Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शरद on Wed, 09/24/2014 - 16:49
लेखनविषय (Tags)
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
होमिओपाथी ( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !) माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख. इथे होमिओपाथी ची मुलतवे व त्यावर घेतले गेलेले आक्षेप यांचाच विचार आहे. संदर्भ दिले नाहीत, जालावर भरपूर माहिती आहे. हनिमन (१७५५-१८४३) हा जर्मन माणुस "होमिओपाथी " चा (या पुढे होमि.) जनक. त्याने घालून दिलेल्या मार्गावरून होमि,ची वाटचाल आज दोनशे वर्षे चालू आहे. दोन महत्वाची तत्वे जोडण्यात आली. त्यांचा उल्लेख पुढे केला आहे. माझ्यावरील आक्षेपात इतकी वर्षे फसवणुक होते आहे काय ? १८० कॉलेजेस आहेत इ. गोष्टी नमुद करण्यात आल्या आहेत. पहिल्याचे उत्तर हो व दुसर्‍याचे शिक्षणसम्राट पैसे मिळत असतील तर आणखी १८०० कॉलेजेस काढतील. असल्या गोष्टींनी होमि. शास्त्रसंमत ठरत नाही. . प्रथम होमि.ची गृहितके व त्यात मिळवलेली नवीन तत्वे पाहू. (१) औषध अल्प प्रमाणात दिले तर त्याची उपयोगिता वाढते. म्हणून औषध पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये विरघळवून ते dilute करावयाचे .याच्या दोन पद्धती. पहिली x किंवा D. यात दशमान पद्धती वापरली जाते. १ ग्राम औषध १० ग्राम पाण्यात विरघळवा, त्याची Power झाली 1 x किंवा 1D. आता हे औषध आणखी ९० ग्राम पाणी घालून १०० ग्राम करा. याला म्हणावयाचे 2 x. हे जास्त पॉवरफुल. पुढचे १००० मध्ये १ म्हणजे 3 x. दुसर्‍या पद्धतीत १० ऐवजी १०० धरा, म्हणजे १०० मध्ये १. त्याला म्हणतात 1C 2C म्हणजे १०० x १०० = १०००० मध्ये १. 3C म्हणजे १० लाखात १. आले लक्षात ? आता हे असे औषध साखरेच्या लहानशा गोळीवर शिंपडून तुम्हाला "औषध" म्हणून देतात. बहुतेक डॉक्टर तुम्हाला कोणते औषध , काय Power चे दिले सांगत नाहीत पण बाजारात विकत घ्यावयाला गेलात तर बाटलीवर लिहलेले आढळेल. 5C च्या पुढचे औषद इतके Diluted असते की ते पाण्यात नसतेच म्हटले तरी चालेल. काचेच्या बाटलीत ठेवलेल्या डिस्टिस्ड पाण्यात विरघळ्लेले क्षारच जास्त असतात. तेव्हा अशा पाण्यात तयार केलेल्या औषधाला काय म्हणणार ? Hahnemann advocated 30C dilutions for most purposes (that is, dilution by a factor of 10 raised to60). In Hahnemann's time, it was reasonable to assume the remedies could be diluted indefinitely, as the concept of the atom or molecule as the smallest possible unit of a chemical substance was just beginning to be recognized. The greatest dilution reasonably likely to contain even one molecule of the original substance is 12C . असो (२) होमी.चे औषध देण्याकरिता डॉक्टर दोन पद्धती अवलंबतात. एक औषध थोड्या थोड्या दिवसांनी द्यावयाचे. त्याचा परिनाम बघण्यासाठी. तर का ही जण औषध सातत्याने घेण्यास सांगतात. नक्की काय करावयाचे ? (३) नवीन औषध गुणकारी आहे की नाही बघण्याकरिता ट्रायल घेतांना रोग्यांच्या कळपातील काही जणांना औषध नसलेले डोस देतात त्याला म्हाणतात .placebo . कल्पना अशी की रोग्याला आपण खरे औषध घेतो असेच वाटत असतांना काही फरक पडतो का ? निरनिराळ्या देशात, निरनिराळ्या काळी घेण्यात आलेल्या ट्रायल्समध्ये असे आढळून आले आहे की होमि. औषधे व placebo यांच्या परिणामात काहीही फरक नाही. जेथे फरक आढलला तेथे कारण पुढील प्रमाणे One of the earliest double blind studies concerning homeopathy was sponsored by the British government during World War II in which volunteers tested the efficacy of homeopathic remedies against diluted mustard gas burns.[144] No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo.[5][145] The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect.