ग्वॉकोमोली (Guacamole)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
29 May 2014 - 1:29 am

ग्वॉकोमोली हे एक मेक्सिकन डिप आहे. हे तुम्ही चिप्सबरोबर किंवा टोस्टवर लावुन किंवा सँडविच मधे स्प्रेड म्हणुन सुद्धा वापरु शकता. त्याची आपण पाकृ बघुया.

साहित्यः

अव्हाकाडो - १
कांदा - २ चमचे बारीक चिरलेला
टोमॅटो - २ चमचे बारीक चिरलेला
लसुण - १-२ पाकळ्या किसुन
हालापिनिओज मिरच्या - १-२ बारीक चिरुन (ह्या मिरच्या brine मधे marinate केलेल्या वापरल्या तर मस्त चव येते)
लिंबु - १/२ किंवा १/२ चमचा लिंबाचा रस
काळि मिरी पावडर - १/४ चमचा
ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
मिठ चवीनुसार

igr

कृती:

१. अव्हाकाडो मधोमध कापुन, मधली बी काढुन गर काढुन घ्यावा.
२. हा गर एका भांड्यामधे घेउन, काटे चमच्याने तो mash करुन घ्यावा. एकदम पेस्ट करु नये.
३. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेला लसुण, हालापिनिओज मिरची, मिठ, काळि मिरी पावडर व ऑलिव्ह ऑईल टाकुन मिक्स करावे.
४. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस टाकुन मिक्स करावे.
५. ग्वॉकोमोली खायला तयार आहे.

टीपः

हे ग्वॉकोमोली तयार करुन जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही. ते काळे पडते. त्यामुळे जेव्हा खायचे असेल तेव्हा लगेच गर काढुन सर्व मिक्स करुन serve करावे.

p1

p2

p3

प्रतिक्रिया

शेखर's picture

29 May 2014 - 1:37 am | शेखर

कालच केली होती ही डिश मी. मस्त लागते.

भारी दिसतीये. एकदम फ्रेश असताना खाणे बंधनकारक असते खरे पण त्यामुळे रंग, चव खूपच चांगली लागते. फोटू पाकृ आवडली. मस्त!

थंडगार बियर सोबत ग्वॉकोमोली नाचोज बरोबर खायला मस्तच लागते. *drinks*

ह्या विकांताला सुद्धा हाच बेत आहे.

अजया's picture

29 May 2014 - 8:30 am | अजया

छान्,सोपी पाकृ!

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 9:31 am | मुक्त विहारि

झक्कास...

एक वेगळी पा.क्रु. समजली.

प्रचेतस's picture

29 May 2014 - 9:33 am | प्रचेतस

छान पाकृ.

स्पा's picture

29 May 2014 - 9:58 am | स्पा

वारल्या गेले आहे

त्रिवेणी's picture

29 May 2014 - 10:08 am | त्रिवेणी

बर्याच दिवसांनी पाक्रु आली.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2014 - 10:14 am | प्रभाकर पेठकर

अ‍ॅव्हॅकॉडो तेवढ आवडत नाही. पण करून पाहिलं पाहिजे. पाकृ चांगली आणि खास खास वेळी उपयोगी वाटते आहे.

दिपक.कुवेत's picture

29 May 2014 - 11:57 am | दिपक.कुवेत

फोटो दिलखेचक आलेत. हे डिप नॅचोज बरोबर मस्त लागतं. ह्यालाच अवकाडो साल्सा असेहि म्हणतात का?

Mrunalini's picture

29 May 2014 - 12:17 pm | Mrunalini

सगळ्यांचे धन्यवाद. :)
हो पेठकर काका, मलाहि अव्हाकाडो नुसता खायला कधीच आबडत नाही, पण हे असे बनवल्यावर खुप छान लागते. नक्की ट्राय करुन बघा.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2014 - 1:18 pm | प्रभाकर पेठकर

नक्कीच करून पाहणार. आता मला हुरुप आला आहे.

सूड's picture

29 May 2014 - 2:28 pm | सूड

मस्त !!

सानिकास्वप्निल's picture

29 May 2014 - 4:03 pm | सानिकास्वप्निल

अव्हकॅडो खूप आवडतं, व्हेरी गुड फॉर फॉलिक अ‍ॅसिड :)
सॅलॅडमध्ये त्याचा उपयोग करता येतो. स्वतःची अशी चव नसते पण इतर घटक असल्यामुले चविष्ट लागतं.

अत्यंत आवडीच्या Cuisineमधले आवडीचे डिप ग्वॉकोमोली, ह्यात ब्राईनमधल्या हॅलेपिनोजबरोबर थोडे ब्राईन / व्हिनेगर घातले तर छान चव येते शिवाय लिंबु रस घातल्यामुळे ते काळे पडत नाही. ताजेच खावे जर का आधी बनवून ठेवायचे असेल तर फ्रिजमध्ये झाकून ठेवावे, मस्तं राहतं.

