विचाराच्या पलिकडले.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
12 Aug 2008 - 6:33 am

प्रो.देसाई आज आपल्या धाकट्या भावाला तळ्यावर घेवून आले होते.मझी त्यांची पहिलीच ओळख झाली होती.बोलता बोलता कुठचा विषय कुठे गेला ह्याचं भानच राहिलं नाही.
मी त्यांच्या भावाला सहजच म्हणालो,
"कॉलेजच्या जीवनातला एखादा संस्मरणीय अनुभव आठवत असेल तर सांगा"
थोडासाचा विचार करून ते म्हणाले,
"मी तुम्हाला तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माझ्या आयुष्यातला एक संस्मरणीय अनुभव अवश्य सांगतो.
एकोणीशे सत्तरच्या दर्म्यान मी कॉलेज मधे प्रवेश केला.देवाच्या अस्थित्वावर माझा विश्वास अजूनही जागच्याजागी होता.पण शिकत असताना एका क्लास मधे मी माझ्या श्रद्धेच्या पलिकडे जावून पाहिलं आणि खरं सत्य म्हणजे काय ते मला कळून चुकलं.

माझा कॉलेज मधे विषय फिलॉसॉफीचा होता.पण नैसर्गीक सौंदर्याच्या कविता अन लघू कथा वाचून झाल्यावर काही तरी खरंखुर-म्हणजे जगातलं हाडं,रक्त आणि मांसा- सारख्या विषयावर काही अभ्यास करण्याची जरूरी भासू लागली.

ह्या विषयावर क्लास घेणारे प्रोफेसर, कोर्सवर्क म्हणून शवविच्छेदन करण्याच्या लॅबमधे आम्हाला घेवून गेले.त्यामुळे आम्हाला आखोदेखा हाल पहाताना टेक्स्टची पुस्तकं आणि बोर्डावरच्या ड्रॉईंगच्या पलिकडे जावून काही तरी शिकायला मिळत होतं.

शवाग्रहात शिरताक्षणी आमचे सर्वांचे आवाज कुजबुजण्याच्या पातळीवर आले.आमचे सगळ्यांचे डोळे मनुष्याच्या अवयवाचे निरनीराळे भाग भिंतीला लागून ठेवलेल्या आणि संरक्षीत रहाण्यासाठी नीट केमिकल्स मधे ठेवलेल्या जारच्या-म्हणजे बाटल्याच्या-दिशेने वळले.
शवविच्छेदनाच्या खोलीत एका स्टेनलेसस्टीलच्या टेबलावर एका माणसाचं शरिर ठेवलं होतं.त्या शरिराची कातडी पिवळ्या मेणासारखी दिसणारी थलथलीत झालेली अगदी प्लास्टीक सारखी झालेली दिसत होती.
त्याचं तोंड उघडं होतं आणि भकास दिसत होतं.
ती एक आत्महत्तेची केस होती.
डॉक्टरने त्या शरिरावर एक रक्तहीन चीर काढली.एक दोन विद्दार्थी भोवळ येवून पडले.मी त्यामानाने स्थिर होतो.त्या शरिराच्या आत जसं आम्हाला शिकवलं होतं तसं, एक हृदय आणि त्याच्या पासून निघणार्‍या अनेक रक्तवाहिन्या दिसल्या,पोटाला अजून यीस्ट सारखा वास येत होता,हाडाचा सांगाडा,आणि आंतड्याची वेष्टनं दिसली.
काही कारणास्तव माझ्या लक्षात आलं की ते सर्व शरिराचे अवयव बघून भयभिती,हवंस,प्रेम किंवा कसली लालसा माझ्या मनात आलेली दिसली नाही.
त्या मृत शरिराच्या कुठच्याच अवयवातून मला भास होईल असं आणि शोधून काढिन असं दया आणणारा अवयव,इच्छाशक्ती दाखवणारा अवयव किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव असं काही शोधता आलं नाही.
नंतर डॉक्टरने कवटीचा भाग उलटाकरून विजेच्या करवतीने काळजीपुर्वक कापून मेदुचा गोळा बाहेर काढला.पापुद्र्यात गुंडाळलेल्या त्या मेंदुच्या गोळ्यावर स्मरणशक्तिच्या आणि अनुभवाच्या सुरकुत्या दिसल्या.त्या राखाडी रंगाच्या शिरांचं जाळं बघून त्याग करणं,माफ करणं,किंवा आत्महत्या करणं ह्या गोष्टी बद्दल माझी असलेली समजूत आणि माणसाचं आयुष्य म्हणजे एक जीवशास्त्र आहे ह्या बद्दलची माझी कल्पना ह्याची सांगड घालणं मला जमलं नाही. माझी स्वतःची खात्री होती की ईच्छाशक्ति,कल्पनाशक्ति,आणि विचार ह्याचं रुपांतर एखाद्या केमिकल रियाक्षन किंवा वीजेच्या लहरीत होईल.पण तसं काही दिसलं नाही.

