मँगो केक (ईन प्रेशर कुकर)

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
25 May 2014 - 1:18 pm

Cake 1

साहित्यः
१. मैदा - १ कप
२. बटर - १२० ग्रॅम
३. ४ हापुस आंब्याचा पल्प
४. व्हॅनीला ईसेन्स - १ चमचा
५. बेकिंग पावडर - १/२ चमचा
६. बेकिंग सोडा - १/२ चमचा
७. मुठभर काळ्या मनुका
८. साखर (आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त)

कॄती:
१. रिकाम्या कुकर मधे खाली तळाशी मीठ घाला व वरुन तरतं झाकण थेवुन मंद आचेवर प्रीहिट करत ठेवा. कुकरला शीटि अजीबात लावु नका.

prehear cooker

२. हापुस आंब्याचा रस मिक्सर मधुन काढा व गाळण्याने गाळुन घ्या जेणेकरुन खाताना रेषा/धागे तोंडात येणार नाहि
३. आता एका मोठ्या बाउल मधे बटर आणि साखर ईलेक्ट्रिक बीटर ने फेटुन घ्या
४. आता त्यात मैदा, बेकिंग पावडर, सोडा, व्हॅनिला ईसेन्स, काळ्या मनुका घालुन फेटत रहा
५. आता त्यात मँगो पल्प घालुन फेटा. मिश्रण अगदिच घट्ट वाटलं तर गरजेप्रमाणे दुध घालुन मिश्रण फ्लोंईंग कंन्सीस्टंटिचं करा

batter

६. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्याला/टिन ला बटर चा हात लावा व त्यावर मैदा भुरभुरुन डस्ट करुन / सर्व बाजुनी कोट करुन घ्या
७. आता फेटलेलं मिश्रण भांड्यात घालुन भांड टॅप करुन घ्या जेणेकरुन मिश्रण सर्वबाजुनी सेट होईल

before bake

८. प्रिहिट झालेल्या कुकर मधे एक ३५-४० मि. बेक करा. एक ३५-४० मि. कुकरचं झाकण उघडुन सुरी किंवा विणायची सुई खुपसा. जर ती क्लीन बाहेर नाहि आली तर केक अजुन बेक करा

After bake

९. केक पुर्ण गार झाला कि हव्या त्या आकारात कापुन त्याचा आनंद घ्या

अवांतरः
ओव्हन आणि कुकर मधे बेक केल्यावर केकच्या टेच्क्शर मधे नक्किच फरक पडतो. माझा हा केक आतुन थोडा मॉईस्ट राहिला. उरलेलं थोडं मिश्रण जेव्हा बेक केलं तेव्हा केक पुर्ण गार झाल्यावर कापला पण मधली लेयर थोडि दाठरलेली झाली. एवी वे पण विदाउट ओव्हन आणि केक खायची दांडगी हौस ह्यापुढे सगळं विसरलो.

Final cake

टिप:
१. ह्या केक मधे मँगो पल्प एवजी अननस + अक्रोड, केळि कुस्करुन + मनुका, खजुराचा पल्प + बदामाचे काप, कोको-ड्रिकिंग चॉकलेट पावडर घालुन वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक बनवु शकतो.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

25 May 2014 - 1:24 pm | प्रचेतस

खल्लास!!!!!!!!!!!!!!

कवितानागेश's picture

25 May 2014 - 3:01 pm | कवितानागेश

कित्ती शहाणा माणूस!
ओव्हन नसताना केक करायची सोपी कृती. :)
शिवाय अंडं न घालताच... ;)

सस्नेह's picture

25 May 2014 - 3:11 pm | सस्नेह

अन याखेपी दीपभौंनी सगळ्या स्टेप्स रीतसर दिल्यायत त्याबद्दल त्यांचे विशेष आभार !

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 3:02 pm | मुक्त विहारि

झक्कास...

आता तू भारतात आलास की, सगळी सूट्टी आमच्या डोंबिवलीतच रहा.

आपण मस्त पैकी खाद्य पदार्थांचा क्लास चालू करू या.तेव्हढेच ४ पैसे तुझ्या गाठीला अन उत्तम पदार्थ आमच्या उदरांत...

आम्ही डोंबिवलीकर तसे खवय्येच.

(एक २/४ दिवस फक्त उरणला जावू या.इथे पण सुकी मच्छी मिळत नाही.तेव्हढी घेऊ, अन परत येवू.)

