मलेशियातील माझे खाद्यजीवन

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जनातलं, मनातलं
10 Aug 2008 - 12:09 pm

मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रु, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच. कॅंटीन भव्य आणि वातानुकुलीत होते. बुफेमुळे आणि वेटरच्या व्हेजी, नानव्हेजीच्या गोंधळात काहीच न कळल्याने पानात पकोडा घेतला तो मनसोक्त खाल्ल्यावर कळले की तो चिकनचा होता! पूर्ण शाकाहारी असलेल्य्या माझ्या खाद्यजीवनाला बसलेला तो पहिला धक्का‌. शेवटी'इदं न मम"म्हणून सोडून दिले.इथे हॉटेलातही प्रत्येक वेळेस सांगावेच लागते 'नो चिकन, नो फिश, नो पोर्क , नो बीफ'एवढे सांगूनही व्हेजी फ्राईड राईस येतो त्यात २-४ कोलंबी डोकावतातच, शांतपणे काढून टाकणे हाच एक उपाय!मलेशियात सी फूड खूप चांगले मिळते असे म्हणतात."मी गोरेंग"(फ्राईड नूडल्स), "नासी गोरेन्ग"(फ्राईड राईस), "नासी लेमा"(स्पे. राईस), "नासी आयाम"(चिकन राईस), रोटी चनई,सारडीन करी हे पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. के. एफ. सी. सेंटर्स तर नुसती माणसांनी भरून वाहत असतात.हॉटेलमध्ये गेलात तर पहिल्यांदा फ्रूट जूस मागवावा लागतो. आपल्यासारखे पाणी येथे मिळत नाही. मागवून घेतलेच तर जेमतेम ग्लासभर देतात पण ते ही गरम!! त्याचे ही वेगळे पैसे द्यावे लागतात. गरम पाणी न दिल्यास, हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते‌. सुंगाई पेटानीसारख्या शहरात फक्त दोन इंडियन हॉटेल्स आहेत. तिथे मात्र केळीच्या पानावर सुंदर दाक्षिणात्य जेवण मिळते.

शनिवार रविवार तिथे जाऊन जेवणे हा आमचा आठवडाभराचा एक ध्यास असतो. बाकी वेळा घरीच रंधा, जेवा आणि भांडी घासा! नाहीतर व्हेजी-नॉनव्हेजीच्या जाळ्यात अडका. अशावेळी 'मेरा भारत महान' असे वाटते.
मलेशियातील फलजीवन मात्र रसभरीत आहे. त्यामुळेच की काय माझे येथील जीवन फ़्रूटफ़ुल्ल झाले आहे. येथे एकच ऋतु असल्यामुळे बारमाही फळे मिळतात. अत्यंत रसाळ आणि चवदार अशी काही त्यातील फळे आहेत.

रामबुतान-- वरवर काटेरी दिसणारी ही फळे म्हणजे मलेशियाचा मेवा आहे. इतकी गोड व रसाळ असतात की कितीही खाल्ली तरी मन तृप्तच होत नाही.

मँगोस्ट्रीम -- नावावर फसू नका. आंब्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. कठीण कवच्याच्या ह्या फळाच्या आतील पांढऱ्या बिया इतक्या रसाळ असतात की पूछो मत!!

ड्यूरियन -- हे फळ मलेशियन लोकांच्या अत्यंत आवडीचे.फणसासारखेच दिसणारे, आतील गऱ्यासारखा भाग अत्यंत गोड व भरपूर प्रथिनयुक्त पण उग्र आणि विचित्र वासाचे.
किवी--चिकूसारखे दिसणारे पण आतून हिरवे व काळ्या छोट्या बिया असणारे, चवीने आंबट गोड.

