी घरच्यांच्या नादी लागून ३ वेळा रद्द करायला लागली होती :( )
तर भटकंतीचा सर्वसाधारण प्लॅन असा असणार आहे :
२५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर - पुणे - दिल्ली - पुणे - तिकीट + दिल्ली निवासाचे आरक्षण झालेले आहे.

२५-२६ - दिल्ली दर्शन
२७ सकाळी - आग्र्यासाठी प्रस्थान - आग्रा स्थल दर्शन
२८ - ताजमहल + फतेह्पुर सिक्री.
२९ - मथुरा + व्रुंदावन
३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर - उर्वरित दिल्ली दर्शन + दिल्लीस्थित मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी + खरेदी + खादाडी

तर या संदर्भात पुढील माहिती हवी आहे:

१. २७ ला रात्री पोर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ताजमहल बघायचा ठरवत आहोत. २७ ला नेमका रविवार आहे. गर्दीची शक्यता लक्षात घेता तसेच जालावर मिळालेल्या माहितीनुसार फक्त १/२ तास वेळ मिळतो म्हणे आणि तोही तिकिटावर (रुपये ५१० फ॑क्त ) जो स्लॉट छापुन येणार तोच, आपल्या सोयीनुसार नाही ...
तर काय करावे? व्दिधा मन:स्थिती झाली आहे.
२८ ला सकाळी तर नक्की बघणार आहोतच..

२. आग्र्याला राहण्यासाठी चांगले हॉटेल सुचवा - बजेट रु. १०००-३०००

३. मथुरा + व्रुंदावनसाठी गुगलने खुप सारी मंदिरांची यादी दिली आहे. नक्की आवर्जून पाहावी अशी मंदिरे + इतर ठिकाणे कोणती आहेत?
मथुरा + व्रुंदावन एकाच दिवसात बघुन होइल का? दिल्लीला परत यायला मध्यरात्र झाली तरी हरकत नाही.
की सरळ १ दिवस मथुरा आणि १ दिवस व्रुंदावन असे करावे?

४. खरेदी - सध्या तरी दिल्ली हाट आणि आग्रा येथे बनाना सिल्क साडी एवढीच खरेदी करायची ठरवली आहे. तसा वेळ भरपुर आहे. त्यामुळे तुम्ही खरेदीसाठी काही स्पेशल ठिकाणे असतील तर अवश्य सुचवा. तसेच आवर्जुन खरेदी करावे असे काही असेल तर तेही सुचवा.

५. दिल्ली स्पेशल खादाडी - कुठे कुठे आणि काय काय खादाडी करता येईल?

६. दिल्ली स्थलदर्शनासाठी चांगला लोकल टुर ऑपरेटर सुचवा. आम्हाला गुगलवर काही सापड्ले पण ते स्वतंत्र इंडिकासाठी २५००रु.+ पर डे ( ८० किमी पर डे ) असा चार्ज सांगत आहेत. ग्रुप टुर नको वाटत ए.
स्वतंत्र गाडी साठी पर डे रिझनेबल चार्ज किती असतो?
दिल्ली मेट्रोचा अभ्यास सुरु करावा की सरळ रिक्शा/ टॅक्सीने फिरावे?

७. इतरही काही सुचना असतील तर अवश्य सांगा.

