ओकांची ठकी - एका काव्य कट्ट्याचा अहवाल

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जे न देखे रवी...
24 Jun 2014 - 5:24 pm

मित्र हो,
एका रविवारी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर स्थानापन्न झाल्यावर जालावर शब्दरुपाने भेटणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला.
राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो.
जुजबी गप्पा नंतर राजने आयोजित काव्यस्पर्धेबाबत आणि आगामी काळात मराठी व अन्य भाषेतील साहित्य प्रकाशनाच्या साकार होऊ घातलेल्या त्यांच्या कल्पना सांगितल्या. प्रसन्नने आपल्या रसाळ कथनातून आधी पत्रकारिता व नंतरच्या काळातील त्यांनी उघडलेले "वर्थ कम्युनिकेशन्स" तर्फे दिली जाणारी 'कंटेंट मॅनेजमेंटची' सेवा यावर गप्पा रंगल्या.
डॉ. कुलकर्णींनी काव्यातील मराठी गझल प्रकारावर नवनव्या कवींच्या प्रयोगावर माहिती पुर्ण कथन केले. जालावर या तऱ्हेचे प्रयोग करणे व वाचकांची दाद मिळवायचे सोपे साधन असे त्यांनी म्हटले. औरंगाबाद - नांदेड कडील लेखकांच्या वाङ्मयसेवेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
जवळून जाणाऱ्यांची कलकल, बालकांच्या फुग्याच्या खेळात आम्हालाही बसल्या बसल्या फुगे परत द्यायला सामिल व्हावे लागत होते. शेंगदाणे-चुरमुरेवाल्यांच्या प्रेमळ हाकांमुळे काही सुरळीपुडे हातात घेऊन गप्पा होत होत्या.
'स्पंदन' नावाचा काव्संग्रह डॉ. कुलकर्णींना प्रेमपुर्वक राजनां भेट दिला. हृदयाचे व पोटूशा बालकाचे स्पंदन दाखवणारे पुस्तकाचे मुखपृष्ठ फारच बोलके होते.
ओकांनी आपल्या *व्यक्तिमत्वाची ओळख करून देणाऱ्या काव्यपंगतींना सजवल्यावर एखादी 'ठकी' एकदम कशी 'बार्बी डॉल' वाटायला लागते तशी, काव्यस्पर्शी हैयोहैयैयोंच्या शब्दरुपाने काव्यालंकारात मढवून आगळ्या तऱ्हेने कसे सादर केले आहे ते वाचून दाखवले गेले.
ती वाचकांना सादर –


ओकांची ठकी -

शशिनामधारी असे कांत अलकाचा ।
मंगलाचरणी नमी तो पुत्र जनार्दनाचा ।।
जीवनी असे जो रत सततोद्योगी ।
आधी नाट्यसेवा नंतरी कूटकोडी।।
होता वार रवी उदेला एकतीस वेळा ।
सप्त मासी वरुषे ४० वर नऊ मिसळा।।
पावाल त्यात मजला उत्पन्न जेष्ठपुत्राला ।।
नसे बंधु विवाहिता दोन बहिणी व पुत्र-पुत्री ।
पदवी वाणिज्य धरली कास देशरक्षणाची।
चढलो पायरी विंग कमांडर पदाची ।।
गतीशीघ्र वाहने घेती घोट अरिचा ।
त्रिशूल वायुसंगे मम धर्म गणिताचा।।
हे दयानिधे, अल्पमतिस काव्यस्फुरण दे ।
जमतील जे काव्यकुजनी तयांना आत्मसंतोष दे।।

हैयोंनी या ठकीला बार्बी रुपांतरित कसे केले त्याआधी त्यातील बारकाईने अभ्यासावयाच्या बाबी प्रथम पाहू -