भाते's picture

25 May 2014 - 3:39 pm | भाते

दिपक, तुझ्या डोंबिवलीतल्या शिकवणी वर्गाला मुविंबरोबर माझेही नाव राखुन ठेव. बाकी विद्यार्थी मिळतीलच तुझ्या शिकवणीसाठी.

धन्यवाद, केकची पाकृ विकांताला टाकल्यापद्धल.

दिपक.कुवेत's picture

25 May 2014 - 7:43 pm | दिपक.कुवेत

अरे शीकवणी वर्ग / ते पैसे राहौदे बाजुला. डोंबीवलीत आलो कि रोज कट्टा करु (घरच्या घरी). मिल बैठेगें तीन यार....आप, मै और भात्या!!!

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 9:34 pm | मुक्त विहारि

आता येतोस केंव्हा ते सांग..

मला ७/८ दिवस सूट्टी पुढे-मागे करता येईल.

दिपक.कुवेत's picture

26 May 2014 - 1:04 pm | दिपक.कुवेत

आता नेक्स्ट ईयर जुन-जुलै मधे येणार आहे. मस्त धो धो पावसात कट्टा करुया.

टवाळ कार्टा's picture

30 May 2014 - 7:58 pm | टवाळ कार्टा

मी खायला येणार :)

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2014 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-a-whole-cake-smiley-emoticon.gif

मुक्त विहारि's picture

25 May 2014 - 7:08 pm | मुक्त विहारि

स्मायलीचीच वाट बघत होतो..

जय स्मायलीवाले बाबा

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2014 - 7:54 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif

दिपक.कुवेत's picture

25 May 2014 - 7:37 pm | दिपक.कुवेत

आहेस खरा स्मायलीवाले बाबा!!!

मदनबाण's picture

25 May 2014 - 7:57 pm | मदनबाण

जबरा ! :)
काळ्या मनुका मस्तच लागतात ! ;)

हौशी शेफना घाबरवण्याचा उद्देश नाही परंतू माझा अनुभव सांगतो .
एक शंका .ते कुकरच्या तळाशी मीठ घालणे याबद्दल आहे .{ओले}मीठ आणि अॅल्युमिनिअम शत्रू आहेत .भोके पडतात .मी पूर्वी खारे दाणे करायचो .दोनचारदा केल्यावर
कळले दाणे पाचशे रुपये पाव किलो पडले (कढई बाद) .
एखादा न वापरायचा कुकर तरी घ्यावा अथवा मिठाला पर्याय हवा .

दिपक.कुवेत's picture

26 May 2014 - 1:06 pm | दिपक.कुवेत

मिठामुळे अ‍ॅल्युमिनियमला भोक पडतात हे अधुंकस ठाउक होतं पण आता परत हिम्मत करणार नाहि. तसाहि ओव्हन घायचाच आहे तो ह्या निमित्ताने घेउन होईल. माहितीसाठि थँक्यु.

पैसा's picture

25 May 2014 - 8:02 pm | पैसा

दीपक, मिठाऐवजी वाळू घातली तर काय होईल?

अजया's picture

25 May 2014 - 9:13 pm | अजया

मस्त पाकृ !!

इन्दुसुता's picture

25 May 2014 - 9:16 pm | इन्दुसुता

मीठापेक्षा बारी़क वाळू हा जास्त चांगला पर्याय आहे, कधीही / कुठलेही भांडे वापरताना. वाळूची अधिक वेळ गरम राहण्याची क्षमता बेकिंग साठी उपयोगी ठरते.
अ‍ॅल्युमिनियम पात्रं बेकिंग साठी एक वेळ ठीक पण, कूकर वापरण्याऐवजी लोखंडी तव्यावर वाळू ठेवून केक करणे अधिक उचित! त्यावर मोठे कुठलेही भांडे झाकता येते.
ह्या केकची कन्सिस्टंसी साखर किती घातलीय आणि किती वेळ बटर आणि साखर फेटली आहे ह्यावर आणि बाहेरील ( वातावरणाचे ) तापमान काय आहे यावर अवलंबून असेल. लाइट केक हवा असेल तर मात्र अंड्याला पर्याय नाही.
सर्व्ह करताना हा केक थंड सर्व्ह करावा. व्हिप्पड क्रीम वर ताज्या आंब्याचे लहान काप घालून सर्व्ह करावा. ( मनुका नकोत).