मी तर कधी कधी तोंडी लावणं म्हणून पण बनवते:;)

मृणालिनी पाकृ फारच खतरनाक दिसतेय, हे डिप खुप आवडतं पण कधी वाटेला गेले नाही. खरेदी करताना अव्हकॅडो कच्च तर नाहिये नाहीये ना असा नेहमी प्रश्न पडतो, (तयार/पिकलेलं कसं दिसते हे ही माहीती नाहीये :( )

पैसा's picture

30 May 2014 - 10:31 am | पैसा

फोटो तर एकदम झकास आलेत!

सुहास झेले's picture

30 May 2014 - 11:12 am | सुहास झेले

झक्कास !!

llपुण्याचे पेशवेll's picture

30 May 2014 - 1:01 pm | llपुण्याचे पेशवेll

अ‍ॅव्हाकाडो भारतात काय नावाने मिळते?
उसात असताना ग्वाकमोली चिपोतलेज मधे खाल्ल्याचं आठवतं आहे. बरीतो बाऊल (बोल) मधे.

मस्त कलंदर's picture

30 May 2014 - 10:20 pm | मस्त कलंदर

मी उत्सुकतेने परवा एक अ‍ॅव्हाकाडो आणलं होतं. ते कापता कापताच हैराण झाले. वरती त्याला चवही कसली नव्हती आणि शेवटाकडे कडवट लागत होते म्हणून फेकून दिले.
तर,
शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे?
शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?

सानिकास्वप्निल's picture

31 May 2014 - 4:19 am | सानिकास्वप्निल

शंका क्र. १. चांगले अ‍ॅव्हाकाडोचे फळ कसे ओळखायचे?

अव्हकॅडोचे देठ काढून बघावे, जर का हिरवट-पिवळट असेल तर ते चांगले पिकलेले आहे.

शंका क्र. २. सहजपणे कापण्यासाठी काही युक्त्या आहेत काय?

हा व्हिडिओ बघावा अशा पद्धतीने मी ही कापते व चमच्याने स्कुप करते.

अव्हकॅडोला स्वतःची चव नसते. एकदम ब्लँड फळ आहे ते. सॅलॅड, ग्वॉकोमोलीमध्ये त्याचा उपयोग करता येतो. काही ठिकाणी त्याचे आयस्क्रीम ही बनवतात :)

आयुर्हित's picture

31 May 2014 - 9:24 am | आयुर्हित

छान व अत्यन्त सोप्पी अशी पण आरोग्यदायी पाक्रु!
आता नाचोजची पण पाक्रु येवु द्या!

अव्हाकाडो आणि हालापिनिओज मिरच्या कुठे मिळतात ? olive oil साठी दुसरा कोणता option आहे ?

Mrunalini's picture

18 Jun 2014 - 4:22 pm | Mrunalini

हाय,
भारतात आज काल तुम्हाला कुठ्ल्याही सुपर शॉपी मधे अव्हाकाडो आणि हलापिनोज मिरच्या अगदी सहज मिळतील. मला वाटते ऑलिवव्ह ऑईलला दुसरा काहि पर्याय नाही. कारण त्याची एक वेगळी चव असते. आपले साधे सनफ्लॉवर ऑईल किंवा शेंगदाण्याचे तेल एवढे खास लागणार नाही आणि ते असे कच्चे खाणे सुद्धा चांगले नाही. जर ऑलिव्ह ऑईल नसेल, तर नाही टाकले तरी चालेल.

केदार-मिसळपाव's picture

18 Jun 2014 - 3:15 pm | केदार-मिसळपाव

आम्ही हेच कोशिंबीर म्हणुन खातो की. फरक एव्ह्ढाच की आवोकादोडो चे तुकडे करतो गर काढण्याऐवजी.
नाव समजले आता मला ह्या कोशिंबीरीचे.
धन्यवाद मृणालिनीताई.

केदार-मिसळपाव's picture

18 Jun 2014 - 3:17 pm | केदार-मिसळपाव

आवोकाडो ला नैसर्गिक लोणी असे पण समजतात बरका.

छान पिकलेले अवोक्याडो अगदी नाजूक म्हणावे इतपत मऊ असते. हाताने कुस्करणे, कापणे सहज जमते.

खटपट्या's picture

18 Jun 2014 - 10:21 pm | खटपट्या

छान पाककृती,

मी तर अवाकाडो कुरमुर्याच्या भेळीबरोबर खातो. छान भेळ होते.