रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
10 Nov 2014 - 9:44 pm

रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय ।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l

अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते. विरही मीरा विचार करीत आहे, गगन मंडल पे सेज पिया की , किस विध मिलना होय. जर कान्हा वृंदावनात असता तर मीरा नावाच्या गोपीची हाक ऐकताच, एका क्षणात धाऊन आला असता. पण आधीच रुक्मिणी, सत्यभामा समेत अनेक पत्नींचे लफडे सोडविता-सोडविता द्वारकाधीश कृष्णाला नाकी नऊ येत होते, त्यात मीरेची आणखीन भर कशाला. मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच.

असा विचार करत-करत मी स्वामी त्रिकालदर्शींच्या आश्रमात पोहचलो. नेहमी प्रमाणे स्वामीजी ध्यानमग्न होते. मी ही त्यांच्या समोर बसलो. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले, स्वामी जी एक शंका आहे, मी म्हणालो. स्वामीजी म्हणाले बच्चा, हीच न तुझी शंका, त्यांनी एक श्लोक म्हंटला:

मुँह में राम बगल में छुरी
मित्राने-मित्राला मारली मिठी.

मी प्रश्नार्थक मुद्रेने स्वामीजी कड़े पाहिले, स्वामीजींच्या चेहर्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, दोघे ही रामभक्त, सतत राम नाम जपणारे, मंदिर बनविण्याची जागा शोधण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यात त्यांना ‘तिलोत्तमा’ समान एक सुन्दर अप्सरा भेटली, आता सुन्दर नार समोर दिसली की कलह हा होणारच. त्यांना मित्रतेचा विसर पडला, हातातली रामनामी माळ ही त्यांनी फेकून दिली आणि बगलेत लपवलेली छुरी हातात घेऊन सुन्द-उपसुंद प्रमाणे एक दुसर्यावर तुटून पडले. स्वामीजी बोलता बोलता थांबले. माझ्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराज आणि अफज़ल खान ची भेटीचे दृश्य तरळले. एका दुसर्याच्या रक्ताने न्हालेले मित्र पुन्हा जवळ येणे शक्य नाही. आले तरी पहिले सारखे प्रेम उरणार नाही. मी म्हणालो, स्वामीजी, आता मला रहीमदासच्या दोह्याचा अर्थ कळला. पण तरीही एक शंका मनात येते. सांग बच्चा, काय शंका आहे, स्वामीजी म्हणाले. मी म्हणालो, स्वामीजी, अर्जुनाचा पौत्र परीक्षित हस्तिनापूरच्या गादीवर बसला. भारतीय युद्धात अर्जुनाने मोठा पराक्रम गाजविला होता, भीष्म पितामह, कर्णा सारख्या योद्धानां त्याने पराभूत केले होते, शिवाय असंख्य कौरव सैन्याला, आपल्या बाणांनी यमसदनी पाठविले होते. मोठा असला तरी काय झाले, युधिष्ठिरने युद्धात विशेष पराक्रम गाजविला नव्हता, हे सर्व पाहता कदाचित् युधिष्ठिरा एवजी अर्जुनच गादीवर बसला असेल. हा! हा! हा! स्वामीजी जोरात हसले, बच्चा, सद्य परिस्थिती पाहता, तुझे म्हणणे रास्त वाटते, कदाचित् असेही झाले असेल. पण त्या साठी पुन्हा एकदा महाभारत तपासून पाहावे लागेल, असे म्हणत स्वामी त्रिकालदर्शी पुन्हा ध्यानमग्न झाले.

