Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user वगिश
Submitted by वगिश on Wed, 11/12/2014 - 21:17
सत्यनारायण पूजा: मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते. काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?
  • Log in or register to post comments
  • 24598 views

प्रतिक्रिया

Submitted by समीरसूर on Fri, 11/14/2014 - 11:57

Permalink

सत्यनारायण पूजा

सत्यनारायण पूजेला काही अर्थ आहे किंवा नाही हे माहित नाही. तसा पूजा, तासंतास रांगेत उभे राहून देवदर्शन घेणे, दिसणार्‍या प्रत्येक मंदिराला नमस्कार करणे, वगैरे प्रकारांत मला रस नाही; पण एक वेगळा विचार केला तर थोड्याफार प्रमाणात सत्यनारायण पूजेकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल. सत्यनारायण पूजा (किंवा कुठलीही पूजा) घरी असल्यास पाहुणे, निमंत्रित, मित्रमंडळी येतात, निवांत गप्पा-टप्पा, खाणे-पिणे होते, पूजेमुळे घरातले वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न होते (भले ते उद्बत्तीच्या वासामुळे किंवा वर्षानुवर्षांच्या सवयींमुळे वाटत असेल), मनाला उभारी देणारा, रिफ्रेश करणारा, काही नवीन चांगले घडेल अशी आशा पल्लवित करणारा, किंवा जे चांगले झाले आहे (गाडी, बंगला, नोकरी, अपत्यप्राप्ती, वगैरे) ते फक्त 'माझ्या'मुळे नव्हे अशी अहंकाराची पुटे जाळणारा एक शुद्ध आणि सात्विक विचार मनाला व्यापून राहतो. सगळे एकत्र जमल्याने विचारांची देवाणघेवाण होते. थोडक्यात 'नेटवर्किंग' होते; ख्यालीखुशाली कळते. जुन्या काळी अशा 'नेटवर्किंग'च्या सोयी उपलब्ध नव्हत्या. म्हणूनच हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा, वगैरे प्रथा रूढ झाल्या असाव्यात. आता सत्यनारायणाच्या कथा हा भाग तसा विवादास्पद आहे. लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. वाढदिवसाला हॉटेलात जाऊन जेवण घेणे किंवा केक कापणे किंवा शुक्रवारी रात्री पार्टी करणे या व अशा कित्येक गोष्टींना तसं पाहिलं तर काहीच अर्थ नाही; तरीही आपण यातल्या कित्येक गोष्टी करत असतो. कारण एकच, विरंगुळा, मोकळेपणा, नेटवर्किंग, मौज, सापेक्ष आनंद, इत्यादी इत्यादी. व्हॉट्सअ‍ॅपवर तासंतास टाईमपास करणे या निरर्थक गोष्टीला तर आजकाल अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. आपण यापैकी कुठल्याच गोष्टीला तुच्छ लेखत नाही. याच दृष्टीकोनातून जर सत्यनारायण किंवा इतर पूजांकडे पाहिले तर मला वाटते आपली टीकेची धार नक्कीच बोथट होईल. या पूजेतून झाला तर फायदाच असतो (मनाला मिळणारी उभारी, प्रसन्न वातावरण, वगैरे). तोटा नक्कीच नसतो. मग एकदा आपला दृष्टीकोन बदलून बघायला काय हरकत आहे? अर्थात हा प्रश्न आत्ता या क्षणी मी स्वतःला देखील विचारतोय कारण मी देखील आतापर्यंत या किंवा तत्सम पूजांना तुच्छच लेखत होतो. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by कविता१९७८ on Fri, 11/14/2014 - 12:08

In reply to सत्यनारायण पूजा by समीरसूर

Permalink

पटलं , प्रतिसाद आवडला.

