कान्हा नॅशनल पार्क - रामटेक (भाग ६) समाप्त

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
28 Mar 2014 - 3:47 pm

कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १)
कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २)
कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३)
कान्हा नॅशनल पार्क - वाघ....... (भाग ४)
कान्हा नॅशनल पार्क - भोरमदेव (भाग ५)

भोरमदेव झाल्यानंतर हॉटेल वर येऊन सर्वांच्या (मागे राहिलेल्यांच्या) शिव्या खाऊन.. वर त्यांनाच (उगाच) ४ शिव्या घालुन मी झोपले.. चिडचिडीवर उतारा म्हणुन खरेदी हा प्रकार (नशिबाने) शेवटी ठेवला होता.. बाकी सगळे खरेदीला निघुन गेले.. म्हणजे काय तर गेट वर एक लहानसे दुकान आहे.. तिथे पगमार्क असलेले टी शर्ट वगैरे निरुपयोगी गोष्टी मिळतात.. मला त्यातल्या त्यात खुप सारे पॉकेट्स असलेल्या जर्किन मध्ये इंटरेस्ट होता.. तेवढं माझ्यासाठि आणा म्हणुन मी पांघरुणात घुसुन समाधिस्त झाले..

दुसर्‍या दिवशी सकाळी रामटेक पाहुन नागपुरात मुक्काम करायचा असा प्लान होता.. सकाळी ११-१२ वाजलेच निघायला.. मुबावाल्यांनी लहान मुलं सोबत आहेत म्हणुन चकटफु नाश्ता दिला..

संध्याकाळी ६ वाजले आम्हाला रामटेकला पोहोचायला.. आधी आम्ही कालिदासाचे स्मारक पाहिले.. नंतर मंदिर..

हे कालिदासाचे स्मारक..

Smarak 1

इथे कालिदासाच्या काव्यांवर आधारित चित्रे (टाईल्सच्या तुकड्यांपासुन बनवलेली आणि काही पेंटिंग्स) आहेत.. कालिदासाचे संपुर्ण काव्य (मला वाटतं मेघदुत असावं..) मागच्या बाजुस कोरलेले आहे.. खाली मराठी अनुवाद आहे.. (त्याचे फोटो काही माझ्या कडे नाहियेत..)

Smarak 2

स्मारक उंचावर आहे.. तिथुन दिसणारे खालचे दृष्य...

Smarak 3

Smarak 4

कालिदासाच्या काव्यांबद्दल थोडक्यात माहिती आणि खाली त्यावर आधारित चित्र अशी सुंदर रचना आहे.. वर तो घुमट दिसतो आहे त्यात आतमध्ये कालिदासाच्या काव्यांवर आधारित पेंटिग्स आहेत.. एकाहुन एक सुंदर पेंटिंग्स आहेत.. खाली नावं पाहुन कळालं की कलाकारही अगदी नामांकित आहेत..

वर्णन आणि टाइल्स पासुन बनवलेली चित्रे..

मेघदूतम

Meghdut

Meghdut 2

अभिज्ञान शाकुंतलम

AS

AS2

विक्रमौर्वशियम

Vikramaurvashiyam

Vikramaurvashiyam 2

कुमारसंभवम

Kumara sambhav

Kumara sambhav 2

अभिज्ञान शाकुंतलम (अजुन एक दृष्य..)

abhijnaan shakuntalam

abhijnaan shakuntalam 2

रघुवंशम

Raghuvasham

Raghuvasham 2

आतमधली पेंटिग्स..

1

2

3

4

5

हे मला अर्वात आवडलेले.. मुरली लाहोटी ह्यांचे..

6

एकंदरीत स्मारक सुंदरच आहे.. पण आपल्यावर उपकार म्हणुन ठेवल्यासारखे सुरु आहे.. ५ रु प्रवेश फी असली तरी आत मध्ये तसं काही विषेश व्यवस्था नाही.. जरा बाग वगैरे करता येईल.. कारंजेही बंदच पडलेले आहे (महाराष्ट्रात चालु कारंजं मी फारसं कधी पाहिलच नाहीये.. कारंजी असतातच बहुदा बंद पडण्यासाठी..)

एवढं सगळं पाहिस्तोवर अंधार पडला होता.. त्यामुळे मंदिराचे फार काही फोटो काढता आले नाहीते.. पण मंदिरही छान आहे..

प्रवेशद्वार आणि त्यातुन दिसणारे आतले कळस..

Ram Mandir

Ram Mandir

ह्या फोटोमधुन काही अर्थबोध होत नसला तरी साधारण कल्पना येण्यासाठी देत आहे..

आतल्या मुर्तींचे फोटो काढायची परवानगी नाही, पण मुर्ती सुरेख आहेत अगदी..

मंदिराबाहेर तटबंदी आहे.. पायर्‍या चढुन तटबंदीवरुन खाली पहाता येतं.. आणि तिथुन दिसणारा हा रामटेक गावाचा नजारा..

Ramtek Gav

दिक्षाभुमीचे काही फोटो

Chaityabhumi

Deeksha bhumi

Deeksha bhumi

एकंदरीत कान्हा - भोरमदेव - रामटेक - नागपुर ट्रिप मस्त झाली.. वाघ दिसला नसला तरी भोरमदेवच्या मंदिरानी ती कसर भरुन काढली.. रामटेक मधलं कालिदास स्मारक बोनस होता..

