अंथरुण (कामात बिझी असणाऱ्या मित्रांना)

Vimodak's picture
Vimodak in जे न देखे रवी...
27 Apr 2015 - 7:23 am

तू गेलीस दूर कधी,
मला कळले नाही,
आणि, आज तुझे कान, माझ्या हाकेबाहेर.

मी यायचो घरी, घामेज़ून
दिवस भरून, कोमेजून...

आणि,
सगळा शिण टाकुन पदरात तुझ्या,
शांतपणे झोपायचो.

ऑफ़ीसमध्ये,
तूझं नाव पुसल्या फळ्यावर,
कोरडे ग्राफ चढत जात, आणि,
ओले लागत उतरणीला.

दिवस कमवायचो,
गमवून दिवस.

दोन दिवस तुझे माझे, हक्काचे,
काढायचे होते...
तारे-तारे निवडून सारे,
ढग दूर सारायचे होते.

पण त्याआधीच,
स्पर्शाच्या परिघातच दूर झालो आपण,
नजरेच्या टप्प्यातच, दृष्टीआड़ झालो आपण.

तुझं पत्र मिळालं,
'काळजी घे' या दोन शब्दांत,
दोन वर्षांचा सारा शिण,
व्याजासकट परत केलास.

आता येतो घरी घामेजून,
दिवस भरुन कोमेजून,
आणि, कड़ी न लावता दाराची,
जूना शिण अंथरतो,
नविन शिण पांघरतो....

कविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Apr 2015 - 2:19 pm | पैसा

शीर्षक मात्र तेवढंसं आवडलं नाही.

वेल्लाभट's picture

27 Apr 2015 - 3:21 pm | वेल्लाभट

हेच म्हणायचंय....

शीण.. शिर्षकही डोक्यात होतं..
पण 'अंथरुणात' शीण नाहिसा करायचं बळ असतं म्हणून...

प्राची अश्विनी's picture

1 May 2015 - 5:52 pm | प्राची अश्विनी

+१

पॉइंट ब्लँक's picture

27 Apr 2015 - 3:13 pm | पॉइंट ब्लँक

वाह, मस्त आहे :)

नगरीनिरंजन's picture

27 Apr 2015 - 8:07 pm | नगरीनिरंजन

कविता आवडली!

सूड's picture

27 Apr 2015 - 8:12 pm | सूड

चांगली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2015 - 10:42 pm | प्रसाद गोडबोले

काम ( अंथरुणात बिझी असणाऱ्या मित्रांना)

असे विडंबन होवु शकते =))

स्पंदना's picture

30 Apr 2015 - 4:37 pm | स्पंदना

किती सुंदर कविता!!
अतिशय आवडली!