बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
2 Aug 2014 - 1:00 pm

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok*
Shock

भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले. *biggrin*

आजकाल अनेक सेवा इतरांच्याकडून किफायती मुल्यात पदरात पाडून घ्यायची सोय वापरली जाते त्या धर्तीवर मॉडेल्स प्रेमी पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्याच्या प्राचीवरून आपल्या दणकेबाज शैलीत नकली ऐवजी असली नोटा छापून द्याव्यात अशी रीतसर उद्घोषणा केली तर नवल वाटायला नको! *good*

मांडणीअर्थव्यवहारमौजमजामाध्यमवेधबातमी

प्रतिक्रिया

निखिल_जाधव's picture

2 Aug 2014 - 2:07 pm | निखिल_जाधव

एक नंबर *biggrin*

त्यापेक्षा १०० व ५००च्या नोटाच छापणे बंद करुन सर्वांनी फक्त चेकबुक, डेबिट कार्ड व ऑनलाईन ट्रांन्सफर वर जोर द्यावा. ह्या मूळे २ नंबरचे व्यवहारही बंद होतिल.

शशिकांत ओक's picture

2 Aug 2014 - 5:20 pm | शशिकांत ओक

असा कुठला देश आहे कळवावे.

ऋतुराज चित्रे's picture

2 Aug 2014 - 6:35 pm | ऋतुराज चित्रे

सगळ्याच नोटा बंद करुन बार्टर पद्धतीचा वापर केल्यास नकली व्यवहार व नोटांची समस्या नष्ट होईल.

शशिकांत ओक's picture

2 Aug 2014 - 11:54 pm | शशिकांत ओक

काय देणार? ड्रॉपरने पेट्रोल?