होमिओपाथी म्हणजे फसवाफसवी ? हो

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
24 Sep 2014 - 4:49 pm

होमिओपाथी
( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !)
माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख. इथे होमिओपाथी ची मुलतवे व त्यावर घेतले गेलेले आक्षेप यांचाच विचार आहे. संदर्भ दिले नाहीत, जालावर भरपूर माहिती आहे.

हनिमन (१७५५-१८४३) हा जर्मन माणुस "होमिओपाथी " चा (या पुढे होमि.) जनक. त्याने घालून दिलेल्या मार्गावरून होमि,ची वाटचाल आज दोनशे वर्षे चालू आहे. दोन महत्वाची तत्वे जोडण्यात आली. त्यांचा उल्लेख पुढे केला आहे. माझ्यावरील आक्षेपात इतकी वर्षे फसवणुक होते आहे काय ? १८० कॉलेजेस आहेत इ. गोष्टी नमुद करण्यात आल्या आहेत. पहिल्याचे उत्तर हो व दुसर्‍याचे शिक्षणसम्राट पैसे मिळत असतील तर आणखी १८०० कॉलेजेस काढतील. असल्या गोष्टींनी होमि. शास्त्रसंमत ठरत नाही.
.
प्रथम होमि.ची गृहितके व त्यात मिळवलेली नवीन तत्वे पाहू.
(१) औषध अल्प प्रमाणात दिले तर त्याची उपयोगिता वाढते. म्हणून औषध पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये विरघळवून ते dilute करावयाचे .याच्या दोन पद्धती. पहिली x किंवा D. यात दशमान पद्धती वापरली जाते. १ ग्राम औषध १० ग्राम पाण्यात विरघळवा, त्याची Power झाली 1 x किंवा 1D. आता हे औषध आणखी ९० ग्राम पाणी घालून १०० ग्राम करा. याला म्हणावयाचे 2 x. हे जास्त पॉवरफुल. पुढचे १००० मध्ये १ म्हणजे 3 x. दुसर्‍या पद्धतीत १० ऐवजी १०० धरा, म्हणजे १०० मध्ये १. त्याला म्हणतात 1C 2C म्हणजे १०० x १०० = १०००० मध्ये १. 3C म्हणजे १० लाखात १. आले लक्षात ? आता हे असे औषध साखरेच्या लहानशा गोळीवर शिंपडून तुम्हाला "औषध" म्हणून देतात. बहुतेक डॉक्टर तुम्हाला कोणते औषध , काय Power चे दिले सांगत नाहीत पण बाजारात विकत घ्यावयाला गेलात तर बाटलीवर लिहलेले आढळेल. 5C च्या पुढचे औषद इतके Diluted असते की ते पाण्यात नसतेच म्हटले तरी चालेल. काचेच्या बाटलीत ठेवलेल्या डिस्टिस्ड पाण्यात विरघळ्लेले क्षारच जास्त असतात. तेव्हा अशा पाण्यात तयार केलेल्या औषधाला काय म्हणणार ?
Hahnemann advocated 30C dilutions for most purposes (that is, dilution by a factor of 10 raised to60). In Hahnemann's time, it was reasonable to assume the remedies could be diluted indefinitely, as the concept of the atom or molecule as the smallest possible unit of a chemical substance was just beginning to be recognized. The greatest dilution reasonably likely to contain even one molecule of the original substance is 12C . असो

(२) होमी.चे औषध देण्याकरिता डॉक्टर दोन पद्धती अवलंबतात. एक औषध थोड्या थोड्या दिवसांनी द्यावयाचे. त्याचा परिनाम बघण्यासाठी. तर का ही जण औषध सातत्याने घेण्यास सांगतात. नक्की काय करावयाचे ?

(३) नवीन औषध गुणकारी आहे की नाही बघण्याकरिता ट्रायल घेतांना रोग्यांच्या कळपातील काही जणांना औषध नसलेले डोस देतात त्याला म्हाणतात .placebo . कल्पना अशी की रोग्याला आपण खरे औषध घेतो असेच वाटत असतांना काही फरक पडतो का ? निरनिराळ्या देशात, निरनिराळ्या काळी घेण्यात आलेल्या ट्रायल्समध्ये असे आढळून आले आहे की होमि. औषधे व placebo यांच्या परिणामात काहीही फरक नाही. जेथे फरक आढलला तेथे कारण पुढील प्रमाणे

One of the earliest double blind studies concerning homeopathy was sponsored by the British government during World War II in which volunteers tested the efficacy of homeopathic remedies against diluted mustard gas burns.[144]
No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo.[5][145] The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect.[16][49]:206[146] A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo
Health organisations such as the UK's National Health Service,[169] the American Medical Association,[170] and the FASEB[131] have issued statements of their conclusion that there is "no good-quality evidence that homeopathy is effective as a treatment for any health condition."[169]

(४)सिंचोनाच्या सालीने मलेरिआ बरा होतो म्हणून हनिमनने तशी साल स्वत: इंजेक्शनच्या रुपाने घेतली व त्याला मलेरिआ झाल्यासारखे परिNaaम दिसून आले. त्यावरून त्याने "law of similars " अथवा " like cures like " हा नियम घातला. या नियमाबदल
Hahnemann's law of similars is a postulate rather than a scientific law. असे म्हणता येईल.

(५) पुढील परिच्छेदाबद्द्दल मला काही बोलावयाचे नाही.होमि.चे पुरस्कर्ते प्रकाश टाकू शकतील काय?
Some modern homeopaths have considered more esoteric bases for remedies, known as "imponderables" because they do not originate from a substance, but from electromagnetic energy presumed to have been "captured" by alcohol or lactose. Examples include X-rays[68] and sunlight.[69] Some homeopaths also use techniques that are regarded by other practitioners as controversial. These include "paper remedies", where the substance and dilution are written on pieces of paper and either pinned to the patients' clothing, put in their pockets, or placed under glasses of water that are then given to the patients, as well as the use of radionics to prepare remedies. Such practices have been strongly criticised by classical homeopaths as unfounded, speculative, and verging upon magic and superstition

(६) water memory, डायल्युशन वर फार टीका होऊ लागल्यावर एक नवीन सिद्धांत मांडला गेला. पाणी औषध आपल्या स्मरणात ठेवते. नंतर कितीही डायल्युशन केलेत तरी, औषध शिल्लक राहिले नाही तरी, पाणी या स्मरणाने तुम्हाला गुण देते. तुम्हाला काय वाटते ते मला माहीत नाही पण मला तर हे बापू-बुवा-महाराज यांचे पाय धुतलेले पाणी "तीर्थ" म्हणून कसे गुणकारी असते याची खात्री देणार्‍या भक्तांचीच आठवण होते !

