सत्यनारायण पूजा:

Primary tabs

वगिश's picture
वगिश in काथ्याकूट
12 Nov 2014 - 9:17 pm
गाभा: 

सत्यनारायण पूजा:

मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते.

काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.

ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2014 - 9:25 pm | टवाळ कार्टा

कॉलिंग आत्मुबाबा :)

hitesh's picture

12 Nov 2014 - 9:34 pm | hitesh

प्रसादाचा शिरा मस्त असतो.

यसवायजी's picture

12 Nov 2014 - 9:35 pm | यसवायजी

साजूक तुपातला, काजू-बेदाणे आणी केळ्याचे काप घातलेला मस्स्स्तं शिरा खायला मिळावा म्हणून ही पूजा करतात.

भिंगरी's picture

12 Nov 2014 - 10:47 pm | भिंगरी

यसवायजींशी सहमत

तुम्ही फारच पैसेवाले दिसता बुवा ! तुमचे काय नुकसान होईल ही माहिती तुम्हाला एवढीच वाटते ?

काही नसल्यामुळे नुकसान(आर्थिक) होण्याची चिंता नहि. हि पूजा धनलाभ होण्यासाठी असते का?
*scratch_one-s_head* *SCRATCH*

धर्मराजमुटके's picture

12 Nov 2014 - 9:51 pm | धर्मराजमुटके

इथे प्रश्न विचारण्यापेक्षा सत्यनारायण पुजा व्यवस्थित ऐकली असती तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. असो. माझा अंदाज असा की तुमचे नुकतेच लग्न झाले आहे व नवदांपत्यास सत्यनारायण पुजेस बसण्यास सांगीतले असल्यामुळे तुमचे लक्ष पुजेपेक्षा जोडीदाराकडेच अधिक असावे. :)
तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची उत्तरे ऐकण्यात रस आहे ते सांगा. तुमच्या आवडीप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करु. शेवटी हे हॉटेल आहे ना. जे गिर्‍हाईकाला पाहिजे ते देणार. मात्र हॉटेलात काही पुणेरी बाण्याचे वेटर आहे ते तुम्हाला हवे ते नाही तर त्यांना हवे तेच देतील. :)

नुकतेच लग्न झालेले नाही तरी जोडीदारकडे लक्ष होतेच *yes3*.पूजा वेगळ्या कारणासाठी होति. असो, पुजेविषयी,म्हणजे ती का,कशासाठी करतात ह्याविषयी तुमच्याकडे काही माहिती असल्यास ती इथे लिहा म्हणजे माझा गणमन वृत्ती मुळे ज्या गोष्टी मला पुजेत कळल्या नाहीत त्या इथे कळतील.

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2014 - 10:59 pm | संजय क्षीरसागर

ते कारण सांगितल्याशिवाय पूजाफलाविषयी चर्चा कशी होईल?

बाकी तुमचं म्हणणं "पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.", बरोबर आहे. कारण मूळात देव हीच (मानवी) संकल्पना भीतीतून निर्माण झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक सत्यनारायण वर्जन: एका माणसाने सात्यानारायानांच्या बाजून ब्लॉग-प्रतिक्रिया दिली, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो तसं करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा ब्लॉग-प्रतिक्रिया केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला..
( देव माझा सत्यानाश करेल, मला त्रास देईल, दहशतीखाली असली कर्मकांडे नको. मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.)

भावाच्या नवीन कार्यालयची पुजा होती.

आदूबाळ's picture

12 Nov 2014 - 9:45 pm | आदूबाळ

:)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2014 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा

सत्यनारायण...सत्यदत्त..सत्यविनायक...सत्यांबा..

हे चारही पूजा प्रकार अगदी अलिकडच्या काळातले आहेत.किंबहुना वैदिक धर्मात पूजा--हाच प्रकार बसत नाही..तो अलिकडे बसवला गेला आहे. {मूळ धर्मात देवतांना मंत्र पठण/गायनाने बोलावणं(आवाहन करणं) आणि त्यांना यज्ञात आथवा पाण्यात आहुती देणं..(अन्न देण) एव्हढच आहे.}
तर ते असो...कुठलिही पूजा ही पंचोपचार किंवा षोडशोपचार असते..इथे प्रश्न आहे..तो चारही पूजांमधे आलेल्या कथांचा! त्या उघडपणे चमत्कारांची भलामण करणार्‍या आहेत,यात वाद नाही. तुमचा यावरच जर आक्षेप असेल..तर माझा तुम्हाला १ प्रश्नः- तुमच्या(सारख्यां)साठी मी दोन प्रकारच्या कथा तयार केल्या आहेत.

१) मूळ कथेतील सगळे चमत्कार आणि पूजा केल्यावर(च) मिळणारी फळं मी वगळली आणि काहि ठिकाणी बदलली आहेत. त्यात जास्तीत जास्त प्रयत्नवाद्/आशावाद माणुसकी ही मूल्य आणायचा प्रयत्न मी केलेला आहे.

२) दुसरी कथा ही सरळ सरळ पूजेला बसलेल्याची(जीवनवाद आणि नैतिकतेच्या बाबतीत) परिक्षा पाहाणारी आहे..

तुम्हाला कोणती कथा हवी? :)

जी कुठली कथा हवी...ती का हवी?

आणि दोन्ही नको(च) असतील..तर का नको?
====================================
समांतरः-
आमच्या वैदिक धर्मापासून ते जगातल्या यच्चयावत चालू/बंद धर्मांमधे असणारी लबाडी/दांभिकता/खोटेपणा/अनैतिकता हीच मी कधिही सर्मथन करत नाही..करु शकणार नाही. फक्त मी माला(च) स्वतःला हल्ली असा प्रश्न विचारतो..की,त्या त्या धर्मांमधे असलेल्या या सर्व वाइट गोष्टी त्या त्या धर्माच्या अनुयायांना चालतात किंवा हव्या असतात..किंवा यापैकी काहिच नसलं..तरी त्याविरोधी आवाज उठवायचा नसतो.. हे सगळं कशाचं लक्षण आहे...