माझ्या अपेक्षेच्या पलिकडे माझ्या क्लासने आणि जास्त करुन शवविच्छदनाचा अनुभवाने मला खोल विचारात नेऊन सोडलं. माझा ह्या बाबतीचा अभ्यास मुख्यत्वेकरून मनुष्याचं शरिराचं अस्तित्व सबळपणे जाणण्यासाठी होता.या उलट मी जास्त खोलात जावून शोधून काढलं की मनुष्याचं शरिर हे तात्पुरतं आणि क्षणभंगूर असून, त्याच्या विरूद्ध आत्मा हा जास्त कायम स्वरूपाचा असावा.
अखेर एक अदृश्य पण पवित्र मुलभूत शक्ति माझ्या कानात माझ्या देव जाणण्याच्या आणि त्या बद्दल आनंद मानण्याच्या क्षमतेची आठवण देऊन कुजबुज करीत होती असा मला त्यावेळी भास झाला."

हे सगळं त्यांच संभाषण ऐकून मी क्षणभर अचंबीत़च झालो.मनूष्य आपल्या विचारशक्तिच्या जोरावर काय काय मनात आणू शकतो,आणि कुठल्या कुठल्या कनक्लुजनला येवू शकतो हे सुद्धा विचाराच्या पलिकडचंच आहे असं वाटलं.

श्रीकृष्ण सामंत

कथाविचार

प्रतिक्रिया

प्राजु's picture

12 Aug 2008 - 6:45 am | प्राजु

काका,
भलताच अनुभव हो हा!
पण , मला त्यांना(तुमच्या मित्राला) यातून नक्की काय सांगायचं होतं ते समजलं नाही.

त्या मृत शरिराच्या कुठच्याच अवयवातून मला भास होईल असं आणि शोधून काढिन असं दया आणणारा अवयव,इच्छाशक्ती दाखवणारा अवयव किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव असं काही शोधता आलं नाही.
नंतर डॉक्टरने कवटीचा भाग उलटाकरून विजेच्या करवतीने काळजीपुर्वक कापून मेदुचा गोळा बाहेर काढला.पापुद्र्यात गुंडाळलेल्या त्या मेंदुच्या गोळ्यावर स्मरणशक्तिच्या आणि अनुभवाच्या सुरकुत्या दिसल्या.त्या राखाडी रंगाच्या शिरांचं जाळं बघून त्याग करणं,माफ करणं,किंवा आत्महत्या करणं ह्या गोष्टी बद्दल माझी असलेली समजूत आणि माणसाचं आयुष्य म्हणजे एक जीवशास्त्र आहे ह्या बद्दलची माझी कल्पना ह्याची सांगड घालणं मला जमलं नाही. माझी स्वतःची खात्री होती की ईच्छाशक्ति,कल्पनाशक्ति,आणि विचार ह्याचं रुपांतर एखाद्या केमिकल रियाक्षन किंवा वीजेच्या लहरीत होईल.पण तसं काही दिसलं नाही.

