Skip to main content

नमस्कार मित्रांनो एक सल्ला हवा होता..........

लेखक चेतन677 यांनी गुरुवार, 25/12/2014 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी इंजिनिअरींग पूर्ण केले आहे.त्यानंतर मी एक वर्ष एका कंपनीत काम केले. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला प्रत्येक कामाची भिती वाटते.सकाळी उठल्यापासुन ते झोपेपर्यंत.....जेव्हा मी पहिल्या कंपनीत कामाला होतो तेव्हा आज आपल्याला काय काम सांगतील? या विचाराने घाबरुन एकदम कापायलाच लागायचो.दुसर्‍या कंपनीत काहीतरी फरक पडेल म्हणून कंपनी बदलली पण तिथेही तसेच मला एकच काम चार पाच वेळा सांगत असत पण आधीच असणार्‍या भितीमुळे ते नीट लक्षातच राहात नसे.माझ्या बरोबरचे सगळे माझ्या पुढे गेले.पण माझ्या या प्रॉब्लेममुळे मी अजुनही तिथेच आहे.माझ्या मित्रांना याबद्द्ल सांगितल तर त्यांपैकी काहींनी तात्पुरता माझा आत्मविश्वास जागवला.पण त्याचा कायमसाठी काहीही फरक पडला नाही तर काहीजण मी एक मानसिक रोगी आहे असे समजुन त्यांनी माझ्याशी कायमचा संपर्क तोडला.खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले.थोडक्यात सांगायचे तर मी एक दुसरा मि.बीन आहे .जर मला कोणते महत्वाचे काम सोपवले तर नक्की मोठा अपघात होउ शकतो तसे एकदा कंपनीत झाले पण होते.माझे साहेब दिवसभर मला काय काम सांगावे याच काळजीत असायचे. मला काय झालेय? हा माझा स्वभाव बद्लायचा मी खुप प्रयत्न केला पण स्वभावाला ओषध नसते असं म्हणतात ते खरेच आहे.मी काय करु ? कंपनी सोडुन देउन मला झेपेल ते काम शोधु की अजुन काही???????सगळे मला हसतात.

वाचने 31445
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

इथल्या १०० लोकांचे प्रत्येकी १०० नखरे सांभाळता सांभाळता, तसचं मी, टवाळ कार्टा (असे अनेक नग) वगैरे वगैरे डोकेदुख्या, झालचं तरं आप्पासाहेब काफळे, ताईसाहेब फुरसुंगीकर, नेटफिशर अश्या डुआयडींशी तोंड देता देता संपाद्क मंडळावर मान'सिक' परिणाम नक्की होतं असणार. =)) तस्मात मदत ही हवीचं =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चायला आपल्याला "आप्पासाहेब काफळे, ताईसाहेब फुरसुंगीकर, नेटफिशर" अशा मिपाप्रसिध्धांच्या बरोबर बशिवल्याचे बघितल्यावर ड्वाळे पाणावळे :)

खुप हिम्मत करुन मी मानसोपचार तज्ञाकडे गेलो पण काहीही फायदा झाला नाही. त्याने माझे निदान करण्याऐवजी आपला खिसा भरणेच पसंत केले
तुम्ही फार त्रोटक माहिती दिली आहे. कुठलाच मनोविकार चुटकीसरशी बरा होत नाही. धीर बाळगणं अतिशय आवश्यक आहे. अनेक डॉक्टर अप्रामाणिक आहेत हे खरे आहे पण बरं व्हायचं असेल तर डॉक्टरवर विश्वास ठेवणंही अतिशय आवश्यक आहे. मानसिक रोगावरची औषधांच्या बाबतीत सगळेच फार्मसिस्ट काळजी घेतात. त्यामुळे निव्वळ तुम्ही मागितली म्हणून त्या फार्मसिस्टने औषधे दिली नाही हे फार योग्य केले. अनेक मनोरुग्ण अशी औषधे गोळा करुन ठेवून नंतर आत्महत्या वगैरे करण्यासाठी वापरतात. शिवाय तुम्हाला सुरुवातीला दिलेला औषधाचा डोस योग्य आहे की नाही हे तपासल्याशिवाय ती औषधे रिपीट करायची सूचना डॉक्टर देऊ शकत नाही. कदाचित त्याला डोस व्यवस्थित अॅडजस्ट करावा वाटत असेल. तुम्ही म्हणताय की की आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील असं डॉक्टरनं सांगितलं. (मला वाटत नाही अगदी कायम औषधं घ्यावी लागतील) पण जर बरं वाटणार असेल तर औषधं घेत राहिली तर काय फरक पडतो? डायबेटिसचे रुग्ण जन्मभर इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात की. ब्लडप्रेशरचे रुग्णही कायम गोळ्या घेत असतात. निव्वळ कायम औषधं घ्यावी लागतील या चिंतेपायी एन्क्झायटीचा त्रास वाढवून घेतलेले काही जण ओळखीचे आहेत. कायम औषधं घ्यावी लागतील म्हणून उपचारच सुरु करायचा नाही हा चुकीचा दृष्टीकोण आहे. डॉक्टरवर विश्वास ठेवा. थोडा व्यायाम वगैरे सुरु करा. विशेषतः ध्यानासारखे श्वासाचे व्यायाम फार उपयुक्त आहेत. हळूहळू नक्की बरे व्हाल.