ओव्या

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
30 Apr 2014 - 1:34 pm

ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची . घरात सुना आल्यवर बाकी जेवणाचा कारभार त्यांच्यावर आजीने सोपवला होता पण दूध, दही मात्रा हे सगळ काम आजीने आपल्या हातात ठेवल होत. कारण ते सोवळ्याच(?)होत.आजी मोठ्या घड्यात दही घेऊन ते घुसळयला उभी रहायची. आमच्या कडे ३/४ फुटी उंच अशी लाकडी रवी होती. तिला दोरी बांधून ती मागे पुढे ओढताना आजीचा छानु सूर लागायचा आणि मग आजी त्या वेळी ज्या सुचतिल त्या ओव्या म्हणायची. कधी मुलाना झोपवायच्या , डोहाळे जेवणाच्या , मुलीच्या पाठवणीच्या तर कधी लग्नाच्या वेळेच्या घना भरणाच्या. मी खूपच लहान असल्याने कधीच तिच्या ओव्यंकडे लक्षा दिल नाही.आई ला काही ओव्या पाठ होत्या . पण आई काही नेहमी म्हणायची नाही त्यामुळे तिला देखील त्या कायम लक्षात नाही राहिल्या . आजी आमची गरजेपुरात लिहावाचयाला शिकली होती पण म्हणून तिने कधी अस ओव्या गाणी लिहून नाही ठेवली . कायम ती म्हणून म्हणून तिच्या लक्षात होती . ज्या काही ओव्या मला आठवतात त्या झलक म्हणून-

"डोहाळे दशरथ ,पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी ,काय आवडे तुजला "

'पहिली माझी ओवी ,पहिला माझा नेम

तुळशिखाली राम,पोथी वाचे "

"राम रथवारी , लक्षमण घोड्यावरी

मागूनि येई डोली,सीतामाईची "

"राम चाले वाटे ,लक्षमण झाडी काटे

ऐसे बंधू नाही कोठे,पृथ्वीवर"

"रामाची ग सीता, लक्षमानाची वाहिनी

दशरथा ची पहिली,ज्येष्ठ सुन "

"घाना भारीयेला,विडा ठेवियेला

आमंत्रण देण्या आलो,देवराया "

"ईशान बाळ गोरा हलदीने न्हाई

पिवळे पाणी जाई ,शेवंतीला "

"हाती कडी तोडे ,गळ्यात कंठी गोफ

कुण्या सावकारचा लेक , ईशान बाळ "

या आणि अश्या प्रकारच्या कितीतरी ओव्या आजीला पाठ होत्या.यातच ती एक छान पाठवणीच गाण म्हणायची .आज अजिबातच आठवत नाही ते .आज वाटते आजीने त्या लिहून ठेवल्या असत्या तर माझ्यासाठी एक ठेवा झाला असता . पण रोजच्या कामाच्या रगाड्यात कुठल तिला लिहून वगैरे ठेवायची आठवण रहनार ?माझ्या आईने तरी जेव्हा पाठ होत्या तेव्हा लिहून ठेवायला हव्या होत्या . पण आज माझ्यासाठी त्या एवढ्या महतवाच्या होतील याची तिला तरी काय कल्पना ?खर तर कुणालाच दोष देण्याचा हेतू नाही पण एक अमूल्य ठेवा मात्रा हरवल्यासारखा वाटतोय . आज आईने शिकवलेल्या ओव्या म्हणून मी ईशान झोपवते . निदान आता माझ्या जेवाड्या ओवा पाठ आहेत त्या तरी मी नक्कीच लिहून माझ्या संग्रही ठेवणार आहे . काय माहित कदाचित माझी भाची पुढच्या वेळी मागत येईल. कारण आजकाल जुन्या गोष्टीना खूपच भाव आलाय .antique म्हणुन.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

किती ही अँटिक असला तरी असला माल-विक ला जात नाही. हा निव्वळ घरबसल्या (काहीही) माल-विकायचा कुटीलोद्योग वाटतोयं. हे मिपा आहे का मुपिठ असा प्रश्न (निष्कारण) पीडतो. आणि अना (मधे) हिता चे धागे वळावे असं सुचवतो .

