ग्वॉकोमोली हे एक मेक्सिकन डिप आहे. हे तुम्ही चिप्सबरोबर किंवा टोस्टवर लावुन किंवा सँडविच मधे स्प्रेड म्हणुन सुद्धा वापरु शकता. त्याची आपण पाकृ बघुया.
साहित्यः
अव्हाकाडो - १
कांदा - २ चमचे बारीक चिरलेला
टोमॅटो - २ चमचे बारीक चिरलेला
लसुण - १-२ पाकळ्या किसुन
हालापिनिओज मिरच्या - १-२ बारीक चिरुन (ह्या मिरच्या brine मधे marinate केलेल्या वापरल्या तर मस्त चव येते)
लिंबु - १/२ किंवा १/२ चमचा लिंबाचा रस
काळि मिरी पावडर - १/४ चमचा
ऑलिव्ह ऑईल - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. अव्हाकाडो मधोमध कापुन, मधली बी काढुन गर काढुन घ्यावा.
२. हा गर एका भांड्यामधे घेउन, काटे चमच्याने तो mash करुन घ्यावा. एकदम पेस्ट करु नये.
३. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेला लसुण, हालापिनिओज मिरची, मिठ, काळि मिरी पावडर व ऑलिव्ह ऑईल टाकुन मिक्स करावे.
४. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस टाकुन मिक्स करावे.
५. ग्वॉकोमोली खायला तयार आहे.
टीपः
हे ग्वॉकोमोली तयार करुन जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही. ते काळे पडते. त्यामुळे जेव्हा खायचे असेल तेव्हा लगेच गर काढुन सर्व मिक्स करुन serve करावे.

वाचने
8108
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
भारी दिसतीये. एकदम फ्रेश
थंडगार बियर सोबत ग्वॉकोमोली
मस्त.
मस्त
छान पाकृ.
वारल्या गेले आहे
बर्याच दिवसांनी पाक्रु आली.
करून पाहीन.
वा पाकृ आकर्षक आणि
सगळ्यांचे धन्यवाद.
धन्यवाद.
In reply to सगळ्यांचे धन्यवाद. by Mrunalini
मस्त !!
खूप आवडतं
मृणालिनी पाकृ फारच खतरनाक
मस्त पाकृ
झक्कास !!
अॅव्हाकाडो चे भारतीय नाव.
मी उत्सुकतेने परवा एक अ
अव्हकॅडो
In reply to मी उत्सुकतेने परवा एक अ by मस्त कलंदर
आरोग्यदायी पाक्रु!
अव्हाकाडो आणि हालापिनिओज
हाय,
In reply to अव्हाकाडो आणि हालापिनिओज by म्हैस
ग्वॉकोमोली
ह्या
छान पिकलेले अवोक्याडो अगदी
In reply to ह्या by केदार-मिसळपाव
छान पाककृती,