प्राचीन काळी दोन पैलवानांच्या झुंजी लाऊन त्या पैकी एक मरेपर्यंत त्या एंजॉय करण्याचा धर्म होता...हा प्रकार अमानुष आहे..हे पटायला लागल्यावर त्या झुंजी फक्त लुटुपुटुच्या..म्हणजे दिखाऊ स्वरुपाच्या होण्याचा धर्म (WWF) सध्या प्रचलीत आहे..हा जो त्या प्रांतात घडलेला बदल आहे..तसा आपल्याला धर्मात झालेला चालणार आहे का? का नाही चालणार? का..., कशाचीच आपल्याला गरज नाही..असं आपलं म्हणणं असणार आहे? :)

अर्धवटराव's picture

12 Nov 2014 - 10:43 pm | अर्धवटराव

मुळात प्रत्यक्ष नारायण समोर असताना त्याला सोडुन त्याच्या पुजेने मिळणार्‍या फळांची हाव का निर्माण होते हेच कळत नाहि.

मार्कस ऑरेलियस's picture

13 Nov 2014 - 12:23 pm | मार्कस ऑरेलियस

बुवा , तुमच्या सत्यनारायण कथेचे ते व्हर्जन ऐकवाना ज्यात तो साधुवाणी जहाज बुडेल म्हणुन पाणबुडीच घेवुन जातो ती
=))

मार्कस ऑरेलियस's picture

13 Nov 2014 - 12:30 pm | मार्कस ऑरेलियस

बाकी मुळ कथेविषयी बोलायचे मी टाळतो , आजकाल लोकांच्या भावना लईच् नाजुक झाल्यात ... मागे सर्वमान्य श्रध्देची चिकित्सा करणारे एक विधान फेसबुक वर टाकले होते तेव्हा माझ्या विरुध्द पोलीस कंप्लेन्ट करेन अशी धमकी मिळाली होती ...

पण ते असो ...

मागे एकदा मी घरी बोललो होतो की " देव जर असला दहशतवादी असेल तर मी अमेरिकन आहे म्हणाव त्याला ." तेव्हापासुन घरचे देव देव कर म्हणुन मागे लागत नाहीत :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2014 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी.

-दिलीप बिरुटे
(आधुनिक बुवांचा फ्यान)

तुम्हाला म्हणून विचारतो पूजेचे पैसे किती असतात हो(आउट ऑफ कुरियोसिटी).मी 200 रुपये देऊ केल्यावर गुरूजींनी माझी "मी काय तुम्हाला मराठवड्यातला भटजी वाटलो काय?" असे विचारले.(का ते माहीत नाही,मीही तिकडचा नाही हो.)असो,गरिब जनतेसाठी कुठे स्वस्त भट्जी मिळतात का?

ह्या कथेचा इतिहास,मूळभाषा,कूळकथा इत्यादी विषयी कुठे माहिती मिळेल?तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया इथे द्या.

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 10:22 pm | सतिश गावडे

मी म्हणतो नसेल परवडत तर पुजा करावीच कशाला हो. ते "देव भावाचा भुकेला" वगैरे कसं काय विसरतात बुवा लोक.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

@पूजेचे पैसे किती असतात हो >>> माझ्या सारख्यांचा असा कुठलाच/कधिच फिक्स रेट नसतो..पण काहि जणं तो ठेवतात. तरिही खेडेगाव शहर पातळीवर अर्थार्जनाच्या दृष्टीने थोडा (वरपांगी..)फरक असतोच.. मी पुण्याचा..त्यामुळे इथलं सांगतो..आता सगळ्याच भटजिंनी सत्यनारायणा सारख्या सर्व पूजांचा- ऑफ सिझन ३०० आणि ऑन'ला ५०० -असा (मानसिक) दर ठरवलेला आहे.. प्रत्येक जण त्यासाठी अगदी हटून वगैरे बसत नाही..पण ही सामान्यतः अपेक्षा असते. आणि ती पूर्ण होते देखिल.. काहिजण (डॉमिनोज पिझ्झा सारखे) ११०० रुपये वगैरेही सांगतात..आणि वर पुन्हा...आमची पूजा हायक्लास असते..असलंही तर्कट चालवतात..हायक्लास म्हणजे काय??? असं तुंम्ही विचारलत..तर मात्र त्यांना राग येतो..असो चालायचच...
धंदे धंदे मे होता है..गन्ने गन्ने का दाम! ;)
लेकिन हर गन्ने को चुसो..तो अंदर मिठास ही होती है...आम!

सतिश गावडे's picture

12 Nov 2014 - 10:47 pm | सतिश गावडे

माझा अनुभव उलट आहे.

काही दिवसांपुर्वी दोन सश्रद्द मित्रांसोबत जेजुरीला जायचा योग आला होता. ते दोघे देवाच्या दर्शनाला तर मी "आहे वेळ तर फीरुन येऊ" या उद्देशाने गेलो होतो. मित्र दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. मी मंदीराभोवतीच्या ओवरीमध्ये बसून पिवळ्या रंगाची उधळण पाहत होतो. मंदीरात चालू असलेली सत्यनारायणाची जवळपास संपत आली होती हे लाऊडस्पिकरवर चालू असलेल्या फलशृतीवरुन कळत होतं. जगातील यच्चयावत सुखं सत्यनारायणाची पुजा घातल्याने मिळतात असं त्या पुजा सांगणार्‍या व्यक्तीचं म्हणणं होतं.