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2014 - 2:27 pm | पिलीयन रायडर

अनाहिता नक्की काय आहे असं तुमचं मत आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2014 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद वाचल्यावर आपल्याला खरड टाकणारच होतो..
आत्ता मी निवांत झालो. :)

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2014 - 2:38 pm | पिलीयन रायडर

धन्यवाद..!

पुढेही अनाहितावर असाच लोभ असु द्या.. म्हणजे आमची पण काळजी मिटली..

आत्मशून्य's picture

30 Apr 2014 - 6:34 pm | आत्मशून्य

अनाहिता नक्की काय आहे असं तुमचं मत आहे?

तिथले काही धागे अनाहीता टॅग खाली जाहीर करा, दुध का दुध पानी का पानी होउन जाइल.

डायरी भेट अन वाढदिवसाच्या कचकून शुभेच्छा ओ संक्षी!

जितक्या आठवतात तितक्या ओव्या त्यांनी टाकल्याच आहेत ना? त्यांना जर मिपावर टाकायच्या असतील, मुक्तपीठामध्ये नाहीतर अनाहितावर तो त्यांचा प्रश्न आहे.
असला माल-विक ला जात नाही. हा निव्वळ घरबसल्या (काहीही) माल-विकायचा कुटीलोद्योग वाटतोयं. - व्हेरी चीप शॉट.

चिन्मय खंडागळे's picture

1 May 2014 - 6:32 pm | चिन्मय खंडागळे

काही लोकांचा स्वतःचा माल खपत नसला की दुसर्‍यांचा खपताना पाहून अशी मत्सरबाधा होते. चालायचंच.

मला स्वतःला बहिणाबाईंच्या काही ओव्या वाचून आश्चर्यचकित व्हायला होतं. कुठल्याही कवीला लाजवेल अशी इमेजरी, गेयता आणि त्याच वेळी साध्यासुध्या शब्दांत सांगितलेलं खोल तत्वज्ञान पाहून एका अशिक्षित अडाणी बाईला हे कसं सुचलं असेल हा विचार करून थक्क व्हायला होतं.

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2014 - 2:00 pm | टवाळ कार्टा

आता "शिव्या" विडंबन कोण लिहितो बघू :)

टवाळ कार्टा's picture

30 Apr 2014 - 2:01 pm | टवाळ कार्टा

शिव्या का शीव्या??? :(

डायरीची भेट देणार कोण "पयला" तेच बघायला आलो होतो...

मालविका लेखन आवडले. थोडे विस्ताराने लिहा. ओव्या हा मराठी कवितेतला अविभाज्य काव्यप्रकार आहे. हल्ली स्त्रीवादी कविता/लेखन म्हणून जे असते त्याचे मूळ ओव्यांमध्ये असेल का ?
माझी आजीही ओव्या म्हणायची. अंथरुणात गुरफटून ते गुणगुणनं ऐकताना अगदी लहान असतानाही काहीतरी उमगल्यासारखं वाटायचं. त्या ओव्यांचा थेट अर्थ तेव्हा कदाचित कळत नसेल. पण आजी आपल्या मनातल्या गाठी उकलतेय, काहीतरी सांगू पाहातेय असं वाटायचं. एरवी अतिशय रागीट वागणारे आजोबाही त्यावेळी शांतपणे जप करत बसलेले असायचे.
बाकी 'ओवी' वर लिहिताना ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचा संदर्भ,उल्लेख आला असता तर अतिशय अभ्यासपूर्ण लेख झाला असता.

बाकी प्रतिसादांबद्दल म्हणाल तर क्ष्रीरसागरातून नेहमी रत्नच बाहेर पडतील याची खात्री खुद्द देवांनाही नसते. प्रतिसादांच्या सागर मंथनात काही निकस आले तरी दुर्लक्ष करावे हे उत्तम.

पैसा's picture

30 Apr 2014 - 3:38 pm | पैसा

अजून जरा विस्ताराने लिहिलेलं आवडलं असतं.

सुहास..'s picture

30 Apr 2014 - 9:42 pm | सुहास..

तुला है ना माया ताई ! काम नाहीत सध्या बहुधा .......

अग किमान सुरु तर होवु दे ...