(७) होमि.मध्ये Miasms म्हणून एक भानगड असते. मला काही उलगडा झालेला नाही, प्रतिसादांमध्ये कोणी जाणकार प्रकाश पाडू शकेल काय ?

याचा अर्थ असा आहे का की होमिओपाथी सर्वस्वी निरुपयोगी आहे ? नाही, तसे नाही. तिचाही उपयोग काही दुखण्यात होतो. बर्‍याच वेळी दुखणी मानसिक असतात. म्हणजे रुग्णाला औषधाची नाही तर मानसिक सहानुभूतीची गरज असते. (पूर्वी तरी) होमिओपाथीचे डॉक्टर रुग्णाची चौकशी करावयाचे, थोडा वेळ का होईना त्याला आपल्याला विचारणारे कोणी तरी आहे याचे समाधान मिळावयाचे व एकदा डॉक्टरवर विश्वास बसला की त्याने दिलेल्या कोणत्याही गोळ्यांनी रुग्णाला बरे वाटावयाचे. रोग श्रद्धेनेच बरा व्हावयाचा. काही रोग सायक्लिक असतात.सुरवातीला कमी, मग जास्त , परत कमी. तुम्ही मधल्या वेळी गेलात तर अशा गोळ्यांनीच आपल्याला बरे वाटले असेही तुम्हाला वाटू शकते. सकाळमध्ये एका डागदरीणीने लिहले होते " एकदा राती उशिरा मला एक फोन आला. नेहमी येणार्‍या एका मुलीच्या वडिलांचा. त्यांनी गयावया केली म्हणून त्यांना घरी बोलावले. मुलीला तपासले, योग्य ते औषध लिहून दिले आणि त्यांना विचारले "आता रात्री तुम्हाला औषध कुठे मिळणार ?" ते म्हणाले, " औषध कोण आणणार ? आम्ही कधीच आणत नाही, तुम्ही तपासले की मुलीला बरे वाटते." घ्या !

फार वाढवण्य़ात अर्थ नाही. (६) व(७) वरून आता वाटू लागले आहे की होमि.चा उल्लेख शेवटच्या परिच्छेदात करावयाच्या ऐवजी एक नवीन तंत्र म्हणूनच करावयास पाहिजे होता. इति अलम ! (मुख्य स्रोत : विकिपेडिया )

शरद

औषधोपचारमाहिती

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

24 Sep 2014 - 5:12 pm | आशु जोग

ओके

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Sep 2014 - 6:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बरं.

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2014 - 6:10 pm | प्रभाकर पेठकर

हम्म्म्म!

मृगनयनी's picture

29 Sep 2014 - 11:45 am | मृगनयनी

ह्म्म.. झाले १०० ... :)

प्रसाद१९७१'s picture

24 Sep 2014 - 6:23 pm | प्रसाद१९७१

तेच तेच शरद भाऊ. हा विषय चघळुन चोथा झालेला आहे. कीतीही लिहा हे होमिओपाथी आणि आयुर्वेदाचे प्रेमी बदलणार नाहीत.

मृत्युन्जय's picture

24 Sep 2014 - 6:26 pm | मृत्युन्जय

ब्राह्मण
पुणेकर
आस्तिक

आणि आता

होमिओपॅथी.

कंटाळा आला राव.

मी यापुढे वाटल्यास साबुदाण्याची खिचडी पण खाणार नाही. पण त्या साबुदाणा गोळ्या वाल्यांना सोडा आता. वात आलाय आता.

हाडक्या's picture

24 Sep 2014 - 7:29 pm | हाडक्या

त्या वरच्या लिस्ट मधल्या सगळ्यांनाच सोडा. दोन्ही बाजूचे लोक काही आपली बाजू सोडणार नाहीत, नुसतीच धुळवड..

लोक तत्वासाठी भांडतात* हां समज व्हावा ? काही असमंजस तसे करत असतिलही पण सुद्न्य लोक त्से करत नसतात हानुभव आहे.

अत्रन्गि पाउस's picture

24 Sep 2014 - 10:25 pm | अत्रन्गि पाउस

नक्की काय प्रमाण मानायचे हे आधी ठरवायला हवे ...
बाकी चालू देत

शरदभाऊ, एवढं सगळं टंकणकाम करत बसण्यापेक्षा एक विकीपि़डियाचा दुवा टाकला असतात तर सोपं गेलं असतं, नाही का?

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2014 - 12:28 pm | श्रीगुरुजी

मा. शरद यांस,

स.न.वि.वि.

हा अभ्यासू लेख लिहून होमिओपॅथी नावाच्या फसवणुकीबद्दल आमचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद! आपण फार महान समाजकार्य करीत आहात हे या निमित्ताने सांगावेसे वाटते.

काही सूचना -

(१) हा लेख मिपावर प्रसिद्ध करण्याऐवजी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा व निव्वळ मराठीत नव्हे तर हिंदी, इंग्लिश, जर्मन, सर्व भारतीय भाषा इ. भाषातून हे पुस्तक प्रसिद्ध केल्यास जागतिक स्तरावर ही फसवणूक टाळता येईल.

(२) होमिओपॅथी डॉक्टर करीत असलेल्या फसवणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत.

(३) माझ्या काही नातलगांचे कावीळ, डेंगी, अल्सरेटिव्ह कोलायटिस इ. गंभीर आजार होमिओपॅथीमुळे पूर्ण बरे झाल्याचे दिसले. चाई, त्वचारोग, खोकला इ. किरकोळ आजारही बरे झाल्याचे दिसते. परंतु हे आजार औषधामुळे बरे झाले नसून निव्वळ प्लासिबो परीणामांनी बरे झाले असणार आणि मुख्य म्हणजे आपण औषधाने बरे झाले नसून प्लासिबो परीणामांनी बरे झालो आहोत याबद्दल हे रूग्ण अंधारात आहेत. होमिओपॅथी डॉक्टर या रूग्णांची अशी फसवणूक करीत होते हे वाचल्यावर संताप आला.

