Skip to main content

होमिओपाथी म्हणजे फसवाफसवी ? हो

लेखक शरद यांनी बुधवार, 24/09/2014 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
होमिओपाथी ( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !) माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख. इथे होमिओपाथी ची मुलतवे व त्यावर घेतले गेलेले आक्षेप यांचाच विचार आहे. संदर्भ दिले नाहीत, जालावर भरपूर माहिती आहे. हनिमन (१७५५-१८४३) हा जर्मन माणुस "होमिओपाथी " चा (या पुढे होमि.) जनक. त्याने घालून दिलेल्या मार्गावरून होमि,ची वाटचाल आज दोनशे वर्षे चालू आहे. दोन महत्वाची तत्वे जोडण्यात आली. त्यांचा उल्लेख पुढे केला आहे. माझ्यावरील आक्षेपात इतकी वर्षे फसवणुक होते आहे काय ? १८० कॉलेजेस आहेत इ. गोष्टी नमुद करण्यात आल्या आहेत. पहिल्याचे उत्तर हो व दुसर्‍याचे शिक्षणसम्राट पैसे मिळत असतील तर आणखी १८०० कॉलेजेस काढतील. असल्या गोष्टींनी होमि. शास्त्रसंमत ठरत नाही. . प्रथम होमि.ची गृहितके व त्यात मिळवलेली नवीन तत्वे पाहू. (१) औषध अल्प प्रमाणात दिले तर त्याची उपयोगिता वाढते. म्हणून औषध पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये विरघळवून ते dilute करावयाचे .याच्या दोन पद्धती. पहिली x किंवा D. यात दशमान पद्धती वापरली जाते. १ ग्राम औषध १० ग्राम पाण्यात विरघळवा, त्याची Power झाली 1 x किंवा 1D. आता हे औषध आणखी ९० ग्राम पाणी घालून १०० ग्राम करा. याला म्हणावयाचे 2 x. हे जास्त पॉवरफुल. पुढचे १००० मध्ये १ म्हणजे 3 x. दुसर्‍या पद्धतीत १० ऐवजी १०० धरा, म्हणजे १०० मध्ये १. त्याला म्हणतात 1C 2C म्हणजे १०० x १०० = १०००० मध्ये १. 3C म्हणजे १० लाखात १. आले लक्षात ? आता हे असे औषध साखरेच्या लहानशा गोळीवर शिंपडून तुम्हाला "औषध" म्हणून देतात. बहुतेक डॉक्टर तुम्हाला कोणते औषध , काय Power चे दिले सांगत नाहीत पण बाजारात विकत घ्यावयाला गेलात तर बाटलीवर लिहलेले आढळेल. 5C च्या पुढचे औषद इतके Diluted असते की ते पाण्यात नसतेच म्हटले तरी चालेल. काचेच्या बाटलीत ठेवलेल्या डिस्टिस्ड पाण्यात विरघळ्लेले क्षारच जास्त असतात. तेव्हा अशा पाण्यात तयार केलेल्या औषधाला काय म्हणणार ? Hahnemann advocated 30C dilutions for most purposes (that is, dilution by a factor of 10 raised to60). In Hahnemann's time, it was reasonable to assume the remedies could be diluted indefinitely, as the concept of the atom or molecule as the smallest possible unit of a chemical substance was just beginning to be recognized. The greatest dilution reasonably likely to contain even one molecule of the original substance is 12C . असो (२) होमी.चे औषध देण्याकरिता डॉक्टर दोन पद्धती अवलंबतात. एक औषध थोड्या थोड्या दिवसांनी द्यावयाचे. त्याचा परिनाम बघण्यासाठी. तर का ही जण औषध सातत्याने घेण्यास सांगतात. नक्की काय करावयाचे ? (३) नवीन औषध गुणकारी आहे की नाही बघण्याकरिता ट्रायल घेतांना रोग्यांच्या कळपातील काही जणांना औषध नसलेले डोस देतात त्याला म्हाणतात .placebo . कल्पना अशी की रोग्याला आपण खरे औषध घेतो असेच वाटत असतांना काही फरक पडतो का ? निरनिराळ्या देशात, निरनिराळ्या काळी घेण्यात आलेल्या ट्रायल्समध्ये असे आढळून आले आहे की होमि. औषधे व placebo यांच्या परिणामात काहीही फरक नाही. जेथे फरक आढलला तेथे कारण पुढील प्रमाणे One of the earliest double blind studies concerning homeopathy was sponsored by the British government during World War II in which volunteers tested the efficacy of homeopathic remedies against diluted mustard gas burns.[144] No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo.[5][145] The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect.