नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........

चेतन677's picture
चेतन677 in काथ्याकूट
25 Dec 2014 - 7:24 pm
गाभा: 

नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील? या विचाराने घाबरुन एकदम कापायलाच लागायचो.दुसर्‍या कंपनीत काहीतरी फरक पडेल म्हणून कंपनी बदलली पण तिथेही तसेच मला एकच काम चार पाच वेळा सांगत असत पण आधीच असणार्‍या भितीमुळे ते नीट लक्षातच राहात नसे.माझ्या बरोबरचे सगळे माझ्या पुढे गेले.पण माझ्या या प्रॉब्लेममुळे मी अजुनही तिथेच आहे.माझ्या मित्रांना याबद्द्ल सांगितल तर त्यांपैकी काहींनी तात्पुरता माझा आत्मविश्वास जागवला.पण त्याचा कायमसाठी काहीही फरक पडला नाही तर काहीजण मी एक मानसिक रोगी आहे असे समजुन त्यांनी माझ्याशी कायमचा संपर्क तोडला.खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले.थोडक्यात सांगायचे तर मी एक दुसरा मि.बीन आहे .जर मला कोणते महत्वाचे काम सोपवले तर नक्की मोठा अपघात होउ शकतो तसे एकदा कंपनीत झाले पण होते.माझे साहेब दिवसभर मला काय काम सांगावे याच काळजीत असायचे.
मला काय झालेय? हा माझा स्वभाव बद्लायचा मी खुप प्रयत्न केला पण स्वभावाला ओषध नसते असं म्हणतात ते खरेच आहे.मी काय करु ? कंपनी सोडुन देउन मला झेपेल ते काम शोधु की अजुन काही???????सगळे मला हसतात.

प्रतिक्रिया

hitesh's picture

25 Dec 2014 - 8:02 pm | hitesh

माणसाला ज्या चिंता असतात त्यातील ९० % प्रत्यक्ष कधीच घडत नाहीत...

राजे साहेब's picture

25 Dec 2014 - 8:04 pm | राजे साहेब

अहो चेतन साहेब तुम्ही अभियन्ता झालेले आहात जे व्हायला हिम्मत लाग्ते , तुम्हाला आरामाची गरज्ज आहे जी इंजिनिअरींग झालावर लाग्ती इगत्पुरि ला जाउन या http://www.vridhamma.org/Courses-Schedule-in-India फरक पडेल
अप्ला जोब भिती दाखव्ना आहे घाबरुन जाने नही
प्रेमात पाडा अनी पडा *kiss3* *KISSING*
सग्ले थिक होइल

लाभ असु द्या

आप्ले राजे साहेब
एक यन्त्रिकी अभियन्ता *smile* :-) :) +) =) :smile:

माझ्यामुळे कंपनीत अपघात होता होता थोडक्यात वाचलाय.क्धी वाटते की ही फिल्ड सोडुन द्यावी.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Dec 2014 - 10:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

चेतन, अरे खचून जायची गरज नाही.अनेकांना हा अनुभव येतो.तू ज्या नोकरीसाठी अर्ज करतोस, तेव्हा तुला कामाचे स्वरूप वगैरेची माहिती असते का?
करियरच्या सुरुवातीच्या काळात कंपन्या ट्रेनिंग देतात असे ऐकले आहे.त्याबाबत तुला काही माहित आहे का?

मी एक यांत्रिकी अभियंता आहे.रोज कसे काम असते याची कल्पना असते माइसाहेब.काही कामात स्वतःची हुशारी दाखवायची असते मी गोंधळतो.त्यामुळे वरीष्ठ माझ्यावर जबाबदारिचे काम टाकत नाहीत.एकदा त्यांनी एक जबाबदारीचे काम दिले होते.२ दीवसाचे काम ५ दिवस झाले तरीही झाले नाही माझ्याकडुन..

काळा पहाड's picture

26 Dec 2014 - 3:54 pm | काळा पहाड

"असं 'हे' म्हणतात" हे म्हणायचं राहिलंच की.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2014 - 8:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

आगया ऊंट पहाडके निचे ! ;)

जे एस सर्वेश्वर's picture

25 Dec 2014 - 10:15 pm | जे एस सर्वेश्वर

काही दिवसांपूर्वी मी थोड्याफार प्रमाणात तुमच्याच समस्येने ग्रासलो होतो.
पण माझ्या एका मित्राचा सल्ला चांगलाच मदतीला आला.

बी युवरसेल्फ!
तेन्सिओन न घेता मनात येईल तसा काही दिवस वागून बघा
पटलं तर कंटिन्यू करा

अट फक्त एकच...
कुठलाही टेन्शन घ्यायचे नाही & कसलीही चिंता करायची नाही

सगळे चांगले होणार असते आपण घाबरून गोंधळ करतो त्यापेक्षा घाबरायचेच नाही

स्वप्नज's picture

25 Dec 2014 - 11:21 pm | स्वप्नज

+१ सहमत. टेन्शन् किंवा तेन्सिओन घेऊन आपणच परिस्थिती वाईट बनवतो.
ह.घ्या. सर्वेश्वरजी.

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2014 - 10:36 am | प्रसाद१९७१

सायकॅट्रिस्ट कडे जाऊन ताबडतोब औषधे चालू करावित. जितके दिवस पुढे ढकलाल तितके नुकसान होइल.

मराठी_माणूस's picture

26 Dec 2014 - 2:44 pm | मराठी_माणूस

त्यांच्या लिखाणावरुन ते आधीच करुन झाले आहे असे दिसते

खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले

सविता००१'s picture

26 Dec 2014 - 3:03 pm | सविता००१

तुम्हाला कोणते मानसोपचार तज्ञ भेटले त्याची कल्पना नाही. पण असं झालं असेल तर हे खरच फार दुर्दैवी आहे.
तरीही मी हेच म्हणेन की अजून जरा चौकशी करून तुम्ही जिथे कुथे रहात असाल तिथे जरूर आणखी एखाद्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या. सतत असा अनुभव येइल असे मनात आणू नका.

कविता१९७८'s picture

26 Dec 2014 - 3:10 pm | कविता१९७८

स्वतःवर विश्वास ठेवा, गोंधळुन जाउ नका, दुसर्‍याकुणी तुमच्यावर सहानुभुती किंवा दया दाखवावी, अशी अपेक्षा करु नका. तुम्हालाच तुमच्यासाठी प्रयत्न करावे लागतील, हे काम माझ्याकडुन २ नाही ५ नाही तर १० दिवसात झाले तरीही चालेल पण व्यवस्थित करेन अशा विश्वासाने सुरुवात करा. आत्मविश्वास हा स्वतःच कमवायचा असतो आणि तो लगेचच मिळ्तो असेही नाही, एखादे काम मिळाले की ते व्यवस्थीत अभ्यासा, कीती वेळात , आणि कशा प्रकारे पुर्ण करता येईल त्याची नोंद करुन ठेवा, लागल्यास दुसर्‍याकडुन मदत मागायला लाजु नका, बोलते व्हा. पुस्तके, माहीती वाचत रहा,

आणि पटत असेल तर ध्यान धारणा (मेडीटेशन) करा. बर्‍याचजणांना फायदा होतो , करुन पहायला हरकत नाही फायदा झाला नाही तरी नुकसान तर नक्कीच होणार नाही. ध्यान धारणेला बसताना एका शांत ठीकाणी डोळे मिटुन बसा आणि कुठलेही जे काही विचार मनात येतील त्यांना येउ द्या. थोड्या दिवसात फरक जाणवायला लागेल.