सत्यनारायण हा देव तसा वेगळाच म्हटला पाहिजे. केवळ एखादया व्यक्तीने पुजेचा प्रसाद खाल्ला नाही तर त्या व्यक्तीला अद्दल घडावी म्हणून त्याची सोन्या-नाण्याने भरलेली नौका सरळ सरळ बुडवणारा देव पुराणांमध्ये विरळाच. एकदम "माझा प्रसाद खात नाही म्हणजे काय. बघतोच तुला आता" असा अ‍ॅट्टीट्युड.

हल्ली फक्त माणूस गेल्यावर सत्यनारायण घालत नाहीत. बाकी आयुष्यातील कुठल्याही इव्हेंटला सत्यनारायण घालतात लोक. लग्न झालं, मुलगा झाला, नोकरी लागली, नविन गाडी घेतली, वर्षभरार देवाचं काही केलं नाही असं काहीही कारण सत्यनारायणाच्या पुजेला चालतं. पुजार्‍याला दक्षिणा मिळते, लोकांना देवाचं काही केल्याचं समाधान.

शिवाजी महाराजांनी सत्यनारायणाची पुजा घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. पेशवे देवभक्त असूनही त्यांनीही सत्यनारायण घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही.

सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती.

सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल.

सत्यनारायणाच्या पुजेच्या माझ्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत.

कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची.

दुसरी आठवण म्हणजे सत्यनारायणाच्या पुजेला वाजवली जाणारी "ऐका श्री सत्यनारायणाची कथा" ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली रेकॉर्ड. ही रेकॉर्ड वाजल्याशिवाय सत्यनारायणाची पुजा होतच नसे.

पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.

आता हा भाग त्या पोथीतून काढून टाकला तरी चालण्यासारखा आहे. हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.

बॅटमॅन's picture

12 Nov 2014 - 11:13 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. खटकण्याबद्दल प्रचंड सहमत आहे. ती लक्ष्मी अन शामबाला इ. ची कथाही तशीच. म्हणे माझी पूजा केली नाही म्हणून मी शासन करते. च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.

आदूबाळ's picture

12 Nov 2014 - 11:25 pm | आदूबाळ

सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती.

हायला! इंट्रेष्टिंग जन्मकथा आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2014 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

@सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल.>>> कर्नाटक्/तामिळनाडू/आंध्र.. या ३ प्रांतात.. याचं प्रस्थ नाही.. गुजराथी/मारवाडी/बंगाली/हिंदि भाषिकांमधे...आपल्या प्रमाणेच आहे..

@कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची.>> अहो..धनाजीराव..त्या काळातला अर्थशास्त्रीय मुद्दा आहे हा! त्याकाळात दक्षिणा म्हणून मिळणारे पैसे..हे अत्यंत कमी असायचे.. म्हणून इकडनं..नाही,तर तिकडनं पूर्तता! एव्हढच.. :)

@हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट
दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif ही माहिती तुंम्हाला कुठून (हाती ;) ) लागली हो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

प्रचेतस's picture

13 Nov 2014 - 6:17 am | प्रचेतस

माहिती तुंम्हाला कुठून (हाती ) लागली हो! >>>>
त्यांचे एक भडजी मित्र आहेत. कदाचित ही माहिती त्यांनीच सांगितली असावी.

आनन्दा's picture

13 Nov 2014 - 3:40 pm | आनन्दा

भडजी

?
भडंग सारखे वाटले :)

ह. घ्या.

हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.

वर "बामनाला" भरभक्कम दक्षिणाही द्यावी लागते. समजा एखादा बामन नसलेला माणसाने ही पुजावीधी शीकुन घेतली आणी स्वतःच पुजा केली तर चालते का ? बामनानेच ही पुजा करावी असा नियम आहे का ?
जाणकारांनी शंका निरसन करावे...

मुळात माझा तरी सत्यनारायण ह्या संकल्पनेवर विश्र्वास आहे आणि मी तो दरवेळी जमेल तसा पाळतो.

कार्य हीच पूजा आणि त्यात पारंगत व्हायला जे कष्ट करायला लागतात तीच अर्चना.

दरे वर्षी द्यायला लागणारी परीक्षा आणि त्यात पास झाले, की पालकांसमवेत मौज-मजा करणे, हा विद्यार्थांचा सत्यनारायण.

तर

दर वर्षीचे अप्रायझल हीच माझ्यासाठी परीक्षा आणि त्यात चांगली पगारवाढ मिळाली की मित्रांबरोबर पार्टी करणे, हाच माझा सत्यनारायण.

आणि मुळात जो उत्तम शिकतो आणि शिकवतो, तो ब्राह्मण अशी माझी धारणा असल्याने, मला माझ्या सत्यनारायणासाठी, ब्राह्मणांची कमतरता कधीच जाणवत नाही.

प्रथे पेक्षा त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेतला, तर ह्या अशा कालबाह्य प्रथांना उडवून लावायला वेळ लागणार नाही.

जेम्स बॉन्ड ००७'s picture

23 Jan 2015 - 7:01 pm | जेम्स बॉन्ड ००७

ब्येष्ट...*clapping*

प्रशु's picture

15 Nov 2014 - 1:55 pm | प्रशु

मी मराठा आहे मात्र पौरोहित्य शिकलोय आणि करतो..

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2014 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

वा... वा! अत्यंत चांगला निर्णय!

आपले मनापासून अभिनंदन! आमचाही एक मराठा मित्र जानवे घालून जेवणावळीस येतो. तेही आवडते.

