माझा गणेश मूर्ती संग्रह

Primary tabs

अजया's picture
अजया in विशेष
29 Aug 2014 - 12:08 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो. (नेहेमीचा कॅमेरा बाहरेनला राह्यल्यामुळे मोबाईलवर काढले आहेत.तरी गोड मानून घ्यावे ही विनंती.)
हा टेराकोटा प्रकरच्या गणपतींचा संग्रह.यातल्या काही मूर्ती कलकत्त्याच्या आहेत.

.

...

.

...

.

हे बाप्पा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे

.

हे शंख शिंपल्यातले.गोवा आणि केरळहून आणलेले.

.

...

.

काचेचे गणपती

.

वेगवेगळ्या प्रकारचे दगड ,ग्रॅनाईट्,संगमरवर, कडाप्प्याचा दगड इ.

.

वायरमेश्,पेपर असं एकत्र असणारे गणपती,ओरिसामधले

.

हे लाकडावर कोरुन केलेले. नारळाचे लाकूड्,चंदन इ.हे केरळ आणि कर्नाटकातले आहेत.

.

हे सिरॅमिकचे बाप्पा

.

तांब्या पितळ्याच्या काही मूर्ती

.

हे अँटिक मिनिएचर बाप्पा!खूप लहान मुर्ती आहेत या.(अँटिक अर्थातच तुळशीबाग ,पुणें ;) )

.

हे फायबर गणेश!

.

गणपतीबाप्पा मोरया!

प्रतिक्रिया

सखी's picture

29 Aug 2014 - 12:13 am | सखी

सगळेच बाप्पा छान.
मी पयली की काय? :))

किसन शिंदे's picture

29 Aug 2014 - 12:16 am | किसन शिंदे

संग्रह मस्तच आहे.

खटपट्या's picture

29 Aug 2014 - 2:25 am | खटपट्या

आवडला सन्ग्रह!!

रेवती's picture

29 Aug 2014 - 2:45 am | रेवती

सुरेख गणेशमूर्ती आहेत. टेराकोटाच्या फोटूतील लहान मुलासारखे पालथे पडलेले बाप्पा आवडले.

भिंगरी's picture

29 Aug 2014 - 2:52 pm | भिंगरी

मलाही तोच बाप्पा जास्त आवडला

कंजूस's picture

29 Aug 2014 - 5:38 am | कंजूस

व्वाव! चांगला आहे छंद.

इनिगोय's picture

29 Aug 2014 - 6:49 am | इनिगोय

वा मस्तच!
कधी भेटतेयस सांग, तुझ्याकडच्या संग्रहात थोडी भर घालेन मीपण. :-)

अजया's picture

29 Aug 2014 - 7:05 am | अजया

शुभस्य शीघ्रम् !!

सस्नेह's picture

29 Aug 2014 - 8:12 am | सस्नेह

काय सुरेख संग्रह आहे !
मी नक्की येणार बघायला.

मदनबाण's picture

29 Aug 2014 - 8:52 am | मदनबाण

मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2014 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा...! भारी संग्रह. आवडले सर्व बाप्पा.
गणेश लेखमालिकेतलं पहिलं पुष्प भारीच.
-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

29 Aug 2014 - 9:51 am | प्रचेतस

संग्रह आवडला.

स्पा's picture

29 Aug 2014 - 10:18 am | स्पा

सहीच कलेक्शन

स्मिता चौगुले's picture

29 Aug 2014 - 11:55 am | स्मिता चौगुले

माझा गणेशा झालायं. एकही फोटो दिसतं नाही :(

आतिवास's picture

29 Aug 2014 - 12:12 pm | आतिवास

संग्रह आवडला.
पण त्याची सफाई म्हणजे एक कामच असणार तुमच्या घरातल्या लोकांसाठी!

मधुरा देशपांडे's picture

29 Aug 2014 - 1:32 pm | मधुरा देशपांडे

संग्रह आवडला. :)

शिद's picture

29 Aug 2014 - 2:17 pm | शिद

|| गणपती बाप्पा मोरया ||

भाते's picture

29 Aug 2014 - 2:35 pm | भाते

सध्या काही फोटो दिसत नसल्यामुळे पुन्हा थोडया वेळाने येऊन बघतो.