वेल्लाभट's picture

26 Dec 2014 - 3:26 pm | वेल्लाभट

काही गोष्टी करून बघता आल्या तर कर. आगोदर करत असशील तर चांगलंच आहे.

१. रोज व्यायाम करणे. शक्यतोवर स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग वाला.
२. आवडती गाणी ऐकणे.
३. जी कला रुचत असेल ती जोपासणे. (उगाच काहीतरी शिकायचंय म्हणून नाही)
४. व्यायाम शक्य नसल्यास खेळणे... बॅडमिंटन क्रिकेट इत्यादी काहीही मैदानी.
५. नियमितपणे चांगली पुस्तके वाचणे. आत्मचरित्र उत्तम.
६. पुरेशी झोप आणि सकस आहार याकडे लक्ष ठेवणे.

या शिवाय; हे बघ भीती गोष्ट न जमण्याची नसते, तर ती नाही जमली तर कुणी काय म्हणेल याची असते. मुळात कुणी काही म्हणताना इतका विचार करत नाही जितका तू कुणी काय म्हणेल याचा करतोस. ही फिकीर सोडून दे. विश्वास असल्यास देवाला हात जोडत जा. आणि तू तेरा देख; जग गेलं उडत. सुयोग्य शब्दातही हे सांगू शकतो पण राहुदे.

जो माणूस इंजिनियरिंग, सीए इत्यादी रिडिक्युलसली कॉम्प्लिकेटेड गोष्टी करू शकतो, तो काहीही करू शकतो. कळलं का? चिल्ल मारायचं.... ड्रीम अबाउट द फ्यूचर, अँड यू विल नायदर रिग्रेट द पास्ट नॉर विल द प्रेजेंट बॉदर यू. इवन इफ इट डज.... जस्ट शो द मिडल फिंगर!

काळा पहाड's picture

26 Dec 2014 - 3:56 pm | काळा पहाड

बाकी सगळं करण्यापेक्षा सगळ्यात पहिल्यांदा दुसर्‍या एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाची मदत घ्या.

सतिश गावडे's picture

26 Dec 2014 - 10:22 pm | सतिश गावडे

तुम्हाला याआधी आलेला मानसोपचारतज्ञाचा अनुभव ही वाईट घटना आहे. मात्र त्या एका अनुभवाने सर्वच मानसोपचारतज्ञांबद्दल नकारात्मक मत बनवू नका. दुसरा एखादा चांगला मानसोपचारतज्ञ शोधा. फॅमिली डॉक्टर असल्यास त्यांना विश्वासात घेऊन ही समस्या सांगा. कदाचित ते/त्या एखादा चांगला मानसोपचारतज्ञ सुचवू शकतील.

अगदीच मानसोपचारतज्ञाकडे जावयाचे नसल्यास एखादा अनुभवी समुपदेशक (काउंसेलर) सुद्धा चालेल. त्यांच्याकडे योग्य ते मार्गदर्शन मिळू शकेल.

मिपावरील मितानताई याबाबतीत कदाचित तुम्हाला मदत करु शकतील. त्यांना व्यनि करु शकता.

बार्नी's picture

8 Jan 2015 - 11:58 pm | बार्नी

बिलकूल हेच म्हणतो. बर्याच वेळा लोक चांगली पुस्तके वाच , गाणी एक असे सल्ले देतात (Its all in your head type ) . पण मेंदुत रासायनिक बदल
झालेला असतो हे त्यांच्या लक्शात येत नाही.

माहितगार's picture

26 Dec 2014 - 4:58 pm | माहितगार

@ चेतन677 आपण मागे मिपावर रहस्यकथा लेखन केले आहे असे दिसते. सदैव सल्ले देण्या उत्सूक मिपाकरांची फिरकी घेण्यासाठी हा धागा आपण काढला नसणार हे गृहीत धरतो. आपणास खरेच अशी समस्या असेल तर, रहस्यकथा विषयक आवडीचा थेट संबंध नसला तरीही समस्या कमी होई पर्यंत लक्ष प्रवासवर्णने, ललीत निबंध अशा तणाव विरहीत लेखन प्रकारांकडे वळवावे, तुर्तास रहस्यकथा प्रकार सर्व माध्यमातून टाळावा असे सुचवावेसे वाटते (हे माझे व्यक्तीगत मत आहे) .

आपणास अशा प्रकारची भिती इतर काही काम करताना वाटते का ? किती वर्षांपासून वाटते ?, आपला नौकरीचा अनुभव किती वर्षांचा आहे इत्यादी माहितीचा आंतर्भाव आपण या प्रस्तुत धाग्यात केलेला नाही.

सर्वसाधारण स्वरूपाचा मानसिक ताण वाटत असेल तर, तुमच्याच कार्यक्षेत्रातील मातब्बर अनुभवी (पण ऑफीस मधील नव्हे) अशा व्यक्तीशी व्यक्तीगत परिचय प्राप्त करून अगदी छोट्या छोट्या वाटणार्‍या शंका विचारु शकता. सोबतीस ह्युमन रिसोर्स मधील एखादी व्यक्ती अथवा ह्युमन रिसोर्स विभागाचा अनुभव असलेला प्लेसमेंट कन्सल्टण्टशीही शंकाबद्दल चर्चा करणे श्रेयस्कर. या दोन गोष्टींचा आत्मविश्वास येण्यात बराच फायदा होउ शकेल.

आता भाग राहिला कामावर पोहोचल्यावरच्या भिती वाटण्याचा. अगदीच प्राथमिक स्वरूपाची ॲंक्झायटी असेल तर स्वसंमोहन पद्धतीत सांगतात तसे कामा वर जाण्या पुर्वी आपण कामावर गेल्या नंतर काय काय कामे सांगितली आणि पार पाडली जातात त्यांची मनातल्या मनातच उजळणी/सराव करता येईल. प्राथमिक स्वरूपाची ॲंक्झायटीस हे पुरेसे असावे असे वाटते. एवढ्यावर होत नसेल तर अनुभवी मानसोपचार तज्ञाची मदत घेणे श्रेयस्कर असेल असे वाटते.