[16][49]:206[146] A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo Health organisations such as the UK's National Health Service,[169] the American Medical Association,[170] and the FASEB[131] have issued statements of their conclusion that there is "no good-quality evidence that homeopathy is effective as a treatment for any health condition."[169] (४)सिंचोनाच्या सालीने मलेरिआ बरा होतो म्हणून हनिमनने तशी साल स्वत: इंजेक्शनच्या रुपाने घेतली व त्याला मलेरिआ झाल्यासारखे परिNaaम दिसून आले. त्यावरून त्याने "law of similars " अथवा " like cures like " हा नियम घातला. या नियमाबदल Hahnemann's law of similars is a postulate rather than a scientific law. असे म्हणता येईल. (५) पुढील परिच्छेदाबद्द्दल मला काही बोलावयाचे नाही.होमि.चे पुरस्कर्ते प्रकाश टाकू शकतील काय? Some modern homeopaths have considered more esoteric bases for remedies, known as "imponderables" because they do not originate from a substance, but from electromagnetic energy presumed to have been "captured" by alcohol or lactose. Examples include X-rays[68] and sunlight.[69] Some homeopaths also use techniques that are regarded by other practitioners as controversial. These include "paper remedies", where the substance and dilution are written on pieces of paper and either pinned to the patients' clothing, put in their pockets, or placed under glasses of water that are then given to the patients, as well as the use of radionics to prepare remedies. Such practices have been strongly criticised by classical homeopaths as unfounded, speculative, and verging upon magic and superstition (६) water memory, डायल्युशन वर फार टीका होऊ लागल्यावर एक नवीन सिद्धांत मांडला गेला. पाणी औषध आपल्या स्मरणात ठेवते. नंतर कितीही डायल्युशन केलेत तरी, औषध शिल्लक राहिले नाही तरी, पाणी या स्मरणाने तुम्हाला गुण देते. तुम्हाला काय वाटते ते मला माहीत नाही पण मला तर हे बापू-बुवा-महाराज यांचे पाय धुतलेले पाणी "तीर्थ" म्हणून कसे गुणकारी असते याची खात्री देणार्‍या भक्तांचीच आठवण होते ! (७) होमि.मध्ये Miasms म्हणून एक भानगड असते. मला काही उलगडा झालेला नाही, प्रतिसादांमध्ये कोणी जाणकार प्रकाश पाडू शकेल काय ? याचा अर्थ असा आहे का की होमिओपाथी सर्वस्वी निरुपयोगी आहे ? नाही, तसे नाही. तिचाही उपयोग काही दुखण्यात होतो. बर्‍याच वेळी दुखणी मानसिक असतात. म्हणजे रुग्णाला औषधाची नाही तर मानसिक सहानुभूतीची गरज असते. (पूर्वी तरी) होमिओपाथीचे डॉक्टर रुग्णाची चौकशी करावयाचे, थोडा वेळ का होईना त्याला आपल्याला विचारणारे कोणी तरी आहे याचे समाधान मिळावयाचे व एकदा डॉक्टरवर विश्वास बसला की त्याने दिलेल्या कोणत्याही गोळ्यांनी रुग्णाला बरे वाटावयाचे. रोग श्रद्धेनेच बरा व्हावयाचा. काही रोग सायक्लिक असतात.सुरवातीला कमी, मग जास्त , परत कमी. तुम्ही मधल्या वेळी गेलात तर अशा गोळ्यांनीच आपल्याला बरे वाटले असेही तुम्हाला वाटू शकते. सकाळमध्ये एका डागदरीणीने लिहले होते " एकदा राती उशिरा मला एक फोन आला. नेहमी येणार्‍या एका मुलीच्या वडिलांचा. त्यांनी गयावया केली म्हणून त्यांना घरी बोलावले. मुलीला तपासले, योग्य ते औषध लिहून दिले आणि त्यांना विचारले "आता रात्री तुम्हाला औषध कुठे मिळणार ?" ते म्हणाले, " औषध कोण आणणार ? आम्ही कधीच आणत नाही, तुम्ही तपासले की मुलीला बरे वाटते." घ्या ! फार वाढवण्य़ात अर्थ नाही. (६) व(७) वरून आता वाटू लागले आहे की होमि.चा उल्लेख शेवटच्या परिच्छेदात करावयाच्या ऐवजी एक नवीन तंत्र म्हणूनच करावयास पाहिजे होता. इति अलम ! (मुख्य स्रोत : विकिपेडिया ) शरद
  • Log in or register to post comments
  • 44786 views

