अकादमी भाग 1: एंट्री

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
27 Mar 2015 - 3:04 pm

अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६

***

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायला लागलो तेव्हा चोवीस वर्षांचा होतो. प्रस्तुत अनुभव कथन हे अगदी सत्य असुन माझ्या सेवाशर्ती अन केंद्रीय कर्मचारी नियमावली च्या निर्देषांना अनुसरुन मी काही नावे अन जागा वगळतो किंवा बदलतो आहे तेवढे फ़क्त मायबाप वाचकहो सांभाळुन घ्यावे इतकी विनंती करतो अन माझ्या अनुभवांना कथा रुपात पेश करतो.

अकादमी भाग 1: एंट्री

उत्तरभारतात जायचा हा माझा तसा काही पहिला अनुभव नव्हता, ह्याआधी युथ हॉस्टेल एसोसिएशन ऑफ़ इंडिया सोबत कॉलेज च्या दिवसांत हिमाचल पूर्ण पिंजून काढला होता आधी ट्रेकर म्हणुन अन नंतर कॅम्प लीडर म्हणुन, पण ह्यावेळी वेगळे भासत होते, कारण ह्याक्षणी मी एक हौशी ट्रेकर म्हणुन नाही तर भारतभरातुन पेपर लिहिलेल्या साडे तीन लाख अविवाहित पुरुष उमेदवारांतून जे 80 निवडले गेले होते त्यांच्यापैकी एक होतो. ट्रेनिंग कसे होईल ह्याची पाव टक्का कल्पना एनसीसी मुळे होतीच तरीही अकादमी कशी असेल तिथे काय शिकवतील ही एक ओढ़ होतीच मनात दाटलेली ! त्याशिवाय जाताना आई बाबांच्या पायाला स्पर्श केल्यावर आईची जाणवलेली चलबीचल त्याने आलेले उदासपणाचे मळभ, वडलांच्या डोळ्यातला ओलसर अभिमान पाहून कमी करायच्या प्रयत्नात मी होतो. लहानपणी पासुन सोबत असलेले 4 मित्र स्टेशन वर आले होते त्यांच्या मजबुत मिठ्या मैत्री अजुन घट्ट करत होत्या, गाड़ीची वेळ झाली तशी मित्रांनी अन वडलांनी सामान माझ्या जागेवर नेऊन ठेवले अन मला काहीवेळ माऊली जवळ सोडले!!! डोळे ओलावत तिने मला सांगितले "नीट रहा!! जितका व्यायाम करशील तितके खात जा कोणाशी उगीच भांडु नकोस" तिला मीठी मारून पाच मिनिटे स्वर्ग अनुभवला अन तोपर्यंत मागे येऊन थांबलेल्या बाबांच्या पायाकडे वळलो नमस्कार करायला वाकलो तसे बाबा 61 च्या वयात ही ताठ झाले , डोळे पाझरत होते त्यांचे!! मित्रहो त्या दिवशी मी हिमालय वितळताना पाहिला!! तो असाच असतो, पोरांसाठी वितळणारा पण पोराच्या कवेतही न मावणारा. आमचे मुळगाव सातारा जिल्ह्यातले, घरटी एक माणुस वर्दीत असलाच पाहिजे असला दंडक असणारा गाव तो!! त्या गावापासुन दुर वर्हाडातला माझा जन्म तरीही, काही गोष्टी डीएनए ने येतात तश्याच आलेल्या काही संस्कार मुद्दाम केलेले. बाबांच्या चेहर्याकडे पाहताना आलेले हे विचार आता लिहायला जितका वेळ लागला त्याच्या पेक्षा हजारपट वेगाने डोक्यात येत होते, तंद्री मोडली ती बाबांच्याच शब्दांनी "बेटा तु जा, जे तुला शिकवले आहे ते लक्षात ठेव, चुकीचे वागण्यालायक मोह येतील ते निग्रहाने टाळ, तु अण्णांचा नातु आहेस हे भान नेहमी ठेव, तु ते ठेवशील हे मला माहिती आहे पण तरीही बाप म्हणुन राहवत नाही, जा मागे वळून पाहू नकोस निरोप घेणे कठीण होते"

अन आई च्या मऊ मेणासम प्रेमातुन मी झटक्यात बाहेर पडलो मागे वळून पहायची गरजच नव्हती आता मला कारण माझा हिमालय माझ्या मागे उभा होता खंबीर !! पाय रोवुन , माझे पाहिले उड्डाण कौतुकाने पाहत असलेला तरीही संतुलित असा.