मिपाकरांची फिरकी घेण्याचा कोणताही हेतु नाही.हा प्राॅब्लेम तसा मी दहावीत असल्यापासुन आहे.त्यावेळी विज्ञान विषय आणि बारावीतील भौतीक शास्र,बायोलाॅजीचे प्रयोग करताना हात पाय थरथर कापत...पण ते असंच होत असेल म्हणुन लक्ष नाही दिले.आता तसाच प्राॅब्लेम कंपनीत कामे करताना होतो.साहेबांच्या खुर्चीसमोरच माझी पण बसायची खुर्ची आहे तिथे बसताना करतरी वाटते.आणि या सगळ्यांतुन बाहेर पडण्यासाठीच कथा लिहिण्याचा छंद जोपासत आहे....

मिपाकरांची फिरकी घेण्याचा कोणताही हेतु नाही....आणि या सगळ्यांतुन बाहेर पडण्यासाठीच कथा लिहिण्याचा छंद जोपासत आहे....

कथा लेखन करणार्‍यांना सहसा व्यक्ती आणि परिस्थितीकडे अधीक तटस्थपणे पहाता येत असावे असा माझा (गोड) गैरसमज आहे. :) व्यक्ती आणि परिस्थितीकडे अधीक तटस्थपणे पहाण्याचे कौशल्य असल्यास स्वतःच्या प्रस्तुत समस्येवर बर्‍यापैकी मात करू शकाल असे वाटते आहे. अर्थात माझ्या परिचयात भरमसाठ भय आणि रहस्यकथा पुस्तक टिव्ही ते चित्रपट माध्यमातून वाचणार्‍या पहाणार्‍या व्यक्ती आहेत. माझ्या व्यक्तीगत ऑब्झर्वेशननुसार भय आणि रहस्यकथांचा भय रस एंजॉय करणे हि मोठी समस्या नाही. अशा व्यक्तिंना दुसर्‍या व्यक्तींवर विश्वास ठेवण जड जाण्याची शक्यता असू शकते. अविश्वासाच नात जेवणाच्या मीठाच्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास त्याचा परिणाम निर्णयक्षमतेवर आणि म्हणून निर्णयाच्या अंमल बजावणीवर होऊ शकतो म्हणून आधी वर म्हटल्या प्रमाणे भय आणि रहस्यकथा एवजी तुर्तास प्रवासवर्णनादी तणावरहीत लेखन/ छंदाचा विचार करावा असे वाटते (पुन्हा एकदा हि माझी व्यक्तीगत मते आहेत, कोणत्याही शास्त्रीय आधाराचा दावा नाही).

प्रत्येकालाच कोणत्या न कोणत्या गोष्टीची anxity कधी न कधी वाटतच असते. मनुष्य प्राण्याच्या दृष्टीने हे अबसोल्यूटली नॉर्मल आहे. अचानक समोर वाघ, सिंह, साप, कशाला साध झूरळ दिसलं तरी इतर वेळी नॉर्मल मंडळी खरेच घाबरतील आणि तुम्हास उपरोक्त anxity असूनसुद्धा अगदी वाघ सिंह समोर आला तरी तुम्ही त्या प्रसंगातून यशस्वीपणे बाहेर पडाल, कारण प्रसंग परत्वे प्रत्येकव्यक्ती प्रसंगाचा सामना वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. वाघ/साप अचानक समोर आला तर तुम्ही नेमकी स्ट्रॅटेजी वापरणार शत्रूवर सरळ उलटा हल्ला करणार, शत्रूने काही केल्यानंतर सामना करणार, लपणार, पळणार की गर्भगळीत होणार हे प्रत्यक्षात तो प्रसंग समोर आल्या नंतरच होते हे खरेजरी असले तरी तशा प्रकारच्या प्रसंगात मी कसा वागलो होतो किंवा अशा शक्य प्रसंगांबाबत उपलब्ध पर्यायांपैकी कोणता पर्याय केव्हा निवडावा याची माझ्या मनाने किती आणि काय तयारी केली आहे यावर बरेच अवलंबून असते.

anxity वाटणाऱ्या प्रसंगाची मनात पुर्वतयारी / सराव केल्याने या प्रकारच्या समस्येचा ८० ते ९० टक्के निराकरण व्हावयास हवे असे वाटते. मला स्वत:स रेल्वेने प्रवास करण्याबाबत जराशी anxity असे त्या बाबत अजूनही मी नेहमी कम्फर्टेबल नसतो प्रत्यक्षात प्रसंगाची मनात पुर्वतयारी / सराव करून मुंबईच्या लोकलचा प्रवाससुद्धा मी नित्याच्या प्रवाशांपेक्षा लिलया पार पाडतो. म्हणजे स्वत:च्या मनात रेल्वेस्टेशन वर गेल्या नंतर काय काय होणार याची उजळणी करतो. रेल्वेस्टेशन पोहोचणार तिथे भला मोठा क्यू असेल तो क्यू केव्हा संपेलयाची काळजी न करता मी क्यूमध्ये उभा टाकेन ट्रेन फलाटावर येण्या आधी सहसा तिकीट मिळतेच. अनिस्चित फलाट क्रमांक केव्हातरी एकदाचा कळतोच तिथे रिझनेबल मेहनतीने आपण पोहोचतोच, हवा असलेला डब्बा रिझनेबल विचारपूस आणि धावाधावी नंतर मिळतो. तेवढ्या गर्दीतही चढण्याची संधी मिऴतेच इतर सहप्रवासीही मदत करतात ह्या सूचना एकदा डोक्यास दिल्या कि माझे पुढचे काम आपोआप फत्ते होत जाते. रेल्वेस्टेशनवरच्या मला अस्वस्थ करू शकणाऱ्या न रुचणाऱ्या प्रत्येक प्रसंगात माझा सकारात्मक प्रतिसाद काय असावयास हे मी माझ्या मनास सांगणे जरूरी आहे. ती अनिश्चित वेळ घेणारी क्यूची गर्दीची , अनिश्चित फलाट बोगी सीट उपलब्ध होणे या प्रक्रीया सहज पूर्ण होत जातात आणि एकदा का या यशस्वी अनुभवांचा सराव झाला की स्वत:स अशी anxity होती हे विसरावयास होते.