प्रतिक्रिया

Submitted by पोटे on Fri, 09/26/2014 - 11:16

In reply to कुठल्याही आयुर्वेदिक कींवा by प्रसाद१९७१

Permalink

.

भ्रम आहे तुमचा. कालच आयु डॉक्टरला विचारलं. तो बोल्ला क्लिनिकल ट्रायल होतात. आयुर्वेदिक साठीही. होमिओ बद्दलही संबंधिताला विचारेन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 11:29

In reply to . by पोटे

Permalink

मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि

मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवलात? एखादे उदाहरण देत का नाही तुमचा तो वैदु. इथे बघा काही नाव सापडतय का? http://www.cdsco.nic.in/forms/list.aspx?lid=1820&Id=11
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Fri, 09/26/2014 - 14:16

In reply to मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि by प्रसाद१९७१

Permalink

.

तुमचे क्वालिफिकेशन काय ? तो एम डी आयु. आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 14:18

In reply to . by पोटे

Permalink

एम्.डी. आयु च आहे ना, मग

एम्.डी. आयु च आहे ना, मग प्रश्न नाही. वैदूच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 09/26/2014 - 18:07

In reply to एम्.डी. आयु च आहे ना, मग by प्रसाद१९७१

Permalink

ऑऊच!

फारच धाडसी विधान! लोक वैदू बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि सरकार त्यांना पदवी देऊन धंदा करायला परवानगीही देतं ही माहिती णवीण आणि फारच भयंकर आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 09/26/2014 - 12:08

In reply to कुठल्याही आयुर्वेदिक कींवा by प्रसाद१९७१

Permalink

क्लिनिकल ट्रायल वगैरे

क्लिनिकल ट्रायल वगैरे केलेल्या बहुराष्ट्रिय औषध कंपन्यांचे काळे धंदे इथे वाचा http://www.loksatta.com/lokrang-news/drugs-companies-exploit-indian-guinea-pigs-44798/
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/26/2014 - 13:24

In reply to कुठल्याही आयुर्वेदिक कींवा by प्रसाद१९७१

Permalink

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही. मॉडर्न मेडिसीनमधली औषधे भारतात विकण्याअगोदर त्यांची भारतिय (किंवा बर्‍याच इतर देशातही स्थानिक) रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करणे कायद्याने व आरोग्यदृष्टीने जरूर असते... केवळ अमेरिकन ट्रायल यशस्वी झाली म्हणून ती भारतात किंवा इतर अनेक देशांत आपोआप वैध होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातल्या विविध भागांत राहणार्‍या लोकांमधले जैववैविध्य आहे. जैव (जेनेटिक) वैविध्यामुळे एकाच औषधाचे--- जे आधुनिक वैद्यकशास्त्रात रासायनिक अणू (केमिकल मॉलेक्युल) या असे संबोधले जाते--- वेगळी जनुकरचना असणार्‍या माणसांमध्ये वेगळे परिणाम दिसतात... उदा. औषध शरिरात शोषण होण्यातला (शोषलेली मात्रा आणि त्यासाठी लागलेला वेळ) फरक, जैववैविध्यामुळे शरीरावर होणार्‍या परिणामातिल फरक, औषधाचे शरिरात चयापचय होण्यातला फरक, शरिरात औषध शिल्लक राहण्यातला (मात्रा आणि वेळ) फरक, औषध आणि त्याचे विघटन झालेले भाग शरीरातून बाहेर (मूत्र, इत्यादींतून) फेकले जाण्यातला फरक, औषध आणि त्याच्या शरीरात विधटित झालेल्या भागांचे शरीरावरचे दूरगामी परिणाम, इत्यादी.
  • Log in or register to post comments

