नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील? या विचाराने घाबरुन एकदम कापायलाच लागायचो.दुसर्या कंपनीत काहीतरी फरक पडेल म्हणून कंपनी बदलली पण तिथेही तसेच मला एकच काम चार पाच वेळा सांगत असत पण आधीच असणार्या भितीमुळे ते नीट लक्षातच राहात नसे.माझ्या बरोबरचे सगळे माझ्या पुढे गेले.पण माझ्या या प्रॉब्लेममुळे मी अजुनही तिथेच आहे.माझ्या मित्रांना याबद्द्ल सांगितल तर त्यांपैकी काहींनी तात्पुरता माझा आत्मविश्वास जागवला.पण त्याचा कायमसाठी काहीही फरक पडला नाही तर काहीजण मी एक मानसिक रोगी आहे असे समजुन त्यांनी माझ्याशी कायमचा संपर्क तोडला.खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले.थोडक्यात सांगायचे तर मी एक दुसरा मि.बीन आहे .जर मला कोणते महत्वाचे काम सोपवले तर नक्की मोठा अपघात होउ शकतो तसे एकदा कंपनीत झाले पण होते.माझे साहेब दिवसभर मला काय काम सांगावे याच काळजीत असायचे.
मला काय झालेय? हा माझा स्वभाव बद्लायचा मी खुप प्रयत्न केला पण स्वभावाला ओषध नसते असं म्हणतात ते खरेच आहे.मी काय करु ? कंपनी सोडुन देउन मला झेपेल ते काम शोधु की अजुन काही???????सगळे मला हसतात.
वाचने
31445
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी रोजच मिपाला भेट देत असतो
मदत कुणाला हवी आहे नक्की ???
In reply to मी रोजच मिपाला भेट देत असतो by चेतन677
बहुतेक मलाच हवी असावी
In reply to मदत कुणाला हवी आहे नक्की ??? by प्यारे१
इथल्या १०० लोकांचे प्रत्येकी
In reply to मदत कुणाला हवी आहे नक्की ??? by प्यारे१
चायला आपल्याला "आप्पासाहेब
In reply to इथल्या १०० लोकांचे प्रत्येकी by कॅप्टन जॅक स्पॅरो
शंका
काही फरक?