भेळपुरीच्या गाड्या

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
7 Aug 2008 - 5:40 pm

घाटावरच्या भटांनी काल केलेली विडंबनाची भेळपुरी खाल्याने आमच्या पोटात गडबड सुरू झाली..

(डिस्क्लेमरसाठी कृपया पहिले कडवे पहा)

व्यथा ऐकली भटा तुझी मी अता ऐक तू माझी कथा
कविता माझी तू हलकी घे, आहे जरा ती यथातथा

नवखा असशी सदस्य तू रे वय तव आहे हप्त्याचे
इतक्यातच अन तुला जाहले अजीर्ण विडंबन कवितांचे?

हसता हसता पोट दुखे मी वाचून हे झालो बेजार
चहुबाजूंनी झाला मजवर द्या उत्तर ऐसा भडिमार

महान तुम्ही कवी घाटीचे अन तुमची कविता भारी
प्रदार्पणातच तुम्ही खिलवली 'विडंबनाची भेळपुरी'

या भेळेचा प्रभाव खासा काव्यापुरता नाही बरे
सर्किट, मुक्ती या दोघांनी उगारले प्रतिसाद सुरे

असे विडंबन चविष्ट जैसी गाडीवरची भेळपुरी
म्हणून 'रंग्या' 'टुकार' या सम आले गाड्यावर कितीतरी

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे
म्हणून झाल्या भेळपुरीच्या गाड्या या जिकडेतिकडे

कविता

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

7 Aug 2008 - 5:45 pm | आनंदयात्री

साक्षात गुरुवर्यांची समाधी भंग केलिस .. भोग आता फळे !!

>>महान तुम्ही कवी घाटीचे अन तुमची कविता भारी
>>प्रदार्पणातच तुम्ही खिलवली 'विडंबनाची भेळपुरी'

:)

(रंगाशेठ श्टाईल स्वगतः आता गुरुवर्य समाधीत परत नाय गेले तर तुला कोण विचारणार टुकारा ?)

आनंदयात्री's picture

7 Aug 2008 - 5:48 pm | आनंदयात्री

हा समाधी भंग नाही .. हे विडंबन नाही ही कविता आहे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2008 - 5:55 pm | बिपिन कार्यकर्ते

केसुशेठ, पुनरागमन समजायचे काय? म्हणजे आता मजा येणार की....

आनंदयात्री साहेब, गुरूवर्यांची समाधी भंग करायला मेनकेलाच यावे लागेले होते... ते काय एखाद्या गल्लीतल्या छबी बाबी ला जमले असते काय? भटाची महती मान्यच करावी लागेल, कसें? :)

बिपिन.

केशवसुमार's picture

7 Aug 2008 - 6:18 pm | केशवसुमार

बिपीनशेठ,

निवृत्त मी विडंबनातून , ही तर आहे 'उत्तर' कविता
काढू नका या कविते मधूनी अर्थ तुम्ही भलता सलता
(निवृत्त)केशवसुमार

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Aug 2008 - 6:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मज्जा आली!

कविता माझी तू हलकी घे, आहे जरा ती यथातथा
मला तर अजिबातच यथातथा वाटली नाही ... आणि हे यथातथा तर उत्तम काय बरं असतं? :?

मुक्तसुनीत's picture

7 Aug 2008 - 7:31 pm | मुक्तसुनीत

मोठे मोठे खेळाडू निवृत्तीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना जो आनंद होतो तो झाला आहे :-)

केसु आणि अअ : एकाइतकाच दुसरा प्रिय. एकाला आवाज मिळवून देण्याकरता दुसर्‍याला झाकण्याची गरज नाही :-)
वेल्कम ब्याक !

स्वाती दिनेश's picture

7 Aug 2008 - 8:17 pm | स्वाती दिनेश

वा, ह्या गाडीवरची भेळपुरीही टेस्टी बरं का..
स्वाती

चतुरंग's picture

7 Aug 2008 - 8:27 pm | चतुरंग

नसो विडंबन असो कविता देण्या उत्तर कवनात
बघुनि काव्य हे 'केसुशेठचे' हर्ष माइना हृदयात

चतुरंग

प्राजु's picture

7 Aug 2008 - 8:31 pm | प्राजु

पुन्हा एकवार केसु.... जबरदस्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेचवसुमार's picture

7 Aug 2008 - 10:25 pm | बेचवसुमार

घाटावरच्या भटांचे श्राध्द जाहले सुरु..
श्राध्दासाठी चक्क प्रकटले ई-डंबन गुरु...

श्राध्दासाठी पहा जमले..कुठुन कुठुन कावळे..
मागुन पुढुन वरुन खालुन सगळे त्यांना शिवले..

भटांना मिळता मुक्ती घाटावरी..
कावळ्यांनी ओरपली..मनसोक्त भेळपुरी..

कावळे नव्हतेच मुळी..ते बगळे सारे साले...
विडंबनाच्या रुपाआडुन काक बनुनि आले...

घाटावरच्या भटांचा आता आत्मा लटकला..
मिपावरती कविता होऊन पहा इथे प्रकटला...

...

जय विडंबन....

.......... बेचवसुमार...

संजय अभ्यंकर's picture

7 Aug 2008 - 10:32 pm | संजय अभ्यंकर

केशवसुमार भाऊ,

कदापी रिटायर होऊ नका!
तुम्ही रिटायर झाल्याचे पाहून ईतके विडंबनकार मैदानात उतरले की मि.पा. चे मुखपृष्ठ विडंबनांनीच भरले.
या सर्वांनी तुम्हाला मैदानात उतरायला भाग पाडले.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

8 Aug 2008 - 4:22 am | घाटावरचे भट

केसुगुरुजी, आवडले आपले उत्तर....
माझा विडंबनावर आक्षेप नाही, त्याच्या अतिरेकावर आहे (आणि थोडीशी गम्मत पण करायची लहर आली होती)

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 8:54 am | विसोबा खेचर

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे
म्हणून झाल्या भेळपुरीच्या गाड्या या जिकडेतिकडे

हम्म! खरं आहे!

तात्या.

गुंडोपंत's picture

8 Aug 2008 - 9:16 am | गुंडोपंत

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे
म्हणून झाल्या भेळपुरीच्या गाड्या या जिकडेतिकडे

हे खास आणि चपखल.

आपला
गुंडोपंत

khadilkarguru's picture

8 Aug 2008 - 4:38 pm | khadilkarguru

मस्त . कविता आवडली.