'सुराई'
अजून देहातुनी उसळते अजाण शाई
अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई
अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची
अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई
अधीर गात्रात रात होते पहाटताना ...
अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई
मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो
परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई
हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे
भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई !
अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे
अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
14 Mar 2014 - 7:01 pm | अत्रुप्त आत्मा
वाह!
14 Mar 2014 - 7:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है रचना आवडली.
-दिलीप बिरुटे
14 Mar 2014 - 9:40 pm | drsunilahirrao
खूप खूप आभार अत्रुप्त आत्मा आणि प्रा.डॉ दिलीप बिरुटे