गाडीने फलाट सोडला तेव्हा सातारी जिद्द अन वर्हाडी गरमी कोळून प्यायलेला बापूसाहेब घर सोडून उडाला होता एक "वर्दीवाला अधिकारी" होण्याकरता.

प्रवास साधारण उदास अवस्थेत गेला कारणे दोन एक म्हणजे एकटेपणा अन दोन म्हणजे रेंगाळलेली घरची आठवण. साधारण 24 तास प्रवास करुन एक गाडी बदलुन मी उत्तर मध्य प्रदेशात,ग्वालियर ला पोचलो.नेमणुक पत्रात ट्रेनिंग एका जुन्या शिंदेशाही महालात होईल असे लिहिले होते, तो पहायचे एक कुतूहल पण तूफान होते. प्लॅटफॉर्म वर उतरताच एक पाटी दिसली "एमसीओ की तरफ" एमसीओ म्हणजेच "मूवमेंट कोआर्डिनेशन ऑफिसर" ग्वालियर ला आधिपासुन मोठी छावणी असल्यामुळे तिथे स्टेशन ला प्लॅटफॉर्म नंबर 1 ला आर्मी चे एमसीओ ऑफिस होतेच , तेच ऑफिस इतर अर्द्धसैनिक बले एयरफोर्स वगैरे पण वापरत. त्या ऑफिस समोर एक टेबल मागे camouflage गणवेशधारी एक वरिष्ठ अधिकारी बसलेला, शेजारी डॉक्यूमेंट वेरिफिकेशनसाठी म्हणुन बसलेले एडम (एडमिनिस्ट्रेटिव ब्रांच) ऑफिस चे नागरीक कर्मचारी बसले होते.एक नागरी अधिकारी मला अतिशय करड्या आवाजात म्हणाला
"ऑफर लेटर और डॉक्युमेंट्स दीजिये प्लीज"
गरजेची सगळी कागदपत्रे त्याने तपासुन परत माझ्या हवाली केली व "हो पुढे" स्टाइल इशारा केला बॅग उचलून जायला लागलो तशी तो कडाडला
"बॅग साथ में रखो नहीं जाओ उसे पीछे वाले कैंटर (आइशर किंवा डीसीएम् टोयोटा चा एक फौजी ट्रक) में रखो और खुद सामने वाले बस में बैठ जाओ" बहुतेक मी येणारा पहिलाच होतो मध्यरात्री आता हे पोरगे ही किती वेळ ताटकळत ठेवणार असा मानवतावादी विचार बहुतेक त्यांनी केला असावा अन त्यातुनच मला त्यांनी बस खाली बोलावले एक चहा दिला अन एक जिप्सी कड़े बोट दाखवत तो camouflage मधला अधिकारी म्हणाला "जाओ बेटा अपना सामान उठाकर उस जिप्सी में बैठो और अकादमी जाओ हम बस भरते ही भेज देंगे तबतक तुम वहीँ सेंट्री गार्ड रूम में बैठो या सो जाओ" गुमान जिप्सित बसलो अन जिप्सी सुसाट निघाली,साधारण 8 किमी शाहराबाहेर आल्यावर एक भली मोठी आवारभिंत लागली तिच्या कड़ेकडेने एखाद किलोमीटर गेल्यावर एक प्रचंड लोखंडी गेट लागले जिप्सी ड्राईवर हॉर्न मारून जागेवर बसला होता तेवढ्यात त्या मोठ्या दरवाज्यात एक खिड़की होती त्यातुन साधारण चीनी दिसावा असल्या माणसाचे डोके बाहेर आले त्याने गाडी नंबर निरखला ड्राईवर चे तोंड टॉर्च च्या प्रकाशात पाहिले अन मोठे गेट उघडले! आत गेल्यावर सेंट्री रूम च्या शेजारच्या जागेत त्याने जिप्सी उभी केली अन मागे वळुन मला म्हणाला
"साब आपका अगले 11 महीनों का घर आ गया"
साधारण चाळीशी पार केलेल्या ड्राईवर ने "साहब" म्हणायचा तो माझ्या आयुष्यात पहिलाच प्रसंग !! विलक्षण अवघडून मी "थैंक्यू भैया" म्हणले तसा तो खळखळून हसला अन म्हणाला "आईये सरजी आईये, भेलकम टू रंगभवन पैलेस" मी मनात म्हणले "राव इथे फाटकाच्या आत तर किर्र रान आहे अन पैलेस कुठला" पण वरकरणी गप्प बसलो. काहीवेळाने ड्राईवर अन जिप्सी निघुन गेली अन मी सेंट्रीच्याच बेड वर ताणुन दिली , बोलायला आता कोणीच नव्हते कारण!! दोघही सेंट्री ड्यूटी वर होते. सकाळी 6 ला सेंट्रीने उठवले व् म्हणाला "साबजी उठो मुह धो के फॉलइन हो जाओ" बाहेर पाहता अजुन 30 मुले दिसली मी यांत्रिकपणे माझे सामान त्यांच्या सामानाच्या ढिगाला लावुन ठेवल अन 3x3 च्या लाइन मधे फॉलइन झालो. मजेशीर दृष्य होते ते कोणी तमिळ कोणी पंजाबी कोणी नॉर्थईस्टर्न कोणी कुठला. अचानक खांद्यावर एक हात पडला