अर्थात एवढ्या एकमेक टेकनीकने १००% anxity जाईल असे नव्हे. मनावरील असंख्य प्रभाव हे लहाणपणापासून कोरले गेले असतात. एखाद्या व्यक्तीची प्रसंगाची लहाणपणीच भिती बसली असते. आणि अशा प्रसंगी सोबत कुणी नसणे, सोबतची मोठी व्यक्तीच घाबरुन प्रतिसाद देत असणे, इतरांच्या ओरड्याची भिती असणे, किंवा अमूक एक गोष्ट अशीच झाली नाहीतर कसे होणार याची अती चिंता. त्या शिवाय आपल्या समाजात कंपॅरिझन म्हणजे अत्यंत निंदनीय पद्धतीने होणारी तुलना, समोरची व्यक्ती चुकत असेल, किंवा micro manage करत असेल तरी वयाने पदाने मोठी आहे म्हणून भिडस्तपणे सहनकरणे आणि या प्रसंगाचा सामना करण्यासाठी आवश्यक संवाद कौशल्य नसणे, आपले स्वत:चे न्यूनगंड असे अनेक पदरांनी आपल्या व्यक्तीमत्वात टाळण्या जोग्या छटा जागा अडवून असतात. अडवला गेलेले एकएक पदर मोकळे करण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवा आणि वापरा यश नक्की मिळेल. आपली समस्या कॉग्नेटीव्ह आणि सॉफ्ट स्कील डेव्हेलपमेंट रिलेटेड वाटते. त्यामुळे औषधवाल्या मानसोपचारापेक्षा कॉग्नेटीव्ह आणि सॉफ्ट स्कील डेव्हेलपमेंट क्षेत्रातील मोटीव्हेट करू शकणाऱ्या समुपदेशकाची गरज अधिक असावी असे माझे व्यक्तीगत मत आहे. (चुभूदेघे)

सर्वाधिक महत्वाचे तांत्रिक क्षेत्रात तुमची तंत्रकुशलता आणि तंत्रकुशलताच महत्वाची बाकी गोष्टी करिअरमध्ये महत्वाच्या असल्या आणि कार्य पारपडत असल्याशी मतलब, म्हणुन काम ठिक आहेतर दहा लोक्स काय म्हणतात ते मनास लावून न घेता काम करत रहा. तुमच्या बॉस आणि कंपनीस दिलेले काम होते हे महत्वाचे त्या दृष्टीने कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणतात तसे अनुभवी अभियंत्यांकडून छोट्या छोट्या शंकांचेही निरसन करून घेणे हि पहिली महत्वाची पायरी ठरावी असे वाटते.

चेतन677's picture

27 Dec 2014 - 1:33 pm | चेतन677

धन्यवाद

चेतन677's picture

27 Dec 2014 - 7:15 pm | चेतन677

तुमचे अनुभवाचा मला नक्कीच फायदा होईल

विजुभाऊ's picture

26 Dec 2014 - 5:15 pm | विजुभाऊ

फोन नंबर व्यनी करा.

किंवा...

ज्या कार्यक्षेत्राचे तुम्ही शिक्षण घेतले आहे, ते तुम्हाला आवडते का?

अभियांत्रिक क्षेत्र तुम्ही निवडले? की तुमच्या माता-पित्यांची इच्छा म्हणून तुम्ही घेतलेत?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Dec 2014 - 10:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी सुद्धा यांत्रिकी अभियंता आहे. कामासंदर्भात काही अडचण असल्यास नक्की व्य.नी. करा. जमेल तेवढी मदत मी करीनचं.

चेतन677's picture

26 Dec 2014 - 11:22 pm | चेतन677

सर्वांनी वेळ काढुन मला मार्गदर्शन केले.हीच गोष्ट काही जवळच्या मित्रमंडळींकडे केली तेव्हा काहींनी साथ सोडली.काहीजणांनी मनापासुन मदत केली.तुम्ही मिपाकरांनीही भरपुर मदत केलीये त्याबद्दल धन्यवाद...पण व्य.नी चा लाॅंग फाॅर्म कुणी सांगेल का??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Dec 2014 - 11:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यक्तीगत निरोप

माझ्या मते आत्मविश्वासाचा अभाव हे या सर्व प्रकारामागाचे (एक) कारण असावे. त्यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जिथे आत्मविश्वास कमी पडतो त्या गोष्टीचे सखोल कौशल्य संपादित करणे. उदा. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही जणांची वरीलप्रमाणे अवस्था होते. त्यावर उपाय काय? तर परिपूर्ण अभ्यास व भरपूर सराव परीक्षा देणे. अपयशी झाल्यामुळे आत्मविश्वास गमावलेला खेळाडू ज्याप्रमाणे प्रचंड सराव व मेहनत करून पुन:पदार्पण करतो. त्याचप्रमाणे तुमच्या कामाची इत्यंभूत माहिती घ्या. अडचण असेल तर प्रश्न विचारता येतील. बर्याचदा एखाद्या कामाचे पूर्ण स्वरूप, त्याची पद्धत, त्यातले धोके, माहित नसल्यामुळे अपघातासारखे प्रकार घडू शकत असतील. (अंदाज)

आत्मविश्वास मिळविण्यासाठी वरील उपयासोबतच संमोहनाची खूप मदत होवू शकेल. (मी या विषयातला तद्न्य नाही . केवळ, माझ्या कुवतीप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. शुभेच्छा. :)

सल्ला नाही. पण मी काय करतो ते सांगू शकतो- अगदी काय करावे कळेनासे झाले की.

"Start by doing what is necessary, then what is possible, and Suddenly, you are doing the impossible."

हे मी रॉबर्ट शुल्लर (Robert Schuller) च्या एका पुस्तकात वाचले होते. जे काम करणे अत्यावश्यक आहे ते करायला सुरु करा. ते पूर्ण झाले की मग जे जे करणे शक्य आहे ते करा. बघता बघता तुम्ही अशक्य काम करायला सुरुवात केली असेल.

माहितगार's picture

27 Dec 2014 - 12:35 pm | माहितगार

हा एक उत्तम सल्ला आहे. एकदम मोठा केक (घास) खाणे अवघड असते. तसेच समस्यांचे असते. कामांचे प्रिऑरिटायझेशकरून त्यांच्या महत्वानुसार त्यातील शक्य होत असलेल्या कामांपासून सुरवात करणे उत्तम. जेवणाच्या ताटातला न आवडणारा पदार्थ शक्यतोवर आधी संपवण्यास सुचवल जात. अर्थात त्यामुळे जेवण थांबणार असेल तर त्या पेक्षा तो पदार्थ टाळलेला बरा असे वाटते (चुभूदेघे)

मोहन's picture

27 Dec 2014 - 1:01 pm | मोहन

"My life is full of disasters which never happened. "

हे माझ आवडत वाक्य आहे .

नको त्या चिंता सगळ्यांनाच सतावत असतात. बहुतेक इतर जण त्या पुढे जायचा मार्ग शोधून काढ्तात तूम्ही बहुदा त्यातच अडकता आहात. एखाद्या चांगल्या समुपदेशकाची / मानसोपचार तज्ञाची मदत घ्या.