पटलं , प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 12:42

In reply to सत्यनारायण पूजा by समीरसूर

Permalink

लोकांमध्ये देवाचे भय असावे

लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.
हा एव्हढा भाग वगळला तर बाकीच्या प्रतिसादाशी सहमत. सत्यनारायण घातला नाही तर (किंवा घालून त्याचा प्रसाद खाल्ला नाही तर) वाईट होईल ही पोथींच्या माध्यमातून घातलेली भीती केवळ लोकांनी पुजा घालून आपला उदरनिर्वाह चालावा या हेतूने घातली असावी अशी वाटते. आमच्या सोसायटी हे असलं देव देवतांचं वर्षभर काही ना काही चालू असतं. १६ मे नंतर त्याची वारंवारता अजून वाढली आहे. देव धर्म यांवर विश्वास नसल्यामुळे मी या सार्‍याचं तटास्थपणे निरिक्षण करतो तेव्हा मला जाणवतं की यात "देवाचं करणं" हा भाग कमी असून "सेलेब्रेशन"चा भाग जास्त आहे. जे तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या मताशी सुसंगत आहे. नुकतीच दिवाळी येऊन गेली. शेजार्‍यांनी म्हटलं, "अरे दारासमोर आकाश कंदील, एखादी पणती, एखादी दिव्यांची माळ लाव की". माझं उत्तर ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचे "फार मोठा विद्वान झाला आहे" हे भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. माझं उत्तर होतं, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही". मग मी त्यांना त्यांच्याच भाषेत समजावले. जगात तीन प्रवृत्तींची माणसं असतात. सात्विक, राजस आणि तामस. तामस प्रवृत्तीची माणसं दारु, सिगारेट, जुगार, गर्द अशा शरीरास हानिकारक तसेच इतर समाजास घातक असणार्‍या इतर कृत्यांमधून आनंद मिळवतात. राजस प्रवृत्तीची माणसं सण, सोहळे, देवपुजा, गाडी, बंगला, नटणे सजणे, चित्रपट, "माझा मुलगा पुण्यातल्या बेस्ट इंटरनॅशनल स्कुलला जातो" अशा भौतिक सुखांमध्ये आनंद मानतात. सात्विक प्रवृत्ती लोक आनंद बाहेर शोधत नाहीत. आपण स्वतःच आनंदस्वरुप आहोत याची त्यांना जाणिव असते. माझं म्हणणं त्यांना समजलं, पटलं की नाही माहिती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 11/14/2014 - 13:03

In reply to लोकांमध्ये देवाचे भय असावे by सतिश गावडे

Permalink

बघा बघा

, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही".
बघा बघा ... हेच आम्ही ज्ञानेश्वरांना क्वोट करुन म्हणालो की मी अविवेकाची काजळी | फेडुनि विवेकदीप उजळी | तै योगिया पाहे दिवाळी | निरंतर || ज्ञा. ४.९.५४ तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात ;) अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला =))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 13:18

In reply to बघा बघा by प्रसाद गोडबोले

Permalink

तर लोक आम्हाला "छुपा सनातनी "

तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात
ते तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओव्या उद्धृत करता म्हणून असेल. ;)
अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला
सिरियसली सायकोअ‍ॅनालिसिस शिकायचे असेल तर फ्रॉईडची "सबकॉन्शियस माईंड" ची थेअरी वाचू नको. जरी मानसाशास्त्रामध्ये फ्रॉईडचे योगदान अनमोल असले तरी या अंतर्मनाच्या सिद्धांताला शास्त्रीय आधार नाही. मेंदू विज्ञान "सबकॉन्शियस माईंड" च्या थिअरीला पाठीमागे टाकून बरंच पुढे गेलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 11/14/2014 - 13:28

In reply to बघा बघा by प्रसाद गोडबोले

Permalink

आणि उलट

हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो. 'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात. कमाल आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 13:38

In reply to आणि उलट by राही

Permalink

हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व,

हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो.
ते ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. अर्थात भगवदगीतेत सांगितलेला "शस्त्रांनी तुकडे न होणारा, अग्नी जाळू न शकणारा, पाण्याने ओला न होणारा आणि वारा वाळवू न शकणारा आत्मा" आणि तुम्ही म्हणत असेलेले 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व' या वेगळ्या गोष्टी आहेत. :)
'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात.
तुम्हाला 'प्रतिगामी' म्हणायचं होतं का?
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Fri, 11/14/2014 - 14:12

In reply to हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, by सतिश गावडे

Permalink

प्रतिगामी?

पूजाबिजा न घालता विवेकाची कास धरा, सदसद्विवेकबुद्धी जागृत करा, आत्मभान जागृत करा असे म्हणणारे लोक पुरोगामी की प्रतिगामी? जाऊ दे. या विषयावर प्रचंड वादावादी आधी झालेलीच आहे. आता पुन्हा नको.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 14:30

In reply to प्रतिगामी? by राही

Permalink

वाद नाही.

तुमच्या वाक्यांनी गोंधळ उडाला होता थोडा. अर्थात तुमच्या मताशी सहमत असल्यामुळे इथेच थांबले तरी हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 11/14/2014 - 12:21

Permalink

मस्त!