"हॅलो दोस्त कैसे हो, मै पुनीत....पुनीत शुक्ला, कानपूर से हूँ, आप??"
"हाय , मै बापुसाहेब, महाराष्ट्र से हूँ अमरावती का"
"यार बापुसाब शायद हमलोगो को सामान खुद ही लेकर जाना पड़ेगा अंदर तक, मैंने गार्ड से पूछा वो बोला ज्यादा दूर नहीं 200 मीटर होगा अंदर"
मी काहीही न बोलता त्याच्या सोबत समोरच्या दाट राईतुन आत जाणाऱ्या पायवाटेला पाहत बसलो तितक्यात समोर एक मजेशीर प्रकार आला, चक्क एक सहाफुटी पण सिंगल हड्डी सरदार
"ओ हलो जी, की हाल अस्सी अपणा नाम ता दस्सो मै अंगदसिंह गिल" आम्ही शेकहैण्ड वगैरे करुन अंगद ला प्रॉब्लम सांगितला तसा तो ही गंभीर झाला!! त्याला सगळा मुद्दा सांगून होइस्तोवर एकाने मागे शांत उभे राहुन तो ऐकला होता अन त्याचाच काळजी युक्त सुर कानावर आदळला "उडी बाबा मोसाय ई तो ट्रेनिंग यही से चालु कर देतायsssss" नाव सुदीप्तो सेन उर्फ़ आमचा पुढे चालून झालेला जीवश्च मित्र "मोसाय" काही साउथ इंडियन मुले भाषेच्या प्रॉब्लम मुळे एकीकडे गोंधळलेले भाव घेऊन उभे होती, आम्ही चौघे तिकडे मोर्चा वळवणार इतक्यात एक कड़क आवाज घुमला

"अपनी बैग्स लेकर सेमी सर्किल में खड़े हो जाओ और सिविलियन जैसे यहाँ वहा दौड़ना बंद पकडे गए तो रगड़ दूंगा"

पोरे त्या हुकुमाबरोबर सामान घेऊन आली अन उभी राहिली, अर्धगोलाकार सेटल झाल्यावर परत तोच आवाज, कमावलेला आवाज घुमला

"मैं सुभेदार भरत नारायण चौधरी, जात से जाट हूँ कायदे के बाहर सोच नहीं सकता, कायदे तफसील बादमे समझाऊंगा उसका पालन करोगे तो लाड करूँगा वरना रगड़ा लगाउँगा फ़िलहाल हम एक क़तार में कतार तोड़े बिना पैलेस जायेंगे, कोई शंका हो तो हाथ खड़ा करके परमिशन ले कर बोलना, मुझे सब लोग बड़े उस्तादजी कहेंगे......कोई शक....चलो" अन माझ्या तीन नवीन मित्रांसोबत मी अकादमी च्या दिशेनेे पाहिले पाऊल टाकले.

