ओव्या
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची . घरात सुना आल्यवर बाकी जेवणाचा कारभार त्यांच्यावर आजीने सोपवला होता पण दूध, दही मात्रा हे सगळ काम आजीने आपल्या हातात ठेवल होत. कारण ते सोवळ्याच(?)होत.आजी मोठ्या घड्यात दही घेऊन ते घुसळयला उभी रहायची. आमच्या कडे ३/४ फुटी उंच अशी लाकडी रवी होती. तिला दोरी बांधून ती मागे पुढे ओढताना आजीचा छानु सूर लागायचा आणि मग आजी त्या वेळी ज्या सुचतिल त्या ओव्या म्हणायची. कधी मुलाना झोपवायच्या , डोहाळे जेवणाच्या , मुलीच्या पाठवणीच्या तर कधी लग्नाच्या वेळेच्या घना भरणाच्या. मी खूपच लहान असल्याने कधीच तिच्या ओव्यंकडे लक्षा दिल नाही.आई ला काही ओव्या पाठ होत्या . पण आई काही नेहमी म्हणायची नाही त्यामुळे तिला देखील त्या कायम लक्षात नाही राहिल्या . आजी आमची गरजेपुरात लिहावाचयाला शिकली होती पण म्हणून तिने कधी अस ओव्या गाणी लिहून नाही ठेवली . कायम ती म्हणून म्हणून तिच्या लक्षात होती . ज्या काही ओव्या मला आठवतात त्या झलक म्हणून-
"डोहाळे दशरथ ,पुसतो कौसल्येला
हे राजकुमारी ,काय आवडे तुजला "
'पहिली माझी ओवी ,पहिला माझा नेम
तुळशिखाली राम,पोथी वाचे "
"राम रथवारी , लक्षमण घोड्यावरी
मागूनि येई डोली,सीतामाईची "
"राम चाले वाटे ,लक्षमण झाडी काटे
ऐसे बंधू नाही कोठे,पृथ्वीवर"
"रामाची ग सीता, लक्षमानाची वाहिनी
दशरथा ची पहिली,ज्येष्ठ सुन "
"घाना भारीयेला,विडा ठेवियेला
आमंत्रण देण्या आलो,देवराया "
"ईशान बाळ गोरा हलदीने न्हाई
पिवळे पाणी जाई ,शेवंतीला "
"हाती कडी तोडे ,गळ्यात कंठी गोफ
कुण्या सावकारचा लेक , ईशान बाळ "
या आणि अश्या प्रकारच्या कितीतरी ओव्या आजीला पाठ होत्या.यातच ती एक छान पाठवणीच गाण म्हणायची .आज अजिबातच आठवत नाही ते .आज वाटते आजीने त्या लिहून ठेवल्या असत्या तर माझ्यासाठी एक ठेवा झाला असता . पण रोजच्या कामाच्या रगाड्यात कुठल तिला लिहून वगैरे ठेवायची आठवण रहनार ?माझ्या आईने तरी जेव्हा पाठ होत्या तेव्हा लिहून ठेवायला हव्या होत्या . पण आज माझ्यासाठी त्या एवढ्या महतवाच्या होतील याची तिला तरी काय कल्पना ?खर तर कुणालाच दोष देण्याचा हेतू नाही पण एक अमूल्य ठेवा मात्रा हरवल्यासारखा वाटतोय . आज आईने शिकवलेल्या ओव्या म्हणून मी ईशान झोपवते . निदान आता माझ्या जेवाड्या ओवा पाठ आहेत त्या तरी मी नक्कीच लिहून माझ्या संग्रही ठेवणार आहे . काय माहित कदाचित माझी भाची पुढच्या वेळी मागत येईल. कारण आजकाल जुन्या गोष्टीना खूपच भाव आलाय .antique म्हणुन.
प्रतिक्रिया
ओव्या आठवत नाहीत तरी लेख टाकायची घाई कशाला ?
अनाहिता नक्की काय आहे असं
मी
धन्यवाद..!
अनाहिता नक्की काय आहे असं
डायरी भेट अन वाढदिवसाच्या
जितक्या आठवतात तितक्या ओव्या
काही लोकांचा स्वतःचा माल खपत
आता "शिव्या" विडंबन कोण
शिव्या का शीव्या???
डायरीची भेट देणार कोण "पयला"
मालविका लेखन आवडले. थोडे
+१
तुला है ना माया ताई ! काम
या जुन्या ओव्या जरी हल्ली फार
ह्म....
वृत्त
प्रिये ये निघोनी घनांच्या
धन्यवाद बॅटमन !
प्रिये ये निघोनि घनांच्या
मस्त आहे ही कविता...
फार दिवसांनी वाचतेय.. थांकू.
येस्स मी पण
मस्तच !
खापरे
खापरेंची साईट जबराट आहे.
+1
राम चाले वाटे ,लक्षमण झाडी
प पु मधाळसिंहजी योयोवाले, ह्यांची ऐक तरी अनुभवावी …
मालविका, येऊदेत अजूनही ओव्या.
छान आहेत ह्या ओव्या
फार छान ओव्या वाचायला
ओव्या छान!
नाही. दुर्मिळ असलेली
त्याला प्रतिशब्द काय असावा
पुरातन बहुदा
येस. जुनी, जुनाट, पुरातन,
होय रेअर म्हणजे दुर्मीळ.
बिना कपाशीन उले,