खाली दिलेल्या टीपेत अननस व अक्रोड हे क्लॅशिंग फ्लेवर्स आहेत ते एकत्र नकोत, बाकी पर्याय ठीक आहेत.

चांगला प्रयत्न!!!

दिपक.कुवेत's picture

26 May 2014 - 1:09 pm | दिपक.कुवेत

अगं आधी वाळुच घालणार होतो आणि मिठाएवजी तीच योग्य आहे पण तु नळित एका प्रतिथयश शेफ नी मीठ घातलेलं बघुन मी हि ट्राय केलं. ईन्दुसुता ने दिलेल्या टिप्सहि अतीशय उपयुक्त आहेत. पुढिल वेळेस योग्य ती खबरदारी घेईन.

तुमचा अभिषेक's picture

25 May 2014 - 9:26 pm | तुमचा अभिषेक

नेहमीप्रमाणेच कातिल आणि नेत्रसुखद

पाककृती कातिल आहे आणि सोबत इन्दुसुताने दिलेल्या टिप्स अतिशय उपयोगी अंमल करण्याजोग्या आहेत..

अनन्न्या's picture

25 May 2014 - 11:04 pm | अनन्न्या

फ्रायपॅनमध्ये छान होतो. एवढा खटाटोप पण नाही. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर भाजा. मस्त होतो केक! रव्याचा पण मँगो केक छान होतो.cake

दिपक.कुवेत's picture

26 May 2014 - 1:10 pm | दिपक.कुवेत

मला सुद्धा रव्याचा केक फार आवडतो. रवा मँगो केक ची पाकृ देशील काय? ह्या विकांताला करीन म्हणतोय.

रवा मँगो केक ची पाकृ आमास्नीपन पायजेलेय...

एक वाटी रवा, एक वाटी दही , एक वाटी साखर , अर्धी वाटी आमरस, दोन छोटे चमचे लोणी, अर्धा चमचा खायचा सोडा, मीठ.
दही, साखर, आमरस, लोणी फेटून घ्या. त्यात रवा मिसळून तासभर झाकून ठेवा. तासाभराने त्यात
सोडा आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण ढवळा. फ्रायपॅनला तुपाचा हात लावून मंद गॅसवर डायरेक्ट ठेवा. पंधरा मिनिटात मस्त केक तयार होतो. यात आमरसाऐवजी व्हॅनिला, स्ट्रॉबेरी असा इसेन्सही चांगला वाटतो.
पहा करून, छान लागतो.

एस's picture

31 May 2014 - 5:22 pm | एस

धन्यवाद दिपकभौ

अनन्न्यातैंनीपन दिली पाकृ पाठवूनशान. वी आर ऑल सेट. (नीट जमल्यास) उद्या फोटू लटकवतो इथे.

सुहास झेले's picture

25 May 2014 - 11:59 pm | सुहास झेले

धाग्याच्या सुरुवातीलाच जीवघेणा फोटो टाकलात.... एकदम खल्लास :)

स्पंदना's picture

26 May 2014 - 10:22 am | स्पंदना

मस्ताड हो दिपक भौ!! कापलेला केक काय छान दिसतोय!!

इरसाल's picture

26 May 2014 - 10:58 am | इरसाल

आवडला केक त्यातल्या त्यात हापुसचा म्हणजे बोलायलाच नको.

पन वो अ‍ॅल्युमेलके भांडेसे उल्टाकरके उस्को बाहर निकालना कित्ता डिफीकल्ट मालुंग ! उपरका डिजायन मोडता हय !

दिपक.कुवेत's picture

26 May 2014 - 1:13 pm | दिपक.कुवेत

अरे कुच डिफिकल्ट नय है. भांडा गार होनेके बाद हि उल्टा करनेका. पहेले किया तो हात भाजेगा और डिजाईन का भी वाट लगेका. गार होने के बाद वो आपसुक हि बार आता हय.

इरसाल's picture

26 May 2014 - 2:36 pm | इरसाल

इत्ता भारी केक बनायेला तो थंडा करनेकी वाट कोन देखेंगा !