कथाअनुभव

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2015 - 3:20 pm | अत्रन्गि पाउस

आन्दौ

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2015 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! सैनीक अकादमीच्या गोष्टी !!

सुरुवात मस्त झालीय. पुढचे भाग येऊद्या लवकर लवकर.

ऑफिसात हुंदका आला ...वा बुवा !!!

रघुनाथ.केरकर's picture

29 May 2015 - 1:38 pm | रघुनाथ.केरकर

घरुन निघतानाचा प्रसन्ग वाचताना डोळे पाणावले...

अन्या दातार's picture

27 Mar 2015 - 3:21 pm | अन्या दातार

दमदार एंट्री बापु. लिखते रहो.

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Mar 2015 - 4:50 pm | लॉरी टांगटूंगकर

पुभाप्र

टवाळ कार्टा's picture

27 Mar 2015 - 3:25 pm | टवाळ कार्टा

राजाराम सिताराम ची आठवण आली :)
और आंदो :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 3:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

राजाराम सीताराम??

बाकी एक मदत हवी आहे मित्रहो , मी मिपाचे एंड्रॉइड एप्प वापरतो आहे मला जर ह्या प्रथम भागाची लिंक द्वितीय भागात द्यायची असली तर कशी काय देता येईल??

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2015 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

एडिट बॉक्सच्यावरचे डावीकडून दुसरे बटण (Insert/Edit link) वापरून योग्य त्या लेखाचा (उदाहरणात तुमच्या पहिल्या लेखाचा दुवा वापरला आहे) द्या; link text बॉक्समध्ये तुम्हाला दृश्य हवे असलेला/ले शब्द लिहा.

उदा :

अकादमी : भाग 1: एंट्री...

राजाराम सीताराम ही लेखमाला २०११ मध्ये सुरु होती. तेव्हा तुम्ही बहुधा मिपावर नसणार म्हणून आठवत नसेल .
http://misalpav.com/node/19045

सुरुवात झकास झालीय. आता लवकर पुढचे भाग आणा हि विनंती

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 7:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे वा!!! आय एम् ए चे अनुभव!!! ग्रेट!!! आमची लैंग्वेज वेगळी असे फार आमच्या अकादमी मधे त्यावर पुढील भागांत सविस्तार लिहतो!

राजाराम सिताराम ची आठवण आली
मलापण तेच आठवले लगेच.

प्रचेतस's picture

27 Mar 2015 - 3:28 pm | प्रचेतस

मस्त सुरुवात.

सांगलीचा भडंग's picture

27 Mar 2015 - 3:29 pm | सांगलीचा भडंग

सुरवात जोरदार . एक वेगळा अनुभव वाचायला मिळाला . पुढचे लेख पटापट टाका

चिनार's picture

27 Mar 2015 - 3:30 pm | चिनार

सोन्याबापू मस्तच !
येऊ द्या अजून

आदूबाळ's picture

27 Mar 2015 - 3:35 pm | आदूबाळ

ये बात! वाचतो आहे.

मोदक's picture

27 Mar 2015 - 4:03 pm | मोदक

ये बात! वाचतो आहे.

हेच बोल्तो... पुढील भागासाठी शुभेच्छा!!

प्रसाद१९७१'s picture

27 Mar 2015 - 3:56 pm | प्रसाद१९७१

पुढ्च्या भागाची आतुरतेने वाट बघतो आहे.

सिरुसेरि's picture

27 Mar 2015 - 3:59 pm | सिरुसेरि

मस्तच...बाकी तुमचा ग्रुप सुद्धा "हवन करेंगे" गाणे म्हणायचा का ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 4:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाही आम्ही सनी लियॉन ची पुजा करायचो! त्यातला सांगतायेण्या लायक भाग पुढे येइलच!! मुळात् ३५ जवान पोरे एकत्र राहणार त्यात महीना महीना पोरगी काय एखाद्या वेणीचे रबर बॅंड दिसत नाही अश्या अवस्थेत पोरांना सनीचाच आसरा असे!!!(अर्थात रगड्यातुन सुट्टी मिळाल्यास)

नाखु's picture

27 Mar 2015 - 4:44 pm | नाखु

पुढील भागासाठी शुभेच्छा!!
भारतदर्शनासाठी उत्सुक.
=====
मला नाद लागला खुळ्यांचा

सुप्रिया's picture

27 Mar 2015 - 4:49 pm | सुप्रिया

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 4:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्त सुरुवात हो लष्करवाले :)