टवाळ कार्टा's picture

27 Dec 2014 - 1:09 pm | टवाळ कार्टा

भारीये :)

माझीही शॅम्पेन's picture

27 Dec 2014 - 9:17 pm | माझीही शॅम्पेन

मानसिक तयारी ही अत्यंत आवश्यक आहे , इथे मी simulation बद्दल बोलतोय.. बरेच वेळेला एखाद खूप कठीण काम करण्या अगोदर मी संपूर्ण काम कस होईल ह्याची मनातील आरखणी करतो , म्हणजे समजा एखाद कठीण presentation असेल तर त्या मीटिंग रूम मध्ये मी कसा शिरेन तिथ पासून presentation संपे पर्यंत काय काय होऊ शकत ह्याचा विचार करतो , कुठल्या कुठल्या बाबी आपल्याला अडथळा आणून शकतात जस projector न चालण , निरूत्तर करणारे प्रश्न कसे टळता येतील ह्याची पूर्व-तयारी , कधी बाकीचे व्यक्ते अश्या वेळी काय करू शकतात ह्याच निरीक्षण करण इत्यादी..
शेवटी एखाद काम दुसरा कोणी करू शकतो तर ते आपण नक्कीच करू शकतो ह्याचा आत्मविश्वास हळु-हळू develop करण हे शक्य आहे..
जर शक्य असेल तर तुम्ही जे काम करता ते बाकीचे कसे यशस्वी पणे करतात त्याच पूर्व-परवानगीने video shooting करून ते पुन्हा पुन्हा पाहून नंतर ते प्रत्यक्षात करण (हे शक्य नसल्यासस youtube वर शोधण) अश्या गोष्टी करा ..

मनिमौ's picture

28 Dec 2014 - 9:56 pm | मनिमौ

रोज सकाळी उठून मनापासून विचार करा की आज मला सोपवलेली सगळी कामे मी वः नीट
पूर्ण करणार. संगीत आवडत असेल तर ते ऐका.

dhakkaa's picture

28 Dec 2014 - 10:10 pm | dhakkaa

भिती , राग , द्वेश यावर नियन्त्रन विपश्यनेद्वरे होउ शकते.

एक चित्रफित :

https://www.youtube.com/watch?v=r5bud1ybBDc

सस्नेह's picture

28 Dec 2014 - 10:32 pm | सस्नेह

चेतन यांना समस्या दहा वेळा सुटण्याइतके सल्ले मिळालेत असे वाटते.
बघतेय, मिपावर सल्ले मागून ट्यार्पी गोळा करणारे नवनवे आयडी अधूनमधून उगवतात कधी सल्ला उपयोगी पडला म्हणून जाहीर आभारही मानतात धागे काढून.
पण नंतर कधी हे आयडी इथली सुखदुःखे विचारताना दिसत नाहीत !
सल्ल्यापुरते मिसळपाव...

सतिश गावडे's picture

28 Dec 2014 - 11:49 pm | सतिश गावडे

चेतन यांना समस्या दहा वेळा सुटण्याइतके सल्ले मिळालेत असे वाटते.

ज्यांची समस्या मानसोपचारतज्ञांच्या सल्ल्याने सुटली नाही ती मिपाकरांच्या सल्ल्यांनी सुटेल असं खरंच तुम्हाला वाटतं?

बघतेय, मिपावर सल्ले मागून ट्यार्पी गोळा करणारे नवनवे आयडी अधूनमधून उगवतात कधी सल्ला उपयोगी पडला म्हणून जाहीर आभारही मानतात धागे काढून.

मानसिक/भावनिक आरोग्याच्या बाबतीत दिलेल्या सल्ल्याबद्दल कुणी आभार मानत असेल तर त्याचा अर्थ सल्ल्याचा उपयोग झाला असे होत नाही. आभार मानणे हे दिलेल्या धीरापोटी व्यक्त केलेली कृतज्ञता असू शकते. शिवाय मानसिक समस्यांबद्दल लोकांमध्ये असलेला स्टीग्मा पाहता कुणी केवळ ट्यार्पी मिळावा म्हणून आपल्याला अशा प्रकारची समस्या आहे म्हणून धागा काढेल असं वाटत नाही.

पण नंतर कधी हे आयडी इथली सुखदुःखे विचारताना दिसत नाहीत !

त्यांचीच समस्या सुटली नसेल तर दुसर्‍यांच्या सुख-दु:खांची चौकशी कुठून करणार.

सल्ल्यापुरते मिसळपाव...

या धाग्यात मांडलेली समस्या किंवा याआधी आलेला दुसर्‍या एका आयडीचा भावनिक आरोग्याच्या समस्येवरचा धागा (जी समस्या बरीचशी सोशल फोबिया या प्रकाराच्या जवळ जाणारी होती) यांच्यावर मिपावर मिळालेल्या सल्ल्याने धीर नक्कीच मिळत असणार. आपल्या पाठीशी कुणीतरी आहे ही भावना नक्कीच आधार देत असणार.

मात्र प्रत्यक्ष समस्येच्या निवारणात मिपावरील सल्ल्यांचा कितपत उपयोग होत असेल याबद्दल साशंक आहे.

बर्‍याचशा वर्तणूक समस्या या मेंदूच्या कार्यप्रणालीशी निगडीत असतात. आणि त्या क्षेत्रातील तज्ञांचे प्रदिर्घ उपचार (बरेच वेळा सायकोथेरपी) उपयोगी ठरु शकतात.

मात्र लोक मिपासारख्या खुल्या मंचावर आपल्या भावनिक आरोग्यासंबंधीच्या समस्या मोकळेपणाने मांडू लागले आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. त्यांची वरील प्रतिसादाप्रमाणे नकारात्मक प्रतिसाद दिल्यास लोक इथून पुढे आपल्या समस्या व्यक्त करणारच नाहीत.

चेतन यांना मिपाकरांच्या सल्ल्याने नक्कीच भावनिक आधार मिळाला असेल. त्या सल्ल्यांच्या बरोबरीने त्यांना इतर एक दोघांनी दिलेला "मनसोपचारतज्ञ बदला" हा सल्ला नक्कीच उपयोगी पडेल.

मितान's picture

29 Dec 2014 - 9:05 am | मितान

+१११ सतिश गावडे

अगदी असंच काहीसं लिहायला आले होते.

सस्नेह's picture

29 Dec 2014 - 9:06 am | सस्नेह

गैरसमज होतो आहे. सल्ला घेण्याबद्दल हरकत नसून त्याचा उपयोग होऊन व आभार मानून पुन्हा इथे न येण्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे.

मितान's picture

29 Dec 2014 - 9:15 am | मितान

गैरसमज नाही गं...

येतील दोन चार दिवसात. किंवा वाचतही असतील. समोर यायचा ताण येऊ शकतो.