येथील शहाळ्याचे पाणी अतिशय गोड जणू पृथ्वीवरील अमृतच."" ह्या व इतर काही व्हेज खाद्यपदार्थंनी माझे खाद्यजीवन समृद्ध केले आहे.पण तरीही बरेच वेळा मला वडापाव, पाणीपूरी इ.चटपटीत पदार्थंची आठवण येतेच. अशावेळेस मी रामबुतानचे एक फळ तोंडात टाकते आणि मानते की मी पाणीपूरी खात आहे. शेवटी काय,समाधान-असमाधान, तृप्ती-अतृप्ती आपल्या मानण्यावरच अवलंबून असते ना???

प्रवासअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

सहज's picture

10 Aug 2008 - 12:15 pm | सहज

शेवटी काय,समाधान-असमाधान, तृप्ती-अतृप्ती आपल्या मानण्यावरच अवलंबून असते ना???

अगदी खरे!!

देवदत्त's picture

10 Aug 2008 - 12:18 pm | देवदत्त

तोंडाला पाणी सुटले :)
नवीन फळांची माहिती मिळाली. धन्यवाद.
शेवटी काय,समाधान-असमाधान, तृप्ती-अतृप्ती आपल्या मानण्यावरच अवलंबून असते ना???
सहमत.
अहो पण रामबुतान फळ खाताना पाणीपुरी खात आहे असे मानण्याचे कारण काय? तुम्हीच म्हणालात ना की 'इतकी गोड व रसाळ असतात की कितीही खाल्ली तरी मन तृप्तच होत नाही.' उगाच त्या फळाला राग यायचा हं :)

ऋषिकेश's picture

10 Aug 2008 - 12:19 pm | ऋषिकेश

वा वैशाली..
तुम्ही माझ्यासारख्याच खवय्या निघालात.. नवनवीन खाऊन बघता :)
याला म्हणतात खवय्येगिरि.. खवैय्या पोटभरण्यासाठी न खाता तृप्तीसाठी खातो.
बरीच नवी फळे कळली.. योग आल्यावर नक्की खाऊन बघेन ..
इथे सचित्र माहिती दिल्याबद्दल धन्यु!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रियाली's picture

10 Aug 2008 - 5:08 pm | प्रियाली

इथे हॉटेलातही प्रत्येक वेळेस सांगावेच लागते 'नो चिकन, नो फिश, नो पोर्क , नो बीफ'एवढे सांगूनही व्हेजी फ्राईड राईस येतो त्यात २-४ कोलंबी डोकावतातच, शांतपणे काढून टाकणे हाच एक उपाय!

शाब्बास! कोलंब्या काढून तुम्ही राहिलेला भात खाऊ शकता यात बरेच काही आले. आम्ही भात काढून कोलंब्या खातो पण बीफ वगैरे खाण्यात आल्यावर तुमच्यासारखेच करतो. :)

पाण्याला पैसे पडतात वाचून मात्र खेद झाला. परदेशातील कॉफी आणि चहा यांची चव भारतीयांना आवडणार नाही हे खरेच. शेवटी सवयीचा प्रश्न असतो. माझ्या काही मैत्रिणी "अरेरे! किती ते क्रिम तुमच्या चहा-कॉफीत" असे म्हणून नाकं मुरडतात. :)

मलेशियन फळं आवडली. किवी सोडून बाकी काही चाखलेलं नाही.

संदीप चित्रे's picture

11 Aug 2008 - 7:30 pm | संदीप चित्रे

>> आम्ही भात काढून कोलंब्या खातो पण बीफ वगैरे खाण्यात आल्यावर तुमच्यासारखेच करतो.
अगदी अगदी !

श्रीयुत संतोष जोशी's picture

10 Aug 2008 - 5:44 pm | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,

शाब्बास! कोलंब्या काढून तुम्ही राहिलेला भात खाऊ शकता यात बरेच काही आले. आम्ही भात काढून कोलंब्या खातो

अगदी बरोबर.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

अभिज्ञ's picture

10 Aug 2008 - 5:54 pm | अभिज्ञ

वैशाली ताइ,
तुमची मलेशिअन खाद्य सफ़र आवडली.
फ़ोटो व समालोचन फ़ारच आवडले.
असेच लेख येउ द्यात.