___/\____

बॅटमॅन's picture

27 Mar 2015 - 5:04 pm | बॅटमॅन

दॅट्स व्हाय आय फकिंग लव्ह मिपा. डॉक्टरांपासून ते मिल्ट्रीम्यान लोकांपर्यंत सर्व क्षेत्रातल्यांचे फर्स्ट हँड अनुभव वाचता येताहेत. बापूसाहेब, आता तुमच्या मालिकेची वाट पाहणे आले. लय तगडं लिखाण आहे तुमचं, अजून येऊंद्या लौकरात लौकर.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 5:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

यास सर!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 5:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चुकीच्या वेळेला लेख टाकलात तुम्ही. नेमकं मिपा तीन दिवस बंद असणार आहे :(.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 5:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

दिन तो तीन ही है!!! जल्दी कट जाएंगे!!!

सुहास झेले's picture

27 Mar 2015 - 5:14 pm | सुहास झेले

मस्त सुरवात.... मज्जा येणार :)

नगरीनिरंजन's picture

27 Mar 2015 - 8:41 pm | नगरीनिरंजन

बॅटमॅनशी सहमत. फर्स्टहँड अनुभव वाचायला भारी वाटतं.
सुरुवात जोरदार आहे. राजाराम सीतारामची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.
पण... सैनिक असले म्हणजे सिव्हिलियन्सचा उद्धार केलाच जातो का नेहमीच?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 8:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

होतो खरा, पण त्यात सिविलियन्स च्या बेशिस्त वर्तना चे रेफरेन्सेस जास्त असतात, अर्थात त्याच्यासोबतच तुमची त्या सिविलियन्स प्रती असणारी ड्यूटी ही जितका उद्धार होतो त्याच्या तिप्पट हैमर केली जाते आमच्या मानसिकतेत!! हे ही तितकेच खरे

बॅटमॅन's picture

30 Mar 2015 - 11:48 am | बॅटमॅन

सैनिक असले म्हणजे सिव्हिलियन्सचा उद्धार केलाच जातो का नेहमीच?

अगदी असेच म्हणतो.

असंका's picture

27 Mar 2015 - 5:15 pm | असंका

सुरेख !!

(ते 'तीन लाखातले ऐंशी' हे इथे सगळ्यांना आधीच माहित आहे असं दिसतंय. मला मात्र नक्की लक्षात नाही आलेलं. त्याबद्दल अधिक माहिती पुढे येणार आहे का? )

धन्यवाद...!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 5:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

अकॉउंटंट साहेब, अहो एग्जाम नोटिफिकेशन आलेले ८० vacancy चे, परिक्षेला भारतभरातुन तीन लाख पोरे बसली होती त्यात हौशे गवशे नवशे सारे असतात ह्यातले पंचवीस हजार इंटरव्यू ला पोचले त्यातले काही पहिल्या जीडी ला गळले उरलेले तीन हजार प्रोग्रेसिव गृप टास्क टेस्ट अन फिजिकल ला पोचले फिजिकल नंतर अडीच् हजार उरले त्यातले शंभर दीडशे हे मेडिकली अनफिट निघाले (फ्लॅट फुट, कमी बीएम्आय, ओवर वेट, प्रोस्टेट प्रॉब्लम वगैरे असलेले) साधारण बाविसशे पर्सनल इंटरव्यू ला बसले त्यातले ऐंशी नमुने सिलेक्ट झाले त्यातले टॉप पैतीस पाहिले बोलावले होते ट्रेनिंग ला त्यातला मी एक, अन बाकी चौतीस my brothers from different mothers :)

अत्रन्गि पाउस's picture

27 Mar 2015 - 5:46 pm | अत्रन्गि पाउस

पुढचे भाग ३ दिवसात लिहून तयार ठेवा ...म्हणजे मिपा सुरु झाल्यावर पटपट टाकता येतील ...
बाकी चौतीस my brothers from different mothers अतिशय आवडले आहे ...वा बुवा

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Mar 2015 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

my brothers from different mothers याऐवजी my brothers from different parents म्हणा, नायतर तुमचे ब्रदर्स हल्लाबोल करण्याची दाट शक्यता आहे :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 5:58 pm | कैलासवासी सोन्याबापु