म्हणजे नक्की काय? त्या शरीरात इच्छाशक्ती दाखवणारा किंवा संगीताला उद्युक्त करणारा अवयव सापडला नाही .. म्हणजे नक्की काय अभिप्रेत होतं?? आणि मेंदूच्या शिरांकडे बघून , माफ करणं.. आत्महत्या करणं.. या गोष्टींची कारणं समजली असती असं काही म्हणायचं होतं का?
थोडी गोंधळले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Aug 2008 - 8:52 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजुजी,
मी पण तुमच्या सारखांच त्यांच भाषण ऐकता ऐकता गोंधळलो होतो.
फिलॉसॉफिकल विषय घेऊन मुळात चिंतन करण्याच्या वृत्तीचे हे प्रो.देसायांचे भाऊ फक्त त्यांच्या सारखे प्रोफेसर झाले नाहीत एव्हडंच.पण एखादा विषय घेऊन प्रो. जसे चर्वीचरण करतात तेच गुण ह्यांच्या अंगी आलेले मला दिसले.
एव्हडी प्रस्तावना ह्या गृहस्थांची करून झाल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
जीवंत असताना माणसाचं शरिर चैतन्यमय असतं.हे चैतन्य निर्माण व्हायला त्या शरिरात काही तरी अजब गोष्टी पहायला मिळतील की ज्यामुळे जरी शरिर मृत झालं तरी त्यातला आत्मा निघून गेल्यावर ते इतकं तेव्हड्यापुरतं आणि क्षणभंगूर असावं की त्या मृत शरिरात आणि एखाद्दा लाकडाच्या ओंडक्यात जितकं साम्य असावं तेव्हडं दिसावं.जीवंत असताना तेच शरिर शास्त्रीय नियमानुसार हवे ते पडताळे देऊ शकतं मग असं काय होतं की मृतझाल्यावर त्यातला कसलाच मागमूस त्यात पाहायला मिळू नये.
तेव्हा जास्त खोलात न जाता एखादी अद्भुत शक्ति ह्यावर काम करीत असावी असा विचार करून ते समाधान मानत होते.आत्मा हा त्यांच्या दृष्टीने ही शक्ति असावी ही त्यांची श्रद्धा द्विगुणीत होत होती आणि म्हणूनच ते पुढे म्हणतात,
"अखेर एक अदृश्य पण पवित्र मुलभूत शक्ति माझ्या कानात माझ्या देव जाणण्याच्या आणि त्या बद्दल आनंद मानण्याच्या क्षमतेची आठवण देऊन कुजबुज करीत होती असा मला त्यावेळी भास झाला."

मला ते काय सांगतात ते अर्थात ऐकून घ्यायचं होतं.त्यांच्याशी वाद न घालता मी म्हणूनच मनात म्हणालो,
"हे सगळं त्यांच संभाषण ऐकून मी क्षणभर अचंबीत़च झालो.मनूष्य आपल्या विचारशक्तिच्या जोरावर काय काय मनात आणू शकतो,आणि कुठल्या कुठल्या कनक्लुजनला येवू शकतो हे सुद्धा विचाराच्या पलिकडचंच आहे असं वाटलं."

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धमाल नावाचा बैल's picture

12 Aug 2008 - 8:58 am | धमाल नावाचा बैल

सामंत साहेब,
तुमच्या अनुभवाबद्दल आम्ही अनादर मुळीच दाखवित नाही.(डांबीस काका श्टाईल ;))..पण तुम्ही आता जरा ब्रेक घ्या बुवा...अहो किती लेख टाकता हे? कंटाळा येतो ना...

बैलोबा

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Aug 2008 - 10:54 am | श्रीकृष्ण सामंत

बैलोबाजी,
नका हो असं म्हणू !. ही निर्मिती आहे. देव तथास्तू म्हणतो. नंतर मग वाईट वाटेल.
"प्रतिभा उरी धरूनी
मी लेखन करीत रहावे
हे भाव स्वप्न अपुरे
साकार त्याने करावे"

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

लिखाळ's picture

13 Aug 2008 - 8:10 pm | लिखाळ

आपण जे लिहिता ती आपल्याला पचले आहे हे या उत्तरातुन पटले.
लेखनास शुभेच्छा !
--लिखाळ.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Aug 2008 - 10:03 pm | श्रीकृष्ण सामंत

लिखाळजी,
"व्यक्ति तशा प्रकृती" असं उगीच का म्हटलंय.
आपल्या प्रोत्साहना बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com