इरसालः शिजताना दम निघतो, निवताना नाही हेच खरं!
दिपक: केक एकदम भारी दिसतोय त्यात हापुसचा म्हणजे मस्तच लागेत असेल. इन्दुसुताने दिलेल्या अधिक टीपापण आवडल्या.

यशोधरा's picture

26 May 2014 - 1:18 pm | यशोधरा

सुंदर! वा! वा!! ते क्लास वगैरे काय ते सुरु करा. पदार्थ चाखून पहायला मेर्कू बुलाव.

मस्त दिसतोय केक...ओव्हन शिवाय करता येतोय हे फारच छान..आता ते अ‍ॅल्युमिनियमच भांड कुठुन आणायच..त्याला काही पर्याय नाही का?

दिपक.कुवेत's picture

26 May 2014 - 1:56 pm | दिपक.कुवेत

वर अनन्न्या ने म्हटल्याप्रमाणे तु फ्राय पॅन मधेहि (फ्राय पॅनला तुपाचा हात लावुन) केक करु शकतेस. त्यासाठि मंद आचेवर एका लोखंडि तव्यावर वाळु तापली कि त्यावर फ्राय पॅन ठेवुन बेक कर. ऑल द बेस्ट!

आता फ्रायपॅनमधे करून बघते.धन्यवाद.

मीठाऐवजी वाळू घातली तर कुकरमध्ये?

शिद's picture

26 May 2014 - 3:45 pm | शिद

जबराट दिसतोय केक. :)

काही न घालता मंद गॅस ठेवला तरी चालतो. मी बिस्कीट केक तसाच करते.

दिपक मस्त रेसिपी. करुन बघेन.

प्यारे१'s picture

28 May 2014 - 12:26 pm | प्यारे१

जुग जुग जियो बेटा, जुग जुग जियो!

त्रिवेणी's picture

28 May 2014 - 12:44 pm | त्रिवेणी

माझे सगळे कुकर Hawkins contura चे आहेत त्यात केला तर चालेल का की कोटींग खराब होईल.
इथल्या बल्लवाचार्यांनी ओवेन चे सेटिंग दिले तर करून बघेन.

एस's picture

30 May 2014 - 5:18 pm | एस

ही पाककृती 'एगलेस' आणि 'शुगरलेस' कशी करता येईल? आंब्याचा अंगभूत गोडवा तितपतच चालेल. उद्या करून पाहणार आहे. रच्याकने - 'मधुमोहा'पायी 'मधुमेह' झालेल्यांच्यासाठी कायतरी पर्याय सुचवा राव कोणीतरी.

दिपक.कुवेत's picture

30 May 2014 - 8:12 pm | दिपक.कुवेत

वरिल पाकॄ हि एगलेसच आहे, जरा साहित्य आणि पाकॄ नीट पहा बरं. शुगरलेस साठि मध हा पर्याय ठरु शकतो.

Prajakta२१'s picture

30 May 2014 - 9:51 pm | Prajakta२१

आत्ताच मी आंब्याचा शिरा विथ गुलकंद करून बघितला
ठीक ठाक झालाय
आत्ता हे करून बघेन
शुगरलेस साठी शुगर फ्री ची पावडर मिळते ती पण चांगला पर्याय ठरू शकेल
मैद्याऐवजी कणिक वापरली तर चवीत फरक पडेल का?

मीठ कसे वापरायचे ते सांगतो ।एक अॅल्युमिनिअम फॉईल दुहेरी करून खाली ठेवून त्यात मीठ ठेवायचे .शक्यतो जुनाकुकर अथवा निर्लेपथर उडत आलेले पैन वापरायचे .

कोकणच्या किनाऱ्यावर एकसट्रा वर्जिन वाळू मिळणे कठीणच आहे .त्यामुळे वाळूऐवजी मीठ रेकमेंड केले असेल .

दिपक.कुवेत's picture

2 Jun 2014 - 6:13 pm | दिपक.कुवेत

आपकि सुचना पे अमल किया जायेगा....

निवेदिता-ताई's picture

23 Jun 2014 - 9:22 pm | निवेदिता-ताई

रव्याच्या केकबद्दल धन्यवाद...

सविता००१'s picture

30 Jun 2014 - 12:12 pm | सविता००१

बास. एवढच म्हणणार मी आता...
दीपक, तू कर आणि मला बोलाव खायला.
मी एकतर्फी ठरवलंच आहे तसं.

घ्या मँगो केक...