Submitted by कोऽहम् on Fri, 09/26/2014 - 16:57

In reply to कुठल्याही आयुर्वेदिक कींवा by प्रसाद१९७१

Permalink

क्लिनिकल ट्रायल

मित्र, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही ) आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस ) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 09/25/2014 - 16:55

In reply to होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप by प्रसाद१९७१

Permalink

भारतात मात्र स्वाईन फ्लु वर

भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on गुरुवार, 09/25/2014 - 16:59

In reply to भारतात मात्र स्वाईन फ्लु वर by अनुप ढेरे

Permalink

भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी

भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...
लस आणि औषध वेगळी
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 09/25/2014 - 17:03

In reply to भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी by प्रसाद१९७१

Permalink

बर

याबद्दल काय मत आहे? http://www.nhs.uk/medicine-guides/pages/medicineoverview.aspx?condition=Swine%20flu&medicine=tamiflu
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 09/26/2014 - 14:15

In reply to बर by अनुप ढेरे

Permalink

प्रसादराव, तुमच्या मतासाठी

प्रसादराव, तुमच्या मतासाठी आतूर आहे. साँगा ना...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 20:07

In reply to प्रसादराव, तुमच्या मतासाठी by अनुप ढेरे

Permalink

टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे

टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे Cure नाही. ते Preventor म्हणुन काम करते. टॅमीफ्लु हे सर्व च टाइप च्या फ्लु साठी preventive medicine म्हणुन वापरु शकतात. फ्लुच्या वाय्ररस शी संपर्क येउन २ दिवस झाले असतील तर टॅमी फ्लु ने फार फरक पडत नाही. माझ्या मुलीला स्वाइन फ्लु झाला होता त्यामुळे मी First Hand माहीतीवर बोलतो आहे. गमतीची गोष्ट म्हणजे टॅमीफ्लु बडीशेपे पासुन बनवतात असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुहास पाटील on Tue, 09/30/2014 - 19:33

In reply to टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे by प्रसाद१९७१

Permalink

मग इतके लोक स्वाइन फ्लु ने

मग इतके लोक स्वाइन फ्लु ने मरत कसे आहेत पुण्यात ?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 09/25/2014 - 16:57

In reply to होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप by प्रसाद१९७१

Permalink

http://www.nhs.uk/Conditions

http://www.nhs.uk/Conditions/Pandemic-flu/Pages/Introduction.aspx हेही एक दिसलं.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on गुरुवार, 09/25/2014 - 16:37

Permalink

रटाळ टॉपिक

रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 09/25/2014 - 17:04

In reply to रटाळ टॉपिक by आदिजोशी

Permalink

अ‍ॅलोपॅथी. कारण तेवढी एकच खरी

अ‍ॅलोपॅथी. कारण तेवढी एकच खरी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/25/2014 - 18:13

In reply to अ‍ॅलोपॅथी. कारण तेवढी एकच खरी by मृत्युन्जय

Permalink

मग वापरली का जात नाही? मिपावर

मग वापरली का जात नाही? मिपावर अ‍ॅलॉपॅथिक डॉक्टर 'कार्यरत' नाहीत काय?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 09/26/2014 - 18:36