अभिज्ञ

बकुळफुले's picture

10 Aug 2008 - 6:08 pm | बकुळफुले

वैशाली तै. एवढेच म्हणते
साया कवान आंदा

मदनबाण's picture

10 Aug 2008 - 7:46 pm | मदनबाण

फळदार कहाणी आवडली..

(पेर /नाचपती हादणारा)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

प्राजु's picture

10 Aug 2008 - 8:20 pm | प्राजु

वैशाली ताई,
आपण दिलेल्या फोटों इतकेच वर्णन सुंदर आहे.
एक शंका : मँगोस्ट्रीम म्हणून जे आहे ते भारतात मिळणार्‍या ताडगोळ्यांसारखे असते का?
मस्त फोटो.. मस्त लेख.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्नेहश्री's picture

10 Aug 2008 - 8:35 pm | स्नेहश्री

इथे हॉटेलातही प्रत्येक वेळेस सांगावेच लागते 'नो चिकन, नो फिश, नो पोर्क , नो बीफ'एवढे सांगूनही व्हेजी फ्राईड राईस येतो त्यात २-४ कोलंबी डोकावतातच, शांतपणे काढून टाकणे हाच एक उपाय!

हे आमच्या सारखेच झाले की " prownz fried rice without prownz"
" prownz fried rice without prownz" हे या डीश च खर नाव आहे. ;)

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

देवदत्त's picture

10 Aug 2008 - 8:44 pm | देवदत्त

" prownz fried rice without prownz" हे या डीश च खर नाव आहे
:D

विसोबा खेचर's picture

11 Aug 2008 - 8:57 am | विसोबा खेचर

अरे वा! विविध पाकृंची चित्रमय सफर आवडली! :)

तात्या.

सर्किट's picture

11 Aug 2008 - 9:07 am | सर्किट (not verified)

मावशी,

रोटी प्राठा मागवा.

सगळ्यात सोपे.

- सर्किट

वैशाली हसमनीस's picture

11 Aug 2008 - 5:31 pm | वैशाली हसमनीस

सर्किटपंत,

काय आहे, तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते आमच्याकडे "रोटी प्राठा"हॉटेलातून मिळत नाही.माझे वास्तव्य मलेशियात आहे 'अमेरीकेत नाही.
तरीही (न विचारलेल्या)सल्ल्याबद्द्ल धन्यवाद!!!!

सर्किट's picture

12 Aug 2008 - 8:28 am | सर्किट (not verified)

मावशी,

काय आहे, की इथले (अमेरिकेतले) "आथेंटिक मलेशियन क्युसीन" वाले लोक, आणि हो क्वालालंपूरचेही असेच काही आथेंटीक लोक, नासी आणि मी गोरेंगच्या खाली रोटी प्राठा (आथेंटिक मलेशियन) असे लिहून आजवर आम्हाला गंडवत आलेले आहेत. आणि ते सिंगापूर विमानतळावरचे कावेरी हाटेल, त्यांनीही रोटी प्राठा ही आथेंटीक मलेशियन-सिंगापुरी असे काहिसे लिहून आम्हाला आजवर गंडवले आहे.

तुम्ही आता मलेशियातच राहता, तर माझ्यातर्फे त्यांना (इंग्रजीत) सू करू शकाल का ? लेकाचे बाहेरून आलेल्या माणसांना गंडवतात. काही लाज ?

[अपडेटः दरम्यान आमच्या एका मित्राने खास मेड इन मलेशिया रोटी प्राठ्याचे चित्र पाठवले आहे, ते इथे जोडतो.

http://www.flickr.com/photos/5xmom/123755907/

मलेशियात रोटी प्राठा मिळत नाही, ह्या आपल्या हट्टी विधानाला प्रतिकार म्हणून नाही. आम्हीही मलेशियातील हाटेलात रोटी प्राठा खाल्ला आहे, पण तिथे फोटो घ्यायचा विसरलो (जेवताना उगाच आपल्या ताटांचे प्रसिद्धीसाठी फोटो घ्यायचे हे आम्हाला पटत नाही. आम्ही ते ताट पोटात कसे जाईल ह्याची काळजी करतो.).