[16][49]:206[146] A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo Health organisations such as the UK's National Health Service,[169] the American Medical Association,[170] and the FASEB[131] have issued statements of their conclusion that there is "no good-quality evidence that homeopathy is effective as a treatment for any health condition."[169] (४)सिंचोनाच्या सालीने मलेरिआ बरा होतो म्हणून हनिमनने तशी साल स्वत: इंजेक्शनच्या रुपाने घेतली व त्याला मलेरिआ झाल्यासारखे परिNaaम दिसून आले. त्यावरून त्याने "law of similars " अथवा " like cures like " हा नियम घातला. या नियमाबदल Hahnemann's law of similars is a postulate rather than a scientific law. असे म्हणता येईल. (५) पुढील परिच्छेदाबद्द्दल मला काही बोलावयाचे नाही.होमि.चे पुरस्कर्ते प्रकाश टाकू शकतील काय? Some modern homeopaths have considered more esoteric bases for remedies, known as "imponderables" because they do not originate from a substance, but from electromagnetic energy presumed to have been "captured" by alcohol or lactose. Examples include X-rays[68] and sunlight.[69] Some homeopaths also use techniques that are regarded by other practitioners as controversial. These include "paper remedies", where the substance and dilution are written on pieces of paper and either pinned to the patients' clothing, put in their pockets, or placed under glasses of water that are then given to the patients, as well as the use of radionics to prepare remedies. Such practices have been strongly criticised by classical homeopaths as unfounded, speculative, and verging upon magic and superstition (६) water memory, डायल्युशन वर फार टीका होऊ लागल्यावर एक नवीन सिद्धांत मांडला गेला. पाणी औषध आपल्या स्मरणात ठेवते. नंतर कितीही डायल्युशन केलेत तरी, औषध शिल्लक राहिले नाही तरी, पाणी या स्मरणाने तुम्हाला गुण देते. तुम्हाला काय वाटते ते मला माहीत नाही पण मला तर हे बापू-बुवा-महाराज यांचे पाय धुतलेले पाणी "तीर्थ" म्हणून कसे गुणकारी असते याची खात्री देणार्‍या भक्तांचीच आठवण होते ! (७) होमि.मध्ये Miasms म्हणून एक भानगड असते. मला काही उलगडा झालेला नाही, प्रतिसादांमध्ये कोणी जाणकार प्रकाश पाडू शकेल काय ? याचा अर्थ असा आहे का की होमिओपाथी सर्वस्वी निरुपयोगी आहे ? नाही, तसे नाही. तिचाही उपयोग काही दुखण्यात होतो. बर्‍याच वेळी दुखणी मानसिक असतात. म्हणजे रुग्णाला औषधाची नाही तर मानसिक सहानुभूतीची गरज असते. (पूर्वी तरी) होमिओपाथीचे डॉक्टर रुग्णाची चौकशी करावयाचे, थोडा वेळ का होईना त्याला आपल्याला विचारणारे कोणी तरी आहे याचे समाधान मिळावयाचे व एकदा डॉक्टरवर विश्वास बसला की त्याने दिलेल्या कोणत्याही गोळ्यांनी रुग्णाला बरे वाटावयाचे. रोग श्रद्धेनेच बरा व्हावयाचा. काही रोग सायक्लिक असतात.सुरवातीला कमी, मग जास्त , परत कमी. तुम्ही मधल्या वेळी गेलात तर अशा गोळ्यांनीच आपल्याला बरे वाटले असेही तुम्हाला वाटू शकते. सकाळमध्ये एका डागदरीणीने लिहले होते " एकदा राती उशिरा मला एक फोन आला. नेहमी येणार्‍या एका मुलीच्या वडिलांचा. त्यांनी गयावया केली म्हणून त्यांना घरी बोलावले. मुलीला तपासले, योग्य ते औषध लिहून दिले आणि त्यांना विचारले "आता रात्री तुम्हाला औषध कुठे मिळणार ?" ते म्हणाले, " औषध कोण आणणार ? आम्ही कधीच आणत नाही, तुम्ही तपासले की मुलीला बरे वाटते." घ्या ! फार वाढवण्य़ात अर्थ नाही. (६) व(७) वरून आता वाटू लागले आहे की होमि.चा उल्लेख शेवटच्या परिच्छेदात करावयाच्या ऐवजी एक नवीन तंत्र म्हणूनच करावयास पाहिजे होता. इति अलम ! (मुख्य स्रोत : विकिपेडिया ) शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 45030
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by बाळ सप्रे

हेच लिवणार होतो. हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले. मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं

पदि मधे पदि होम्योपदी .. तुम्हाला नाय चालत .. तर प्लासिबोरावांचे नाव का घालता मदी ??

ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-a…
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.

In reply to by मराठी_माणूस

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.

In reply to by मराठी_माणूस

अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >> +१ हे मी मान्य करतो !!

मित्र प्रसाद, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi... ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)!!! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.

मित्र सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो. १. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalc… २. http://www.amcofh.org/research/proving-trials ३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/ ४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन). दोन प्रश्न : आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का? एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का? सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.

In reply to by सुबोध खरे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही. ---------- * "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग... "तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."... हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे. ** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)

In reply to by कोऽहम्

२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत. गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.

In reply to by कोऽहम्

कोऽहम् साहेब आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे. Is there any proof that homeopathic medicine works? J Burgess, Norwich It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough. बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही. मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही. असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी. या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही. हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.

In reply to by सुबोध खरे

तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता. डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते. असो. माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती. असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता. एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!

In reply to by सुबोध खरे

सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.

मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन. आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.

In reply to by सामान्यनागरिक

डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी.
खरे डॉक्टर आहेत मिपावर. :)

In reply to by सामान्यनागरिक

होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे. होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत. डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे. त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते. वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे. पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची. आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.

In reply to by पोटे

"प्रचंड प्रमाणात डायल्युशन केले तर त्या द्रावणाच्या एक मिलीलिटर भागात औषधाचा एकही अणू शिल्लक नाही असे होऊ शकते" इतकाच एक छोsssटासा मुद्दा नजरेतून सुटलेला दिसतो आहे ! ;) बाकी चालू द्या.

In reply to by पोटे

पोटे साहेब आधुनिक वैद्यकशास्त्र हि कुणाचीही मक्तेदारी नाही. कुणीही व्यवस्थित महाविद्यालयात शिकावे आणि व्यवसाय करावा. फक्त आधुनिक वैद्यकशास्त्रात न देता माझा केलेले दावे मान्य होणार नाहीत. येथे बायको दाखव नाही तर जावई हो असे असते. ट्रिचुरेशन हि प्रक्रिया घन पदार्थात मोठ्या प्रमाणावर करावी लागते द्रव पदार्थात नाही हे सामान्य ज्ञान आहे. चार थेंब शाईचे बादलीभर पाण्यात टाकून पहा. समर्थन करण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ नये.

In reply to by सुबोध खरे

ट्रिचुरेशन घन , द्रवासाठी होमिओपथिक डायल्युशन असते. या दोन्ही गोष्टी पोटंटायझेशन याचा भाग अहेत. डायल्युशन याचा अर्थ नुसतेच थेंबभर औस्शध मिस्सळणे नव्हे.

In reply to by पोटे

Trituration is the name of several different methods used to process materials. In one sense, it is a form of comminution (reducing the particle size of a substance). In another sense, it is the production of a homogeneous material by mixing component materials thoroughly.
ट्रायच्युरेशन एखाद्या घन पदार्थाचे लहान कण करण्याची अथवा त्याचे द्रवातले अणू एकमेकापासून वेगळे करण्यासाठी करायच्या क्रिया असतात... ट्रायच्युरेशन अणुंची मूळ संख्या बदलू शकत नाही किंवा एका अणूचे अनेक भाग करू शकत नाही. :) कोणत्याही पदार्थाचा गुणधर्म दिसण्यासाठी / परिणाम होण्यासाठी त्याचा कमीत कमी एक तरी अणू आस्तित्वात असणे आवश्यक आहे, याबाबत दुमत नसावे !

भारत सरकारचं 'आयुष' नामक एक खातं आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दुवा पाहावा.

No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo. The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo.

हे लॉजिक तर मला फार आवडले Furthermore, since water will have been in contact with millions of different substances throughout its history, critics point out that water is therefore an extreme dilution of almost any conceivable substance. By drinking water one would, according to this interpretation, receive treatment for every imaginable condition.[

In reply to by प्रसाद१९७१

हैला ! हे अगोदर कसं नाही लक्षात आलं ?... कदाचित तेवढा विचारच केला नाही म्हणून असेल काय ?! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का साहेब मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि शहराच्या पाणीपुरवठ्यातच तितके थेंब औषध मिसळा. म्हणजे फ्लूची किंवा डोळे येणे किंवा गास्ट्रो आणि तत्सम साथीवर उपचार करण्याची गरजच लागणार नाही. सर्वच लोकांना एकदम उपचार होतील. शिव्या ह्र्युद्या विकार कर्करोग इ वर पण उपचार होऊन जातील. पण कदाचित होमियॉपथिच्या लोकांचे या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी साटेलोटे असावेत त्यामुळे कोणी असा विधायक विचार मनावर घेत नाहीत.