प्यारे१'s picture

29 Dec 2014 - 8:55 pm | प्यारे१

माऊली, जरा सबुरीनं घ्या. कसलीच घाई करु नका. निष्कर्ष काढायची पण!
आता 'मोठ्ठ्या' झालात ना तुम्ही? मग???? ;)

@स्नेहांकिता तुम्हाला जर असे वाटत असेल की मी फक्त सल्ले विचारायला आयडी ओपन केलंय तर ते साफ खोटं आहे..मी मिपावर एक कथा लिहिली आहे.आणि एक लिहीत आहे.आणि सुख दुःखे वाटण्यासंबंधी म्हणत असाल तर मी रोजचं आयुष्य कसा जगतो ते मला माहित आहे.सकाळच्या सुरुवातीपासुन मला लहान लहान गोष्टींचा विचार करावा लागतो.मला नाही माहित की मला काही मानसिक आजार आहे किंवा नाही.पण जेव्हा कुणी त्याचे सुख दुख मला सांगतो तेव्हा मी माझे प्राॅब्लेम्स विसरुन नक्किच माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करतो.....

सस्नेह's picture

29 Dec 2014 - 9:33 pm | सस्नेह

तुमच्या धाग्यावर असला तरी प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही किंवा तुमच्या भावनांचा अनादर नाही.
यापूर्वी बरेचजण अतिशय अंतरंग सल्ले विचारून गेले . आणि परत आले नाही कधी, त्यांची आठवण आली तुमचा धागा पाहून.
भावना समजून घ्याल अशी आशा असलेली
--स्नेहांकिता

मी रोजच इथे असतो..स्नेहांकिताजी काही मदत हवी असल्यास नक्की कळवा!!!!!

सिरुसेरि's picture

28 Dec 2014 - 11:15 pm | सिरुसेरि

तुम्हाला जर कंपनीतील विशिष्ट विभागातील काम करण्यात त्रास होत असेल तर विभाग बदलून बघा . पण कंपनी बदलू नका. मार्केटिंग , सेल्स , क्वालिटी या विभागांमध्येही खुप स्कोप आहे - कामाला , शिकायला आणि करीअरला .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Dec 2014 - 11:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण मेकॅनिकल ईंजिनिअरिंग मधल्या नेमक्या कुठल्या क्षेत्रात काम करता? कॅड-कॅम किंवा नुसत्या मॅन्युफॅक्चरिंग मधे काम करत असाल आणि त्या संदर्भात मदत लागली तर नक्की सांगा. मदत करायला आनंद होईल. मी नवा होतो तेव्हा मलाही भिती वाटायची. आपल्याला जमेल का नाही असं वाटायचं. नंतर हळु हळु रुळत गेलो. :)...

दिनेश गोडे's picture

29 Dec 2014 - 1:20 pm | दिनेश गोडे

batch flower remedy वापरुन पहा मला चांगला उपयोग झाला.

प्रसाद गोडबोले's picture

29 Dec 2014 - 2:36 pm | प्रसाद गोडबोले

काही उपाय देत आहे : ह्यातील कोणताही उपाय करुनये.

आयुर्वेदिक उपाय :गाजा/भाग प्या
गाजा पिल्याने "भो$ड्यात गेली दुनिया " असा अ‍ॅटीट्युड निर्माण होतो , माणुस ब्रह्मानंदी लागली टाळी ह्या अवस्थेप्रत जाऊन पोहचतो , तिथे मग घाबरण्यासारखे काहीच नसते . एकदा का ही अवस्था प्राप्त झाली की मग तुमची भीति कायमची नष्ट होईल
आणि तुम्ही म्ह्नालात की सगळे तुम्हाला हसतात .... त्यांना पाहुन तुम्हीच अनावर हसायला लागाल :D

होमिऑपॅथिक उपाय :कालिफॉसिफोरम १/१६
कालिफॉसिफोरम हे खर्‍या अर्थाने अमृतच आहे , डोळ्यांना दिसणार नाही इतका डोस रोज सकाळी उठण्याच्या आधी आणि झोपल्यानंतर घेत चला .

अ‍ॅलोपॅथिक उपाय : लोबोटोमी ... सिंपल

अध्यात्मिक उपाय : नामस्मरण करा . ह्याविषयी प्यासारामबुवा अधिक मार्गदर्शन करु शकतील

ज्योतिष उपाय : चंद्राची शांत करा. चंद्र मनाचा , चंचलतेचा सार्‍या भावनांचा कारक आहे त्याची शांत करा , हातात मोत्याचीचांदीची अंगठी घाला .

राजकीय उपाय : साहेबांना शरण जावा , साहेब सर्व भक्तांची भीती दुर करतात असा आजवरचा अनुभव आहे.

अजुन काही उपाय आहेत , सुचतील तसे देत जाईन ...

सूचना: "येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी."

प्यारे१'s picture

29 Dec 2014 - 8:56 pm | प्यारे१

लाल रंग जरा सौम्य करा रे कुणीतरी.
पश्या डोक्यावर पडलंय आमचं. :)

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 11:13 am | प्रसाद गोडबोले

प्यारे बुवा ,

लाल रंग पाहुन जसा बैल उधळतो तसे करु नका, तुम्ही उगाच अशी चित्ताची शांती ढळु देवु नका . प्रवचन्कारांनी कसं गरीब गायी सारखं असलं पाहिजेल ...

पश्या डोक्यावर पडलंय आमचं.

. वगैरे वाक्यातुन आपली मनाची चंचलता मत्सरभाव लोकांपुढे मांडणे तुमच्या सारख्या बुवांना शोभुन दिसत नाही .

कोण्याही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पुजनाचे || हे तुकोबांनी सांगुन ठेवलय, ध्यानात घ्या .

जे अज्ञ जन भरकटले आहेत त्यांना मार्गदर्शन करा ... भवसागरात तुम्ही उडी मारलीच आहेत तर तारुन न्या ह्या सामन्य जनांना .

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे |
भयातीत ते संत आनंत पाहे |
तया पाहता द्वैत काही दिसेना |
भयो मानसी सर्वथाही असेना ||

मुळातच भीती हाच एक भास आहे ...ह्यावर एक फक्कड प्रवचन होवुन जाऊदे

आणि आता शांतपणे प्रवचन सुरु करा .

:D

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:03 pm | प्यारे१

इन जनरलच 'मोठे व्हा'! ;)

बाकी भीती हा भास आहे हे माहिती असणं आणि तसा अनुभव येऊन त्यावर मात करणं हे महत्त्वाचं आहे हे बरीक खरेच.
भारतीय मानसशास्त्र त्या दृष्टीनं मोलाची मदत करतं खरं पण हल्ली सगळ्या भारतीय गोष्टींना नाक मुरडायची सवय लागली आहे आपल्याला. त्यामुळे पास!

बॅटमॅन's picture

30 Dec 2014 - 1:16 pm | बॅटमॅन

भारतीय मानसशास्त्र त्या दृष्टीनं मोलाची मदत करतं खरं पण हल्ली सगळ्या भारतीय गोष्टींना नाक मुरडायची सवय लागली आहे आपल्याला. त्यामुळे पास!

