चला, असाही एक वाढदिवस...

अजय जोशी's picture
अजय जोशी in जे न देखे रवी...
11 Mar 2014 - 7:27 pm

रोजचे उठणे
रोजचे आवरणे
रोजचे तेच तेच करणे
आजही तसेच....?
चला..., असाही एक वाढदिवस...

सकाळपासून जुंपलेला....
उन्हातान्हात राबलेला...
ठिकठिकाणी रापलेला...
ओथंबून वाहिला आजही....
चला.., असाही एक वाढदिवस...

जमेल तितकं करायचं..
जमेल तितकं जगायचं...
उरामध्ये दु:ख लपवून
जमेल तितकं हसायचं...
आपलं मन आपल्यापाशी...
दुसर्‍याचं मात्र सांभाळायचं नेहमी...
आजही सांभाळतोच आहे ना....
चला.., असाही एक वाढदिवस....

नेहमी इतरांचा विचार करताना
आपल्यासाठी नसलेला....
कधी कधी तर आपल्यातही नसलेला...
आला कधी...
गेला कधी...
कळत नाही कधी
अगदी आजही...?
चला.., असाही एक वाढदिवस...

प्रत्येक वाढदिवशी माणसे येतात...
आनंदाचं उधाण आणतात...
शुभेच्छांच्या पंगती
वातावरण भारावून टाकतात...
काळ पुढे सरकत असतो...
गोची होते इथेच...
मनातल्या काही भावना
राहतात जिथल्या तिथेच...
मनातील काही दारे बंद करून..
आज हसलो मनसोक्त....
चला, असाही एक वाढदिवस...
चला.., असाही एक वाढदिवस....

कविता

प्रतिक्रिया

अतिशय आवडली कविता.
मनापासून.