इतिहासराजकारणलेख

प्रतिक्रिया

hitesh's picture

11 Nov 2014 - 6:01 am | hitesh

:)

विवेकपटाईत's picture

11 Nov 2014 - 8:09 pm | विवेकपटाईत

विचार करा, एवढे काही अवघड नाही

स्वर्ग सुखाचा आनंद ( स्वर्ग सुख म्हणजे काय, डोक खाजवा)
मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच. (मीरेच्या नशिबी विरह कुठला आहे)

सुन्द उपसुंद हे दोन राक्षस बंधू होते. (महाभारतात कथा आहे) शिवाय कथा स्पष्ट करण्या साठी रामभक्तांचे उदाहरण कहावत मुँह में राम बगल में छुरी सहित दिले आहे.
अप्सरा तिलोत्तमा कोण - ज्या स्त्री वरून सुन्द -उपसुंद भाऊ भांडले - आजच्या परिस्थितीत विचार करा
शेवटी टीवी वर समाचार पहा
पुन्हा कथा वाचा

स्पंदना's picture

12 Nov 2014 - 5:58 am | स्पंदना

समझेला है पटाईत भाय!!
समझेला है!

विवेक जी तुम्ही प्रगल्भ लेखक आहात तुमचे लेख मी आवडीने वाचत असतो ...तुम्ही तुमच्या प्रदर्शित लेखामध्ये रहिम यांचा खूप प्रसिद्ध दोहा शीर्षक म्हणून वापरला आहे आणि लेखाची सुरवात याच दोहा ने केली आहे. म्हणून उत्सुकतेपोटी हा लेख वाचला मात्र उर्वरित लेखाचा आणि दोह्याचा अर्थाअर्थी संबंध दिसला नाही. इथे रहिम ने किती छान दोहा लिहून "माणूस (प्रेमाचा धागा) जपून ठेव, माणुसकीचे नाते जप एखाद्याला एकदम हिणवू नको किंवा बोलताना काळजी घे, एखादी गोष्ट तोडून बोलू नको जर तुझ्या हातून किंवा तुझ्या वाणीने इतराप्रती चुकून जरी एखादी वाईट गोष्ट घडली आणि नंतर तुम्ही माफी मागितली तरी तो तुम्हाला क्षमा करेल मात्र त्याच्या मनात नेहमी तुमच्याविषयी एक अढी निर्माण होईल. (टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय).
फार वर्षापूर्वी वाचलेले रहिम, कबीरदास, बिहारी यांचे दोहे हे आजही जीवनाचे अर्थ (सार) सांगून जातात, जगणे शिकवत राहतात. रहिम यांचाच दुसरा दोहा जो खूप प्रसिध्द आहे त्यामध्ये ते म्हणतात कि, - "रहिमन पाणी रखिये, बिन पाणी सब सून, पाणी गये न उबरे मोती, मानस, चून!" अर्थात मोत्यांमधील चमक निघून गेली तर तो फक्त काचेच्या रुपात उरतो त्याची किंमत शुन्य होते, चुण्यातील पाणी निघून गेले तर तो फक्त सुकलेला खडा राहतो, त्याचा बांधकामासाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे माणसाने मर्यादशील राहिले पाहिजे त्याने आपली प्रतिष्ठा, इज्जत जपत जगले पाहिजे. माणसाची इज्जत गेली तर तो पुढील जीवनात कितीही यशस्वी झाला तरी त्याच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला जात नाही, गेलेली इज्जत परत येत नाही. हे जीवनाचे तत्वज्ञान रहिम यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. इथे पाणी हे मोत्याची चमक, माणसाची इज्जत आणि चुण्यातील पाणी यांच्या रूपकात वापरले आहे.

विवेकपटाईत's picture

14 Nov 2014 - 7:51 pm | विवेकपटाईत

साजिद साहेब, लेखाचा विषय महाराष्ट्रातले सद्य राजकारण आहे. प्रेमाचा धागा फक्त प्रतिक म्हणून वापरला आहे. एक हा धागा तोडून सिंहासनावर बसला आणि दुसऱ्याने भरपूर वाटाघाटी केल्या तरी ही सत्तेचा विरहच त्याच्या नशीबी आला. पण ते खरोखरच मित्र होते का(?) किंवा सत्ता सुंदरी मिळविण्यासाठी मित्र झाले होते. ती भेटताच त्यांनी आपले खरे स्वरूप दाखविले म्हणून सुन्द-उपसुंद या राक्षस बंधू आणि अप्सरा तिलोत्तमा ची कथा यात घातली.