भारतीय या नावाखाली नेमका गाळच खपवणे हे बाकी प्रवचनकारांना मस्त जमते. धन्य हो प्यारेबुवा की!

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:23 pm | प्यारे१

>>> गाळच खपवणे
उदाहरण द्या.

बॅटमॅन's picture

30 Dec 2014 - 1:32 pm | बॅटमॅन

अनेक उदा. आहेत, पण अर्थात कुणी काही बोलले तरी दुकान काही बंद होणार नाही, सो व्हाय बॉदर? :)

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:36 pm | प्यारे१

एखादं द्या हो मालक. बाकी बोलूच. उगाच बाल वॉशिंग्टन असल्याचं पुराव्यानं शाबित करु नका.
कुठला गाळ खपवला ते सांगा.

ज्ञानमार्गाच्या अवहेलनेचा गाळ खपवणं हे सर्वत्र दिसतंच आहे की. :)

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 1:22 pm | प्रसाद गोडबोले

इन जनरलच 'मोठे व्हा'!

जसे भीती हा भास आहे तसेच , लहान मोठे हाही भास आहे , होणे - न होणे हाही भासच आहे रादर जे जे काही द्वैत भासते तो साराच भास आहे बुवा .

कधी लक्षात येणार तुमच्या हे ?

त्यामुळे पास!

पास नापास हाही भासच आहे :D

अवांतर : निर्विकार गुरुदेवांची फार राहुन राहुन आठवण आली बुवा आज तुमच्यामुळे :D

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:23 pm | प्यारे१

ब्वारं!

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले

उगाच वर देखंलं बरं म्हणु नका बुवा , समजुन घ्या , उमजुन घ्या .

मी सांगतो त्यावर चिंतन मनन करा मग "पशा डोक्यावर पडलाय " वगैरे मत्सरयुक्त विधाने करायला प्रवृत्त करणारा मोहरुपी चिखल बुध्दीवरुन आपोआप विरुन जाईल आणि तुम्हाला सत्य प्राप्ती होईल !

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ||

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:34 pm | प्यारे१

खिक्क्क!
अगा जे झालेचि नाही, त्याचि वार्ता पुससी काही?
तुमच्या थोर विचारांचे वारु भलतीसलतीकडे धावू देऊ नका म्हणजे जमेल.
'पश्या डोक्यावर पडलंय' हे म्हटलेलं दिसतंय नि 'आमचं' दिसत नाही होय रे चोरा? त्यामुळं तो मत्सर वगैरे ठेव तुझ्याकडंच. :)

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 1:43 pm | प्रसाद गोडबोले

बुवा बुवा बुवा असं काय करता ?

"आमचं" म्हंणलं म्हणुन "पश्या डोक्यावर पडलंय" ह्या वाक्याच्या आतुन येणारा मत्सराचा दुर्गंध कसा लपवता येईल ?

खरा योगी कसा मनाचा पावन हवा , कोणी डोक्यावर पडलेला असला तरीही तो आमचा आहे ही भावना जास्त बलवान असल्याने त्याने कधीही तो डोक्यावर पडलाय असे विधान केले नाही पाहिजे . उलट त्याला सांभाळुन घेणारे विधान करेल तोच खरा योगी .
जेव्हा लोक म्हणाले की हा ज्ञाना रेडा आहे तेव्हा माऊली काय म्हणाले की तरीही त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे , आमच्यात काही द्वैत असे नाही .
तुम्ही असं असणं अपेक्षित आहे बुवा !!

असे कुजकट विधान करणारा मत्सर हाच खरा तुमचा शत्रु आहे . आप:परभाव सोडुन द्या . आमचा तुमचा असे काहीच नाहीये , आपण सारे एकच आहोत , हे जे काही द्वैत भासत आहे तो मोह आहे बुवा .

विश्वात्मक व्हा बुवा विश्वात्मक व्हा :)

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 1:57 pm | प्यारे१

चालतंय.

प्रसाद गोडबोले's picture

30 Dec 2014 - 2:24 pm | प्रसाद गोडबोले

शाब्बास !

प्रगति आहे :)

काळा पहाड's picture

30 Dec 2014 - 12:28 pm | काळा पहाड

मी पुन्हा एकदा सांगतो. दुसरं काहिही करण्यापूर्वी त्वरित मानसोपचाराकडे जा. आत्ता लगेच जा.

चेतन677's picture

30 Dec 2014 - 9:10 pm | चेतन677

मी या आधी ज्या मानसोपचार तज्ञाकडे गेलो होतो तो मला म्हणाला होता की गोळ्या तुला आयुष्यभर घ्याव्या लागतील.मी गोळ्या संपल्यावर मी पुन्हा मेडिकलमध्ये गेलो तर त्या मेडीकलवाल्याने गोळ्या देण्यास नकार दिला आणि मला पुन्हा डाॅक्टरला भेटायला लावले.आणि त्या डाॅक्टरने पुन्हा त्याच गोळ्या दिल्या ज्या त्याने आधी दिल्या होत्या आणि परत फी सुध्धा घेतली आणि परत म्हणे की गोळ्या संपल्यावर परत माझ्याकडे ये(म्हणजे हा शहाणा परततेच गोळ्या देणार) आणि हा डाॅक्टर संगमनेर मधला एक नांमांकीत मानसोपचार तज्ञ आहे ज्याचे लेख पेपर मध्ये येतात.मला असं का होतं तेही नाही सांगितलं त्याने फक्त गोळ्या लिहुन दिल्या...पैसे पण मी कसेबसे जमा केले होते.3000 खर्च करूनही घंटा काही फरक नाही.त्यापेक्षा मी.बीन बनुन राहिलेलं काय वाईट???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Dec 2014 - 8:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

चुकीचा विचार आहे मित्रा. दुसरी एखादी आवडतं क्षेत्र आहे का तुझ? जिथे तुला छंद आणि व्यवसाय एकत्र करता येईल असं? तु अभियंता आहेस. मग आपल्या विषयांशी संबधित क्लासेस चालु करु शकतोयस. त्यामधे कुठलाही धोका नाही. शॉप फ्लोअर वर काम करायला जमत नाहीये तर मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मधे जा. तिथे डेडलाईन्स असतील शॉपफ्लोअर एवढी टेन्शन्स नक्की नसतील. तुला ब्ल्यु कॉलर लोकांच्या रफ वागण्याबोलण्याचं टेन्शन येतयं का? ते लोकं रफ असतील, पण त्यांच्याशी मिळवुन जुळवुन घेतलं की ते तुम्हाला सहकार्य करतात बरोबर.