कवितानागेश's picture

30 Apr 2014 - 3:29 pm | कवितानागेश

या जुन्या ओव्या जरी हल्ली फार कुणाला येत नसल्या तरी हल्ली काही नविन कविता याच छंदात लिहिलेल्या वाचल्या आहेत. संदीप खरेच्या तर नक्कीच आहेत. अजूनही आहेत. जरा शोधून लिहिते.

मितान's picture

30 Apr 2014 - 3:35 pm | मितान

प्रिये ये निघोनी... अशी सुरुवात आठवतेय.

ग्रेसांची 'तुला पाहिले मी नदीच्या किनारी' यांच छंदातली का गं ?

बॅटमॅन's picture

30 Apr 2014 - 3:40 pm | बॅटमॅन

दिलेली ओळ ही पूर्ण एक ओळ असेल तर भुजंगप्रयात, त्यापलीकडे अजून या ओळीइतकेच शेपूट असेल तर सुमंदारमाला.

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2014 - 3:44 pm | पिलीयन रायडर

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे आता वाटताहे..
कुणालाच जे सांगता येत नाही..
असे काहीसे मन्मनी दाटताहे..

मितान's picture

30 Apr 2014 - 3:48 pm | मितान

धन्यवाद बॅटमन !
सुमंदारमाला, भुजंगप्रयात ही फक्त नावे आठवताहेत :(
वृत्त आणि छंदांवर एक धागा निघावा ही मनीषा !

कवितानागेश's picture

30 Apr 2014 - 3:42 pm | कवितानागेश

प्रिये ये निघोनि घनांच्या कडेनी, अशी सुरुवात आहे, ती कविता मनाच्या श्लोकांच्या छंदात आहे. खूप आर्ततेनी म्हणतो तो ती कविता.
त्याच्या 'कवितांची वही' या संग्रहात आहे ओवीसारखी रचना, त्यात शेवटच्या ओवीत 'संदू म्हणे' असे शब्द आहेत. :)

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2014 - 3:47 pm | पिलीयन रायडर

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधून नेते
कधी मुक्‍तता हे कुणाला न ठावे

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कधी घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देऊन येतो

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे न वाहे ऊरातून श्वास
ऊरा-अंतरातून यांत्रीकतेने
फिरे फक्‍त वारा किंवा तोही भास

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतु तयांच्या
नशीबी कसे सांग तुजला पहाणे

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सगळ्यात यात
मिठीतून देईन सगळा पुरावा

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे

इथे ऐका:- http://www.aathavanitli-gani.com/Song/Priye_Ye_Nighoni_1
________________________________________

नको ओढ लावून घेऊ उन्हाची
जसे पारधी हे तसे तीर टोची
पिसांमागुनी गे पिसे दग्ध होती
भरारी पडे मृत्तीकेशीच अंती

तसे ऊन्ह मार्गात होतेच माझ्या
पदांशी भूमी तप्त होतीच माझ्या
परंतु तुझे हात हातात आले
व्यथांचे तळे गा नीळेशार झाले

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची

फुला या उन्हाचा तुला ठाव नाही
बरे तप्त देशी तुझा गाव नाही
म्हणोनी तुझे ओठ गातात ओले
तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोली

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे.....

इथे ऐका:- http://www.aathavanitli-gani.com/Song/Priye_Ye_Nighoni_2

आणि जरुर ऐका...

कवितानागेश's picture

30 Apr 2014 - 4:06 pm | कवितानागेश

फार दिवसांनी वाचतेय.. थांकू. :)

दिपक.कुवेत's picture

1 May 2014 - 2:41 pm | दिपक.कुवेत

बर्‍याच दिवसांनी एकले. थॅंक्स पिरा.

सस्नेह's picture

1 May 2014 - 3:10 pm | सस्नेह

धन्यू गो पिरा. काय भावविभोर कविता अन ओढाळ शब्द ! भर उन्हात श्रावणसरी बरसल्यासार्खं वाटलं !
अन ओव्याही भारी आहेत. लडिवाळ.