In reply to by सुबोध खरे

तसे नाय हो ! "जगाच्या उत्पत्तीपासून (म्हणजे अगदी हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाण्याचा पहिला अणू तयार झाला तेव्हापासून) आतापर्यंत पाण्याचे अणू कित्येक इतर अणूंच्या संपर्कात आले आहेत. त्या सगळ्यांची जाणीव/आठवण्/गुणधर्म पाण्याने साठवली असेल तर त्या सर्व अणूंमुळे मानवी शरीरावर होणारे सर्व बरे वाईट परिणाम केवळ पाणी पिण्यानेच व्हायला पाहिजेत, नाही का?" असा प्रश्न मनात आला !!! :)

कितीदाही डोकेफोड केली, तरी होमिओपथीवाले 'बरे' होणार नाहीत. वरतून अर्धवट

In reply to by आनंदी गोपाळ

कितीदाही डोकेफोड केली, तरी होमिओपथीवाले 'बरे' होणार नाहीत. वरतून अ‍ॅलोपथीचे शून्य ज्ञान असताना आम्ही डॉक्टर आहोत असे म्हणत आरोग्यमंत्र्यांना लाच देऊन अ‍ॅलोपथी औषधे वापरणार, व पेशंटचे नुकसान झाल्यावर "हा अ‍ॅलोपथीचा साईड इफेक्ट बरं का! आमच्या होमिओपथीत नस्तं असं काही" अशा थापा मारणार. लोकांचंही मला एक कळत नाही. होमिओपथीची, रामदेवबाबाची औषधे घेऊन आजार बळावून जेव्हा अ‍ॅलोपथीकडे येतात, तेव्हा गुण लागला नाही तर मारामार्‍या अन केसेस करायला तयार असतात. होमिओपथीवाल्यांमुळे जीव जायची वेळ आली तर तिथे यांचा आवाज का निघत नाही?

In reply to by आनंदी गोपाळ

वरतून अ‍ॅलोपथीचे शून्य ज्ञान असताना आम्ही डॉक्टर आहोत
ज्ञान तर शुन्य आणि त्याही पेक्षा ह्या होमिओ/आयु वाल्यांचा विश्वास नाही ना मॉडर्न मेडीसीन वर मग कशाला औषधे लिहुन देतात मॉडर्न मेडीसीन ची. किंवा शासना कडे भीक मागतायत की आम्हाला पण मॉडर्न मेडीसिन ची औषधे वापरायची परवानगी द्या म्हणुन. कमीतकमी आपल्या तत्वाशी प्रामाणीक तरी रहा. हे रोग्यांना पण लागू आहे. असेल होमिओ/आयु वर विश्वास तर काही झाले तरी खर्‍या डॉक्टर कडे जाउ नका.

मिपावरील सप्त-चिरंजीवांपैकी एक होमिओपॅथी.. बाकी चिरंजीव अस्तिक-नास्तिक, पुणे-मुंबई, स्त्री-पुरुष, जातपात, राजकारण, गांधी-गोडसे

In reply to by गवि

शाका-मांसा वर चर्चा झाली नाही बरेच दिवसात, तेच गे-लेस्बियनबाबत, लिव्ह्-इन मात्र सध्या हॉट आहे. साली एकदा रणधुमाळी होऊनच जाऊ दे वरच्या विषयांबद्दल गविबद्दलचा आदर दुणावला. अभ्यासाला लागतो आता कसुन

एका जवळच्या नात्यातल्या तरुण मुलाला दोनदा वेगवेगळ्या कारणासाठी (एकदा कावीळ आणि एकदा ताप्)दोन वेगवेगळ्या अ‍ॅलोपॅथिक डॉ. कडुन जे उपचार (?) मिळाले , त्यांनी मुळ रोग बरा होणे बाजुलाच राहीले पण त्या औषधांचा प्रचंड त्रास झाला . ते सर्व मग आयुर्वेदिक उपचारानी निस्तरावे लागले

कोविड-१९ च्या सध्याच्या अर्सेनिकम अल्बम ३०सी या होमिओपथी औषधाची प्रतिकारशक्तीवाढी साठी चर्चा सुरु आहे. आपल्यापैकी कोणी हे औषध वापरून पाहिले आहे काय ? काही परिणाम जाणवले का ?