(४) होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. म्हणजे तिथेही फसवणुकच. हा प्लासिबो इफेक्ट अन्य पॅथीतही वापरात आणावा यासाठी आपण चळवळ सुरू करावी. म्हणजे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी कॅप्सूल/गोळ्यांमध्ये प्रत्यक्ष औषधाची मात्रा घालण्याऐवजी ग्लुकोज किंवा असेच काहीतरी निरूपद्रवी पदार्थ घालायचे. औषध घेणारा माणूस आपण औषध घेतले या कल्पनेनीच बरा होईल व बराचसा खर्च व इतर दुष्परीणाम टाळता येतील.

किंवा एखादी शस्त्रक्रिया करून आतला काही भाग काढायचा असल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टेबलावर घेऊन भूल देऊन काहीच न करता, पोटावर किंवा शस्त्रक्रियेच्या जागी वरूनच प्लॅस्टर करायचे. आपल्यावर खरंच शस्त्रक्रिया झाली असे जाग आल्यावर त्या रूग्णाला वाटेल आणि त्या प्लासिबो परीणामानेच शस्त्रक्रिया न करताच तो बरा होईल.

(५) प्लासिबो परीणाम इतर क्षेत्रातही वापरता येईल. म्हणजे भूक लागली असली तर आपण आमरसपुरीचे भरपूर जेवण जेवलो आहोत किंवा झणझणीत कोल्हापुरी मटणावर आडवा हात मारला आहे अशी नुसती कल्पना करायची. आपोआप पोट भरेल व प्रत्यक्ष अन्नधान्याचा खर्च कमी होईल.

एकंदरीत आपण फार महान कार्याला हात घातला आहे. महान कार्याचा पाठीराखा परमेश्वर असतो. त्यामुळे आपल्याला यश मिळणार हे नक्की.

या लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

कळावे,

आपला नम्र,

श्रीगुरूजी

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Sep 2014 - 2:25 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गुरूजींनी विकेट घेतली.असो. होमिओपाथीवर माझा १००% विश्वास नाही पण ते सगळे थोतांड आहे,बकवास आहे हे अमेरिकन व जगभरच्या औषधी कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे असे माझे मत.
मोठ्या विमा कंपन्या व औषधी कंपन्या लोकांच्या बोकांडी बसल्या आहेत गेले ५० वर्षे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Sep 2014 - 9:48 am | प्रसाद गोडबोले

श्रीगुरुजी + माईसाहेब + नानासाहेब नेफळे अशी महायुती होत आहे काय मिपावरील राजकारणात ? =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Sep 2014 - 11:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

=))

=))

गुर्जी लय भारी.

शरद's picture

26 Sep 2014 - 7:11 am | शरद

मी सहसा प्रतिसादांचा प्रतिवाद करत नाही. पण अधुनमधून फुस (फुकट सल्ले) मात्र देतो. (वयाचा परिणाम, दुसरे काय !) असा सल्ला कोणी ऐकला नाही तरी बिघडत नाही. श्रीश्री गुरुजी हेही माझे समानधर्मा आहेत हे त्यांनी दिलेल्या फुसवरून कळले व आनंद झाला. म्हटले चला, पन्नासएक वर्षांपूर्वी कॉलेजातील मुलामुलींना गणित शिकवत होतो आता त्याची उजळणी श्रीश्री गुरुजी यांच्याकरिता करावी.त्यांनी एक मिलिग्राम औषधाबद्दल लिहले आहे. डॉ. खरे यांनी त्याला उत्तरही दिले आहे. मी फक्त गणित करणार आहे.

आपण 3C पॉवरचे एक मिलिग्राम वजनाचे होमिओपाथीचे औषध घ्यावयाचे आहे असे समजू. कुठले औषध हे महत्वाचे नाही. तर प्रथम एक ग्राम औषध दहा लाख ग्राम पाण्यात विरघळावे लागेल ( 3C म्हणजे १०००००० मध्ये एक) पण आपल्याला तर १ मिलिग्रामच पाहिजे आहे. तेव्हा यातला १/१००० भाग म्हणजे १०००००० भागिले १००० बरोबर १००० ग्राम औषधाचे पाणी घ्यावयाचे आहे.पण पाणी नाही तर गोळ्या घ्यावा लागतात. तर एक ग्राम पाण्यात १० गोळ्या भिजवल्या (बर्‍याच जास्त भिजतील पण हिशेबा करिता १० धरा) म्हणजे तुम्हाला १ मिलिग्राम औषधाकरिता फक्त १०,००० गोळ्या खावयाच्या आहेत.
श्रीश्री गुरुजी, अंमळ जास्तच झाल्या नाही ?
शरद

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2014 - 8:42 pm | श्रीगुरुजी

डॉ. सुबोध खरे यांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गोळ्यांमध्ये औषधाचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे नसून औषध किती प्रभावी आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे १ मिलिग्रॅम होमिओपॅथी औषधाकरीता १०००० गोळ्या लागतील का अजून जास्त लागतील हा मुद्दाच इथे गैरलागू आहे. महाविद्यालयात गणित शिकवित होता तरी ते इथे निरूपयोगी व गैरलागू आहे.