शुचि's picture

30 Apr 2014 - 5:07 pm | शुचि

कालच खापरे वरती अत्यंत गोड ओव्या वाचत होते त्यातील काही पुढे -

वाटेच्या वाटसरा नको करुंस उभा घोडा
कंथ माझा जंगलांत मोजे वाघिणीच्या दाढा
______________________________
ल्येकापरायास लेक कशानं उणी झाली
आईबापाला ओवी गाते कैलासी ऐंकुं गेली
___________________________________
वाणियाच्या घरी खडीसाखर मोलाची
माझिया घरामंदी लेक ल्येकाच्या तोलाची
_______________________________________
थोरला माझा लेक वाडयाचा कळस
धाकुटी बाळाबाई माझ्या दारीची तुळस

बॅटमॅन's picture

30 Apr 2014 - 5:10 pm | बॅटमॅन

खापरेंची साईट जबराट आहे.

शुचि's picture

30 Apr 2014 - 5:13 pm | शुचि

होय.

राम चाले वाटे ,लक्षमण झाडी काटे
ऐसे बंधू नाही कोठे,पृथ्वीवर"

किती गोड आहे ओवी. इथे या ओव्या दिल्याबद्दल धन्यवाद मालविका

नाय म्हणलं, म्या काय म्हन्तो, प पु मधाळसिंहजी योयोवाले, ह्यांची ऐक तरी अनुभवावी …
चार बोतल वोडका, काम मेरा रोज़ का ।।
ना मुझको कोई रोके, ना किसी ने रोका ।।

मालविका, येऊदेत अजूनही ओव्या. इथेच लिहा, अधिकांश मिपाकरांना आवडेल वाचायला, असं वाटत.
आवडत नाहीत त्यांनी वाचू नका, पण आम आदमीला ओव्या वाचण्यापासून रोखू नका! ;)

सखी's picture

30 Apr 2014 - 9:03 pm | सखी

छान आहेत ह्या ओव्या, किती गोडवा आहे त्यात. ब-याचशा ऐकल्याही नव्हत्या. मितान म्हणाली तसे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचा संदर्भ आला असता तर छान वाटलेच असते त्याबरोबरच साक्षात सरस्वती म्हणुन ज्या बहीणाबाईंनी इतक्या ओव्या लिहल्यात की नक्की कोणती ओवी जास्त आवडते हे सांगणे कठीण होऊन बसते. त्यातल्या त्यात ह्या काही ओव्या देते आहे.
“धरित्रीच्या कुशीमध्ये बी-बियाणं निजली
वर पसरली माती, जशी शाल पांघरली !

बीय टरारे भुईत, सर्वे कोंब आले वर्हे
बहरले शेत जसे अंगावरले शहारे !

ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन !

टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी
जसे करती कारोन्या (करुणा), होऊ दे रे आबादानी !

काय म्हने, कणसं कशी वारियाने डुलताती
दाने आली गाडी माडी…

देव अजब गारोडी, देव अजब गारोडी !”

स्पंदना's picture

1 May 2014 - 4:53 am | स्पंदना

फार छान ओव्या वाचायला मिळाल्या.
त्या त्या काळच काव्यच ते!

किसन शिंदे's picture

1 May 2014 - 2:53 pm | किसन शिंदे

ओव्या छान!

कारण आजकाल जुन्या गोष्टीना खूपच भाव आलाय antique म्हणुन.

रच्याकने इथे antique च्या ऐवजी दुर्मिळ हा शब्द वापरता आला असता.

बॅटमॅन's picture

1 May 2014 - 5:27 pm | बॅटमॅन

नाही. दुर्मिळ असलेली प्रत्येक गोष्ट अँटिक अर्थात जुनी नसते.

किसन शिंदे's picture

1 May 2014 - 5:28 pm | किसन शिंदे

त्याला प्रतिशब्द काय असावा मराठीत?

अनुप ढेरे's picture

1 May 2014 - 5:45 pm | अनुप ढेरे

पुरातन बहुदा

बॅटमॅन's picture

1 May 2014 - 5:58 pm | बॅटमॅन

येस. जुनी, जुनाट, पुरातन, जुनीपुराणी, इ.इ.

होय रेअर म्हणजे दुर्मीळ. अँटीक म्हणजे जुनी.

भावना कल्लोळ's picture

2 May 2014 - 3:09 pm | भावना कल्लोळ

बिना कपाशीन उले,
त्याले बोंड म्हंणू नही,
हरी नामाइना बोले,
त्याले तोंड म्हंणू नही.