बाकी तुझ्या माहितीकरता म्हणुन सांगतो. त्या ज्या गोळ्या असतात त्यांच्या दिर्घकालीन सेवनाचे दुसरे दुष्परिणाम असतात. मेंदुच्या केमिकल रिअ‍ॅक्शन्स मधे बदल होऊन डो़कं शांत आणि ताळ्यावर राहावं अश्या त्या गोळ्या असतील असा माझा कयास आहे. तेव्हा डॉक्टरची भेट घेतल्याशिवाय त्या गोळ्या दिर्घकाळ नं घेणचं श्रेयस्कर. बाकी ऑल द बेस्ट.

लॉरी टांगटूंगकर's picture

31 Dec 2014 - 9:03 am | लॉरी टांगटूंगकर

जॅक भाईशी सहमत आहे.
डॉक्टर उगाच काहीही सल्ले देणार नाही. एकंदर बायोलॉजिकल सायकल, झोप वगैरे बर्‍याच गोष्टींवर ही औषधे परिणाम करू शकतात. मेडीकलवाल्याने गोळ्या देण्यास नकार दिला यात बरंच काही येतं.
बाकी पर्यायांचा नीट विचार कर. गोष्टी विसरतो आहेस तर लिहून काढून एक-एका गोष्टीवर फोकस कर. न जमणार्‍या गोष्टींचा प्रामाणिक प्रयत्न केला तरी बरेच जण स्वतःहून मदत करायला लागतात.
करायला पुरी दुनियाभर कामे आहेत. तुला काय आवडतं ते शोध.

मी.बीन बनुन राहिलेलं काय वाईट???
मी.बीन... स्वतःवर प्रेम करणारा, जगाची पर्वा न करणारा, छोट्या छोट्या गोष्टात आनंद शोधणारा, दुसऱ्याला टशन देणारा, भले आता कूच नाही पण कॉन्फिडन्स कायम हाई ठेवणारा मी.बीन काय वाईट.

मी तर म्हणतो प्रत्येकात थोडा तरी मी.बीन असावा.

अर्धवटराव's picture

30 Dec 2014 - 1:52 pm | अर्धवटराव

एका दिवसात आजार बरा करणारा अक्सर इलाज सापडेल अशी आशा करु नका. चांगल्या मानसोपचाराची गरज आहे, ते टाळु नका.
तुम्हाला मनात कुठेतरी वाटतय का कि समस्येचं निराकरण सहज शक्य आहे, बस पेचेचाननेकी देर है? तुम्ही स्वतः काहि प्रयत्न केला असेल आणि त्यात तात्पुरतं यश आलं असेल तर तोच धागा परत जुळवायचा प्रयत्न तुमचं मन करतय. असं असल्यास गिव्ह इट अ कन्सीस्टण्ट ट्राय. प्राणायाम, व्यायाम, ध्यान वगैरे अभ्यासाने भितीवर मात करता येते असा अनेकांचा अनुभव आहे. तुम्हाला जे काहि जमेल ते प्रयत्नपूर्वक काहि काळ नेटाने करा.

शेवटी भिती हा एक प्रकारचा केमीकल लोचा आहे. आणि शरीरात रासायनीक बॅलेन्स हेच त्याचं समाधान आहे. ऑल द बेस्ट.

मी रोजच इथे असतो..स्नेहांकिताजी काही मदत हवी असल्यास नक्की कळवा!!!!!

प्यारे१'s picture

30 Dec 2014 - 8:32 pm | प्यारे१

मदत कुणाला हवी आहे नक्की ???

सस्नेह's picture

31 Dec 2014 - 8:50 am | सस्नेह

बहुतेक मलाच हवी असावी *biggrin*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Dec 2014 - 9:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

इथल्या १०० लोकांचे प्रत्येकी १०० नखरे सांभाळता सांभाळता, तसचं मी, टवाळ कार्टा (असे अनेक नग) वगैरे वगैरे डोकेदुख्या, झालचं तरं आप्पासाहेब काफळे, ताईसाहेब फुरसुंगीकर, नेटफिशर अश्या डुआयडींशी तोंड देता देता संपाद्क मंडळावर मान'सिक' परिणाम नक्की होतं असणार. =))

तस्मात मदत ही हवीचं =))

टवाळ कार्टा's picture

31 Dec 2014 - 9:48 am | टवाळ कार्टा

चायला आपल्याला "आप्पासाहेब काफळे, ताईसाहेब फुरसुंगीकर, नेटफिशर" अशा मिपाप्रसिध्धांच्या बरोबर बशिवल्याचे बघितल्यावर ड्वाळे पाणावळे :)

आजानुकर्ण's picture

9 Jan 2015 - 1:16 am | आजानुकर्ण

खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले

तुम्ही फार त्रोटक माहिती दिली आहे. कुठलाच मनोविकार चुटकीसरशी बरा होत नाही. धीर बाळगणं अतिशय आवश्यक आहे. अनेक डॉक्टर अप्रामाणिक आहेत हे खरे आहे पण बरं व्हायचं असेल तर डॉक्टरवर विश्वास ठेवणंही अतिशय आवश्यक आहे. मानसिक रोगावरची औषधांच्या बाबतीत सगळेच फार्मसिस्ट काळजी घेतात. त्यामुळे निव्वळ तुम्ही मागितली म्हणून त्या फार्मसिस्टने औषधे दिली नाही हे फार योग्य केले. अनेक मनोरुग्ण अशी औषधे गोळा करुन ठेवून नंतर आत्महत्या वगैरे करण्यासाठी वापरतात. शिवाय तुम्हाला सुरुवातीला दिलेला औषधाचा डोस योग्य आहे की नाही हे तपासल्याशिवाय ती औषधे रिपीट करायची सूचना डॉक्टर देऊ शकत नाही. कदाचित त्याला डोस व्यवस्थित अॅडजस्ट करावा वाटत असेल.

तुम्ही म्हणताय की की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील असं डॉक्टरनं सांगितलं. (मला वाटत नाही अगदी कायम औषधं घ्यावी लागतील) पण जर बरं वाटणार असेल तर औषधं घेत राहिली तर काय फरक पडतो? डायबेटिसचे रुग्ण जन्मभर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात की. ब्लडप्रेशरचे रुग्णही कायम गोळ्या घेत असतात. निव्वळ कायम औषधं घ्यावी लागतील या चिंतेपायी एन्क्झायटीचा त्रास वाढवून घेतलेले काही जण ओळखीचे आहेत. कायम औषधं घ्यावी लागतील म्हणून उपचारच सुरु करायचा नाही हा चुकीचा दृष्टीकोण आहे.

डॉक्टरवर विश्वास ठेवा. थोडा व्यायाम वगैरे सुरु करा. विशेषतः ध्यानासारखे श्वासाचे व्यायाम फार उपयुक्त आहेत. हळूहळू नक्की बरे व्हाल.

मितभाषी's picture

26 Jul 2016 - 11:53 am | मितभाषी

काही फरक?