प्रतिक्रिया

स्वामी संकेतानंद's picture

15 Jun 2015 - 3:47 pm | स्वामी संकेतानंद

आग्रामथुरावृंदावनचा व्यक्तिगत अनुभव नाही, पण मित्राने सांगितले की मथुरा-वॄंदावन एकाच दिवसाच होतात. चांदण्या रात्रीसाठी जो स्लॉट मिळत असेल तो घेऊन टाका. दिवसा काय नेहमीच ताज पाहतो.
दिल्लीला तुम्ही जे दर पाहिलेत ते स्टँडर्ड आहेत. पण तुमच्यापाशी नंतर ४ दिवस आहेत तेव्हा निवांत दिल्ली बघता येईल. लक्षात असू द्या की सगळी ऐतिहासिक स्थळे सोमवारी बंद असतात दिल्लीत. मेट्रो+ऑटो/हातरिक्षा हा कॉम्बो बेस्ट आहे. फक्त ऑटो किंवा फक्त टॅक्सी महाग पडेल. म्हणजे कुतुबमिनार जायचे असेल तर येलो लाइन घेऊन कुतुब मिनार स्टेशनला उतरायचे आणि तिथून रिक्षा करायचा. साधारण एक-दिड किलोमिटर दूर आहे. (मी पायीच गेलो होतो.) हेच कॉम्बिनेशन वापरुन सगळी प्रेक्षणिय स्थळे बघता येतात. स्वस्तात मस्त काम आहे. वेळ फारसा जात नाही.दिल्लीतल्या घाणेरड्या ट्राफिक जामपासून सुटका होते. मुख्य म्हणजे तुमच्यापाशी भरपूर वेळ आहे. टूर ऑपरेटर फार घाई करतात. नीट दाखवत नाही.
खादाडीची बरीच ठिकाणे आहेत. त्याबाबत मिपाकर सोन्याबापू जास्त व्यवस्थित सांगू शकतील. मी दिल्लीतच राहत असलो तरी फक्त पुरानी दिल्लीलाच खादाडी केली आहे आणि करिम्सबद्दल ऐकून आहे. करीम्स म्हणजे ऑथेन्टीक मुघलई चे दुसरे नाव.पराठेवाली गल्लीमध्ये चिकटुन असलेल्या ३ दुकानांपैकी एकात पराठे खाणे. अनेक डुप्लिकेट दुकाने उभी राहिली आहेत. पण मला व्यक्तिश पराठेवाली गल्लीतले पराठे ओवरहाइप्ड वाटले.

चिमी's picture

15 Jun 2015 - 5:59 pm | चिमी

धन्स :)
सध्या मेट्रो + रिक्शा - असच ठरवल आहे. बाकी एक एक्सेलच बनवुन ठेवली आहे, कोणत्या दिवशी कुठे जायच, त्याचे तिकिट किती,कॅमेरा फीस , वर्किंग अवर्स, सुट्टीचे दिवस etc. etc.

किसन शिंदे's picture

15 Jun 2015 - 11:26 pm | किसन शिंदे

लक्षात असू द्या की सगळी ऐतिहासिक स्थळे सोमवारी बंद असतात दिल्लीत.<<<

ताजमहलच्या संस्थळावर शुक्रवार दिलाय.

स्वामी संकेतानंद's picture

16 Jun 2015 - 10:41 am | स्वामी संकेतानंद

ताजमहल दिल्लीत नसून आग्रा नामे शहरात आहे. दिल्लीत बहुतेक जामा मस्जिद पण शुक्रवारी बंद असते फॉर कॉमन पब्लिक.

बॅटमॅन's picture

16 Jun 2015 - 1:18 pm | बॅटमॅन

सोमवारी उघडी असणारी दोनच ठिकाणे- हुमायून टोम्ब आणि कुतुब मिनार क्यांपस. बाकि सगळे बंद असते. पण किमान ही दोन ठिकाणे तरी उघडी असतात, हेही नसे थोडके. कुतुब मिनार सगळेच पाहतात, पण हुमायून का मकबरा मात्र जास्त रडारवर दिसत नाय. तो कुतुबमिनारहून २-३ किमीच लांब आहे.

चिमी's picture

16 Jun 2015 - 2:20 pm | चिमी

हुमायून, सफदरजंग का मकबरा बघणार आहे. tripadvisor वर दिलेली most of the attractions पाहणार आहे.

जमल्यास पुराना किला येथील साउंड & लाईट शो देखील बघण्यास विसरू नका. लै भारी असतो असे कैक मित्रांकडून समजते.

संसदेजवळच नॅशनल म्युझियम आहे ते तर नक्कीच बघितले पाहिजे. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांपासून ते शिवाजीमहाराजांच्या होनापर्यंत अनेक जबराट वस्तू आहेत.

लोधी गार्डन्सही मस्त.

कनॉट प्लेस पासून जवळच गुरुद्वारा बंगला साहिब आहे, तिथेही जाऊन या. अतिशय सुंदर व्यवस्था आहे.

लोटस टेंपल आणि अक्षरधाम हेही बघायला विसरू नका. बाकीही अनेक उत्तम ठिकाणे आहेत, जमल्यास राष्ट्रपती भवनाचे रिझर्व्हेशन करून ठेवा अगोदरच ऑनलाईन.