अस्वस्थामा's picture

13 Nov 2014 - 1:04 am | अस्वस्थामा

आमाला सत्यनारयण आत्मूगुर्जींनी सांगितला तेव्हा ते फुलांची रांगोळी काडीत होते. तेव्हा आमचे लक्ष तिकडेच सगळे.. कथा आणि त्यातले नफा-नुकसान त्यांनाच माहीत. ;)

मला मुक्तविहारी साहेब ज्या पद्धतीने सत्यनारायणाची पुजा करतात तो प्रकार आवडतो.

मुक्त विहारि's picture

13 Nov 2014 - 7:04 am | मुक्त विहारि

तुमच्या बरोबर आणि तुम्ही म्हणाल तिथे..

नीलकांत's picture

13 Nov 2014 - 6:13 am | नीलकांत

या पुजेची कथा ऐकल्यावर आपल्या लक्षात यायला हवे की ही चित्रपटाची पटकथा शोभेल अशी कथा आहे. राग, अपमान, प्रलोभन आदी सर्वच आहे. खरं तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्या निर्गुण निराकार म्हणवल्या जाणार्‍या देवाला मानवी पातळीवर उतरवून आणि त्याला मानवचे सर्व गुण दोष देवून वर आपण कुठल्या तोंडाने त्यालाच आशिर्वाद मागतो?

मी गेली १५ वर्षे सत्यनारायण नामक पुजेत बसलेलो नाही. पुढे कधी बसण्याचा संबंध नाही. मात्र ही पर्याय व्यक्तीगत आवडीचा आहे. बाकी सत्यनारायणाचा तुपातील प्रसाद मस्तंच लागतो. आपण शिरा म्हणून खायचा :)

वर उल्लेखल्याप्रमाने फक्त मरण सोडून हा कधीही करतात मात्र लग्नानंतर वैवाहीक आयुष्य सुरू करण्या अगोदर ही पुजा करावीच असा आग्रह असतो. मानसीक दृष्ट्या संवेदनशील झालेल्या व्यक्तीला अशी कथा ऐकवल्यावर तो पुढील आयुष्यात हमखास ही पुजा करणार. काय साला टायमींग आहे ना? :) तर अशी वेळ माझ्यावर आल्यावर मी आमच्या सासरकडच्या गुरूजींना बोललो होतो की सत्यनारायण सोडून अन्य पुजा सांगा. तर ते अगदीच ब्लॅन्क होते .... या वेळी हीच पुजा करतात... शेवटी माझे दैवत शंकराची कसलीही पुजा केलेली चालेल अश्या उपायावर चर्चा थांबली व पुजा झाली.

शेवटी पुजा काय तर देवाचे अस्तीत्व मान्य करून त्याची कृपा आपल्यावर घेणे हे आहे. हे करण्याची पध्दत म्हणजे पुजा. मध्यंतरी वेगवेगळ्या पंथानी आपआपल्या दैवताचे पुजन करण्याच्या पध्दती ठरवल्या. आपल्याला बरी वाटेल ती पुजा करण्यास काहीही हरकत नाही. एखादी पुजा खटकत असेल तर ती नाही केलेली बरी. पुजा केल्यावर मनाला समाधान वाटले पाहीजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा. :)

- नीलकांत

च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.

इथे एक बाब दुर्लक्षीत झालीय की ही कथाच मूळी एक मानवाच्या "सुपीक्"डोक्यातून आलेली आहे तेव्हा त्यातील देवही तितकेच दुराग्रही/शीघ्रकोपी असणारच्!आपण सगळे फक्त मसाल्यालाच भाजी (हाटेलातील पंजाबी डिश) समजतोय कालांतराने त्यात मूळ भाजीतरी शिल्लक राहिल का नाही हाच प्रश्न आहे!!!

राही's picture

13 Nov 2014 - 3:29 pm | राही

एकोणिसाव्या शतकातले मुंबईतले एक प्रसिद्ध आणि समाजसुधारक गृहस्थ दैनंदिनी लिहीत असत. (हे गृहस्थ बहुधा रावसाहेब वि.ना. मंडलिक असावेत. आता नक्की आठवत नाही.) या दैनंदिनीतल्या मजकुराचा उल्लेख एका ठिकाणी वाचला. त्यात रावसाहेबमजकुरांना एकेदिवशी आलेल्या सत्यनारायणपूजेच्या निमंत्रणाविषयी लिहिताना त्यांनी लिहिले होते की अलीकडे मुंबईत ही प्रथा बोकाळू लागली आहे. मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी (एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी )मुंबईतल्या धनवान मिश्र समाजात या पूजेची 'फॅशन' आली होती असेही यात लिहिले होते. बाकी पोथी कशी प्रचारात आली ते सांगता येत नाही. पण पोथीतही एक गुजराती वैश्य व्यापाराला दूरदेशी जातो आणि तो सुरक्षित परत यावा म्हणून त्याची पत्नी हे व्रत करते असे काहीसे आहे.
अगदी अलीकडच्या काळातही मार्गशीर्षातल्या गुरुवारी करावयाच्या 'वैभवलक्ष्मी' व्रताची प्रचंड क्रेझ आहे. मजा म्हणजे या व्रतात या पोथ्या आठ/अकरा/सोळा जणांना वाटाव्या आणि त्यांनीही हे व्रत करावे असेही असते. या पोथ्या छापून एका प्रकाशनगृहाला भरपूर फायदा झालेला आहे. त्यांना जवळजवळ लाखभर प्रती छापाव्या लागतात असे ऐकले आहे. ( त्यांनी आपल्या फायद्यासाठी हे व्रत प्रचारात आणले असे अर्थात अजिबातच म्हणावयाचे नाही. त्यांना फायदा झाला तर त्यात तक्रार करण्याजोगे काही नाही.)
काही वर्षांपूर्वी शुक्रवारच्या संतोषीमाताव्रताचीही जोरदार चलती होती.

