एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
तुझ्या आणि माझ्या मैत्रीची चाले सर्वत्र चर्चा
तुझ्या चाहत्यांनी पण आणला घरी माझ्या मोर्चा
पण तू मात्र लग्नाचा आमंत्रण घेऊन आलीस
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
तुझ्याकडे व्यक्त करायचं होत मला माझं प्रेम
पण तू "हो" म्हणशील याचा नव्हता नेम
माझी प्रेमाची भावना मनातच माझ्या विरून गेली
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
पूर्वी इतकी "सुंदर" तू आजही दिसतेस
केसाची एक बट गालावर तुझ्या आजही खेळते
पण तू मात्र माझ्या उडून गेलेल्या
केसांकडे पाहत मुक्त पणे हसलीस
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस .
नवऱ्याशी तुझ्या तू ओळख मला करून दिलीस
कॉलेज मध्ये "बरोबर" होतो एवडेच तू म्हणालीस
मात्र तुझ्या " चिमुरड्याचा" मला तू "मामा" करून गेलीस
एके दिवशी अशी अचानक समोर माझ्या आलीस
आणि भूतकाळात मला तू घेऊन गेलीस
प्रतिक्रिया
10 Mar 2015 - 6:28 pm | प्रचेतस
अगदी लील्याच.
किसमिस कवितेची आठवण झाली.
10 Mar 2015 - 6:41 pm | आदूबाळ
ये बात! झकास कविता!
त्यांचं कॉलेजमध्ये प्रकर्ण चालू असताना तुम्ही काय करत होतात? :D
10 Mar 2015 - 6:45 pm | सूड
कलोनियल कझिन्स टाईप वाटली.
10 Mar 2015 - 7:42 pm | सौन्दर्य
नुसत्या चिमुरड्याचा नाही तर पूर्णच 'मामा'करून गेली. कविता झकास.
10 Mar 2015 - 11:59 pm | रुपी
मस्त!
11 Mar 2015 - 4:50 am | जॅक डनियल्स
सुंदर कविता...अनेक मित्र "मामा" बनलेले बघितले आहेत. अश्या मामा लोकांबरोबर "स्टेप इन " (तळघरातील) मध्ये दिवसा उजेडी जाऊन २ घोट टाकले आहेत.