बाकी आग्र्यात ताजमहाल आणि आग्र्याचा किल्ला हे तर सगळेच बघतात. पण अजून काही ठिकाणे आहेत तिकडे लक्ष तितके जास्त प्रमाणात जात नाही. (बाकी ताजमहालाच्या परिसरातले ताज म्युझियम बघा, तिथे अनेक भारी भारी गोष्टींची माहिती दिलेली आहे. एक फारसी व मोडी अशा दोन्ही लिप्यांमधले पत्रही ठेवलेले आहे.)

इत्मद-उद-दौला अर्थात नूरजहानच्या बापाचे थडगे. ताजमहालचे वैशिष्ट्य म्ह. संगमरवरात अजून दगड जोडून केलेली कारागिरी अर्थात पिएट्रा ड्यूरा. त्याचे ताजमहालापूर्वीचे उदाहरण म्हणजे इत्मद उद दौला. छोटेसे पण नितांतसुंदर.

आणि आग्रा शहराच्या सिकंदरा भागात असलेले अकबराचे थडगे. हे तर कुणी फारसे पाहते असे आजिबात वाटत नाही. सगळे फतेपुर सिक्रीच पाहतात. पण थडगेही अवश्य बघावे, ग्रँड आहे एकदम. कलाकुसर छान आहे.

बाकी मथुरेस जाणार असाल तर तिथे मंदिरे पहा, त्यातही विशेषतः प्रेम मंदिर, बांकेबिहारी मंदिर, इस्कॉन टेंपल, इ. विशेष पाहण्याजोगे आहेत. बांकेबिहारी मंदिर टिपिकल गचाळ आहे, पण प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेंपल छान ऐसपैस आणि स्वच्छ आहेत. विशेषतः प्रेम मंदिराची सजावट खासकरून रात्रीच पहा, अप्रतिम.

मस्त माहिती.वाखु साठवत आहे.

चिमी's picture

17 Jun 2015 - 2:18 pm | चिमी

बॅटमॅन,
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद. पिएट्रा ड्यूरा ही टर्म माहित नव्हती.
बांकेबिहारी मंदिर गूगलवरचे फोटो पाहुन कॅन्सल केले होते. वेळ मिळाला तर जाईन.
बाकी सर्व नक्की बघणार आहे.

बॅटमॅन's picture

17 Jun 2015 - 2:27 pm | बॅटमॅन

बाकी अजूनेक सल्ला:

दिल्लीत मेट्रो ही प्रवासाकरिता बेस्ट हेवेसांनल. त्यामुळे राहण्याचे ठिकाण असे असावे की जे मेन मेट्रो स्टेशनपासून जवळ असावे. राजीव चौक हे त्याकरिता बेस्ट स्टेशन आहे. दिल्लीचे दादर म्हटले तरी चालेल. इथे मेट्रोच्या मॅक्सिमम लायनी क्रॉस होतात आणि कुठेही जायचे तर इथून गाडी मिळते म्हणजे मिळतेच. तस्मात राजीव चौकाजवळच हॉटेल इ. बघा. आणि मेट्रो तिकिटाचे म्हणाल तर प्रथम दिवशी एक स्मार्टकार्ड घ्या, दोनतीनशेचा रिचार्ज मारा म्हणजे नेहमी रांगेत उभे रहावे लागणार नाही.

आणि आग्रा-मथुरा प्रवासाकरिता अजून एक पेश्शल सूचना: दिल्लीहून तिकडे जायला अनेक रेल्वे गाड्या आहेत अन ३ तासांत जाता येते आग्र्यापर्यंत, पण परतीच्या गाड्या मात्र हमखास लेट होतात, त्यात एकदम लांबवरच्या स्टेशनांहून आल्या तर लैच लेट होतात. त्यामुळे परतीसाठी शताब्दीचे रिझर्वेशन केलेले एकदम उत्तम. दोन तासांत दिल्ली टच. आणि लेटही होत नाही.

हे सगळे जर एका दिवसात आग्रा आटोपणार असाल तरचे झाले. दोन दिवस थांबणार असाल तर कै टेन्शन नै. आरामात दुसर्‍या दिवशी परत येता येईल.

दिल्ली हाट खरेदीसाठी चांगले आहे ऐकुन आहे.इथले दिल्लीकरच सांगु शकतील जास्त.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2015 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा

चिमा,
भटकंतिला शुभेच्छा!
भरपूर फ़ोटो काढ. आणि टाक इकडे.