खुप दिवसांनी माहेरच्यांसोबत मोठ्या ट्रिपला गेले होते.. नवर्‍यासोबत तर माझी ही पहिली ट्रिप.. त्यात अबीर सोबत.. त्यामुळे प्रवासासोबत डायपर, मऊ भात आणि सर्दी ह्यांचही टेन्शन होतंच..! निघतानाच बहीण किती वेळा रडणार.. आई घेतलेल्या १ टन कपड्यांपैकी किती कपडे खरंच घालणार.. कोण पहिली उलटी करणार.. असल्या अनेक बेट्स लावल्या होत्या.. त्यांचे हिशोब अजुनही व्ह्यायचे आहेत..

ह्या लेखांमधुन सगळी ट्रिप परत अनुभवली.. कदाचित अजुन १०-१५ वर्षांनी नुसते फोटो बघताना जेवढी मजा येणार नाही तेवढी हे लेख वाचुन येईल..

सगळ्या वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..!

फोटो क्रेडिट - बहीण आणि नवरा... हजारोंनी फोटो काढल्याबद्दल धन्यवाद!

प्रतिक्रिया

मीता's picture

28 Mar 2014 - 4:17 pm | मीता

खुप मस्त!!!तुझ्या लेखांमधून आम्हीही कान्हा फिरून आलो.

पैसा's picture

28 Mar 2014 - 6:45 pm | पैसा

या भागात जास्त लिहिलं नाहीस, पण कालिदास स्मारकाच्या फोटोंनी कसर भरून काढली!

रेवती's picture

28 Mar 2014 - 7:30 pm | रेवती

छान!

अक्खी मालिका वाचलीये, स्वताच फिरून आल्यासारख वाटल...मस्तच!

खटपट्या's picture

28 Mar 2014 - 10:02 pm | खटपट्या

छान छान फोटो !!!

सर्व भागांवर प्रतिसाद दिले नाहीत, पण वाचले आहेत आणि आवडलेत.

राघवेंद्र's picture

28 Mar 2014 - 11:18 pm | राघवेंद्र

आमची ही सहल मस्त झाली.
खुप धन्यवाद !!!

राघवेंद्र

जेपी's picture

29 Mar 2014 - 9:57 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

इशा१२३'s picture

29 Mar 2014 - 3:03 pm | इशा१२३

आधिचे भाग वाचलेत..छान माहिती आणी फोटो...

राही's picture

29 Mar 2014 - 4:13 pm | राही

सगळे भाग वाचले. प्रतिसाद लिहिलेच असे नाही. पण आवडले. फोटो आणि माहितीपेक्षा लिहिण्याची नर्मविनोदी शैली फार आवडली.

सस्नेह's picture

1 Apr 2014 - 2:42 pm | सस्नेह

फोटो आणि वर्णन लैच खुसखुशीत झालेत !

प्यारे१'s picture

1 Apr 2014 - 2:46 pm | प्यारे१

+२

अत्रुप्त आत्मा's picture

29 Mar 2014 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा

@रामटेक गावाचा नजारा..>>> लै मंजे लैच भारी!

प्रचेतस's picture

29 Mar 2014 - 9:32 pm | प्रचेतस

रामटेक नाव पाहून प्रचंड उत्सुकता वाटली होती पण धागा पाहिल्यावर अंमळ निराशा झाली म्हणाजे कालिदास स्मारक छानच यात वादच नाही पण रामटेकची जुनी मंदिरे तुम्ही पाहायला हवी होती.
भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी काही रामटेकला आहेत. वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त हिचा शिलालेख (इ.स. ४थे शतक) तिथल्या केवल नरसिंह मंदिरावर आहे.

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2014 - 1:51 pm | पिलीयन रायडर

त्याचं झालं असं की रामटेक आमच्या प्लान मध्ये नव्हतंच.. आमचा डायवर नागपुरचा असल्याने त्याची फार इच्छा होती की आम्ही इतक्या लांब आलो आहोत तर रामटेक पहावच.. पण सगळं अचानक ठरल्यानं खुप गडबड उडाली आणि आम्ही रामटेकला पोहोचेस्तोवर अंधार पडलेला.. त्यामुळे स्मारक आणि त्याच्या बाजुचे मंदिर एवढेच काय ते पाहिले. त्यातही मंदिरात उत्सवा निमित्त रंगरंगोटी आणि डागडुजी चालु असल्याने मंदिरही नीट पहाता आले नाही...

भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी काही रामटेकला आहेत. वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त हिचा शिलालेख (इ.स. ४थे शतक) तिथल्या केवल नरसिंह मंदिरावर आहे.

नागपुरात परत जाण्याचा योग पुढच्या १-२ वर्षात निश्चित येईलच.. तेव्हा हे १००% पाहुन परत वृतांत लिहीन!! त्यामुळे ह्या माहिती बद्दल मंडळ तहेदिलसे आभारी आहे..! :)

सगळे भाग छान लिहीलेस!

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2014 - 1:52 pm | पिलीयन रायडर

सगळ्यांनाच धन्यवाद!

मृत्युन्जय's picture

1 Apr 2014 - 3:47 pm | मृत्युन्जय

मस्तच. मालिका आवडली

नानुअण्णा's picture

6 Feb 2020 - 7:33 pm | नानुअण्णा

सुंदर लिहिलंय, कान्हाला जायचा विचार आहे, रस्ते आता चांगले असतील अशी अपेक्षा