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद.

हाडक्या's picture

13 Nov 2014 - 3:49 pm | हाडक्या

मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

आक्षी हेच आमीपण वाचले होते... 'ब्रह्मसमाजी' लोकांनी सुरु केलं एका हेतूने आणि लोकांनी त्याला पण सोवळा करून घेतलं.
त्या 'ओह माय गॉड' मधल्या कांजीभाईचा पण शेवटी देव करणार्‍या लोकांची आठवण झाली. ;)

आदूबाळ's picture

13 Nov 2014 - 5:42 pm | आदूबाळ

जबरीच! धन्यवाद!

पामर's picture

13 Nov 2014 - 3:46 pm | पामर

मला ही पुजा फक्त प्रसादामुळेच आवडते.बाकी पुजा केली नाही म्ह्णुन सुड घेणारा,भक्ताची वाट लावणारा देव मला कधी आवडला नाही.माझा दहावीचा निकाल लागला त्यावेळी वडिलांनी घरी सत्यनारायणाची पुजा ठरवली होती..गुरुजी उपलब्ध झाले नाहीत.मला ती पुजा भंपकपणा वाटत असुन पण केवळ वडिलांची इत्छा म्ह्णुन मी पुजा केली..मात्र ती नेहमीची पोथी बिलकुल वाचली नाही त्याऐवजी विवेकानंदांच्या चरित्रामधल्या ४-५ कथा वाचल्या होत्या आणि आईला जास्तीचा प्रसाद करायला लावुन तो घराजवळच्या वृद्धाश्रमात पोचता केला होता...मला काय मिळ्णार होतं त्या साधु वाण्याचं काय झालं ते वाचुन...

कविता१९७८'s picture

13 Nov 2014 - 3:50 pm | कविता१९७८

काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.

ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?

पुजा लक्षपुर्वक ऐकली असं म्हणता आणि प्रत्येक अध्यायात पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होइल एवढीच माहीती मिळाली असेही म्हणता म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का?

राही यांचा प्रतिसाद अगदी माहीतीपुर्ण आहे.

सतिश गावडे's picture

13 Nov 2014 - 3:59 pm | सतिश गावडे

म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का?

पुर्ण पोथीत काय नुकसान होईल हेच जर प्रत्येक अध्यायात लिहिले असे तर त्याला पुजेला बसणारा काय करणार?

अर्थात अशी भीती घालण्याचा हेतू एकच असणार. लोकांनी पुजा घालावी आणि पुरोहिताची पोटा-पाण्याची सोय व्हावी. आता या पोथीत सुधारणा करण्यास हरकत नाही. कारण लोक आता स्वतःहून पुजा घालतात.

मी वाचलेल्या दोन गोष्टी या निमित्तानं आठवल्या,

१. SBI च्या लेबर कोर्ट शाखा अहमदनगर इथे व्यवस्थापनासंबंधी अनेक सुविचार भिंतींवर लिहिले होते. त्यात एक होता की "कुठलाही प्रश्न/समस्या वरीष्ठांकडे नेताना, त्याचे आपल्याला योग्य वाटणारे कमीत कमी एक तरी उत्तर/समाधान घेऊन मगच जावे".

२. दुसरी गोष्ट आठवली ती एका विचारवंताची, ज्याच्याबद्द्ल असे म्हणले जाते की तो लोकांना विचार करायला उद्युक्त करणारा माणूस होता- The Man Who Asked Questions: Socrates- सॉक्रेटीस.

आपण फक्त शंका विचारत आहात. प्रश्न मांडत आहात. वरच्यापैकी कुठली भूमिका आपल्या ह्या वागण्याशी सुसंगत आहे?

(मीही फक्त प्रश्न विचारत आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे वरच्या प्रश्नाचे जे उत्तर आपण स्वत:कडे घेताल, तेच माझ्याकडेही द्या एवढीच विनंती)

माज्या प्रश्नाचे उत्तर मजकडे आहेच,पण ते माज्या मर्यादित ज्ञानवर मी बनवले अहे.इथे मला काही नवीन विचार मिळतात का ते बघतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 10:16 pm | अत्रुप्त आत्मा

@इथे मला काही नवीन विचार मिळतात का ते बघतोय. >> कृपया हे वाचा :)
http://www.misalpav.com/node/29438

तिमा's picture

13 Nov 2014 - 5:53 pm | तिमा

लबाडांनी मूर्ख माणसांना फसवण्यासाठी काढलेल्या अनेक क्लुप्त्या आहेत.
दुनिया पुजती है, फसानेवाला चाहिये.

पिलीयन रायडर's picture

14 Nov 2014 - 10:39 am | पिलीयन रायडर

माझे आजोबा भटजी होते. घरोघरी पुजा सांगुन त्यातुन मिळणारे पैसे, धन्य, खारिक खोबरं वगैरे वर आमचं घर चालायचं (पुजेतले पैसे ब्राह्मणाला देणं खटकणं स्वाभाविक आहे.. पण कधी काळी लोकांची घरं त्यावरच चालत होती..) अर्थात ते पुरेना म्हणुन मग शिवणकाम / छोट दुकान चलवुन बघणे असे प्रकारही झाले.. पण त्यात काही राम नव्हता.. दुकान तर चोरांनी घरात घुसुन लुटुन नेले...
..तर आमचे बाबाही पुज शिकले.. गरज पडल्यास घरोघरी जाउन सांगायचेही.. जर बारावी पास झालो नाही तर सत्यनारायणाच्या पुजा सांगायच्या हा Plan B होता..
पुढे ते शिकले.. पुन्हा कधी पुजा सांगायची वेळ आली नाही... आणि गंमत म्हणजे आमच्या घरात सुद्धा बाबांनी कधीही सत्यनारायण / सत्यांबा घातला नाही. आमचं कधीही काही नुकसान झालं नाही.. काही त्रास झाला नाही.. सामान्य माणसाच्या आयुष्यात जेवढे चढ उतार असतात तेवढेच आम्ही पण पाहिले.. त्यात पुजा घालण्या - न घालण्याचा संबंध नाही.. त्यामुळे माझा व्यक्तिशः ह्यावर अजिबातच विश्वास नाही..