मथुरा वृंदावन घाण फार आहे. दोन तासात उरकावे लागले.हॅाप-ओन-हॅाप ओफ बसने अथवा मेट्रो दोन्ही पर्याय आहेत दिल्लीसाठी.

चिमी's picture

15 Jun 2015 - 6:09 pm | चिमी

--मथुरा वृंदावन घाण फार आहे -- एवढ्या दुर जात ए तर बघुनच येते - on the way आहे.

नितिन५८८'s picture

15 Jun 2015 - 5:42 pm | नितिन५८८

दिल्ली भटकंती साठी मेट्रो एकदम सुलभ, मेट्रो नकाशा खाली देत आहे

http://www.delhimetrorail.com/Zoom_Map.aspx

मेट्रो प्रवास आणी तिकीट साठी http://www.delhimetrorail.com/metro-fares.aspx

खादाडीसाठी पुरानी दिल्ली परिसर मस्तच. खान मार्केट नवी दिल्ली मधील खान चाचा (कबाब साठी फ़ेमस)

खरेदी करताना घासाघीस नक्की करावी. विशेष करून पालिका बाजार, सरोजिनी बाजार मध्ये.

माझा एक अनुभव
मला पालिका बाजार मध्ये sport bike gloves १२०० रु. ला सांगितले मी सुरुवात १०० रु ने केली आणि १५० रु ला मिळाले. कोट ४००० रु सांगितलेला मी ११०० रु मध्ये घेतला शिवाय त्यावर ३ टाय पण फ्री घेतले. सरोजिनी बाजार मध्ये sport shoes ८०० चे २५० ला दिले,

बाकी तुमच्या भटकंतिला शुभेच्छा !

वपाडाव's picture

15 Jun 2015 - 5:56 pm | वपाडाव

एग्जॅक्टली...
नितीन यांनी जे सान्गितले आहे, ते महत्वाचे आहे...
पालिका अन सरोजिनी बजार मध्यी घासाघिस केल्याशिवाय काहीही घेउ नये...
मेट्रो ब्येश्ट...
गुगल वर स्र्व सर्‍व अभ्यास करुन जावे

आपल्या गतीने भटकायला ही सेवा उत्तम आहे.
दिल्ली हाट मध्ये सर्व प्रांतातले खाद्यपदार्थ मिळतात. आयएनए मेट्रो स्टेशनपासून दोन मिनिटं लागतात फक्त.

चिमी's picture

15 Jun 2015 - 6:07 pm | चिमी

धन्यवाद इरसाल, अजया ताई, बुवा, कंजुस काका, नितिन अन वपाडाव..
मेट्रोचा अभ्यास लवकरच सुरु करावा लागणार :(
कंजुस काका हॅाप-ऑन-हॅाप ऑफ बसचे बघितले होते - पण त्या बससाठी अडकून बसाव लागेल विनाकारण :(
<< मथुरा वृंदावन घाण फार आहे >> एवढ्या दुर जात ए तर बघुनच येते - on the way आहे.

आतिवास's picture

15 Jun 2015 - 6:12 pm | आतिवास

पण त्या बससाठी अडकून बसाव लागेल विनाकारण :(
अनेक बस एकाच मार्गावरून (दर अर्ध्या तासाने) जातात. प्रत्येक स्टॉपवर कोणकोणत्या वेळी बस येईल ते वेळापत्रक देतात. एकाच तिकिटावर दिवसभरात कोणत्याही बसमध्ये चढता येते.

वॉव! अशी सोय पुण्यात पीएमपीएमएल बससाठी सुरू झाली पाहिजे. परदेशात तर असे ऐकले आहे की एकच तिकिट बस, रेल्वे, भुयारी रेल्वे, ट्राम या सगळ्यांना चालते. २४ तासांचे असते.