In reply to रटाळ टॉपिक by आदिजोशी

Permalink

रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या

रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी? >>> +१०१५४५४६६९७२१३५४६२३१३५४७१२३५४६५४५४३२१६३८५५६४२५४५६७४६४३२४६८७४६५४३५४६८७८
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 09/25/2014 - 17:35

Permalink

औषधांचे जाउ द्या , ते तसेही

औषधांचे जाउ द्या , ते तसेही आपण फक्त बरे नसतानाच घेतो. पण जे अन्न वर्षानुवर्ष आपण पोटात ढकलतो, जसे पोळी,भाजी, वरण भात ईत्यादी, त्यांची कोणत्या लॅब मधे क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ? शिवाय ते किति प्रमाणात खायला हवे ह्याचे काही मोजमाप आहे का ? जसे कि पोळी ... ग्राम, भात्....ग्राम ई.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on गुरुवार, 09/25/2014 - 17:37

In reply to औषधांचे जाउ द्या , ते तसेही by मराठी_माणूस

Permalink

औषधाचे जाऊ द्या कसे? आपण

औषधाचे जाऊ द्या कसे? आपण उपचार पद्धती बद्दल च बोलतो आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 09/25/2014 - 18:05

In reply to औषधाचे जाऊ द्या कसे? आपण by प्रसाद१९७१

Permalink

उपचार आणि रोजचा आहार दोन्हीही

उपचार आणि रोजचा आहार दोन्हीही आपल्या तब्येती साठीच आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on गुरुवार, 09/25/2014 - 22:42

Permalink

मंत्र तंत्रावर लिहिणार्‍याला

मंत्र तंत्रावर लिहिणार्‍याला होमिओपाथी खटकावी याचं आश्चर्य वाटतय!!
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Fri, 09/26/2014 - 00:39

In reply to मंत्र तंत्रावर लिहिणार्‍याला by बाळ सप्रे

Permalink

.

हेच लिवणार होतो. हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले. मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं
  • Log in or register to post comments

Submitted by पहाटवारा on Fri, 09/26/2014 - 05:36

Permalink

पदि मधे पदि होम्योपदि

पदि मधे पदि होम्योपदी .. तुम्हाला नाय चालत .. तर प्लासिबोरावांचे नाव का घालता मदी ??
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Fri, 09/26/2014 - 13:03

Permalink

ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे

ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-and-good-diet-to-be-away-from-diseases-944760/
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/26/2014 - 13:30

In reply to ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे by मराठी_माणूस

Permalink

हे तर फार पूर्वीपासून

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 09/26/2014 - 18:37

In reply to ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे by मराठी_माणूस

Permalink

अपुरी झोप, दूषित आणि अवेळी

अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >> +१ हे मी मान्य करतो !!
  • Log in or register to post comments

Submitted by कोऽहम् on Fri, 09/26/2014 - 17:02

Permalink

क्लिनिकल ट्रायल

मित्र प्रसाद, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi... ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)!!! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 17:26

In reply to क्लिनिकल ट्रायल by कोऽहम्

Permalink

अहो ही होमिओपाथीची जहिरात

अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.
  • Log in or register to post comments

Submitted by कोऽहम् on Fri, 09/26/2014 - 18:02

Permalink

प्रमाणीकृत दुवे

मित्र सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो. १. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalcode=acupmed%7Camiajnl%7Cannrheumdis%7Carchdischild%7Cbjophthalmol%7Cbjsports%7Ccasereports%7Cbmjopen%7Cbmjdrc%7Cbmjresp%7Cbmjspcare%7Cbmjqir%7Cdtb%7Cebmed%7Cebmental%7Cebnurs%7Cedpract%7Cejhpharm%7Cemermed%7Cfamilyplanning%7Cfetalneonatal%7Cflgastro%7Cgutjnl%7Cheartasia%7Cheartjnl%7Cinjuryprev%7Cinpract%7Cjclinpath%7Cjech%7Cjmedgenet%7Cjnnp%7Cjramc%7Clupusscimed%7Cmedethics%7Cmedhum%7Cmolpath%7Cneurintsurg%7Coemed%7Copenhrt%7Cpostgradmedj%7Cpractneurol%7Cqhc%7Csextrans%7Cthoraxjnl%7Ctobaccocontrol%7Cvetrec%7Cvetreccr%7Cvetreco%7Cbmj २. http://www.amcofh.org/research/proving-trials ३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/ ४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन). दोन प्रश्न : आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का? एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का? सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. कळावे, मित्र
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/26/2014 - 18:25