- सर्किट

वैशाली हसमनीस's picture

12 Aug 2008 - 12:09 pm | वैशाली हसमनीस

पंत,मी आपल्यासारखी हट्टी विधाने कधीच करीत नाही.मला ती संवय नाही.सर्वसाधारणपणे मी ज्या हॉटेल्समधून गेले आहे तिथली माहिती दिली आहे.इथे रोटी चनई हा प्रकार मिळतो पण तोही अंडयाने युक्त,त्यामुळे मला वर्ज्य! आपण फोटोत दाखविलेला प्राठा मॉलमध्ये मिळतो.तो घरी आणतोच.माझ्या माहितीप्रमाणे ते यू.ए.इ.मध्ये बनतात,आणि जगभरात पाठविले जातात.आपल्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल क्षमस्व!यावर मी अधिक लिहू इछित नाही.प्रत्येकाला लेखन स्वातंत्र्य आहेच की!

अनिरुध्द's picture

11 Aug 2008 - 10:15 am | अनिरुध्द

छान. पण शेवटी मेरा भारत महान.

विश्वजीत's picture

11 Aug 2008 - 3:35 pm | विश्वजीत

काकू,

तुमच्या दाक्षिणात्य पाकृ आणि छान छान खाद्यसफरीचे लेख! तुम्ही खवैया दिसता.

येडा अण्णा's picture

11 Aug 2008 - 3:44 pm | येडा अण्णा

मी ही तुमचाच समदुखी आहे. कामानिमीत्त कौलालंपुरला जाणे झाले होते. ऐयरपोर्ट वरून थेट ऑफिसला गेलो. त्यामुळे दुपारचे जेवण मिळाले नाही. थेट सन्ध्याकाळी डिनरला गेलो. मेनु कार्ड मधील एकही पदार्थाचे नाव कळेना. शेवटी साधा भात कोरडाच खावा लागला. त्यानंतर महिनाभर फक्त दाल - भात यावरच जगलो.
तुमच्या प्रमाणे मलाही चहा खूप लागतो. परंतू चहा कोठेही मिळाला नाही. मुंबई मध्ये उतरल्या उतरल्या ३ कप चहा ढोसला.

अवांतर: अन्ना लक्ष्मी नावाचे एक हॉटेल आहे मिड व्हली मेगा मॉल मध्ये. चारीटि हॉटेल आहे. अतिशय छान दाक्षिणात्य जेवण मिळते.

वैशाली हसमनीस's picture

11 Aug 2008 - 5:42 pm | वैशाली हसमनीस

आपल्या दुर्दैवाने आपण सुचविलेले अन्नलक्ष्मी हॉटेलही आता कायमस्वरूपी बंद झाले आहे.गेल्याच महिन्यात के.एल्.ला गेले होते.तेव्हा तिथे जाऊन आल्यामुळे ही ताजी खबर आहे.

मनस्वी's picture

11 Aug 2008 - 6:31 pm | मनस्वी

वैशालीताई
मलेशिअन फळांची सचित्र सफर आवडली.
येउदेत अजून.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

आनंदयात्री's picture

11 Aug 2008 - 6:42 pm | आनंदयात्री

हेच म्हनतो. आवडली सफर.

धनंजय's picture

11 Aug 2008 - 9:18 pm | धनंजय

या फळांबद्दल लोकांकडून ऐकले होते.

आता तुमची चित्रे बघितलीत, आणि रसाळ वर्णन चाखले!

अरे मग राहिलं काय? :S

लेख फार छान आहे.. आता या विकेंडला मलेशियन होटेलात गेलं पाहिजे..