चारोळी धाग्यात बरेच छान प्रतिसाद वाचायला मिळाले. सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिर्‍यासाठी लोकांनी पूजा घालाव्यात आणि आम्हाला बोलवावे ही सत्यनारायणाकडे प्रार्थना! ;) नारायण हे साधारणपणे विष्णुला दिलेले नाव आहे. तसे सूर्यालाही नारायण म्हणतात म्हणा! आता हा सत्य नारायण म्हणजे विष्णुस्वरूपच आहे का? मग इतर वेळी तो "सत्य" नसतो का? मजा आहे सगळी! बाकी ज्याला जे आवडेल ते करावे हे माझे कायमचे मत. मात्र दुसर्‍या कोणाला आवडेल म्हणून मी उपास बिपास करून सत्यनारायणाच्या पूजेला बसणार नाही. पूजा दुसरा कोणी करत असेल तर लागेल ती मदत नक्की करीन. आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी! =))
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 12:25

In reply to मस्त! by पैसा

Permalink

आत्मुबुवांच्या व्यवसाय पण

आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी!
म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत. आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 11/14/2014 - 12:30

In reply to आत्मुबुवांच्या व्यवसाय पण by सतिश गावडे

Permalink

उधळा उधळा!

कितीही मौक्तिके उधळली आणि कीबोर्ड मोडले तरी लोक कधीच आपली मते बदलत नाहीत. शहाणे वगैरे व्हायचे सोडाच! तस्मात न भिता "होऊ दे खर्च! मिपा आहे घरचं."
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/14/2014 - 13:10

In reply to आत्मुबुवांच्या व्यवसाय पण by सतिश गावडे

Permalink

@म्हणून तर आम्ही या धाग्यावर

@म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत. आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. >> ह्या ह्या ह्या ह्या... =)) धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!??? लै लै आश्चेर्य वाटलं बगा आज! ;) (मागे एकदा... संतांमुळे लोक सुधारले नाहीत्,आणि लावण्यांमुळे बिघडले नाहीत!..अश्या आशयाचा प्रतिसाद देणारे तुम्हीच का? ..असा प्रश्ण पडतोय आमास्नी! ;) ) तुम्मी काय लिवायचं ते लिवा हो.. ह्यो आत्मूभट डोंबारी हाय! ;) लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! =))
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 11/14/2014 - 13:14

In reply to @म्हणून तर आम्ही या धाग्यावर by अत्रुप्त आत्मा

Permalink

लोकांनी माकड बगायच सोडलं की

लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! :))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 11/14/2014 - 13:16

In reply to @म्हणून तर आम्ही या धाग्यावर by अत्रुप्त आत्मा

Permalink

लोकांनी माकड बगायच सोडलं की

लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! हेच काय ते ब्रम्हसत्य, बाकी सारे मिथ्या ! ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 13:22

In reply to @म्हणून तर आम्ही या धाग्यावर by अत्रुप्त आत्मा

Permalink

धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये

धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!???
भडजीबुवा, तो उपरोध होता. बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Fri, 11/14/2014 - 14:04

In reply to धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये by सतिश गावडे

Permalink

स्टिव्ह जॉब्ज

स्टिव्ह जॉब्जने आयफोन गळी उतरवला आणि अजून कुणी व्हॉट्सअ‍ॅप उतरवलं, अगदी तसंच आहे हे. :-) शेवटी लोकांची गरज ओळखून (अत्मिक शांतता, मनाची उभारी, प्रसन्न वाटणे, निर्धास्त राहणे इत्यादी) कुणाचंही कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता ती गरज पुरविणे हा समान धागा. शेवटी जगातला सगळाच व्यवहार मानसिक स्तरावरच तर येऊन ठेपतो, नव्हे काय? उकाड्यात गार हवेची झुळूक नुसती शरीराला शांत करत नाही; मनाला ही शांत करते. फेसबुकवर टाकलेले वाढदिवसाचे फोटो अहं कुरवळातात. रुपये २००००० ची एफडी मनाला सुरक्षिततेची भावना देते, हायसं वाटतं. शेवटी सगळं मनाला शांत करण्यासाठीच असतं. मग अजून एका पद्धतीने कुणी अशी शांती देण्याचा प्रयत्न केला तर चालतं की. जगरहाटीला धरूनच आहे ते. हां, अगदीच आसाराम बापू सारख्यांच्या नादी लागणं म्हणजे मूर्खपणाच पण म्हणून पूजा-अर्चा म्हणजे मूर्खपणा असे सरसकट म्हणणे जीवावर येते. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 11/14/2014 - 16:12

Permalink

बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या

बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे. त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/14/2014 - 17:09

In reply to बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या by जेपी

Permalink

@त्यानीं देव नाहि काढला तर

@त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव>>> ये हुई ना बात! :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 11/14/2014 - 17:15

In reply to बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या by जेपी

Permalink

त्यानीं देव नाहि काढला तर लोक

त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव +१ बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 11/14/2014 - 17:23

In reply to त्यानीं देव नाहि काढला तर लोक by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+२

बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.
आणि जे असे विसंबून राहतात त्यांना विसंबून राहायला अक्षरशः कुणीही म्हणजे कुणीही चालते.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 11/15/2014 - 14:39

In reply to +२ by सतिश गावडे

Permalink

डार्विन आणि फ्रॉईड पण चालतात!