In reply to प्रमाणीकृत दुवे by कोऽहम्

Permalink

clinical trials

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/26/2014 - 19:18

In reply to clinical trials by सुबोध खरे

Permalink

CONCLUSIONS--At the moment

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही. ---------- * "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग... "तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."... हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे. ** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 18:54

In reply to प्रमाणीकृत दुवे by कोऽहम्

Permalink

२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी

२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत. गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/26/2014 - 19:02

In reply to प्रमाणीकृत दुवे by कोऽहम्

Permalink

कोऽहम् साहेब

कोऽहम् साहेब आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे. Is there any proof that homeopathic medicine works? J Burgess, Norwich It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough. बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही. मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही. असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी. या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही. हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Sat, 09/27/2014 - 16:12

In reply to कोऽहम् साहेब by सुबोध खरे

Permalink

.

तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता. डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते. असो. माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती. असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता. एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Mon, 09/29/2014 - 10:11

In reply to कोऽहम् साहेब by सुबोध खरे

Permalink

सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ

सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्यनागरिक on Fri, 09/26/2014 - 18:14

Permalink

मिपावर कोणी डाक्टर नाहीत काय?

मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन. आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 09/26/2014 - 18:24

In reply to मिपावर कोणी डाक्टर नाहीत काय? by सामान्यनागरिक

Permalink

डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल

डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी.
खरे डॉक्टर आहेत मिपावर. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Sat, 09/27/2014 - 10:09

In reply to मिपावर कोणी डाक्टर नाहीत काय? by सामान्यनागरिक

Permalink

.

होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे. होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत. डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे. त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते. वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे. पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची. आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/27/2014 - 13:16

In reply to . by पोटे

Permalink

"प्रचंड प्रमाणात डायल्युशन

"प्रचंड प्रमाणात डायल्युशन केले तर त्या द्रावणाच्या एक मिलीलिटर भागात औषधाचा एकही अणू शिल्लक नाही असे होऊ शकते" इतकाच एक छोsssटासा मुद्दा नजरेतून सुटलेला दिसतो आहे ! ;) बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 09/27/2014 - 13:18

In reply to . by पोटे

Permalink

पोटे साहेब

पोटे साहेब आधुनिक वैद्यकशास्त्र हि कुणाचीही मक्तेदारी नाही. कुणीही व्यवस्थित महाविद्यालयात शिकावे आणि व्यवसाय करावा. फक्त आधुनिक वैद्यकशास्त्रात न देता माझा केलेले दावे मान्य होणार नाहीत. येथे बायको दाखव नाही तर जावई हो असे असते. ट्रिचुरेशन हि प्रक्रिया घन पदार्थात मोठ्या प्रमाणावर करावी लागते द्रव पदार्थात नाही हे सामान्य ज्ञान आहे. चार थेंब शाईचे बादलीभर पाण्यात टाकून पहा. समर्थन करण्यासाठी कोणत्याही पातळीला जाऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by पोटे on Sat, 09/27/2014 - 16:03

In reply to पोटे साहेब by सुबोध खरे

Permalink

.