बादवे.. सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 11:07 am | अत्रुप्त आत्मा

@सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...>> चला आता मि.पा.सत्यनारायण करायलाच हवा.. ! ;)

थोडं थांबा हं..आता..जुनी..नवी कथा एकदमच लावतो..सविस्तर विवेचनासह! :)

समीरसूर's picture

14 Nov 2014 - 11:57 am | समीरसूर

सत्यनारायण पूजेला काही अर्थ आहे किंवा नाही हे माहित नाही. तसा पूजा, तासंतास रांगेत उभे राहून देवदर्शन घेणे, दिसणार्‍या प्रत्येक मंदिराला नमस्कार करणे, वगैरे प्रकारांत मला रस नाही; पण एक वेगळा विचार केला तर थोड्याफार प्रमाणात सत्यनारायण पूजेकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल. सत्यनारायण पूजा (किंवा कुठलीही पूजा) घरी असल्यास पाहुणे, निमंत्रित, मित्रमंडळी येतात, निवांत गप्पा-टप्पा, खाणे-पिणे होते, पूजेमुळे घरातले वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न होते (भले ते उद्बत्तीच्या वासामुळे किंवा वर्षानुवर्षांच्या सवयींमुळे वाटत असेल), मनाला उभारी देणारा, रिफ्रेश करणारा, काही नवीन चांगले घडेल अशी आशा पल्लवित करणारा, किंवा जे चांगले झाले आहे (गाडी, बंगला, नोकरी, अपत्यप्राप्ती, वगैरे) ते फक्त 'माझ्या'मुळे नव्हे अशी अहंकाराची पुटे जाळणारा एक शुद्ध आणि सात्विक विचार मनाला व्यापून राहतो. सगळे एकत्र जमल्याने विचारांची देवाणघेवाण होते. थोडक्यात 'नेटवर्किंग' होते; ख्यालीखुशाली कळते. जुन्या काळी अशा 'नेटवर्किंग'च्या सोयी उपलब्ध नव्हत्या. म्हणूनच हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा, वगैरे प्रथा रूढ झाल्या असाव्यात. आता सत्यनारायणाच्या कथा हा भाग तसा विवादास्पद आहे. लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.

वाढदिवसाला हॉटेलात जाऊन जेवण घेणे किंवा केक कापणे किंवा शुक्रवारी रात्री पार्टी करणे या व अशा कित्येक गोष्टींना तसं पाहिलं तर काहीच अर्थ नाही; तरीही आपण यातल्या कित्येक गोष्टी करत असतो. कारण एकच, विरंगुळा, मोकळेपणा, नेटवर्किंग, मौज, सापेक्ष आनंद, इत्यादी इत्यादी. व्हॉट्सअ‍ॅपवर तासंतास टाईमपास करणे या निरर्थक गोष्टीला तर आजकाल अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. आपण यापैकी कुठल्याच गोष्टीला तुच्छ लेखत नाही. याच दृष्टीकोनातून जर सत्यनारायण किंवा इतर पूजांकडे पाहिले तर मला वाटते आपली टीकेची धार नक्कीच बोथट होईल. या पूजेतून झाला तर फायदाच असतो (मनाला मिळणारी उभारी, प्रसन्न वातावरण, वगैरे). तोटा नक्कीच नसतो. मग एकदा आपला दृष्टीकोन बदलून बघायला काय हरकत आहे? अर्थात हा प्रश्न आत्ता या क्षणी मी स्वतःला देखील विचारतोय कारण मी देखील आतापर्यंत या किंवा तत्सम पूजांना तुच्छच लेखत होतो. :-)

कविता१९७८'s picture

14 Nov 2014 - 12:08 pm | कविता१९७८

पटलं , प्रतिसाद आवडला.

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 12:42 pm | सतिश गावडे

लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.

हा एव्हढा भाग वगळला तर बाकीच्या प्रतिसादाशी सहमत.

सत्यनारायण घातला नाही तर (किंवा घालून त्याचा प्रसाद खाल्ला नाही तर) वाईट होईल ही पोथींच्या माध्यमातून घातलेली भीती केवळ लोकांनी पुजा घालून आपला उदरनिर्वाह चालावा या हेतूने घातली असावी अशी वाटते.

आमच्या सोसायटी हे असलं देव देवतांचं वर्षभर काही ना काही चालू असतं. १६ मे नंतर त्याची वारंवारता अजून वाढली आहे. देव धर्म यांवर विश्वास नसल्यामुळे मी या सार्‍याचं तटास्थपणे निरिक्षण करतो तेव्हा मला जाणवतं की यात "देवाचं करणं" हा भाग कमी असून "सेलेब्रेशन"चा भाग जास्त आहे. जे तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या मताशी सुसंगत आहे.

नुकतीच दिवाळी येऊन गेली. शेजार्‍यांनी म्हटलं, "अरे दारासमोर आकाश कंदील, एखादी पणती, एखादी दिव्यांची माळ लाव की". माझं उत्तर ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचे "फार मोठा विद्वान झाला आहे" हे भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. माझं उत्तर होतं, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही".