शरदराव,
तुम्हास्नी कंधी कोण्च्या होम्योपदि वाल्या डागतरानी फशीवलाय कि काय :ऑ....तवाच हिकड त्यांची बिन पाण्यान कराय बगताय....
बाकि श्रीगुरुजी यांस स.न.वि.वि.
अहो पण गुरुजी,
जसे आपण लिहिले आहे ते वाचुन डोळ्यांत पाणी आले हो...प्लासिबोने गोची होईल ना ....हॉटेलात गेलो कि हॉटेल वाले फक्त फोटो दाखवतील आणि ...ती जुणी म्हण आठवेल...खाया पिया कुछ नहि फोटो देखा बारा आना ( आता आना बंद झाला माहित आहे मला )

सुबोध खरे's picture

25 Sep 2014 - 3:37 pm | सुबोध खरे

होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार.
गुरुजी वरील विधान खरे नाही. कित्येक आधुनिक औषधे इतकी परिणामकारक आहेत कि एकच का ०. १ मि. ग्रॅम औषध सुद्धा पुरेसे आहे. उदा. लीव्हो थाय रोक्सीन ०.१ mg , टामसुलोसीन ०. २ mg , ग्लायमेप्राईड १ mg, अल्फा कॅलसी डॉल ०. २५ मायक्रो ग्रॅम (होय मायक्रोग्रामच).
फार कशाला सदाफुलीपासून कर्करोग विरोधी औषध व्हिनक्रिस्टीनचे सुद्धा १ मिली ग्रॅमचे इंजेक्शन मिळते अशी असंख्य औषधे सूक्ष्म प्रमाणात पण काटेकोर पणे तयार केलेल्या पद्धतीने वापरली जातात.
आपल्यापैकी कुणाचा असा समज असेल की हि औषधे प्लासिबो परिणाम करतात तर त्यांना माझे खुले आव्हान आहे त्यांनी हि औषधे घेऊन दाखवावीत ज्यांचा त्याच्या परिणामावर विश्वास नाही तर त्यांच्यावर त्या औषधाचा परिणाम होणार नाही. ( व्हिनक्रिस्टीनचे इंजेक्शन घेऊन केस गळले किंवा हगवण लागली तर ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर).
प्लासिबो परिणामाचा काही वेळा मनोरुग्णांवर उपयोग करावा लागतो. आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे असे समजणाऱ्या रुग्णांना किंवा हिस्टेरिया च्या रुग्णांवर शुद्ध पाणी किंवा काम्पोजच्या इंजेक्शन चा प्रभावी परिणाम दिसून येतो.
अजून एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक स्त्री मुलाला घेऊन रडत आली होती कि मुलाने मलम खाल्ले. मी हातात घेऊन पहिले तर ते सोफ्रामायसीन चे मलम होते. त्या ट्यूब मध्ये बहूतांश मलम शिल्लक होते. सोफ्रामायसीन आपल्या आतड्यात शोषले जात नाही ( त्यामुळे त्याच्या गोळ्या वापरता येत नाहीत). हे सांगून त्या स्त्रीचे समाधान होत नव्हते. त्या मुलाला मी ब जीवनसत्त्वाचे सिरप पाजले आणि आईला सांगितले कि अर्धा तास थांबा. मुलाला उलटी होते का ते पहा उलटी झाली नाही तर मुलाला धोका नाही. अर्ध्या तासाने ती आई मोठ्या कृतज्ञ भावनेने मला सागू लागली डॉक्टर तुमच्या औषधाचा उत्तम परिणाम झाला आहे आणि मुल छान खेळते आहे. (मुळात मुल पहिल्यापासूनच आनंदात होते).
असेच दुसरे उदाहरण -- बरेच मासे खाणारे मोठा काटा गिळतात हा काटा घशाच्या मागच्या भागावर ओरखडा काढतो. त्यामुळे त्या माणसाला घशात काटा अडकला आहे अशी भावना होत राहते. त्यांना एक्स रे काढा किंवा स्क्रीनिंग करा समाधान होत नाही. अशा लोकांना बेरियम मध्ये भिजवलेला कापूस खायला सांगतो आणि असे सांगितले जाते कि जर काटा असेल तर तो कापूस तेथे अडकेल. काटा नसल्याने तो कापूस गिळल्यावर पोटात जाताना स्क्रीन वर दिसतो कि मग त्या माणसांचे समाधान होते.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 3:47 pm | प्रसाद१९७१

डॉक्टर साहेब - तुम्ही जीव तोडुन नका घेउ, काही ( भारतातल्या बहुसंख्य ) लोकांना डोळ्यासमोर सरळसरळ दिसत असलेल्या फॅक्ट इग्नोर मारायची सवय असते.
भारतीयांचा मुळ स्वभाव चमत्काराच्या मागे लागणारा आहे. त्यांना अश्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आवडतो की ज्या खोट्या आहेत आणि सिद्ध होणार नाहीत. ह्याने उत्तरे शोधायचा त्रास वाचतो.
होमिओपाथी आणि आयुर्वेदा साठी हा समाज अगदी आयडीयल आहे.

नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे.

खरे तर तसे ही नाही. ह्या लोकांना बरोबर माहीती आहे की कुठला रोग झाला की कुठल्या डॉक्टर कडे जायचे. सर्दी, अपचन झाले की जातील वैदू कडे पण काही मोठा रोग झाला की येतील तुमच्या कडे.

मृत्युन्जय's picture

25 Sep 2014 - 3:56 pm | मृत्युन्जय

आणि आयुर्वेदा साठी

एक मिनिट हॉमिओपॅथी बद्द;अ जे मत असेल ते असो. पण आयुर्वेद हे शास्त्र नाही असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कारण ते चक्क १००% चुकीचे आहे.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:05 pm | प्रसाद१९७१

क्निनिकल ट्रायल ( शक्यतो अमेरिकेतुन ) पास झालेल्या कुठल्या ही औषधावर माझा विश्वास आहे. आयुर्वेदाने ते करावे, मी नक्की घेइन.
मी कोण बोलणार मॉडर्न मेडीसिन वाला डॉक्टरच लिहुन देइल ते पेशंटला.
पण क्लिनिकल ट्रायल होत नाहीत तो पर्यंत नाही. आता तुम्ही हजारो वर्षाची परंपरा वगैरे बोलू नका.
इतकी खात्री आहे तर का कोणती आयुर्वेदीक औषध कंपनी क्लिनिकल ट्रायल करून घेत.
भारता पेक्षा अमेरिका खुप खुप मोठे मार्केट आहे.

अजुन एक
आणि मी औषध हा शब्द वापरला, र्टॉनिक नाही.

दुसरे
तुमचा जर आयुर्वेदावर विश्वास असेल तर चिनी, युनानी ने काय घोडे मारले आहे?

