मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझा गणेश मूर्ती संग्रह

अजया · · विशेष
बर्‍याच वर्षांपासुन गणेश मुर्तींचा संग्रह करण्याचा माझा छंद आहे. जिथे जातो तिथली गणेश मुर्ती आणली जायची. बर्‍याच मुर्ती जमा झाल्यावर या संग्रहाचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. त्यातल्याच काही विविध माध्यमातल्या मुर्तींचे हे फोटो. (नेहेमीचा कॅमेरा बाहरेनला राह्यल्यामुळे मोबाईलवर काढले आहेत.तरी गोड मानून घ्यावे ही विनंती.) हा टेराकोटा प्रकरच्या गणपतींचा संग्रह.यातल्या काही मूर्ती कलकत्त्याच्या आहेत. . ... . ... . हे बाप्पा प्लॅस्टर ऑफ पॅरीसचे . हे शंख शिंपल्यातले.गोवा आणि केरळहून आणलेले. . ... . काचेचे गणपती . वेगवेगळ्या प्रकारचे दगड ,ग्रॅनाईट्,संगमरवर, कडाप्प्याचा दगड इ. . वायरमेश्,पेपर असं एकत्र असणारे गणपती,ओरिसामधले . हे लाकडावर कोरुन केलेले. नारळाचे लाकूड्,चंदन इ.हे केरळ आणि कर्नाटकातले आहेत. . हे सिरॅमिकचे बाप्पा . तांब्या पितळ्याच्या काही मूर्ती . हे अँटिक मिनिएचर बाप्पा!खूप लहान मुर्ती आहेत या.(अँटिक अर्थातच तुळशीबाग ,पुणें ;) ) . हे फायबर गणेश! .

गणपतीबाप्पा मोरया!


वाचन 12428 प्रतिक्रिया 39
Permalink

सुरेख गणेशमूर्ती आहेत. टेराकोटाच्या फोटूतील लहान मुलासारखे पालथे पडलेले बाप्पा आवडले.
Permalink

वा मस्तच! कधी भेटतेयस सांग, तुझ्याकडच्या संग्रहात थोडी भर घालेन मीपण. :-)
Permalink

वा...! भारी संग्रह. आवडले सर्व बाप्पा. गणेश लेखमालिकेतलं पहिलं पुष्प भारीच. -दिलीप बिरुटे
Permalink

संग्रह आवडला. पण त्याची सफाई म्हणजे एक कामच असणार तुमच्या घरातल्या लोकांसाठी!
Permalink

सध्या काही फोटो दिसत नसल्यामुळे पुन्हा थोडया वेळाने येऊन बघतो.
Permalink

सुंदर गणेशमूर्ती आहेत. सुरेख संग्रह ++११११ :)
Permalink

यानबूत बसल्या बसल्या २१पेक्षा जास्त बाप्पांचे दर्शन झाले...
Permalink

मस्तच :)
Permalink

यात भर म्हणून आपापल्याकडील एक गणेश अजयाला पोचता करावा. मग संग्रह योग्य कलाकृति वाटल्यास त्या संग्रहात तो शोभून दिसेल.
Permalink

मस्तच ओ! संग्रह आवडला. जपायला कसरत करावी लागणार पण. गणपती गणपतीच्या वेगवेगळ्या रुपात नि फॉर्म मध्ये छान वाटतो.
Permalink

सुंदर आहेत सगळेच बाप्पा. दुसर्‍या फोटोत बाप्पा आणि मूषक लपाछपी खेळत आहेत असं वाटतय. फारच गोड! :)
Permalink

गं अजया
Permalink

सगळ्या मूर्त्या आवडल्या!
Permalink

आवडेश. एक इन जनरल शंका अशा संग्रहकांना, ह्या मूर्त्या केवळ कलादृष्टीने संग्रही ठेवल्या जातात की त्यांची पूजा वगैरे होते? नसेल होत तर का होत नाही? की तसे काही बंधन नाही? आणि त्यात जर उजव्या सोंडेची मूर्ती असेल तर?
Permalink

मी मला अावडल्या म्हणून संग्रह केला आहे,मूर्तींचा.उजवी डावी सोंड असे काही घेताना बघत नाही.मला गणपतीच्या विविध रुपांचं आकर्षण आहे.पूजा कोणत्याच मूर्तीची होत नाही.मला त्यातल्या कर्मकांडात इंटरेस्टही नाही.बंधन असल्यास काही कल्पना नाही,असलं तरी पाळलं जाणार नाहीच.मग कशाला त्यात पडा!!

आपला छंद उत्तरोत्तर असाच वृद्धींगत होत राहो. केवळ मूर्त्याच नव्हे तर वेगवेगळ्या रूपातील विशेषतः अमूर्त स्वरूपातील गणेश-आकार जमा करणेही एक वेगळा अनुभव असू शकेल. चित्रे म्हणा किंवा काष्ठशिल्पे इत्यादी. ह्या दृष्टीनेही संग्रह करून पहा कधी. शुभेच्छा... :-)
Permalink

अजया ताई, खूप छान संग्रह… सगळ्या मूर्ती खूपच सुंदर आहेत आणि हा संग्रह बाप्पासारखाच खूप वाढूदे :)