मग मी त्यांना त्यांच्याच भाषेत समजावले.

जगात तीन प्रवृत्तींची माणसं असतात. सात्विक, राजस आणि तामस. तामस प्रवृत्तीची माणसं दारु, सिगारेट, जुगार, गर्द अशा शरीरास हानिकारक तसेच इतर समाजास घातक असणार्‍या इतर कृत्यांमधून आनंद मिळवतात. राजस प्रवृत्तीची माणसं सण, सोहळे, देवपुजा, गाडी, बंगला, नटणे सजणे, चित्रपट, "माझा मुलगा पुण्यातल्या बेस्ट इंटरनॅशनल स्कुलला जातो" अशा भौतिक सुखांमध्ये आनंद मानतात. सात्विक प्रवृत्ती लोक आनंद बाहेर शोधत नाहीत. आपण स्वतःच आनंदस्वरुप आहोत याची त्यांना जाणिव असते.

माझं म्हणणं त्यांना समजलं, पटलं की नाही माहिती नाही.

मार्कस ऑरेलियस's picture

14 Nov 2014 - 1:03 pm | मार्कस ऑरेलियस

, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही".

बघा बघा ... हेच आम्ही ज्ञानेश्वरांना क्वोट करुन म्हणालो की
मी अविवेकाची काजळी | फेडुनि विवेकदीप उजळी | तै योगिया
पाहे दिवाळी | निरंतर || ज्ञा. ४.९.५४

तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात ;) अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला =))

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 1:18 pm | सतिश गावडे

तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात

ते तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओव्या उद्धृत करता म्हणून असेल. ;)

अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला

सिरियसली सायकोअ‍ॅनालिसिस शिकायचे असेल तर फ्रॉईडची "सबकॉन्शियस माईंड" ची थेअरी वाचू नको. जरी मानसाशास्त्रामध्ये फ्रॉईडचे योगदान अनमोल असले तरी या अंतर्मनाच्या सिद्धांताला शास्त्रीय आधार नाही. मेंदू विज्ञान "सबकॉन्शियस माईंड" च्या थिअरीला पाठीमागे टाकून बरंच पुढे गेलं आहे.

राही's picture

14 Nov 2014 - 1:28 pm | राही

हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो. 'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात.
कमाल आहे!

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 1:38 pm | सतिश गावडे

हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो.

ते ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे.

अर्थात भगवदगीतेत सांगितलेला "शस्त्रांनी तुकडे न होणारा, अग्नी जाळू न शकणारा, पाण्याने ओला न होणारा आणि वारा वाळवू न शकणारा आत्मा" आणि तुम्ही म्हणत असेलेले 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व' या वेगळ्या गोष्टी आहेत. :)

'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात.

तुम्हाला 'प्रतिगामी' म्हणायचं होतं का?

राही's picture

14 Nov 2014 - 2:12 pm | राही

पूजाबिजा न घालता विवेकाची कास धरा, सदसद्विवेकबुद्धी जागृत करा, आत्मभान जागृत करा असे म्हणणारे लोक पुरोगामी की प्रतिगामी?
जाऊ दे. या विषयावर प्रचंड वादावादी आधी झालेलीच आहे. आता पुन्हा नको.

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 2:30 pm | सतिश गावडे

तुमच्या वाक्यांनी गोंधळ उडाला होता थोडा. अर्थात तुमच्या मताशी सहमत असल्यामुळे इथेच थांबले तरी हरकत नाही. :)

पैसा's picture

14 Nov 2014 - 12:21 pm | पैसा

चारोळी धाग्यात बरेच छान प्रतिसाद वाचायला मिळाले. सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिर्‍यासाठी लोकांनी पूजा घालाव्यात आणि आम्हाला बोलवावे ही सत्यनारायणाकडे प्रार्थना! ;) नारायण हे साधारणपणे विष्णुला दिलेले नाव आहे. तसे सूर्यालाही नारायण म्हणतात म्हणा! आता हा सत्य नारायण म्हणजे विष्णुस्वरूपच आहे का? मग इतर वेळी तो "सत्य" नसतो का? मजा आहे सगळी!

बाकी ज्याला जे आवडेल ते करावे हे माझे कायमचे मत. मात्र दुसर्‍या कोणाला आवडेल म्हणून मी उपास बिपास करून सत्यनारायणाच्या पूजेला बसणार नाही. पूजा दुसरा कोणी करत असेल तर लागेल ती मदत नक्की करीन. आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी! =))

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 12:25 pm | सतिश गावडे

आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी!

म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत.
आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. ;)

पैसा's picture

14 Nov 2014 - 12:30 pm | पैसा

कितीही मौक्तिके उधळली आणि कीबोर्ड मोडले तरी लोक कधीच आपली मते बदलत नाहीत. शहाणे वगैरे व्हायचे सोडाच! तस्मात न भिता "होऊ दे खर्च! मिपा आहे घरचं."

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 1:10 pm | अत्रुप्त आत्मा

@म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत.
आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. >> ह्या ह्या ह्या ह्या... =)) धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!??? लै लै आश्चेर्य वाटलं बगा आज! ;) (मागे एकदा... संतांमुळे लोक सुधारले नाहीत्,आणि लावण्यांमुळे बिघडले नाहीत!..अश्या आशयाचा प्रतिसाद देणारे तुम्हीच का? ..असा प्रश्ण पडतोय आमास्नी! ;) )

तुम्मी काय लिवायचं ते लिवा हो..
ह्यो आत्मूभट डोंबारी हाय! ;)
लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! =))

लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो!

:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2014 - 1:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो!

हेच काय ते ब्रम्हसत्य, बाकी सारे मिथ्या ! ;) :)

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 1:22 pm | सतिश गावडे

धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!???