डार्विन आणि फ्रॉईड पण चालतात!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 11/15/2014 - 14:51

In reply to डार्विन आणि फ्रॉईड पण चालतात! by कवितानागेश

Permalink

रिचर्ड डॉकिन्स सध्या

रिचर्ड डॉकिन्स सध्या अग्रक्रमात नाही काय माऊ?
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 11/15/2014 - 15:06

In reply to रिचर्ड डॉकिन्स सध्या by प्यारे१

Permalink

खरं तर असायला हवा होता. माऊला

खरं तर असायला हवा होता. माऊला रिचर्ड डॉकिन्स कोण हे माहिती नसावं कदाचित. त्यामुळे ते नाव लिहिले नाही तिने ;) रिचर्ड डॉकिन्स हा उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ असून आजच्या घडीला त्याला डार्विनचा वैचारीक वारसदार समजले जाते. तो जी विधाने करतो त्याची सत्यता त्याने प्रयोगशाळेत तपासून पाहिलेली असते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 11/15/2014 - 17:55

In reply to खरं तर असायला हवा होता. माऊला by सतिश गावडे

Permalink

कुठल्या तरी धाग्यात कुठे तरी

कुठल्या तरी धाग्यात कुठे तरी अंतरंगातला दिवा पेटल्यावर बाहेरचे दिवे पेटवावे लागत नाहीत असं उत्तर दिलेलं म्हणे. ते अंतरंगाचे दिवे पेटलेत की कसं हे कुठल्या प्रयोगशाळेत सिद्ध केलं गेलं ब्वा? ;) तुमची विधानं तुम्हाला 'सिद्ध' (ठराविक पद्धतीनं) करता येत नसतील तर तुम्ही खोटे असता का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 11/15/2014 - 17:56

In reply to कुठल्या तरी धाग्यात कुठे तरी by प्यारे१

Permalink

आपलं म्हणणं इथं वरच आहे की.

आपलं म्हणणं इथं वरच आहे की. माझीच नजरचूक. असो. नेहमीचंच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 11/15/2014 - 15:00

In reply to डार्विन आणि फ्रॉईड पण चालतात! by कवितानागेश

Permalink

हो...

कारण ते विसंबून राहणे नसते तर सत्याच्या मार्गावर चालणे असते. डार्विन चालतो. कारण डार्विनची मते प्रयोगशाळेत तपासता येतात. फ्रॉईड काही अंशी चालतो. फ्रॉईडचे काही सिद्धांत चुकीचे होते हे मागच्या शंभर वर्षातील मेंदुविज्ञानातील संशोधनाने लक्षात आले आहे. फ्रॉईड ज्याला "सब कॉन्शियस माईंड" असं म्हणत होता ती खरं तर "न्युरॉन पाथवे"ची कमाल असते. केमिकल लोचा हा शब्द आता शेंबडं पोरही वापरू लागलं आहे. मुळात विज्ञान मार्गाचा अवलंब आणि सत्यनारायणाच्या पोथीत सांगितलेला मार्ग अवलंबणे यात फरक आहे. जर विज्ञानाला कालचा रस्ता चुकीचा वाटला तर विज्ञान स्वतःहून सांगतं तो रस्ता चुकीचा आहे योग्य रस्ता दुसरा आहे किंवा योग्य रस्ता सापडायचा आहे. कालचा रस्ता कितीही मोठया शास्त्रज्ञाने दाखवला असला तरी जर तो चुकीचा असेल तर ते झिडकारले जाते. पोथीवादात हे होत नाही. सुर्य हा ग्रह नसून तारा आहे हे माहिती होऊन जमाना गेला तरी कुंडलीत तो ग्रहच असतो. आणि बरेच सुशिक्षीत, उच्चशिक्षित लोक आजही कुंडल्या घेऊन ज्योतिषांकडे धाव घेतात. राहू केतू आकाशात दाखवता येत नाही तर म्हणे ल्युनार नोडस आहेत. जे नाही ते नाही म्हणून स्विकारायची धमक नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 11/15/2014 - 16:08

In reply to हो... by सतिश गावडे

Permalink

(No subject)

:P
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com