मृत्युन्जय's picture

25 Sep 2014 - 4:58 pm | मृत्युन्जय

मला चिनी युनानी बद्दल काही माहिती नाही.

आयुर्वेदाचा आवाका मात्र खुप मोठा आहे. आज्जीबाईचा बटवा असे आपण ज्याला म्हणतो तो सगळा आयुर्वेदात येतो. क्लिनिकल ट्रायल बद्दल म्हणत असाल तर माझा तुमच्या एवढा या विषयातला अभ्यास मोठा नाही. पण बाजारात जी मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधे येतात ती क्लिनिकल ट्रायल नंतरच येत असतील ना? निसर्गातले घटक वापरुन तयार केलेली औषधे ती आयुर्वेदाची असे माझे मत आहे. ही साधारन व्याख्या झाली. वैद्यकीय परिभाषेत यात काही अधिक उणे होइलच.

मी हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल काय बोलणार? पण अ‍ॅलोपॅथीच्या डागतरांना न जमलेले रोग आयुर्वेदिक डॉक्टरांनी बरे करुन दाखवलेले बघितले आहेत. हे करताना त्यांनी कुठल्या स्टेजला काय प्रगती होइल ते सांगितले. जेव्हा जेव्हा कुपथ्य झाले तेव्हा तेव्हा ते बरोबर ओळखले. अचूक नाडीपरीक्षा केली. औषधे सगळी आयुर्वेदिक दिली. किती दिवसात रुग्ण पुर्ण बरा होइल ते अचूक सांगितले आणि तेवढ्या दिवसात रुग्ण पुर्ण बरा झाला. त्या आधी अ‍ॅलॉपथी डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते.

बाप दाखव नाहितर श्राद्ध घाल हे काही लोकांना सिद्ध करावे लागते म्हणुन सांगतो की डॉक्टर पुण्यातले समीर जमदग्नी होते. माझ्या जवळच्या माहितीतील बर्‍याच जणांना इतर काही चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा असाच अनुभव आला. आयुर्वेदतरी किमान नक्की प्लासिबो इफेक्ट वर चालत नाही. शेकडो वेगवेगळ्या पुड्या आणि कडवट काढे हे सगळे प्लासिबो इफेक्ट असते हे मला मान्य नाही.

अवांतरः डॉ समीर जमदग्नी आणि माझे कुठलेही नाते नाही. असेलच तर ते मला ज्ञात नाही.

खटपट्या's picture

26 Sep 2014 - 2:18 am | खटपट्या

माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही.
आता दिलेले औषध आयुर्वेदिक आहे कि अलोपथिक हे विचारण्याची हिम्मत माझ्यात नाही. कारण लगेच बाबांकडे तक्रार करतील :)

सुहास..'s picture

26 Sep 2014 - 6:34 pm | सुहास..

माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. >>

माझे ही !! पण स्सालं काही ही आजार घेवुन जा ..अगदी दाढ दुखीसुध्दा ..बर करतो ..नाव सरदार आहे आणि आहे पण सरदार :)

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 2:27 am | खटपट्या

मी हाच विचार करतोय कि BAMS आणि MBBS या दोन्ही डिग्र्या घेतलेल्या डॉक्टरांचा वैचारिक गोंधळ होत नसावा का ? एखाद्याला अलोपथिक औषध द्यायचे कि आयुर्वेदिक हे ते कसे ठरवत असतील. एखादा रुग्ण त्यांच्याकडे "फक्त आयुर्वेदिक" किंवा "फक्त अलोपथिक" उपचारांची मागणी करू शकतो का ?

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2014 - 2:32 am | प्रभाकर पेठकर

अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना, दूसर्‍या पॅथीला वापरायला, एंडॉर्स करायला बंदी असते असे वाचले आहे. डॉ. श्रीराम लागूंनी च्यवनप्राशची जाहिरात केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर्स असोसिएशनकडून कांहीतरी कारवाई झाली होती असे वाचल्याचे स्मरते.

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 3:49 am | खटपट्या

हा श्रीराम लागुंबद्दल ऐकले आहे. पण त्यांच्यावर चवनप्राश ची जाहिरात केल्याबद्दल कारवाई झाली का हे माहित नाही. मी ऐकलेय कि कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाची जाहिरात करू शकत नाही.
डॉक्टर मिपाकर प्रकाश टाकतीलच.

सुबोध खरे's picture

27 Sep 2014 - 9:22 am | सुबोध खरे

डॉ. श्रीराम लागूनी च्यवनप्राशची जाहिरात केली त्यावर त्यांच्या काही व्यावसायिक सहकार्यांनी मत्सरामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे तक्रार केली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने त्या तक्रारीची "दखल" घेत त्यांचे सदस्यत्व काही महिन्यांसाठी निलंबित केले. कारण हे होते कि तुम्ही डॉक्टर असताना एखाद्या औषधाची जाहिरात करणे हे बेकायदेशीर आहे.
डॉक्टर लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याविरुद्ध अपील केले आणि त्यात असे म्हटले कि मी त्यात डॉक्टर म्हणून कोणतीही जाहिरात केलेली नाही उलट एक प्रसिद्ध व्यक्ती( CELEBRITY) म्हणून ती जाहिरात केलेली आहे.
उच्च न्यायालयाने ते म्हणणे ग्राह्य धरत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची कारवाई रद्द केली. ( मुळात डॉक्टर लागू तेंव्हा बरेच वर्षापासून आपला व्यवसाय करीतच नव्हते)

खटपट्या's picture

27 Sep 2014 - 1:15 pm | खटपट्या

धन्यवाद डॉक, माहिती बद्दल

मराठी_माणूस's picture

25 Sep 2014 - 4:06 pm | मराठी_माणूस

नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे.

गुरुजींच्या (३) प्रमाणे त्यांना कर्माची फळे मिळालीच आहेत (गंभीर आजार बरे होण्याची)

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:09 pm | प्रसाद१९७१

अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी.

काविळ आणीडेंगी आपोआप बरा होतो .कसा काय बॉ?
काही शास्त्रीय माहिती आहे का ?
असल्यास इथल्या एका पेंशटला सांगतो.
एक आठवडा झाला हुडकुन हुडकुन o- च
ब्लड पुरवत आहोत.