गणेश मूर्तीं चा संग्रह आवडला

मनुराणी's picture

29 Aug 2014 - 5:46 pm | मनुराणी

सर्व बाप्पा छान आहेत. आणि सगळीकडून जमवून सांभाळून ठेवण्याची कल्पना पण छान.

सानिकास्वप्निल's picture

29 Aug 2014 - 8:59 pm | सानिकास्वप्निल

सुंदर गणेशमूर्ती आहेत.
सुरेख संग्रह ++११११
:)

आयुर्हित's picture

29 Aug 2014 - 9:10 pm | आयुर्हित

टेराकोटातील तीन मुखी लाकडी पंचमुखी गणपती प्रथमच पहातोय.
संग्रह आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2014 - 11:16 pm | अत्रुप्त आत्मा

पहिल्या फोटुतला पाय वर केलेला :D आणि दुसर्‍यातला झाडावरचा..सुप्परलाइक! http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

मुक्त विहारि's picture

29 Aug 2014 - 11:37 pm | मुक्त विहारि

यानबूत बसल्या बसल्या २१पेक्षा जास्त बाप्पांचे दर्शन झाले...

सुहास झेले's picture

30 Aug 2014 - 12:14 am | सुहास झेले

मस्तच :)

चौकटराजा's picture

30 Aug 2014 - 9:08 am | चौकटराजा

यात भर म्हणून आपापल्याकडील एक गणेश अजयाला पोचता करावा. मग संग्रह योग्य कलाकृति वाटल्यास त्या संग्रहात
तो शोभून दिसेल.

कविता१९७८'s picture

30 Aug 2014 - 10:37 am | कविता१९७८

खुपच सुंदर .

मस्तच ओ! संग्रह आवडला. जपायला कसरत करावी लागणार पण.

गणपती गणपतीच्या वेगवेगळ्या रुपात नि फॉर्म मध्ये छान वाटतो.

अनन्न्या's picture

30 Aug 2014 - 7:33 pm | अनन्न्या

सही कलेक्शन!

कवितानागेश's picture

30 Aug 2014 - 11:13 pm | कवितानागेश

सुंदर आहेत सगळेच बाप्पा. दुसर्‍या फोटोत बाप्पा आणि मूषक लपाछपी खेळत आहेत असं वाटतय. फारच गोड! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2014 - 12:40 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर बाप्पासंग्रह !

सविता००१'s picture

1 Sep 2014 - 11:57 am | सविता००१

गं अजया

इशा१२३'s picture

1 Sep 2014 - 11:58 am | इशा१२३

मस्त संग्रह..सगळे बाप्पा सुरेख!

पैसा's picture

1 Sep 2014 - 2:29 pm | पैसा

सगळ्या मूर्त्या आवडल्या!

एस's picture

1 Sep 2014 - 6:08 pm | एस

आवडेश. एक इन जनरल शंका अशा संग्रहकांना, ह्या मूर्त्या केवळ कलादृष्टीने संग्रही ठेवल्या जातात की त्यांची पूजा वगैरे होते? नसेल होत तर का होत नाही? की तसे काही बंधन नाही? आणि त्यात जर उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर?

मी मला अावडल्या म्हणून संग्रह केला आहे,मूर्तींचा.उजवी डावी सोंड असे काही घेताना बघत नाही.मला गणपतीच्या विविध रुपांचं आकर्षण आहे.पूजा कोणत्याच मूर्तीची होत नाही.मला त्यातल्या कर्मकांडात इंटरेस्टही नाही.बंधन असल्यास काही कल्पना नाही,असलं तरी पाळलं जाणार नाहीच.मग कशाला त्यात पडा!!

एस's picture

1 Sep 2014 - 11:01 pm | एस

आपला छंद उत्तरोत्तर असाच वृद्धींगत होत राहो. केवळ मूर्त्याच नव्हे तर वेगवेगळ्या रूपातील विशेषतः अमूर्त स्वरूपातील गणेश-आकार जमा करणेही एक वेगळा अनुभव असू शकेल. चित्रे म्हणा किंवा काष्ठशिल्पे इत्यादी. ह्या दृष्टीनेही संग्रह करून पहा कधी. शुभेच्छा... :-)

मी कस्तुरी's picture

2 Sep 2014 - 12:03 pm | मी कस्तुरी

अजया ताई, खूप छान संग्रह… सगळ्या मूर्ती खूपच सुंदर आहेत आणि हा संग्रह बाप्पासारखाच खूप वाढूदे :)