बेसनलाडू's picture

12 Aug 2008 - 2:06 am | बेसनलाडू

रान्च मार्केट, मिल्पिटास. चांगले आहे.
(खवय्या)बेसनलाडू

धमाल नावाचा बैल's picture

12 Aug 2008 - 7:41 am | धमाल नावाचा बैल

माझं पोट बिघडलं आहे आज मला रात्रीपण जावं लागेल असं म्हणाल की़ तुम्ही लगेच लक्स चा साबण वापरा, हात धुवायला. असा सल्ला देता का हो?

(वैतागलेला) बैललाडू

बेसनलाडू's picture

12 Aug 2008 - 1:46 pm | बेसनलाडू

तुम्हालाही हवाय का?
(सल्लागार)बेसनलाडू

नाटक्या's picture

12 Aug 2008 - 2:18 am | नाटक्या

मिल्पिटास. हे देखील चांगले आहे. तिथला रोटी प्राठा तर उत्तमच...

(खादाड) नाटक्या...

बेसनलाडू's picture

12 Aug 2008 - 1:51 pm | बेसनलाडू

बनाना लीफही चांगले आहे; पण मुख्यत्त्वे करून थाय पदार्थ चांगले मिळतात.
(माहीतगार)बेसनलाडू
'ऑथेन्टिक' मलेशिअन-सिंगापुरी खाद्यपदार्थांच्या नावाखाली रुमाली रोटी (रोटी प्राठा/रोटी सिनई किंवा रोटी चिनई जे म्हणाल ते) आणि चिकन करीचा किंवा वेजी कुर्म्याचा रस्सा (इन्डिअन सॉस!) या नकलीपणाला बाकी आमचा सर्कीटकाकांप्रमाणेच विरोध!
(विरोधक)बेसनलाडू

धमाल नावाचा बैल's picture

12 Aug 2008 - 7:38 am | धमाल नावाचा बैल

वैशाली ताई लेख आवडला.

बैलोबा

अमेरिकेत कुठल्या हाटेलात काय मिळते त्याची माहिती इथं का आहे? लेको खरडवह्या वापरा की आपापल्या..

एकलव्य's picture

12 Aug 2008 - 7:48 am | एकलव्य

वैशालीताई - चित्रे आणि वर्णन आवडले. धन्यवाद!

अवांतर - फिलिपाईन्सला वर्ष-दीड वर्ष सुखात काढले आहे. :) तेव्हा एका मलेशिअन रेस्टॉरन्टमध्ये बर्‍याचदा जायचो. उत्तम पदार्थ, अतिउत्तम वातावरण (धबधबे/ नारळाची झाडे वगैरे बगैरे) आणि उत्तमोत्तम मलेशिअन गर्लस या सुंदर आठवणी पुन्हा मनात दाटून आल्या. ह्म्म्म जुने फोटो धुंडाळायला हवेत.

वर्षा's picture

12 Aug 2008 - 9:37 am | वर्षा

मस्त वाटलं वाचून. पूर्वरंगमध्ये रामबुतान (रांबुतान?), ड्युरियन (दुरियान?) फळांविषयी वाचल्याचं आठवलं :)
-वर्षा

पद्मश्री चित्रे's picture

12 Aug 2008 - 1:33 pm | पद्मश्री चित्रे

खाद्यसफर्.आवडली

येडा अण्णा's picture

12 Aug 2008 - 3:51 pm | येडा अण्णा

अन्नलक्ष्मी हॉटेल बंद झाले हे ऐकुन फार वाईट वाटले. मी साधारण एक वर्षा पुर्वी गेलो होतो. तेव्हा ते हॉटेल छान चालू होते. आमचा विक एन्ड तिथेच साजरा व्हायचा.

यशोधरा's picture

12 Aug 2008 - 10:56 pm | यशोधरा

मस्तच जमली आहे खाद्यसफर!