अस्वस्थता अस्वस्थता
अस्वस्थता अस्वस्थता
राजकारण्यांच्या चालण्यामुळे
राजकारण्यांच्या चालींमुळे
त्यांनी त्यांच्या सोयींसाठी
चालवलेल्या राजकारणांमुळे
अस्वस्थता अस्वस्थता
दिशाहीन आंदोलनांमुळे
चारित्र्यहीन आंदोलकांमुळे
त्यांनी त्यांच्या सोयींसाठी
चालवलेल्या चळवळींमुळे
अस्वस्थता अस्वस्थता
हरवलेल्या मित्रांमुळे
रोज भेटणार्या शत्रुंमुळे
त्यांनी त्यांच्या सोयींसाठी
जुळवु पाहिलेल्या नात्यांमुळे
- कवी म.ना.दे.
प्रतिक्रिया
21 Feb 2014 - 8:22 pm | धन्या
अहो हे सगळं प्रारब्धाचा भाग आहे. पाहा बरे कुंडली मांडून. :)
21 Feb 2014 - 8:38 pm | विवेकपटाईत
सकाळी लवकर उठा
रामदेव बाबा बघा
दीर्घ श्वास घ्या
हळू हळू सोडा
शांतीचे ध्यान करा (?)
i-m_so_happy* *HAPPY* :happy: :HAPPY: :Happy: ^^
अस्वस्थता दूर करा