:D अहो तसे म्हणायची पद्धत आहे झाले!!! तुम्ही पेरेंट्स वाचा!! :D

पण कसली एग्जाम होती म्हणे ? कारण आय ए एस / आय पी एस ला असले त्रासदायक प्रकार असतील असं वाटत नाही- की असतात?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 6:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयपीएस ला ह्याहुन जास्त कुटाने असतात मी त्यांच्यापेक्षा एक गृप खालच्या पोस्ट वर आहे ती एग्जाम म्हणजे असिस्टंट कमांडेंट एग्जाम

कुटाने शब्द ऐकून लय दिवस झाले होते राव...!
ठँक्यु ओ बापुसाहेब!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Mar 2015 - 6:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्रदर इन आर्म्स अश्या अर्थाचेही शब्द वापरले जातात ना?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 6:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रत्येक फ़ोर्स चा परलंस वेगळा असतो कप्तान साहेब , साधारणतः बैचमेट लोकांस "buddies" असे संबोधले जाते आमच्याकडे सोबत जो राइफलमॅन असतो त्याला "ट्विन किंवा बड़ी पेअर" असेही म्हणले जाते

सतीश कुडतरकर's picture

27 Mar 2015 - 5:42 pm | सतीश कुडतरकर

M:-)
घरातला एकतरी मुलगा सैन्यात जावा अशी आजोबांची खुप इच्छा होती. पण आमच्या चष्म्याने दगा दिला. पुढे काकांच्या मुलाने सैन्यात प्रवेश मिळवलाच. आता तुमच्या लेखणीतून सुटलेले क्षण अनुभवयाचे.

मास्टरमाईन्ड's picture

27 Mar 2015 - 6:48 pm | मास्टरमाईन्ड

पुढचेही भाग मस्तच असतील ही माफक अपेक्षा.
बाकी तुमचे बर्‍याच ठिकाणी जबरदस्त प्रतिसाद वाचलेयत, त्यामुळे फारशी काळजी नाही

मित्रहो त्या दिवशी मी हिमालय वितळताना पाहिला!!

सिविलियन जैसे यहाँ वहा दौड़ना बंद पकडे गए तो रगड़ दूंगा

पु.भा.प्र.

एक एकटा एकटाच's picture

27 Mar 2015 - 6:50 pm | एक एकटा एकटाच

Waiting .......!!!!!!!

राही's picture

27 Mar 2015 - 6:55 pm | राही

एका भागात किती सिक्सर्स?
हिमालय वितळताना, मिठीत पाच मिनिटे स्वर्ग, सिविलियन जैसे यहाँ वहाँ दौडना, डोळ्यातला ओलसर अभिमान..
खरोखर जबरदस्त.

पिलीयन रायडर's picture

27 Mar 2015 - 6:55 pm | पिलीयन रायडर

"मैं सुभेदार भरत नारायण चौधरी, जात से जाट हूँ कायदे के बाहर सोच नहीं सकता, कायदे तफसील बादमे समझाऊंगा उसका पालन करोगे तो लाड करूँगा वरना रगड़ा लगाउँगा फ़िलहाल हम एक क़तार में कतार तोड़े बिना पैलेस जायेंगे, कोई शंका हो तो हाथ खड़ा करके परमिशन ले कर बोलना, मुझे सब लोग बड़े उस्तादजी कहेंगे......कोई शक....चलो" अन माझ्या तीन नवीन मित्रांसोबत मी अकादमी च्या दिशेनेे पाहिले पाऊल टाकले.

वातावरणच बनवलं ना!!!!
लवकर लवकर टाका पुढचे भाग.. २-३ दिवस मिपा बंद आहे तेव्हा भरपुर लिहुन ठेवा..काय!!!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 7:05 pm | कैलासवासी सोन्याबापु

उस्तादजी चे हे सगळे शब्द फ़क्त त्यांचे नाव सोडून सत्य आहेत अन आजही कानात घुमतात तो काही काही वाक्ये असली बोलायचा की डोके अन कान गरम होत! राइफल चा बप्तिसमा दिलेला हा अचाट माणुस खरेच प्रचंड अचाट आहे!!!!

