तुझी माझी मैत्री
म्हणजे एक उंच झोका असतो,
हसणं असतं,रुसणं असतं,
चिमणीच्या दातांनी तोडलेलं
चिंचेचं बुटुक असतं..
तुझी माझी मैत्री ..
पडणं असतं,सावरणं असतं,
आपलंच खरं करणारं
भांडणही असतं
तुझी माझी मैत्री..
खेळ असतो,वादही असतो,
कुणीच न दिलेला
अधिकार असतो
तुझी माझी मैत्री..
नात्यापलिकडचं नातं असतं,
उसवलेल्या धाग्यांची रफू असते,
तीच मैत्रीला श्रीमंत करते.
तुझी माझी मैत्री..
चित्र-पियुशा
विशेष
वाचने
11515
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तये कविता :) माझ चित्र पण
यातली तू कोण? :P
In reply to मस्तये कविता :) माझ चित्र पण by पियुशा
तुझ्या या प्रतिसादावर मी फिदा
In reply to मस्तये कविता :) माझ चित्र पण by पियुशा
कविता आणि चित्र दोन्ही आवडले.
स्वातीताई..
सुंदर कविता आणि अगदी समर्पक
मैत्रीची कविता आवडली.गोड्
मस्त कविता ! आणि पियु कोणती
कविता आवडली
चिंचेच बुटुक देणं म्हणजे खरी
निरागस कविता व गोड चित्र.
साधी सोपी आणि मस्त कविता फार
मस्त कविता . मैत्री अशीच असते
कविता आणी चित्र दोन्ही आवडेश!
मस्त कविता
एकदम गोड :)
मस्त कविता.
चित्र कविता मस्तच.एक दुजे के
मस्त ग
+१
In reply to मस्त ग by सामान्य वाचक
किती गोड... ते चित्र पण खुप
चित्र..
कविता आणि चित्र बघून
कविता खूप आवडली, बालपण आठवले
साधी सरळ सोप्पी आणी गोड !
मस्त कविता
अरे वा , मस्तच आहे
किती गोड कविता आणि तसच गोडुल
मैत्री म्हटलं की अमाप आनंद!
कवितेतले भाव चित्रात आणि
सुरेख कविता आणि त्याला समर्पक
मस्त!!
कविता जास्त छान की चित्र हे
मस्त सहजसुंदर कविता आणि
जशी माझी आणि सगळ्या