भडजीबुवा, तो उपरोध होता.

बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे.

समीरसूर's picture

14 Nov 2014 - 2:04 pm | समीरसूर

स्टिव्ह जॉब्जने आयफोन गळी उतरवला आणि अजून कुणी व्हॉट्सअ‍ॅप उतरवलं, अगदी तसंच आहे हे. :-) शेवटी लोकांची गरज ओळखून (अत्मिक शांतता, मनाची उभारी, प्रसन्न वाटणे, निर्धास्त राहणे इत्यादी) कुणाचंही कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता ती गरज पुरविणे हा समान धागा. शेवटी जगातला सगळाच व्यवहार मानसिक स्तरावरच तर येऊन ठेपतो, नव्हे काय? उकाड्यात गार हवेची झुळूक नुसती शरीराला शांत करत नाही; मनाला ही शांत करते. फेसबुकवर टाकलेले वाढदिवसाचे फोटो अहं कुरवळातात. रुपये २००००० ची एफडी मनाला सुरक्षिततेची भावना देते, हायसं वाटतं. शेवटी सगळं मनाला शांत करण्यासाठीच असतं. मग अजून एका पद्धतीने कुणी अशी शांती देण्याचा प्रयत्न केला तर चालतं की. जगरहाटीला धरूनच आहे ते. हां, अगदीच आसाराम बापू सारख्यांच्या नादी लागणं म्हणजे मूर्खपणाच पण म्हणून पूजा-अर्चा म्हणजे मूर्खपणा असे सरसकट म्हणणे जीवावर येते. :-)

बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे.
त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2014 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव>>> ये हुई ना बात! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2014 - 5:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव
+१

बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.

सतिश गावडे's picture

14 Nov 2014 - 5:23 pm | सतिश गावडे

बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.

आणि जे असे विसंबून राहतात त्यांना विसंबून राहायला अक्षरशः कुणीही म्हणजे कुणीही चालते.

कवितानागेश's picture

15 Nov 2014 - 2:39 pm | कवितानागेश

डार्विन आणि फ्रॉईड पण चालतात!

प्यारे१'s picture

15 Nov 2014 - 2:51 pm | प्यारे१

रिचर्ड डॉकिन्स सध्या अग्रक्रमात नाही काय माऊ?

सतिश गावडे's picture

15 Nov 2014 - 3:06 pm | सतिश गावडे

खरं तर असायला हवा होता. माऊला रिचर्ड डॉकिन्स कोण हे माहिती नसावं कदाचित. त्यामुळे ते नाव लिहिले नाही तिने ;)

रिचर्ड डॉकिन्स हा उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ असून आजच्या घडीला त्याला डार्विनचा वैचारीक वारसदार समजले जाते. तो जी विधाने करतो त्याची सत्यता त्याने प्रयोगशाळेत तपासून पाहिलेली असते.

कुठल्या तरी धाग्यात कुठे तरी अंतरंगातला दिवा पेटल्यावर बाहेरचे दिवे पेटवावे लागत नाहीत असं उत्तर दिलेलं म्हणे.
ते अंतरंगाचे दिवे पेटलेत की कसं हे कुठल्या प्रयोगशाळेत सिद्ध केलं गेलं ब्वा? ;)

तुमची विधानं तुम्हाला 'सिद्ध' (ठराविक पद्धतीनं) करता येत नसतील तर तुम्ही खोटे असता का?

प्यारे१'s picture

15 Nov 2014 - 5:56 pm | प्यारे१

आपलं म्हणणं इथं वरच आहे की. माझीच नजरचूक. असो. नेहमीचंच. :)

सतिश गावडे's picture

15 Nov 2014 - 3:00 pm | सतिश गावडे

कारण ते विसंबून राहणे नसते तर सत्याच्या मार्गावर चालणे असते.

डार्विन चालतो. कारण डार्विनची मते प्रयोगशाळेत तपासता येतात.

फ्रॉईड काही अंशी चालतो. फ्रॉईडचे काही सिद्धांत चुकीचे होते हे मागच्या शंभर वर्षातील मेंदुविज्ञानातील संशोधनाने लक्षात आले आहे. फ्रॉईड ज्याला "सब कॉन्शियस माईंड" असं म्हणत होता ती खरं तर "न्युरॉन पाथवे"ची कमाल असते. केमिकल लोचा हा शब्द आता शेंबडं पोरही वापरू लागलं आहे.

मुळात विज्ञान मार्गाचा अवलंब आणि सत्यनारायणाच्या पोथीत सांगितलेला मार्ग अवलंबणे यात फरक आहे. जर विज्ञानाला कालचा रस्ता चुकीचा वाटला तर विज्ञान स्वतःहून सांगतं तो रस्ता चुकीचा आहे योग्य रस्ता दुसरा आहे किंवा योग्य रस्ता सापडायचा आहे. कालचा रस्ता कितीही मोठया शास्त्रज्ञाने दाखवला असला तरी जर तो चुकीचा असेल तर ते झिडकारले जाते.

पोथीवादात हे होत नाही. सुर्य हा ग्रह नसून तारा आहे हे माहिती होऊन जमाना गेला तरी कुंडलीत तो ग्रहच असतो. आणि बरेच सुशिक्षीत, उच्चशिक्षित लोक आजही कुंडल्या घेऊन ज्योतिषांकडे धाव घेतात. राहू केतू आकाशात दाखवता येत नाही तर म्हणे ल्युनार नोडस आहेत. जे नाही ते नाही म्हणून स्विकारायची धमक नाही.

कवितानागेश's picture

15 Nov 2014 - 4:08 pm | कवितानागेश

:P