१) प्रथम-द्वितीयचरणांतील, प्रथम अक्षर समान, (नन, कक, मम तत)
२) तृतीय व अंत्य चरणातील प्रथम अक्षर समान, (जज भभ, शश)
३) प्रथम चरणातील दुसरे अक्षर आणि तृतीय चरणातील दुसरे अक्षर समान.(वव,टट, त्रत्र )
४) अंत्यचरणातील शेवटचे अक्षर वा शब्द पुढील श्लोकाच्या सुरवातीचा. (कूट, मात्र, तरि).
वरील अभ्यासावयाच्या बाबींतला तिसऱ्या मुद्याला ‘सिंदुपा यमकम्’ तर चौथ्या मुद्द्याला तमिळमधे ‘अंतादि यमकम्’ असे म्हणतात. ह्या तमिळ काव्यप्रकारांच्या बाबतची वैशिष्ठ्ये असून हैयो ह्यांनी ती जशाच्या तशा स्वरूपात मराठीमधे आणण्याचा एक प्रयत्न केला आहे. ह्यावर चर्चा झाली. उपस्थितांनी असे काव्यप्रकार प्रथमच पहाण्यात येत आहेत असे अचंब्याने म्हटले. (आता हे लिहिताना "असा काव्यप्रकार मराठीत आहे का?" ह्या हैयोंच्या धाग्याची आठवण होते.) त्याशिवाय हैयोंनी ओकांच्या लक्षात आणून दिलेल्या द्राविड भाषांतील यमकांच्या विविध प्रकारांची रंजक माहिती दिली गेली.

हैयोंची बार्बी

नांधारी शशि, कांत अलकाचा
मी मंगलाचरणी पुत्र जनार्दनाचा
जीनी असे रत सततोद्योगी
नसेवा नाट्यसेवा लिही कूटकोडी

कूटातूनि भानुदिनी एकतिसाव्या
काढा पन्नासी एका, मासी सातव्या
भेटा मज, कुलोत्पन्न ज्येष्ठपुत्रा
गिनीद्वया परिणीता, तनयस्वजा मात्र

मात्रा गणिती वणिजशास्त्रज्ञाता
मिळे बढती चढे विंगकमांडर पदा
त्रुकंठा फोडण्या विमाने व्याधापरि
शूलत्रय वायुसवे जेथ, देशरक्षा तरि

रि प्रेमरूप दयानिधे दे काव्यस्फूर्ती
तोषवी काव्यकूजनी समाहृतचित्ती

*कूट काव्यात काय काय समाविष्ट आहे याचा वाचकांनी छडा लावावा...
हे सर्व शोधकार्य करणारी, भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारी ही व्यक्ती उर्फ हैयो हयैयो म्हणजे कोण यावर विचारणा झाली. त्यावर "योग्य वेळी हैयो आपला परिचय करून देतील" असे विश्वास ओकांनी व्यक्त केला… करता करता, आलेल्या सदस्यांना निघण्याचे वेध लागले... कॉकटेल फ्रुट ज्यूसने कटट्याची सांगता झाली.
.........

मराठीचे श्लोकवाङ्मयशेतीसंस्कृतीकविताशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

एस's picture

24 Jun 2014 - 5:58 pm | एस

कट्ट्याबद्दल अभिनंदन! त्या हैय्योंच्या धाग्याचा दुवा द्या तेवढा.

शशिकांत ओक's picture

26 Jun 2014 - 11:10 am | शशिकांत ओक

मित्रा,
हैयोंच्या धाग्याची लिंक

प्रचेतस's picture

24 Jun 2014 - 6:04 pm | प्रचेतस

तरीच म्हटलं ओक काका शनिवारवाड्यावर कसे आले नाहीत.

वृत्तांत आवडला.

शशिकांत ओक's picture

25 Jun 2014 - 11:24 am | शशिकांत ओक

कविराज मित्रांनो,
आपल्या काव्यशक्तीचा प्रभाव वरीव प्रकारे काही काव्यात्मक अविष्कार करून दाखवावा अशी विनंती...

पैसा's picture

27 Jun 2014 - 11:06 pm | पैसा

कवितेचा प्रयोग आवडला! छान कट्टा!