माझीही शॅम्पेन's picture

15 Jun 2015 - 6:31 pm | माझीही शॅम्पेन

चिमी - फक्त दोन महिन्यापूर्वी एक दिवसात आग्रा (ताज महाल आणि आग्रा किल्ला) आणि मथुरा (कृष्ण जन्म मंदिर) एका दिवसात पाहिले
कृष्ण जन्म मंदिर परिसरात शिरताना कुठलेही मोबईल फोन , कॅमेरा, सीम कार्ड , इतर गाझेटस ह्यांना परवानगी नाही
माझ्या माहितीत फत्तेपूर सिक्री हे वेगळ्या दिशेला आहे
वृन्दावन मुद्दाम नाही पाहिले , वृन्दावन परिसरात बरीच मंदिर आहेत , बरीच फसवा फसवी आहे आणि किचाड पण आहे , दिल्लीत बाराच्या आत पोहोचण कधीही शहाणपणाचे आहे

दिल्लीत :-
इंडिया गेट , राष्ट्रपती भवन + ससंद भवन (दोन्ही बाहेरून) , राज घाट , बिर्ला मंदिर , अक्षर-धाम मंदिर (हे बघायला ४/५ तास लागतात)

खरेदी
दिल्लीला कपडे / सुका मेवा / चपला बूट / चामड्याच्या इतर गोष्टी , खादाडी जागोजागी
आग्रा - पेठा (काही पेठा चोकलेट , पान फ्लेवर मध्ये मिळतात)
मथुरा - पेढा , रबडी

चिमी's picture

15 Jun 2015 - 9:32 pm | चिमी

माशॅ - मी आग्रा १ दिवस, फत्तेपूर सिक्री दुसरा दिवस आणि मथुरा + वृन्दावन साठी तिसरा दिवस - असा ऐसपैस/ साग्रसंगीत कार्यक्रम ठरवला आहे..
दिल्लीत बघण्यासाठी तुम्ही लिहिलेली सर्व ठिकाणे बघणार आहे :)

भुमन्यु's picture

16 Jun 2015 - 12:57 pm | भुमन्यु

आवड असल्यास रेल्वे म्युझिअम ही बघा

माझीही शॅम्पेन's picture

17 Jun 2015 - 1:51 pm | माझीही शॅम्पेन

दिल्लीत लोटस मंदिर आणि इंडिया गेट सांगायचं राहिलाच आणि कॅनॉट प्लेस आणि पालिका बझार (इथे दरात घासाघीस करू शकतेस)

आग्रा , मथुरा ,वृंदावन आणि फत्तेपूर सिख्रीला थोडा जास्त वेळ देते आहेस अस वाटतंय

मथुरा आणि वृंदावन खूप सांभाळून खास करून वृंदावन, प्रचंड फसवा फसवी आहे , येन केन प्रकारे देणग्या उकळणे हा इथला राज-रोस धंदा आहे , म्हणून ह्या वेळेस वृंदावनला फाट्यावर मारलं होत , तरीही वृंदावनच्या फाट्यावर काही समाज कंटक आम्हाला गाडी जबरदस्ती वृंदावन कडे नेण्यास सांगत होते (शेवटी आमचा दरीवर UP चाच खमक्या असलाने अतिप्रसंग आला नाही)

जिकडे तिकडे बर्या पैकी गर्दी , हैराण करणारे फोटोग्राफार्स (खास करून ताज) आणि फिरते विक्रेते (खास करून इंडिया गेट) हे इग्नोर मारलस तर ट्रीप चांगली वेन्जोय करशील

हर्षद खुस्पे's picture

15 Jun 2015 - 8:26 pm | हर्षद खुस्पे

नक्की पहा.आ.जा. वर तिकीट बुकीॉ बुकींग मिळते .

मथुरा वृंदावन याबरोबरच गोकुळ ही करा. एक दिवस पुरे. पण सावध रहा. तिथे गाइड म्हणा पुजारी म्हणा, त्यांचा रेटा भयानक असतो. अनेक क्लूप्त्या करून ते आपल्याला दक्षिणा द्यायला लावायचा प्रयत्न करतात. माझ्या अंगावर काटा आणणारा अनुभव होता.

काळी यमुना नक्की बघा...

दिल्ली मथुरा दिल्ली एक दिवसात होइल की नाही, कल्पना नाही हो. बघायला एक दिवस नक्कीच खूप होइल.

चिमी's picture

15 Jun 2015 - 9:45 pm | चिमी

हे एक नवीनच कळल. गोकुळाची माहिती काढुन ठेवते. वेळेच गणित जुळल तर अवश्य जाऊन येते. धन्यवाद.