श्रीगुरुजी's picture

30 Sep 2014 - 8:49 pm | श्रीगुरुजी

>>> अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी.

अहो आश्चर्यम्! पण मग दरवर्षी मुंबई, पुणे इ. शहरात किमान २००-३०० व्यक्ती डेंगी ने मृत्युमुखी पडतात ते कसे काय बोवा? आणि डेंगी झाल्यावर अनेकांना रूग्णालयात दाखल करून शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी? डेंगी आपोआपच बरा होणार असेल तर कशाला डॉक्टरचा, रूग्णालयाचा आणि प्लेटलेट्सचा खर्च करायचा? आणि दरवर्षी महानगरपालिका विनाकारणच डासनिर्मूलन मोहीम राबविते असं दिसतंय कारण डेंगी आपोआपच बरा होतो ना?

आणि समजा होमिओपॅथीने डेंगी बरा झालेला नसून तो शरीर लढण्यासाठी टिकून राहिल्यामुळे आपोआप बरा झाला आहे असे गृहीत धरले तर होमिओपॅथी औषधामुळे डेंगीच्या प्रतिकारासाठी शरीर लढण्यासाठी टिकवून धरायला मदत होते असा निष्कर्ष का नाही काढता येणार?

अनुप ढेरे's picture

30 Sep 2014 - 9:17 pm | अनुप ढेरे

शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी?

अहो प्लेटलेट्स काही डेंगूवर उपचार म्हणून नाही भरत.

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2014 - 1:08 pm | श्रीगुरुजी

मी कुठं म्हणतोय तसं?

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 6:33 pm | प्रसाद१९७१

गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही.

काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको.

मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही.

तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा.

श्रीगुरुजी's picture

1 Oct 2014 - 8:54 pm | श्रीगुरुजी

>>> गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही.

काय हा वेडेपणा. आयुष्यात मॉडर्न मेडिसिनचे औषध घ्यायचे नाही हा पण कशासाठी आणि का करायचा? होमिओपॅथी औषध सुद्धा आजारांवर लागू पडते अशी माझी भूमिका. फक्त होमिओपॅथीच लागू पडते व इतर पॅथी ही फसवणूक/निरूपयोगी आहेत असे मी कधीही म्हटले नाही.

>>> काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको.

माझी अशी ठाम भूमिका आहे की होमिओपॅथी ही फसवणूक नसून अनेक आजारांवर होमिओपॅथीमुळे गुण येतो.

>>> मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही.

तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न आहे.

>>> तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे.

मी अ‍ॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी सोडून इतर पॅथींना अजिबात नावे ठेवलेली नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एखाद्याने "मला दूध आवडत नाही" असे म्हटले तर "म्हणजे तुम्हाला मद्य आवडते" असा अर्थ तुम्ही काढत आहात. होमिओपॅथी ही भोंदूगिरी नसून त्या पॅथीचाही आजार बरे करण्यासाठी उपयोग होतो. हेच मी सांगितले आहे.

>>>> असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा.

माझे वागणे अजिबात दुटप्पी नाही. तसेच माझे वागणे पूर्वग्रहदूषित सुद्धा नाही. मी माझ्या व माझ्या परिचयातील अनेकांच्या व्यक्तिगत अनुभवावरून होमिओपॅथीविषयी माझे मत ठरविले आहे. होमिओपॅथीच्या बाजूने बोलणे म्हणजे इतर पॅथींचा द्वेष करणे नव्हे हे समजून घ्या.

मृत्युन्जय's picture

1 Oct 2014 - 6:28 pm | मृत्युन्जय

तुमचे वक्तव्य थोडेसे "एड्समुळे कोणीही मरत नाही" यासारखे आहे. टेक्निकली बरोबर असु शकते कदाचित. प्रॅक्टिकली अगदीच चुकीचे

गवि's picture

25 Sep 2014 - 4:46 pm | गवि

@प्रसाद

जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे. दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर असे करताना दिसत नाहीत. कदाचित त्यांचे मत "मला काय करायचेय होमिओपथीविषयी बोलून" असे असू शकेल. आणि केवळ व्यवसायाच्या दृष्टीने ते रास्तही असेल. पण रुग्ण चुकीची उपचारपद्धती वापरतात किंवा कसे याकडे लक्ष देणे आणि किमान त्याविषयी माहिती देणे हाही वैद्यकीय व्यवसायाचा भाग मानला पाहिजे असे वाटते.

एकदा तत्व माहीत झाले आणि तरीही होमिओपथी घेतली तर मग काहीच म्हणणे असू नये, कारण तो इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. सध्या माझ्यामते बहुतांश पेशंट्सना हे माहीतच नसतं की होमिओपथीमधे थेट औषधाचा अंश नाही.

तेवढं माहीत झालं म्हणजे मग आपापले ठरवणे इष्टच..

जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे.

हे सगळं काही आपल्या तोंडासमोरच बोललं पाहिजे असं काही आहे का? माझ्या मते नसावं. होमिपदीबद्दल कित्ती काय काय रिसर्च पेपर लिहून झालेले आहेत. त्यामुळे 'अ‍ॅलोपथीचे डॉक्टर कै बोलत नैत' हे चूक आहे.

पोटे's picture

25 Sep 2014 - 4:08 pm | पोटे

ही प्लासिबोची उदाहरणे वाटत नाहीत.

या उदाहरणात रुग्णाला काही झालेलेच नाही. झाले , असे त्याला वाटत आहे.

होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:13 pm | प्रसाद१९७१

होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत

हे सर्व रोग शरीरच बरे करते. नागिणी वर औषध घेण्याची गरज नाही.
मधे स्वाईन फ्लु चे वारे होते तेव्हा आम्हाला युके मधे ताप आला तर घरी विश्रांती घ्या आणि ताप वाढला तर पॅरॅसिटेमॉल घ्या इतकाच सल्ला डॉक्टर देत होते. एक पण मृत्यु झाला नाही.
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

पोटे's picture

25 Sep 2014 - 4:52 pm | पोटे

सर्व रोग शरीरच बरे करते तर मग आमची अ‍ॅलोपथीही निरर्थ्कच नाही का ?

