नमस्कार मिपाकर्स,
अजया ताईच्या इटलीच्या भ्रमणगाथेवरुन प्रेरणा घेऊन मी आणि माझ्या मैत्रिणीने दिल्ली - आग्रा ट्रिप फायनली फायनल करुन टाकली आहे. (जी ह्या आधी घरच्यांच्या नादी लागून ३ वेळा रद्द करायला लागली होती :( )
तर भटकंतीचा सर्वसाधारण प्लॅन असा असणार आहे :
२५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर - पुणे - दिल्ली - पुणे - तिकीट + दिल्ली निवासाचे आरक्षण झालेले आहे.
२५-२६ - दिल्ली दर्शन
२७ सकाळी - आग्र्यासाठी प्रस्थान - आग्रा स्थल दर्शन
२८ - ताजमहल + फतेह्पुर सिक्री.
२९ - मथुरा + व्रुंदावन
३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर - उर्वरित दिल्ली दर्शन + दिल्लीस्थित मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी + खरेदी + खादाडी
तर या संदर्भात पुढील माहिती हवी आहे:
१. २७ ला रात्री पोर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ताजमहल बघायचा ठरवत आहोत. २७ ला नेमका रविवार आहे. गर्दीची शक्यता लक्षात घेता तसेच जालावर मिळालेल्या माहितीनुसार फक्त १/२ तास वेळ मिळतो म्हणे आणि तोही तिकिटावर (रुपये ५१० फ॑क्त ) जो स्लॉट छापुन येणार तोच, आपल्या सोयीनुसार नाही ...
तर काय करावे? व्दिधा मन:स्थिती झाली आहे.
२८ ला सकाळी तर नक्की बघणार आहोतच..
२. आग्र्याला राहण्यासाठी चांगले हॉटेल सुचवा - बजेट रु. १०००-३०००
३. मथुरा + व्रुंदावनसाठी गुगलने खुप सारी मंदिरांची यादी दिली आहे. नक्की आवर्जून पाहावी अशी मंदिरे + इतर ठिकाणे कोणती आहेत?
मथुरा + व्रुंदावन एकाच दिवसात बघुन होइल का? दिल्लीला परत यायला मध्यरात्र झाली तरी हरकत नाही.
की सरळ १ दिवस मथुरा आणि १ दिवस व्रुंदावन असे करावे?
४. खरेदी - सध्या तरी दिल्ली हाट आणि आग्रा येथे बनाना सिल्क साडी एवढीच खरेदी करायची ठरवली आहे. तसा वेळ भरपुर आहे. त्यामुळे तुम्ही खरेदीसाठी काही स्पेशल ठिकाणे असतील तर अवश्य सुचवा. तसेच आवर्जुन खरेदी करावे असे काही असेल तर तेही सुचवा.
५. दिल्ली स्पेशल खादाडी - कुठे कुठे आणि काय काय खादाडी करता येईल?
६. दिल्ली स्थलदर्शनासाठी चांगला लोकल टुर ऑपरेटर सुचवा. आम्हाला गुगलवर काही सापड्ले पण ते स्वतंत्र इंडिकासाठी २५००रु.+ पर डे ( ८० किमी पर डे ) असा चार्ज सांगत आहेत. ग्रुप टुर नको वाटत ए.
स्वतंत्र गाडी साठी पर डे रिझनेबल चार्ज किती असतो?
दिल्ली मेट्रोचा अभ्यास सुरु करावा की सरळ रिक्शा/ टॅक्सीने फिरावे?
७. इतरही काही सुचना असतील तर अवश्य सांगा.
वाचने
14573
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
आग्रामथुरावृंदावनचा व्यक्तिगत
धन्स :)
In reply to आग्रामथुरावृंदावनचा व्यक्तिगत by स्वामी संकेतानंद
लक्षात असू द्या की सगळी
In reply to आग्रामथुरावृंदावनचा व्यक्तिगत by स्वामी संकेतानंद
ताजमहल दिल्लीत नसून आग्रा
In reply to लक्षात असू द्या की सगळी by किसन शिंदे
सोमवारी उघडी असणारी दोनच
In reply to लक्षात असू द्या की सगळी by किसन शिंदे
हुमायून का मकबरा
In reply to सोमवारी उघडी असणारी दोनच by बॅटमॅन
जमल्यास पुराना किला येथील
In reply to हुमायून का मकबरा by चिमी
मस्त माहिती.वाखु साठवत आहे.
In reply to जमल्यास पुराना किला येथील by बॅटमॅन
धन्यवाद
In reply to जमल्यास पुराना किला येथील by बॅटमॅन
बाकी अजूनेक सल्ला:
In reply to धन्यवाद by चिमी
आणि आग्रा-मथुरा प्रवासाकरिता
In reply to धन्यवाद by चिमी
माहिती + फ्लेक्स
दिल्ली हाट खरेदीसाठी चांगले
चिमा,
मथुरा वृंदावन घाण फार आहे.
मथुरा वृंदावन
In reply to मथुरा वृंदावन घाण फार आहे. by कंजूस
दिल्ली भटकंतिला शुभेच्छा
+१
आपल्या गतीने भटकायला ही सेवा
मेट्रोचा अभ्यास :(
पण त्या बससाठी अडकून बसाव
पण त्या बससाठी अडकून बसाव लागेल विनाकारण :(अनेक बस एकाच मार्गावरून (दर अर्ध्या तासाने) जातात. प्रत्येक स्टॉपवर कोणकोणत्या वेळी बस येईल ते वेळापत्रक देतात. एकाच तिकिटावर दिवसभरात कोणत्याही बसमध्ये चढता येते.वॉव! अशी सोय पुण्यात
In reply to पण त्या बससाठी अडकून बसाव by आतिवास
चिमी - फक्त दोन महिन्यापूर्वी
धन्स माशॅ
In reply to चिमी - फक्त दोन महिन्यापूर्वी by माझीही शॅम्पेन
आवड असल्यास
In reply to धन्स माशॅ by चिमी
दिल्लीत लोटस मंदिर आणि इंडिया
In reply to धन्स माशॅ by चिमी
राष्ट्रपती भवन
मथुरा वृंदावन याबरोबरच गोकुळ
दिल्ली मथुरा दिल्ली एक दिवसात
In reply to मथुरा वृंदावन याबरोबरच गोकुळ by असंका
काळी यमुना ??
In reply to मथुरा वृंदावन याबरोबरच गोकुळ by असंका
काळी यमुना..
In reply to मथुरा वृंदावन याबरोबरच गोकुळ by असंका
हेच का ते कृष्णाचे गोकुळ
ह्या भुतलावर कुठेही जा.....
हॉटेलसाठी www.agoda.com आणि
पत्रके/दिल्ली १) २)
युथ हॉस्टेल
मेट्रो साठी Travel card विकत घ्यावे
युथ हॉस्टेल सर्वात बेस्ट
हे चकवू नका
अहो तुमची ट्रीप कशी झाली?
छान झाली ट्रिप
In reply to अहो तुमची ट्रीप कशी झाली? by असंका