स्वाती दिनेश's picture

16 Jun 2015 - 12:22 am | स्वाती दिनेश

अवांतर- काळी यमुना वरुन उगाचच रात्र काळी, घागर काळी... हे गाणं आठवलं.. :)
स्वाती

हेच का ते कृष्णाचे गोकुळ ,वगैरे प्रश्न पडतो.आता तुम्ही सर्व ठरवलेच आहे नाहीतर आग्रा करून परत दोनशे किमी मागे दिल्लीला जाण्यपेक्षा तेवढेच अंतर जयपूर आहे .तिथे दोन दिवस काढून येणे योग्य ठरते.

मुक्त विहारि's picture

16 Jun 2015 - 10:57 am | मुक्त विहारि

पण....

प्रवासवर्णन मात्र जरूर लिहा...

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2015 - 11:06 am | टवाळ कार्टा

हॉटेलसाठी www.agoda.com आणि www.tripadvisor.com बेस्ट आहेत...आधी रिव्ह्यू वाचून रेटिंग बघून मगच बुकिंग करावे

कंजूस's picture

16 Jun 2015 - 12:17 pm | कंजूस

पत्रके/दिल्ली १) २)

भुमन्यु's picture

16 Jun 2015 - 12:41 pm | भुमन्यु

दिल्लीत राहण्यासाठी युथ हॉस्टेलचा विचार करु शकता. त्याचे ऑनलाईन बूकिंग त्यांच्या संकेतस्थळावरुन करु शकता.
दुवा: http://www.yhaindia.org/

नितिन५८८'s picture

16 Jun 2015 - 12:44 pm | नितिन५८८

मेट्रो साठी Travel card विकत घ्यावे, नाहीतर टोकन घेण्यासाठी प्रत्येकवेळी मोठया रांगेत ताटकळत
उभे रहावे लागेल. (Travel Card कोणत्याही मेट्रो स्टेशन वर मिळते)

मेट्रोच्या वेबसाईटवरून खाली माहिती मिळेल

Travel card
First Time Rs 100 ( including Rs 50 refundable security)
Next recharge Rs 100 to Rs 1000
Validity - 1 year after every recharge, max 10 years

नितिन५८८'s picture

16 Jun 2015 - 12:56 pm | नितिन५८८

भुमन्यु च्या सांगण्याप्रमाणे युथ हॉस्टेल सर्वात बेस्ट आहे, ३०० रु. एका दिवसासाठी शिवाय नाश्ता फ्री, मी स्वतः युथ होस्टेलचा मेम्बर आहे व युथ होस्टेलचा डलहौसी ट्रेक दरम्यान अनुभव घेतला आहे.

चौकटराजा's picture

18 Jun 2015 - 8:54 am | चौकटराजा

अक्षर धामला कॉनोट प्लेस वरून बस ने अर्ध्या तासात पोह्चता येते. अप्रतिम स्थान आहे.
इस्कोन मंदिरा तील शो अगदी मस्ट.
काही इव्हेन्ट असल्यास प्रगती मैदानाला जरूर भेट द्या.
आग्र्यात किल्ला ताज बरोबर..... दयाळ बाग चुकवू नका... हे पूर्ण झाले की ताजला झाकोळून टाकेल बहुदा.

हे जाता जाता च पहा.....
कुतब मिनार, लोटस टेंपल, बिरला मंदिर .

हे चुकविले तरी चालेल
बंगाल मिटाई मार्केट, दिल्ली हाट, पराठेवाली गल्ली.

कातड्याच्या वस्तू क्नाट प्लेस ला मिळतील. करोल बाग ला स्वेटर जर्किन ई.

अहो तुमची ट्रीप कशी झाली? काही प्रवास वर्णन वगैरे लिहिलंयत का?

चिमी's picture

1 Dec 2015 - 10:58 am | चिमी

दिल्ली ट्रीप एकदम मस्त झाली. वर्णन लिहायची इच्छा आहे पण ऑफिस मुळे वेळ मिळत नाही ए :(
ताजमहल आणि फतेहपुर सिक्री अतिशय सुंदर :)
पुण्याच्या आणि युपीच्या रिक्षावाल्यांमधे अंमळ फरक जाणवला.
लोकांच्या दारिद्र्याची प्रकर्षाने जाणीव करुन देणारी ट्रीप ठरली :( :(