निमिष ध.'s picture

27 Mar 2015 - 6:57 pm | निमिष ध.

वा झकास सुरूवात आहे एकदम. येऊद्या पुढचे भागही लवकर !

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Mar 2015 - 7:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

भाग दोन लिहितोय अर्धा झाला ! लवकरच पोस्टतो!! :)

उत्सुकता वाढवणारी सुरुवात.पुभाप्र.

एस's picture

27 Mar 2015 - 7:57 pm | एस

झक्कास!

बाबा पाटील's picture

27 Mar 2015 - 8:16 pm | बाबा पाटील

आंग पे काटा उभा राहला ना माझ्या,साला ए के ४७ चालवायची इच्छा होती,०.३२ भागवायची पाळी आली. आयुष्यात मिलिट्रीत जायची ज्याम इच्छा होती राव,तुमचे अनुभवात तरी समाधान मिळेल.जियो मेरे शेर.

खटपट्या's picture

30 Mar 2015 - 2:57 am | खटपट्या

जबरा सुरवात. पु.भा.प्र.!!!

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2015 - 3:27 am | श्रीरंग_जोशी

वाह, एकदम जोरदार सुरुवात. लेखनशैली एकदम आतपर्यंत भिडणारी आहे.

इतरांप्रमाणे मलाही राजाराम सिताराम या लेखमालिकेची आठवण झाली.

तुमच्या सातारा जिल्ह्यातील मुळांमुळे मला माझ्या ३री ते ५वी या काळातल्या जीवश्च कंठश्च मित्राची आठवण झाली. त्याचे मूळ गाव वाई होते अन त्याच्या वडिलांच्या नोकरीमुळे अमरावती जिल्ह्यातल्या वरुड येथे वास्तव्य होते. त्याच्या घरचेही वातावरण सैनिकी होते. किल्ले बनवून त्यावर खेळण्यातल्या तोफा वगैरे ठेवणे त्याचे आवडते खेळ होते. २३ वर्षे होऊन गेलीत त्याच्याबरोबर शेवटची भेट होऊन. त्याचे नाव असे आहे की जालावर शोधल्यास शेकडो लोक मिळतात (स्वप्निल जाधव). त्यामुळे आजवर तरी माझ्या शोधकार्यात यश मिळाले नाही. तुमच्यामध्ये माझे मन माझ्या मित्राला बघत आहे.

पुभाप्र.

बहुगुणी's picture

30 Mar 2015 - 4:11 am | बहुगुणी

अकादमी भाग २ ची वाट पहातो आहे, दमदार सुरूवात.

जुइ's picture

30 Mar 2015 - 5:28 am | जुइ

अजुन येउद्यात!!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

30 Mar 2015 - 9:04 am | भाग्यश्री कुलकर्णी

फार छान.वाचायला भारी वाटतयं..नवीन जग कळेल यातुन...मस्त

चिगो's picture

30 Mar 2015 - 11:45 am | चिगो

मस्तच.. वाचतोय..

मोहनराव's picture

30 Mar 2015 - 2:47 pm | मोहनराव

वा. छान सुरवात!!

पलाश's picture

30 Mar 2015 - 5:06 pm | पलाश

छान लेखन.

भावना कल्लोळ's picture

6 Apr 2015 - 3:51 pm | भावना कल्लोळ

आमचे मुळगाव सातारा जिल्ह्यातले, घरटी एक माणुस वर्दीत असलाच पाहिजे असला दंडक असणारा गाव तो!! मिलिटरी अपशिंगेचे का हो भाऊ तुम्ही? लेखमाला खूपच सुंदर.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Apr 2015 - 5:24 pm | कैलासवासी सोन्याबापु

नाय नाय अपशिंग्याचा नाही! मी भोसऱ्याचा !!

sश्रिकान्त's picture

8 Apr 2015 - 11:25 am | sश्रिकान्त

एयरफोर्स आणी नेवी हे अर्धसैिनक बल नाहीत., ते आर्मी सारखेच ििमलीटरी च एक भाग आहेत. त्यमुळे रेल्वे स्टेश्न वर त्यांचे कोमन ओफीस आसतात.

रुपी's picture

29 Apr 2015 - 4:34 am | रुपी

आत्ताच सुरुवात केली वाचायला, आता पुढचे भाग वाचते!