नागिणीवर औषध घेऊ नये हे सांगून मात्र उपकारच केलेत. आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत रोज एक पेशंट असतो नागिणीचा.

बरं झालं , स्रकारला कळवून टाकतो .. अ‍ॅसायक्लोवीर औषधावर फुकट खर्च करु नका म्हणुन.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:58 pm | प्रसाद१९७१

मालक हे वाचा. शरिरच बरे करते नागिण. हे सपोर्टींग औषध आहे. बरे करण्या साठी नाही.

Acyclovir is used to treat infections caused by certain types of viruses. It treats cold sores around the mouth (caused by herpes simplex), shingles (caused by herpes zoster), and chickenpox.

This medication is also used to treat outbreaks of genital herpes. In people with frequent outbreaks, acyclovir is used to help reduce the number of future episodes.

Acyclovir is an antiviral drug. However, it is not a cure for these infections. The viruses that cause these infections continue to live in the body even between outbreaks. Acyclovir decreases the severity and length of these outbreaks. It helps the sores heal faster, keeps new sores from forming, and decreases pain/itching. This medication may also help reduce how long pain remains after the sores heal. In addition, in people with a weakened immune system, acyclovir can decrease the risk of the virus spreading to other parts of the body and causing serious infections

आनन्दा's picture

26 Sep 2014 - 6:40 am | आनन्दा

परवा मी आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते तेव्हा माझ्यावर तुटून पडला होतात.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 9:16 am | प्रसाद१९७१

आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते

ते क्लिनिकल ट्रायल करुन प्रूव्ह करा, मग मॉडर्न मेडीसिन चे डॉक्टरच लिहुन देतील ना ते पेशंट ला.

पोटे's picture

25 Sep 2014 - 4:54 pm | पोटे

भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

.....

अग्गोबै ! म्हणजे एखादे औस्षध इंग्लंदात असले तरच ते सत्य मानायचे का काय ? ? ?

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:21 pm | प्रसाद१९७१

हो इंग्लंडात केले चालेल कारण इंग्लंडात कोणाला वाटले म्हणुन कोणी औषध काढुन विकू शकत नाही. क्लिनिकल ट्रायल लागतातच कराव्या.

रामपुरी's picture

26 Sep 2014 - 3:23 am | रामपुरी

म्हणजे भारतात औषध विकण्यासाठी क्लिनिकल ट्रायल घ्याव्या लागत नाहीत असं आपल्याला वाटतं कि काय?

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 9:14 am | प्रसाद१९७१

कुठल्याही आयुर्वेदिक कींवा होमिओपाथी औषधाची क्लिनिकल ट्रायल झालेली नाही.
हे वैदू त्यांना पाहीजे ते देतात. तुम्हाला एक जरी असे औषध माहीती असेल तर सांगा.

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही.

पोटे's picture

26 Sep 2014 - 11:16 am | पोटे

भ्रम आहे तुमचा.

कालच आयु डॉक्टरला विचारलं.

तो बोल्ला क्लिनिकल ट्रायल होतात. आयुर्वेदिक साठीही.

होमिओ बद्दलही संबंधिताला विचारेन.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 11:29 am | प्रसाद१९७१

मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवलात? एखादे उदाहरण देत का नाही तुमचा तो वैदु.

इथे बघा काही नाव सापडतय का?

http://www.cdsco.nic.in/forms/list.aspx?lid=1820&Id=11

पोटे's picture

26 Sep 2014 - 2:16 pm | पोटे

तुमचे क्वालिफिकेशन काय ?

तो एम डी आयु. आहे

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 2:18 pm | प्रसाद१९७१

एम्.डी. आयु च आहे ना, मग प्रश्न नाही. वैदूच आहे.

पैसा's picture

26 Sep 2014 - 6:07 pm | पैसा

फारच धाडसी विधान! लोक वैदू बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि सरकार त्यांना पदवी देऊन धंदा करायला परवानगीही देतं ही माहिती णवीण आणि फारच भयंकर आहे!

मराठी_माणूस's picture

26 Sep 2014 - 12:08 pm | मराठी_माणूस

क्लिनिकल ट्रायल वगैरे केलेल्या बहुराष्ट्रिय औषध कंपन्यांचे काळे धंदे इथे वाचा

http://www.loksatta.com/lokrang-news/drugs-companies-exploit-indian-guin...

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2014 - 1:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही.

मॉडर्न मेडिसीनमधली औषधे भारतात विकण्याअगोदर त्यांची भारतिय (किंवा बर्‍याच इतर देशातही स्थानिक) रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करणे कायद्याने व आरोग्यदृष्टीने जरूर असते... केवळ अमेरिकन ट्रायल यशस्वी झाली म्हणून ती भारतात किंवा इतर अनेक देशांत आपोआप वैध होत नाहीत.

याचे मुख्य कारण म्हणजे जगातल्या विविध भागांत राहणार्‍या लोकांमधले जैववैविध्य आहे. जैव (जेनेटिक) वैविध्यामुळे एकाच औषधाचे--- जे आधुनिक वैद्यकशास्त्रात रासायनिक अणू (केमिकल मॉलेक्युल) या असे संबोधले जाते--- वेगळी जनुकरचना असणार्‍या माणसांमध्ये वेगळे परिणाम दिसतात... उदा. औषध शरिरात शोषण होण्यातला (शोषलेली मात्रा आणि त्यासाठी लागलेला वेळ) फरक, जैववैविध्यामुळे शरीरावर होणार्‍या परिणामातिल फरक, औषधाचे शरिरात चयापचय होण्यातला फरक, शरिरात औषध शिल्लक राहण्यातला (मात्रा आणि वेळ) फरक, औषध आणि त्याचे विघटन झालेले भाग शरीरातून बाहेर (मूत्र, इत्यादींतून) फेकले जाण्यातला फरक, औषध आणि त्याच्या शरीरात विधटित झालेल्या भागांचे शरीरावरचे दूरगामी परिणाम, इत्यादी.

कोऽहम्'s picture

26 Sep 2014 - 4:57 pm | कोऽहम्

मित्र,

जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही ) आवश्यक असलेली माहिती मिळेल.

https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi...

ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत.

ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे:

"British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature"

इत्यादी इत्यादी (हुश्श)!

ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा.

ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस ) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया.

कळावे,
मित्र

अनुप ढेरे's picture

25 Sep 2014 - 4:55 pm | अनुप ढेरे

भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 4:59 pm | प्रसाद१९७१

भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...

लस आणि औषध वेगळी

अनुप ढेरे's picture

25 Sep 2014 - 5:03 pm | अनुप ढेरे

याबद्दल काय मत आहे?
http://www.nhs.uk/medicine-guides/pages/medicineoverview.aspx?condition=...

अनुप ढेरे's picture

26 Sep 2014 - 2:15 pm | अनुप ढेरे

प्रसादराव, तुमच्या मतासाठी आतूर आहे. साँगा ना...

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 8:07 pm | प्रसाद१९७१

टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे Cure नाही. ते Preventor म्हणुन काम करते. टॅमीफ्लु हे सर्व च टाइप च्या फ्लु साठी preventive medicine म्हणुन वापरु शकतात. फ्लुच्या वाय्ररस शी संपर्क येउन २ दिवस झाले असतील तर टॅमी फ्लु ने फार फरक पडत नाही.

माझ्या मुलीला स्वाइन फ्लु झाला होता त्यामुळे मी First Hand माहीतीवर बोलतो आहे.

गमतीची गोष्ट म्हणजे टॅमीफ्लु बडीशेपे पासुन बनवतात असे ऐकले आहे.

सुहास पाटील's picture

30 Sep 2014 - 7:33 pm | सुहास पाटील

मग इतके लोक स्वाइन फ्लु ने मरत कसे आहेत पुण्यात ?

अनुप ढेरे's picture

25 Sep 2014 - 4:57 pm | अनुप ढेरे
आदिजोशी's picture

25 Sep 2014 - 4:37 pm | आदिजोशी

रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी?

मृत्युन्जय's picture

25 Sep 2014 - 5:04 pm | मृत्युन्जय

अ‍ॅलोपॅथी. कारण तेवढी एकच खरी आहे.

मग वापरली का जात नाही? मिपावर अ‍ॅलॉपॅथिक डॉक्टर 'कार्यरत' नाहीत काय?

रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी? >>>

+१०१५४५४६६९७२१३५४६२३१३५४७१२३५४६५४५४३२१६३८५५६४२५४५६७४६४३२४६८७४६५४३५४६८७८

मराठी_माणूस's picture

25 Sep 2014 - 5:35 pm | मराठी_माणूस

औषधांचे जाउ द्या , ते तसेही आपण फक्त बरे नसतानाच घेतो. पण जे अन्न वर्षानुवर्ष आपण पोटात ढकलतो, जसे पोळी,भाजी, वरण भात ईत्यादी, त्यांची कोणत्या लॅब मधे क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ? शिवाय ते किति प्रमाणात खायला हवे ह्याचे काही मोजमाप आहे का ? जसे कि पोळी ... ग्राम, भात्....ग्राम ई.

प्रसाद१९७१'s picture

25 Sep 2014 - 5:37 pm | प्रसाद१९७१

औषधाचे जाऊ द्या कसे? आपण उपचार पद्धती बद्दल च बोलतो आहोत.

मराठी_माणूस's picture

25 Sep 2014 - 6:05 pm | मराठी_माणूस

उपचार आणि रोजचा आहार दोन्हीही आपल्या तब्येती साठीच आहेत

मंत्र तंत्रावर लिहिणार्‍याला होमिओपाथी खटकावी याचं आश्चर्य वाटतय!!

पोटे's picture

26 Sep 2014 - 12:39 am | पोटे

हेच लिवणार होतो.

हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले.

मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं

पहाटवारा's picture

26 Sep 2014 - 5:36 am | पहाटवारा

पदि मधे पदि होम्योपदी ..
तुम्हाला नाय चालत .. तर प्लासिबोरावांचे नाव का घालता मदी ??

मराठी_माणूस's picture

26 Sep 2014 - 1:03 pm | मराठी_माणूस

ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा

http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-an...

अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2014 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.

अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >>

+१ हे मी मान्य करतो !!

कोऽहम्'s picture

26 Sep 2014 - 5:02 pm | कोऽहम्

मित्र प्रसाद,

जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल.

https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi...

ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत.

ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे:

"British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature"

इत्यादी इत्यादी (हुश्श)!!!

ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा.

ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया.

कळावे,
मित्र

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 5:26 pm | प्रसाद१९७१

अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.

कोऽहम्'s picture

26 Sep 2014 - 6:02 pm | कोऽहम्

मित्र

सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो.

१. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalco...

२. http://www.amcofh.org/research/proving-trials

३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/

४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन).

दोन प्रश्न :

आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का?

एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का?

सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत.

ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा.

कळावे,
मित्र

सुबोध खरे's picture

26 Sep 2014 - 6:25 pm | सुबोध खरे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials.
असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Sep 2014 - 7:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials.

या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः

आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही.

----------

* "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग...

"तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."...

हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे.

** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 6:54 pm | प्रसाद१९७१

२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत.
गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.

सुबोध खरे's picture

26 Sep 2014 - 7:02 pm | सुबोध खरे

कोऽहम् साहेब
आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे.

Is there any proof that homeopathic medicine works?
J Burgess, Norwich
It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough.
बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही.
मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही.
असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण.
ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी.
या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही.
हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.

पोटे's picture

27 Sep 2014 - 4:12 pm | पोटे

तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता.

डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते.

असो.

माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती.

असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता.

एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!

सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.

सामान्यनागरिक's picture

26 Sep 2014 - 6:14 pm | सामान्यनागरिक

मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन.
आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.

अनुप ढेरे's picture

26 Sep 2014 - 6:24 pm | अनुप ढेरे

डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी.

खरे डॉक्टर आहेत मिपावर. :)

पोटे's picture

27 Sep 2014 - 10:09 am | पोटे

होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे.

होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत.

डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे.

त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते.

वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे.

पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची.

आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.