ट्रिचुरेशन घन , द्रवासाठी होमिओपथिक डायल्युशन असते. या दोन्ही गोष्टी पोटंटायझेशन याचा भाग अहेत. डायल्युशन याचा अर्थ नुसतेच थेंबभर औस्शध मिस्सळणे नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 09/27/2014 - 13:42

In reply to . by पोटे

Permalink

Trituration is the name of

Trituration is the name of several different methods used to process materials. In one sense, it is a form of comminution (reducing the particle size of a substance). In another sense, it is the production of a homogeneous material by mixing component materials thoroughly.
ट्रायच्युरेशन एखाद्या घन पदार्थाचे लहान कण करण्याची अथवा त्याचे द्रवातले अणू एकमेकापासून वेगळे करण्यासाठी करायच्या क्रिया असतात... ट्रायच्युरेशन अणुंची मूळ संख्या बदलू शकत नाही किंवा एका अणूचे अनेक भाग करू शकत नाही. :) कोणत्याही पदार्थाचा गुणधर्म दिसण्यासाठी / परिणाम होण्यासाठी त्याचा कमीत कमी एक तरी अणू आस्तित्वात असणे आवश्यक आहे, याबाबत दुमत नसावे !
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Fri, 09/26/2014 - 18:57

Permalink

'आयुष'

भारत सरकारचं 'आयुष' नामक एक खातं आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दुवा पाहावा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 19:09

Permalink

हे विकी वरचे बघा

No individual preparation has been unambiguously shown by research to be different from placebo. The methodological quality of the primary research was generally low, with such problems as weaknesses in study design and reporting, small sample size, and selection bias. Since better quality trials have become available, the evidence for efficacy of homeopathy preparations has diminished; the highest-quality trials indicate that the remedies themselves exert no intrinsic effect A review conducted in 2010 of all the pertinent studies of "best evidence" produced by the Cochrane Collaboration concluded that "the most reliable evidence – that produced by Cochrane reviews – fails to demonstrate that homeopathic medicines have effects beyond placebo.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 09/26/2014 - 19:10

Permalink

हे लॉजिक तर मला फार आवडले

हे लॉजिक तर मला फार आवडले Furthermore, since water will have been in contact with millions of different substances throughout its history, critics point out that water is therefore an extreme dilution of almost any conceivable substance. By drinking water one would, according to this interpretation, receive treatment for every imaginable condition.[
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/26/2014 - 19:21

In reply to हे लॉजिक तर मला फार आवडले by प्रसाद१९७१

Permalink

हैला ! हे अगोदर कसं नाही

हैला ! हे अगोदर कसं नाही लक्षात आलं ?... कदाचित तेवढा विचारच केला नाही म्हणून असेल काय ?! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 09/26/2014 - 20:29

In reply to हैला ! हे अगोदर कसं नाही by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एक्का साहेब

एक्का साहेब मी मागे एका प्रतिसादात म्हटले होते कि शहराच्या पाणीपुरवठ्यातच तितके थेंब औषध मिसळा. म्हणजे फ्लूची किंवा डोळे येणे किंवा गास्ट्रो आणि तत्सम साथीवर उपचार करण्याची गरजच लागणार नाही. सर्वच लोकांना एकदम उपचार होतील. शिव्या ह्र्युद्या विकार कर्करोग इ वर पण उपचार होऊन जातील. पण कदाचित होमियॉपथिच्या लोकांचे या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी साटेलोटे असावेत त्यामुळे कोणी असा विधायक विचार मनावर घेत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 09/26/2014 - 20:37

In reply to एक्का साहेब by सुबोध खरे

Permalink

तसे नाय हो !

तसे नाय हो ! "जगाच्या उत्पत्तीपासून (म्हणजे अगदी हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाण्याचा पहिला अणू तयार झाला तेव्हापासून) आतापर्यंत पाण्याचे अणू कित्येक इतर अणूंच्या संपर्कात आले आहेत. त्या सगळ्यांची जाणीव/आठवण्/गुणधर्म पाण्याने साठवली असेल तर त्या सर्व अणूंमुळे मानवी शरीरावर होणारे सर्व बरे वाईट परिणाम केवळ पाणी पिण्यानेच व्हायला पाहिजेत, नाही का?" असा प्रश्न मनात आला !!! :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com